अँब्युलन्स
Submitted by भास्कराचार्य on 16 November, 2021 - 12:40
एका मोठ्ठ्या कारखान्याच्या आवारात तो उभा होता. आसपास इमारतीच इमारती पसरल्या होत्या. नाही, फक्त इमारतीच नाही. शेकड्यांनी अॅम्ब्युलन्सेससुद्धा होत्या. अॅम्ब्युलन्सेसचाच कारखाना होता तो. पण बाकी त्याला काही म्हणजे काही सुधरत नव्हतं. गावाबाहेर माळरानावर तो आला होता. आसपास झाडोरा वगैरे अस्ताव्यस्त सुटला होता. नुसत्याच मंद उताराच्या टेकड्या त्याच्याकडे बघत बसल्या होत्या. आणि अश्यातच त्याला तो कारखाना दिसला होता.
विषय:
शब्दखुणा: