लॉकडाऊन कायम आहे.
पण दारूची दुकाने ऊघडत आहेत.
अगदी रेड झोनमध्येही उघडत आहेत. जणू काही हे जीवनाव्श्यक पेय आहे.
आता दारू काय करते हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे.
दारू चढते. चढली कि लोकं दंगा करतात. बरेच मद्यपी असे असतील जे आधी बारमध्ये जाऊन प्यायचे. आणि बाहेरच ऊतरवून घरी येऊन मुकाट झोपायचे. आता ते घरी पितील. घरच्यांना त्रास देतील. आधीच त्यांची बायकापोरे लॉकडाऊनने त्रस्त असतील. त्यांचा त्रास आणखी वाढणार. जसे ड्राय डे असतो तेव्हाच लोकं दारूवर तुटून पडतात तसे आता खूप दिवसांनी मिळाल्यावर लोकं रोज पितील. त्याचे व्हॉट्सपवर शेअर करून एकमेकांना आणखी पिण्यास उद्युक्त करतील. म्हणजे जवळपास रोजच घरच्यांना त्रास. जो नवरा घरच्या कामात हातभार लावत असेल ते देखील कमी होईल. जे बाप आधी पोरांसमोर कधी प्यायले नसतील ते सुद्धा आता भले नाईलाजाने का असेना समोरच पितील. कित्येकांच्या घरी पैश्यांची अडचण असेल. ती आता आणखी वाढेल. दारूचा खर्च जास्तच असतो. पिणारा माणूस पैश्यांचा विचार कमीच करतो हे पाहिले आहे. एकूणच कित्येक कुटुंबांना याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फटका बसेल याची मोजदाद नसेल. डोमेस्टीक वॉयलेन्सची वेळ येऊ शकते, सोसायटीत वा वस्तीत राडा होऊ शकतो. जे या लॉकडाऊन काळात परवडण्यासारखे नाही.
बरं ती दारू चढते तेव्हा ती मेंदूचा ताबा घेते. माणसाची हिंमत वाढते. दारूच्या नशेत लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवणे सहज शक्य आहे. एकूणच दारू डोक्याला त्रास होऊ शकते.
सरकारला काय हवेय? महसूल? लोकांना दारू पाजून तो कमावणार? त्यासाठी एवढी रिस्क? या महसूल मुद्द्यावरून दारू पिणारे अर्थव्यवस्थेचा कणा आहेत असे मेसेज व्हॉटसपवर फिरू लागलेत. पुढे याचे रुपांतर उन्मादात होऊ शकते.
मला कल्पना आहे की ईथल्या लोकांना वाटेल की आम्ही पितो लिमिटमध्ये. काही होत नाही असे. होऊ दे दुकाने चालू...
पण हा विषय तुमच्या किंवा माझ्या घरचा नाही. सध्या देशाच्या स्थितीचा विचार करा आणि प्रामाणिक मते मांडा.
धन्यवाद,
ऋन्मेष
रूनमेष
रूनमेष
फक्त तुमच्या साठी सरकार नी हा निर्णय घेतला आहे
या काळात चकणा भरपूर तयार
या काळात चकणा भरपूर तयार झालाय. तो कसा संपणार
चला झाले एकदाचे वाईन शाॅप ओपन
चला झाले एकदाचे वाईन शाॅप ओपन, बरेच दिवस गळा शेकला नव्हता. आता ब्लेंडरची एक पार्टी!
---
#करून दाखवले..
हा निर्णय शाहरुख ने घ्यायला
हा निर्णय शाहरुख ने घ्यायला लावला असे म्हणत होते
त्याचा स्टॉक संपला होता, सिगरेट्स पण संपल्या होत्या
त्याला खरेतर मिळत होती घरपोच पण तो इतका मनाने मोठा माणूस आहे की तो म्हणाला मला एकट्याला मिळून काय उपयोग
माझ्या भक्तांना पण मिळाली पाहिजे
सगळ्यांना मिळाली तरच मी घेणार नाही तर दारवपषणाला बसणार
आता इतका मोठा सेलिब्रिटी म्हणतोय म्हणल्यावर सरकारचा पण नाईलाज झाला
चांगला निर्णय... दारू पिणारा
चांगला निर्णय... दारू पिणारा पिऊन गप पिऊन झोपणार.. तो कशाला बाहेर जाईल..
सर्व राज्यांची अर्थ व्यवस्था
सर्व राज्यांची अर्थ व्यवस्था कोलमडली आहे.
दारूचा व्यवसाय आणि त्या वर मिळणारे उत्पादन च फक्त राज्यांना वाचवू शकत.
आता पर्यंत आपण दारू पिणाऱ्या लोकांना बेवडे म्हणून नाव ठेवायचो.
पण तेच अर्थ व्यवस्थेचा कणा आहेत.
त्यांच्या शिवाय देश चालणार नाही.
ऋन्मेष, हा धागा आणि मुद्दे
ऋन्मेष, हा धागा आणि मुद्दे पटले, आवडले.
मलाही हेच सगळे प्रश्न पडलेत बातमी ऐकल्यापासून.
हो पियु,
हो पियु,
तसा मी दारूच्या आधीपासूनच विरोधात आहे. पण ईथे वेगळी चिंता आहे, वेगळे प्रश्न उद्भवण्याची भिती आहे. त्यात ईतके दिवसाच्या बंदीनंतर सुरू होणे याचा एक वेगळा परीणाम होणार.
तुम्ही इतकी चिंता करू नका हो
तुम्ही इतकी चिंता करू नका हो प्रत्येक विषयाची. पब्लीक समंजस आहे. गोंधळ घातला तर ही सुविधा काढुन घेतील याची जाणीव आहे त्यांना.
अहो त्यांना चिंता त्याची
अहो त्यांना चिंता त्याची नाहीये, लोकं त्यांच्या धाग्यावर कमी प्रतिसाद देतील याची आहे. त्यामुळे ते मुद्दाम असे विषय शोधून काढून त्यावर धागे विणतात. हे विषय त्यांचे हुकमी एक्के आहेत. त्यामुळे त्यांना फार सिरियसली घेऊ नका
आशुचँप, पण मुळात हा शारुख
आशुचँप, पण मुळात हा शारुख इतका पितो म्हणजे कमालच आहे. गेला दीड महिना त्याने स्टॉक करून ठेवला असेलच की.
अस्सं आहे का. पण काम धंदा
अस्सं आहे का. पण काम धंदा सोडुन हा माणुस इतक्या विषयांवर लिहतो म्हणुन म्हटलं आपला फुकटचा सल्ला देऊन पहावा.
केवळ green zone हिरव्या
केवळ green zone हिरव्या रंगाच्या पट्ट्यातच उघडणार आहेत ना?
मायबोली धाग्यावर मिळणार्या प्रतिसादांच्या संखेत घट होणार नाही.... फरक पडलाच तर थोडाफार भाषेच्या धारेमधे पडेल . अगोदरच धारदार असलेली आपली भाषा अधिक अलंकारयुक्त बनेल.
व्हॉट्स अ(ऍ)प वर (या गूगल
व्हॉट्स अ(ऍ)प वर (या गूगल इंडिकने फार म्हणजे फार त्रास होतोय) एक सर्क्युलर सारखे फ़ॉर्वर्ड आले होते त्यात म्हटलेय की वाईन शॉपस उघडणार नाहीत. खखोदेजा
त्यात म्हटलेय की वाईन शॉपस
त्यात म्हटलेय की वाईन शॉपस उघडणार नाहीत. खखोदेजा
Submitted by हीरा on 4 May, 2020 - 07:06
--
या तीन तिघाडी सरकारच्या प्रत्येक निर्णयात घोळ दिसतोय....तिकडे उ.प्र. मधे योगी बाबांने, एक फटक्यात निर्णय घेऊन ऑरेंज व ग्रीन झोन मधील दारूचे ठेके ओपन देखील केले.
फक्त कंटेन्मेंट मध्ये उघडणार
फक्त कंटेन्मेंट मध्ये उघडणार नाहीत
रेड ऑरेंज ग्रीन सर्वत्र मिळणार
रेड वाइन , ऑरेंज बिअर , ग्रीन लेबल
सर्वत्र उपलब्ध आहे
नो डिस्क्रिमीनेशन
ऋषी कपूरच्या काव कावला थोडी
ऋषी कपूरच्या काव कावला थोडी ठेवा ग्लासात तेव्हा कावळा शिवेल.
मूर्खपणा आहे लॉकडाऊन काळात
मूर्खपणा आहे लॉकडाऊन काळात दारूची दुकाने सुरू करणे.
