एका मोठ्ठ्या कारखान्याच्या आवारात तो उभा होता. आसपास इमारतीच इमारती पसरल्या होत्या. नाही, फक्त इमारतीच नाही. शेकड्यांनी अॅम्ब्युलन्सेससुद्धा होत्या. अॅम्ब्युलन्सेसचाच कारखाना होता तो. पण बाकी त्याला काही म्हणजे काही सुधरत नव्हतं. गावाबाहेर माळरानावर तो आला होता. आसपास झाडोरा वगैरे अस्ताव्यस्त सुटला होता. नुसत्याच मंद उताराच्या टेकड्या त्याच्याकडे बघत बसल्या होत्या. आणि अश्यातच त्याला तो कारखाना दिसला होता.
नुकतंच महाराष्ट्र सरकारने अंशतः लॉकडाऊन जाहीर केलंय. (म्हणजेच आय लव यू बट अँज अ फ्रेंड)
पण खरं तर मुंबईतील कर्मचारी वर्गाला लॉकडाऊन खरंच डोईजड झाले आहे. रस्त्यावर परवानगी नाकारलेले दुकान चालू नसायला हवे, ह्याची खातरजमा करण्यासाठी जंग जंग पछाडावे लागते. ह्यात काही चुक झाली तर नोकरीवर टांगती तलवार असते. सामान्य जनता ऐकत नसेल तर वादावादी होते. हिंसात्मक कृत्ये होतात. होणारच.
आज मुंबईची लाईफ लाईन लोकल मुंबईतील लाईफ लाईन असलेल्या महिलांसाठी सुरू झाली
पण वेळ फार गंडलेली आहे. सकाळी ११ पासून सुरू होणार ते ३ पर्यंत आणि त्यानंतर ३ ते ७ पुन्हा बंद आणि मग ७ नंतर चालू. ऑफिसला जाणार्या महिला या वेळेवर नाराज दिसल्या.
मद्यालये उघडली आहेत पण विद्यालये कधी उघडणार याचा पत्ता नाही.
उघडल्यावरही पालकांनी आपापल्या पाल्याची जबाबदारी घ्यावी असे कानावर आलेय.
लॉकडाऊन लागायच्या आधीच आमची बाई सर्वांची नोकरी सोडून कायमची गावाला गेली. आम्ही नवीन घरात शिफ्ट होणार असल्याने महिनाभरासाठी तात्पुरती बाई पाहिली. पण तिलाही या महिन्याभराच्या कामात रस नसल्याने दोमचार दिवस काम करत ती सुद्धा गायबली. मग कोरोना आला. लॉकडाऊन लागला. या काळात सोसायटीनेच घरकामाल बाई ठेवण्यास मनाई केली होती. आणि नंतर जेव्हा निर्बंध हटवला तेव्हा आम्हीच रिस्क नको म्हटले. तसेही बायको आणि आई मिळून घर व्यवस्थित चालवत होत्या. माझीही वर्क फ्रॉम होम मुळे त्यांना मदत होत होतीच. आणि तसेही पुन्हा थोड्या काळासाठी नवीन बाई शोधण्यात अर्थ नव्हता.
लॉकडाऊन जाहीर झाला, रांगा लावून लावून खरेदी झाली, FB वर चॅलेंज रंगले, आपण मध्यमवर्गीय आपापल्या परिघात सुरक्षित होतो, जॉब चे काही वरखाली होईल का? , दूर असणाऱ्या प्रियजनांची तब्येत ठीक असेल ना? असे काही भुंगे सोडल्यास तसा बहुतेकांचा लॉक डाऊन सुरळीत पार पडला.
(हा दिवस आहे इंग्लिश मध्ये.पण लिहिणारीला तितकं फाडफाड इंग्लिश येत नाही त्यामुळे आपण मराठीतच वाचूयात.ही शाळा आणि मुलं पूर्णपणे काल्पनीक आहेत.असं करणारी खरी मुलं तुमच्या आजूबाजूला असल्यास तो योगायोग समजावा).
(डिस्क्लेमर: या लेखमालिकेतले मांजर आणि ऑफिस पूर्णपणे प्रातिनिधिक आणि काल्पनिक आहे.वात्रटपणे माहिती गुगल करून खऱ्या माणसाशी किंवा ऑफिसशी संबंध लावल्यास दात पाडण्यात येतील.)
लॉकडाऊन कायम आहे.
पण दारूची दुकाने ऊघडत आहेत.
अगदी रेड झोनमध्येही उघडत आहेत. जणू काही हे जीवनाव्श्यक पेय आहे.
आता दारू काय करते हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे.
नमस्कार मंडळी,
लॉकडाऊन मध्ये वाचण्यासाठी मायबोलीवरच्या तुम्हाला आवडलेल्या कुठल्याही विषयांवरच्या धाग्याची लिंक इथे द्या.
आपल्याला सगळ्यांना तर परत वाचता येतीलच पण भारतात एकटे असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा त्या लिंक्स पाठवता येतील. त्यांना नेहमीच्या बातम्या आणि भीतीदायक कायप्पा मेसेजेस पासुन तेव्हढाच विरंगुळा.
सर्व विषय / कथा चालतील....
चला तर मग, वाट बघते आहे.
धन्यवाद!