कोरोना

मास्कमुक्त महाराष्ट्र ! कोरोनाचे सारे निर्बंध हटवले.

Submitted by ऋन्मेऽऽष on 31 March, 2022 - 11:33

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पूर्ण मंत्रीमंडळाने गुढी पाडव्यापासून अर्थात २ एप्रिलपासून महाराष्ट्रातील सर्व निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना वाटत असेल मास्क लावावा, त्यांनी तो लावावा. ज्यांना वाटत असेल मास्क लावू नये, त्यांनी लावू नये. आता कोणतंही बंधन राज्यात राहिलेलं नाही
https://www.loksatta.com/maharashtra/corona-restrictions-removed-complet...

विषय: 

कधी ,कधी सरतील ह्या भयानक विषाणूचे दिवस चार?

Submitted by kavyarshi_16 on 24 June, 2021 - 05:23

कधी ,कधी सरतील ह्या भयानक विषाणूचे दिवस चार?
भगवंता तुझ्या ह्या लेकरांना शक्तीची गरज आहे फार

आता या आभासी(virtual) दुनियेचा आला आहे कंटाळा
पोरंही विचारू लागली आहेत कोणती असती ती शाळा?

हा विषाणू जणू कली आहे या विचारात वेळ चाललाय व्यर्थ
भगवंता तुझ्या कल्की अवताराचे चे दाखव बरं सामर्थ्य

इतके तर कळाले धन,दौलत ,पद, पैसा निष्फळ आहे सर्व
त्यामुळेच तर उमगले माणसातला,धवल, खाकीतला देव

हे भगवंता,कित्येकांनी श्वास सोडला, कित्येकांचा घास पळाला
त्यामुळेच त्यांच्या जीवलगांचा रडून रडून डोळ्यांचा ही बांध फुटला

कोरोना विधवेसाठी सरकारी मदत कशी मिळवायची?

Submitted by रीया on 10 June, 2021 - 20:56

आमच्या शेजारच्या काका मागच्या वर्षी ऑक्टोबर मध्ये कोरोना ने गेले. त्यांची आर्थिक परिस्थिती फार चांगली नाही. कुठे तरी बातमी वाचली होती की कोरोना मुले विधवा झालेल्या स्त्रियांसाठी सरकार मदत देत आहे. एक फॉर्म ऑनलाईन मिळाला पण तो कुठे पाठवायचा आहे वगैरे काही माहिती त्यावर नाही. कोणाला काही माहिती असेल तर प्लिज शेअर करा.

मोदी कोरोना आणि प्रतिमा व्यवस्थापन

Submitted by कॅपिटलिस्ट-बंड्या on 26 May, 2021 - 10:55

गेल्या काही दिवसात देशात कोरोना ने हाहाकार उडालाय. हजारो लोक मृत्युमुखी पडलेत आणि अजूनही पडतायेत. या मध्ये मोदी, भाजप आणि सरकार एकुणात पूर्णपणे गायब आहे आणि मदत केल्याचा देखावा देखील करत नाहीये. लोकांना पूर्णपणे वाऱ्यावर सोडून दिलाय.

ज्या तत्परतेने सरकार उत्तर प्रदेश च्या निवडणुकीच्या तयारीला लागलेय जी २०२२ मध्ये आहे ते पाहता हि तत्परता कोरोना बद्दल का नाही दाखवली गेली?

कोरोना बद्दल काम करायच्या ऐवजी धार्मिक दिशा देणे, काँग्रेस वर आरोप करणे, टीव्ही वर रडणे किंवा सुशांत सिंग असे नेहमीचे यशस्वी कार्यक्रम या वेळेस चालले नाही.

विषय: 
शब्दखुणा: 

कोरोनामुळे तुम्हाला जीवनातील कोणकोणत्या गोष्टींचा फोलपणा कळाला..?

Submitted by DJ....... on 18 May, 2021 - 04:19

कोरोना काळ सुरू होऊन आता वर्ष होऊन गेलं. कोरोना भारतात येण्याआधी जीवनात सर्व काही सुरळीत चालू होतं. सकाळी उठलं की आधी जॉगिंग.. घरी येऊन आंघोळ.. झटपट आवरून चहा.. वर्तमानपत्र.. करता करताच ऑफिसची बस गाठण्याची धांदल. ऑफिसमधे सर्वकाही वर्षानुवर्षं जसं सुरू होतं अगदी तसंच तेंव्हाही सुरु होतं... संध्याकाळी पुन्हा ऑफिस ते घर.. घरी आलं की मुलांचा कल्ला.. संध्याकाळी जेवायला काय भाजी/कालवण बनवायची यावर खल.. जेवण झालं की टी.व्ही. आणि नंतर शतपावली झाली की झोप अस किती सुखाचं आयुष्य सुरू होतं असं वाटण्यासारखी परिस्थिती.. कधी एखाद्या वीकेंडला जोडून आलेल्या सुट्टीत एस.टी.ने गावी जाणं..

शब्दखुणा: 

आमचीबी आंटी जन टेस

Submitted by पाषाणभेद on 26 April, 2021 - 13:18

आमचीबी आंटी जन टेस

गावात कायबी काम नव्हतं आजकाल. सगळे निसते बशेल. कोरूनामुळं नाम्याचं रसाचं गुर्‍हाळबी बंद पडेल व्हतं.
त्येच्यायच्या त्या कोरूनाच्या. सकाळ संध्याकाळचा आमच्यावाला आड्डा आसा बंद पडेल. वावरातबी कांदे काढेल व्हते, आन या येळेला भाव काय मिळाला नाय. टॅक्टरचा हप्ता घरातून द्यावा लागला, आता बोला.

या कोरूनाची आंटी जन टेस करून घ्या, आंटी जन टेस करून घ्या म्हनून मलेरीया डाक्टर आन आशाबाई गावात फिरत व्हती. मलेरीया डाक्टर लई बाराचं हाय बरं का आमच्या आरोग्य शेंटरवरचं. कायम आशाबाईला बरूबर घेवूनच फिरतं लेकाचं.

जाऊद्या, आपल्याला काय म्हना.

कोरोनाचे दूरगामी परिणाम

Submitted by अथेना on 15 April, 2021 - 12:59

टीप- या विषयावर धागा आधीच काढला असेल, तर हा काढून टाकेन.

गेले वर्षभर आपण सगळेच या महामारीशी लढतोय पण येणार्‍या काही वर्षात परिणाम काय होतील? सध्यातरी फैलाव थाम्बण्याचे नाव घेत नाहिये.. नवनवीन स्ट्रेन्स येत आहेत..

१. उद्योगधन्दे बन्द
२. शैक्शणिक वर्षाचे नुकसान
३. नोकर्‍या जाणे
४. शहरातील लोन्ढा गावाकडे परत (काहिप्रमाणात)
५. उपासमार

विषय: 
शब्दखुणा: 

घरात न आलेला नको असलेला पाहुणा अर्थात कोविड-१९ अन त्यामुळे टाकलेल्या सुटकेच्या नि:श्वासाची गोष्ट

Submitted by DJ....... on 6 April, 2021 - 08:51

नको असलेला पाहुणा आपल्या घरात येऊच नये असे जरी आपणाला वाटत असलं अन त्यासाठी तुम्ही स्वतः त्यादृष्टीने कितीही योग्य ती खबरदारी घेत असला तरी घरातील प्रत्येकजण ती खबरदारी योग्य रितीने घेत नसेल तर तुमच्या दारी तो नको असलेला पाहुणा कधीही हजर होऊ शकतो. त्यात तो पाहुणा कोवीड-१९ असेल तर मग त्याच्या येण्याच्या नुसत्या कल्पनेनेच कानातून गरम वाफ निघाल्याची जाणीव होऊ शकते.

विषय: 

भोसरी' मध्ये घरपोच डबा पोहोचवणाऱ्या लोकांची माहिती हवी आहे.

Submitted by रीया on 1 April, 2021 - 23:17

सध्या कोरोना च्या काळात अनेक जण घरी विलागीकरणात आहेत त्यांच्यासाठी आणि इतर ही पेशंट साठी घरपोच डब्बे पोहोचवणा ऱ्यांची माहिती एकत्र संकलित व्हावी म्हणून हा धागा.

माझे आई , बाबा आणि बहीण कोविड पोजिटीव्ह असून दवाखान्यात ऍडमिट होते. त्यांना 2 दिवसात डिस्चार्ज मिळेल. अशक्तपणा खूप असल्यामुळे घरी स्वयंपाक करण्याची ताकद त्यांच्यामध्ये नसणार तेंव्हा मला 'भोसरी' मध्ये घरपोच डबा पोहोचवणाऱ्या लोकांची माहिती हवी आहे.

मला स्पेशली नाश्ता पोहचवणारे लोकं हवे आहेत खरं तर कारण दुपारचे आणि रात्रीचे जेवण बहिणीच्या मित्र मैत्रिणी अरेंज करतील पण नाश्ता कुठून अरेंज होत नाहीये.

१४ फेब्रुवारी...(कोवीड अनुभव)

Submitted by 'सिद्धि' on 14 March, 2021 - 03:14

१४ फेब्रुवारी...
Valentine च यंदाच गीफ्ट, ते म्हणजे माझा कोरोना टेस्टचा आलेला रिपोर्ट.
detected म्हणजेच Positive ! SadSadSad

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - कोरोना