Submitted by Yogita Maayboli on 23 July, 2019 - 02:09
अशाच एका आठवणीत भेटलीस आम्हाला तू
प्रत्येक अडचणींना पार करताना दिसलीस आम्हाला तू
कधी मोठी बहीण, कधी मैत्रीण, तर कधी आई होऊन पाठीशी उभी तुझीच सावली
तुझ्या रूपाने जणू काही मिळाली आम्हाला एक नवीन माउली
तुझे ते गुबरे गाल,कधी हसताना कधी फुगताना दिसतातआम्हाला
पण त्यात लपलेली अनामिक चिंता लपवताना भासलीस तू
तुझ्या डोळ्यातला तो तीळ जणू तुला सगळ्यापेक्षा वेगळेकरून गेला
आणि त्याच डोळ्यात लपलेली काळजी तुझ्या अजूनजवळ घेऊन गेला
मुलांसाठी राबताना नेहमीच आम्हाला दिसलीस तू
पण त्यातही तुझ्यातल्या "मी" ला शोधताना भासलीस तू
अशाच एका आठवणीत भेटलीस आम्हाला तू
आम्हा भावंडात नेहमीच मनाने खंबीर भासलीस तू
-योगी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
ही तुमची कविता आहे का?
ही तुमची कविता आहे का?
आजच एका मैत्रिणीच्या बहिणीचा वादि आहे तर तिने वॉअ स्टेटस वर ही कविता तिच्या ताईच्या फोटोसह टाकली आहे.
सेमच आहे का सगळी कविता. एस.एस
सेमच आहे का सगळी कविता. एस.एस. टाका.
हो. त्यात ताईचा फोटो आहे. एका
हो. त्यात ताईचा फोटो आहे. एका बाजुला अर्ध्याबाजुला कविता.
हो हि माझीच कविता आहे आणि ती
हो ही माझीच कविता आहे आणि ती माझीच बहीण आहे . आम्ही ३ बहिणी
गुड.
गुड.
हो ही माझीच कविता आहे आणि ती
हो ही माझीच कविता आहे आणि ती माझीच बहीण आहे . आम्ही ३ बहिणी>>>>>>>> ऑ??
योगिता तुमचं खरं नाव आहे का?
योगिता, छान
योगिता, छान
ताईला वादिच्या शुभेच्छा
मी तुमच्या ताईची मैत्रीण आहे.