लॉकडाऊनमध्ये दारूची दुकाने का ऊघडत आहेत??

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 May, 2020 - 13:46

लॉकडाऊन कायम आहे.
पण दारूची दुकाने ऊघडत आहेत.
अगदी रेड झोनमध्येही उघडत आहेत. जणू काही हे जीवनाव्श्यक पेय आहे.

आता दारू काय करते हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे.

दारू चढते. चढली कि लोकं दंगा करतात. बरेच मद्यपी असे असतील जे आधी बारमध्ये जाऊन प्यायचे. आणि बाहेरच ऊतरवून घरी येऊन मुकाट झोपायचे. आता ते घरी पितील. घरच्यांना त्रास देतील. आधीच त्यांची बायकापोरे लॉकडाऊनने त्रस्त असतील. त्यांचा त्रास आणखी वाढणार. जसे ड्राय डे असतो तेव्हाच लोकं दारूवर तुटून पडतात तसे आता खूप दिवसांनी मिळाल्यावर लोकं रोज पितील. त्याचे व्हॉट्सपवर शेअर करून एकमेकांना आणखी पिण्यास उद्युक्त करतील. म्हणजे जवळपास रोजच घरच्यांना त्रास. जो नवरा घरच्या कामात हातभार लावत असेल ते देखील कमी होईल. जे बाप आधी पोरांसमोर कधी प्यायले नसतील ते सुद्धा आता भले नाईलाजाने का असेना समोरच पितील. कित्येकांच्या घरी पैश्यांची अडचण असेल. ती आता आणखी वाढेल. दारूचा खर्च जास्तच असतो. पिणारा माणूस पैश्यांचा विचार कमीच करतो हे पाहिले आहे. एकूणच कित्येक कुटुंबांना याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फटका बसेल याची मोजदाद नसेल. डोमेस्टीक वॉयलेन्सची वेळ येऊ शकते, सोसायटीत वा वस्तीत राडा होऊ शकतो. जे या लॉकडाऊन काळात परवडण्यासारखे नाही.

बरं ती दारू चढते तेव्हा ती मेंदूचा ताबा घेते. माणसाची हिंमत वाढते. दारूच्या नशेत लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवणे सहज शक्य आहे. एकूणच दारू डोक्याला त्रास होऊ शकते.

सरकारला काय हवेय? महसूल? लोकांना दारू पाजून तो कमावणार? त्यासाठी एवढी रिस्क? या महसूल मुद्द्यावरून दारू पिणारे अर्थव्यवस्थेचा कणा आहेत असे मेसेज व्हॉटसपवर फिरू लागलेत. पुढे याचे रुपांतर उन्मादात होऊ शकते.

मला कल्पना आहे की ईथल्या लोकांना वाटेल की आम्ही पितो लिमिटमध्ये. काही होत नाही असे. होऊ दे दुकाने चालू...

पण हा विषय तुमच्या किंवा माझ्या घरचा नाही. सध्या देशाच्या स्थितीचा विचार करा आणि प्रामाणिक मते मांडा.

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दीड महिना चहा मिळाला नसता ना १०१ टक्के लोकांनी रांगा लावून फटके खाल्ले असते इतके चहाबाज आहेत आपल्याइथे

चहा पावडर उदाहरण आहे कारण ऋन्मेष दुसरा मुद्दा धरून बसला आहे...
दारुपेक्षा जास्त चहा प्रेमी आहेत हे मान्य कर हृन्मश ...

दारुपेक्षा जास्त चहा प्रेमी आहेत हे मान्य कर
>>>>
लोकं संगीतप्रेमी असतात, क्रिकेटप्रेमी असतात, तसेच चहाकॉफी प्रेमीही असतात. दारूच्या व्यसनाची तुलना नाही. हा, ड्रग्स तंबाखू गुटखा यांच्याशी तुलना करू शकता.

व्यायाम केल्यावरच दारु मिळेल सांगितले असते तर लोकांनी शिर्षासन पण करून दाखवले असते

+७८६.
दारूसाठी कायपण.
आजच्या रांगा बघून थक्क झालो

काय ती दर धाग्यात शाहरुख ची चर्चा . अर्थात हरकत घेणारा मी कोण .
Submitted by कटप्पा on 5 May, 2020 - 02:08

>>>

यूह कॅन हेट हिम ऑर लव्ह हिम
बट कॅन नॉट ईग्नॉर हिम ...

हि ईण्ग्रजी म्हण शाहरूखसाठीच बनवली गेलीय Happy

बातमी खरी असेल तर हा नवीन धाग्याचा विषय होऊ शकतो

बातमी खरी आहे, तसे फोटोही आले आहेत, त्यामुळे नविन धागा यायला पाहिजे. रोज एक नवा टाईमपास पाहिजे. दारु नाही तर नाही, तोंडी लावयाला दारु विरोधक पाहिजेच

काही ठिकाणी महिला वर्गानेही रांगा लावल्या म्हणे.
>>>>

महिलांमध्ये दारू पिण्याचे प्रमाण कमी आहे. ज्या पितात त्यांच्यातही कमी अल्कोहोलचे प्रमाण असलेल्या ड्रिंक्सना पसंती देतात.

असे का?

दारूबाबत हि स्त्री पुरुष असमानता का आहे जी चहाकॉफी बाबत आढळत नाही.

विचार करा. कारण जाणून घ्यायचा प्रयत्न करा. बरीच ऊत्तरे मिळतील.

मी तुर्तास शुभरात्री.
शाहरूखचा ओवर डोस झालाय.

यंदाच्या ऑफिसपार्टीत एक फुल्ल टल्ली झालेल्या मुलीला तिच्या घरी सोडायची जबाबदारी माझ्यावर आलेली. जमल्यास उद्या त्या किश्याबद्दल लिहितो

शुभरात्री शब्बखैर खुदा हाफिज !....

वाईन शाॅप समोर "दारू" विकत घेण्यासाठी, पुरुषांची व महिलांची वेगळी रांग, पाहायला मिळाली काल दिल्लीत.

इतिहासात असे पहिल्यांदाच होत असावे कि हजारो महिला, पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून दारू खरेदीसाठी लाईनमधे उभ्या आहेत.

ऋनम्या बस कर यार. एकतर प्रसिद्ध माणसं मारताहेत. शाहरुख पण उचकी लागून लागून मरायचा.

सारखं सारखं शाहरुखला बळंच ओढून धाग्यात आणणं खटकतं मलाही. दातात खडा आल्यासारखं वाटतं.
Submitted by हीरा on 5 May, 2020 - 07:22

>>>

काही लोकांना असे वाटते की शाहरूखला शिव्या घातल्या की मला राग येईल . म्हणून बळंच ओढून आणतात.

या पोरींचा एकच फोटो फिरतोय.
काय आहे यानागचे सत्य?
कुठला आहे?
दारूलाच आहे का रांग? आणि मुलींची वेगळी होती का?

काही लोकांना असे वाटते की शाहरूखला शिव्या घातल्या की मला राग येईल .>>> तुझ्या राग लोभाची पर्वा करायला आहेस कोण मित्रा तू? काही च्या काही गैरसमज असतात एखाद्याचे.
वैताग आहे नुस्ता.

बाकीच्यांचे माहिती नाही पण मी तरी तुला बरे वाटावे म्हणून शाखा ला शिव्या देतो

शाखा काय एक निव्वळ दारुडा आणि धुरांडा आहे
पण तू मायबोलीकर आहेस, त्यातून असा आजारी
तुझी काळजी नको घ्यायला?

तुझ्या राग लोभाची पर्वा करायला आहेस कोण मित्रा तू?
>
शाहरुखचा म आं जा वरील सर्वात मोठा चाहता Happy

तुला भक्त म्हणायच आहे का?
रच्याकने तू आरती नाहीस का रचलीस अजुन त्याच्यावर
इतकी प्रतिभा उतू चालली आहे तुझी
त्यातून खोटारडा पण आहेस मग घे की मनावर राव
नवीन धागा काढ शाहरुख ची आरती म्हणून Happy

मुळात दारू का बनवतात हा प्रश्न पाहिजे ना या धाग्यावर
जगात दारुच बनली नसती तर किती वेगळे धागे काढले असते रूनमेश ने

Pages