दारू अवैधपणे सर्वत्र मिळतच
दारू अवैधपणे सर्वत्र मिळतच आहे.
त्यात सरकारचा महसूल बुडतो आहे.
शिवाय सरकारी खाबू लोकांची पंचाईत झाली आहे.
दारू अवैधपणे सर्वत्र मिळतच
दारू अवैधपणे सर्वत्र मिळतच आहे.
>>>
क्षुल्लक प्रमाण असेल
लॉकडाऊन काळात अवैध दारू मिळवणे सोपे नाही सर्वांना.
दारू अवैधपणे सर्वत्र मिळतच
दारू अवैधपणे सर्वत्र मिळतच आहे.
--
मिळते पण इतकी सहजा सहज नाही, शिवाय एका English चपटीचा भाव सध्या 800 रुपये आहे.
ऑनलाइन पिली तर ५०टक्के कॅश
ऑनलाइन पिली तर ५०टक्के कॅश बॅक ऑफर आहे आणि शिवाय ५०टक्के विशेष सूट
दारू अवैधपणे सर्वत्र मिळतच
दारू अवैधपणे सर्वत्र मिळतच आहे.>>
तर मग तशी मिळू नये अशी उपाय योजना करणे आवश्यक आहे की खुली करून टाकणे ही?
हाच नियम सर्वच गोष्टींसाठी लावावा याचा विचार करुन उत्तर द्या.
दारूत अल्कोहोल असल्याने
दारूत अल्कोहोल असल्याने कदाचित दिली असेल परवानगी.
रांगा लागायला सुरुवात. ईतक्या
रांगा लागायला सुरुवात. ईतक्या मोठ्या आहेत की सोशल डिस्टंन्सिंग अवघड आहे. लोकांनी खेटून रांग बनवल्या आहेत..
नोटा बंदित काळा पैसा
नोटा बंदित काळा पैसा ज्याप्रमाणे नष्ट केला तसाच आता कारोना ही नष्ट होणार. लाईन मध्ये उभे राहणे हे साम्य आहे.
न पिणाऱ्या लोकांनी बोंबाबोंव
न पिणाऱ्या लोकांनी बोंबाबोंव करून काय उपयोग?
जे पिणारे आहेत त्यांनी कधीच गर्दी केलीय दुकानांवर असे वर वाचले. सोशल डिस्टनसिंग पाळण्यासाठी दुकानासमोर चौकोन आखले जाताहेत याचेही फोटो सो मि वर पाहिलेत. ऑलिम्पिकच्या पूर्वतयारीचेही एवढे कौतुक केले जात नाही. त्यावरून पिणारे किती आहेत ते बघा.त्यांच्या भावनांचाही मान ठेवा. शेवटी बुडत्या इकॉनॉमीचे हेच तारणहार आहेत.
महाराष्ट्र सरकार , कोरोना
महाराष्ट्र सरकार , कोरोना महामारीच्या दबावाने सारासार विचार करण्याची शक्ती देखील गमावून बसले आहे असे दिसते
ज्या मुंबईत आठ..दहा हजार कोरोना रुग्णांची संख्या आहे, तिथे वाईन शॉप उघडण्याची परवानगी दिली आहे. व ज्या वसई-विरार आणि कल्याण-डोंबिवलीत 200 ते 250 रूग्ण आहेत तिथे मात्र वाईन शॉप उघडण्याची परवानगी नाकारली आहे.
दारूची दुकानं ही जास्त करून
दारूची दुकानं ही जास्त करून राजकारणी आणि पोलिस अधिकारी ह्यांच्या च मालकीची आहेत.
वाहत्या गंगेत हात धुणे म्हणतात ह्याला.
लॉकडाऊनमध्ये दारूची दुकाने का
लॉकडाऊनमध्ये दारूची दुकाने का ऊघडत आहेत??
कारण,
ते सरकार आहेत. आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांनी त्यांना निवडुन दिलय. त्यांना समजत की आपल्यासाठी काय चांगल आहे.
म्हणुन काळजी करु नका टेन्शन घेवु नका. वाटलच तर बाटली घरी आणा आणी प्या, ओता, झाडांना घाला, इतरांना पाजा पण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावा.
मी मराठी आहे. मी पीत नाही आणी मी महाराष्ट्रातही नाही या कारणाने मी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावु शकत नाही.
Pages