हिंजवडी चावडी: लॉकडाऊन नॉकडाऊन
(डिस्क्लेमर: या लेखमालिकेतले मांजर आणि ऑफिस पूर्णपणे प्रातिनिधिक आणि काल्पनिक आहे.वात्रटपणे माहिती गुगल करून खऱ्या माणसाशी किंवा ऑफिसशी संबंध लावल्यास दात पाडण्यात येतील.)
(डिस्क्लेमर: या लेखमालिकेतले मांजर आणि ऑफिस पूर्णपणे प्रातिनिधिक आणि काल्पनिक आहे.वात्रटपणे माहिती गुगल करून खऱ्या माणसाशी किंवा ऑफिसशी संबंध लावल्यास दात पाडण्यात येतील.)
(लोकहो, यावेळी ही सिरीज थोडी जास्त तांत्रिक झाली आहे.वाचावी वाटली तर वाचा.सकारात्मक नकारात्मक सर्व प्रकारचे प्रतिसाद वेलकम आहे.तुम्ही कोणतातरी विषय काढून भांडण करून 200 प्रतिसाद केले तर मला जबरदस्त आनंद होणार आहे.पण तुम्ही इतके गोड मनमिळाऊ आणि क्युट लोक आहात की त्यापेक्षा लेख वाचणं सोडून द्याल. ☺️☺️बघुयात.पूर्ण वाचता की मध्येच सोडता ते.)
मांजर बस मध्ये शांतपणे गाणी ऐकत बसलं होतं.घरी "मला वेळ दे, आपण गप्पा मारू" वाली रोमँटिक बायको आणि ऑफिसात "मेल कशाला, एक मीटिंग करून निपटून टाकू" वाली साहेब मांजरे यामुळे ऑफिस बस हे त्याचं एकमेव विरंगुळ्याचं ठिकाण होतं.तितक्यात निल्या चा फोन आला.
"अरे पण तू केली होती ना मीटिंग रुम बुक?"
"केली होती.पण ती पलीकडच्या टीम ची परदेशी बाई 2 आठवडे तिथे बसणार आहे बिस्कीट आणि पाण्याच्या बाटल्या घेऊन.सो दुसरीकडे जावं लागेल."
"पण मग तू त्याना बदली रुम नाही मागितली का?"
"आपण रूट कॉज अनलिसिस मध्ये टाकलं होतं ना त्यांनी इन्फ्रा सेटअप लवकर दिला नाही म्हणून टोयोटाचा इश्यू उशिरा गेला..तेव्हापासून ते लोक असेच करतात."
नमस्कार!!
आपण जाणार आहोत एका छोट्या सहलीला. सहल छोटी, माहिती मोठी!!
सहल टप्पा: 'कुठूनही' ते हिंजवडी फेज १
लागणारा वेळः हा एका शब्दात उत्तर देण्याचा प्रश्न नाहीय. या प्रश्नाचं उत्तर मिळण्या साठी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या: कोणत्या वारी निघणार?कोणत्या ठिकाणाहून निघणार?कोणत्या वेळी निघणार?कोणत्या वाहनाने निघणार?'कोण' निघणार? त्याप्रमाणे उत्तर २० मिनीटे/४५ मिनीटे/१ तास/१.५ तास असे बदलू शकते.
तुम्ही कार ने किंवा दुचाकी ने येत असाल तर हे कॅलेंडर लक्षात ठेवा:
तारीख १ ते २५:
स्थळः हिंजवडीमधून दोन किलोमीटर अंतराच्या आत कोणत्याही दिशेला असलेले एक मोठे हॉटेल. "बुफे" ३५० पेक्षा कमीत मिळत असल्यास आणि जेवणाला चांगली चव असल्यास हॉटेल बाद समजले जावे आणि चावडीतील मांजरे ही उंदीर समजण्यात यावीत. हे सगळे एका वर्कशॉपसाठी जमले आहेत. यातून खूप काही नवीन मुद्दे निघाले आणि खूप अद्वितीय सुधारणा झाल्या असं यांना या दिवसाच्या अंती एका रंगीत एक्सेल मध्ये पुराव्याने शाबित करायचं आहे.