कोरोना कोरोना महामारी कोरोना
-----------------------------------------------
कोरोना कोरोना महामारी कोरोना
त्याने केला तिकडे
अन इथला गोंधळ सरंना
माणसाची झाली पिंजऱ्यातली माकडं
जवळ आली जणू शेवटची लाकडं
डोळ्यांतलं पाणी जागी ठरंना
चाकरमाने बसले निवांत घरात
कष्टकऱ्यांची रोजच भुकेली वरात
नुसत्या पाण्यानं पोट भरंना
भकास रस्ते उदास बाजार
टपून बसलेला जीवघेणा आजार
माणूस त्याच्या पासंगाला पुरंना
कुठे चाललास माणसा रे आता
निसर्ग पीडेल तुला रे पुरता
तरी तुझ्यातला राक्षस मरंना
आज मुंबईची लाईफ लाईन लोकल मुंबईतील लाईफ लाईन असलेल्या महिलांसाठी सुरू झाली 
पण वेळ फार गंडलेली आहे. सकाळी ११ पासून सुरू होणार ते ३ पर्यंत आणि त्यानंतर ३ ते ७ पुन्हा बंद आणि मग ७ नंतर चालू. ऑफिसला जाणार्या महिला या वेळेवर नाराज दिसल्या.
मद्यालये उघडली आहेत पण विद्यालये कधी उघडणार याचा पत्ता नाही.
उघडल्यावरही पालकांनी आपापल्या पाल्याची जबाबदारी घ्यावी असे कानावर आलेय.
लॉकडाऊन लागायच्या आधीच आमची बाई सर्वांची नोकरी सोडून कायमची गावाला गेली. आम्ही नवीन घरात शिफ्ट होणार असल्याने महिनाभरासाठी तात्पुरती बाई पाहिली. पण तिलाही या महिन्याभराच्या कामात रस नसल्याने दोमचार दिवस काम करत ती सुद्धा गायबली. मग कोरोना आला. लॉकडाऊन लागला. या काळात सोसायटीनेच घरकामाल बाई ठेवण्यास मनाई केली होती. आणि नंतर जेव्हा निर्बंध हटवला तेव्हा आम्हीच रिस्क नको म्हटले. तसेही बायको आणि आई मिळून घर व्यवस्थित चालवत होत्या. माझीही वर्क फ्रॉम होम मुळे त्यांना मदत होत होतीच. आणि तसेही पुन्हा थोड्या काळासाठी नवीन बाई शोधण्यात अर्थ नव्हता.
कोरोनासोबत कसे जगावे !!
प्रथम माझ्याविषयी थोडसं,मी 40 वर्षांचा असून नुकताच कोरोनामुक्त झालो आहे.
यापूर्वी मी मे महिन्यातच "कोरोनामुक्ती नंतर पुढे काय ?" असा लेख लिहून मोकळा झालो होतो आणि जुलैमध्ये Unlock च्या पार्श्वभूमीवर "पुनःश्च हरीओम" या नावाचे तीन भाग लिहिले होते. काही कारणाने ते सगळे पोस्ट झाले नाहीत.
अरुंधतीचा रागाचा पारा आज फारच चढला होता. कोरोना, कोरोना म्हणत घरातला प्रत्येकजण नुसता बसून होता. मार्च पासून जून पर्यंत मुलांनी सुट्टी म्हणून आणि नवऱ्याने लॉकडाऊन म्हणून एका हातात मोबाइल धरून दिवस नुसता लोळून काढला होता. ऑनलाईन शाळा आणि वर्क फ्रॉम होम सुरु होऊनही त्यांच्या दिनक्रमात फारसा काही फरक नव्हता. मागच्या वर्षी पर्यंत १० वाजता एकदा मुलं शाळेत आणि नवरा ऑफिसला गेले की दिवसभर ती एकटीच्या राज्यात निवांत असायची. आता मात्र तसं नव्हतं. ऑनलाईन शाळा म्हणजे नुसतं थातुर मातुर होत. थोडा वेळ शाळा झाली की परत दिवसभर मुलांची नुसती कटकट सुरु व्हायची.
फेब्रुवारी महिन्यापर्यंत चीन मध्ये कुठे तरी कोणती तरी भयंकर साथ आलीय आणि तिने तिथे हाहा:कार माजवला आहे ह्या हुन अधिक मला काही माहीत नव्हतं कोरोना बद्दल. कारण जगात कुठे ना कुठे कोणती ना कोणती तरी साथ आलेली असते आणि ती थोड्याच दिवसात विरून ही जाते हा अनुभव असल्याने मी इतकं काही सिरीयसली घेतलं नव्हतं. पण हळू हळू यरोप अमेरीका सिंगापूर अश्या सगळ्याच ठिकाणी ती पसरायला लागली, निरपराध जीव तिला बळी पडू लागले तेव्हा मी माहिती गोळा करायला सुरुवात केली नि जेव्हा साथ भारतात /मुंबईत पोचली तेव्हा त्याबद्दल मला बरीच जागरूकता आली होती.
तसे प्रामाणिकपणे सांगायचे तर मी एक कमालीचा आत्मकेंद्रीत मनुष्य आहे.
(महाराष्ट्रीय राज्य पाठ्यपुस्तक अनावलोकन व टिप्पणी असंशोधीत खाजगी मंडळ, पुणे-१२)
इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजारः जगावरचे संकट
(प्रस्तावना: कोरोना आजारापश्चात एखाद्या इयत्तेतील अभ्यासक्रमात एखादा पाठ कसा असू शकेल हे लेखकाच्या मनात आल्याने "इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजारः जगावरचे संकट" हा पाठ लिहीला आहे. )
कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.रोज लस कधी येणार याचे फक्त आडाखे येत आहेत .खात्रीशीर काही ठोस कुणीही सांगत नाही.फक्त अंदाज चालू आहेत.कधीकाळी आपण मुक्तपणे फिरायचो ,बाहेर जायचो ,बाहेर खायचो याचा विसर पडावा असं वातावरण झाले आहे.
आमच्या समोरच्या घरात राहणार्या कुटुंबातील चारपैकी तीन जणांना कोरोना झाला.
नुकतीच बातमी कानावर आदळली. आणि जाणवले कोरोना चार फूटांवर आला.
अगदी चार दिवसांपूर्वीच मी स्वत:ला आणि स्वतःच्या कुटुंबाला फार सुरक्षित समजत होतो.
अर्थात कारणही तसेच होते. या कोरोनाकाळात आमच्या कॉलनीत वा शेजारच्या पाजारच्या कॉलनीत जिथवर मी जीवनावशयक वस्तू घ्यायला जात आहे, तिथवर कोणालाही कोरोना झाल्याची बातमी आजवर आली नव्हती. याच कारणासाठी फुकटचे घरभाडे जात असूनही घर बदलायचीही घाई करत नव्हतो.