लॉकडाऊन कायम आहे.
पण दारूची दुकाने ऊघडत आहेत.
अगदी रेड झोनमध्येही उघडत आहेत. जणू काही हे जीवनाव्श्यक पेय आहे.
आता दारू काय करते हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे.
दारू चढते. चढली कि लोकं दंगा करतात. बरेच मद्यपी असे असतील जे आधी बारमध्ये जाऊन प्यायचे. आणि बाहेरच ऊतरवून घरी येऊन मुकाट झोपायचे. आता ते घरी पितील. घरच्यांना त्रास देतील. आधीच त्यांची बायकापोरे लॉकडाऊनने त्रस्त असतील. त्यांचा त्रास आणखी वाढणार. जसे ड्राय डे असतो तेव्हाच लोकं दारूवर तुटून पडतात तसे आता खूप दिवसांनी मिळाल्यावर लोकं रोज पितील. त्याचे व्हॉट्सपवर शेअर करून एकमेकांना आणखी पिण्यास उद्युक्त करतील. म्हणजे जवळपास रोजच घरच्यांना त्रास. जो नवरा घरच्या कामात हातभार लावत असेल ते देखील कमी होईल. जे बाप आधी पोरांसमोर कधी प्यायले नसतील ते सुद्धा आता भले नाईलाजाने का असेना समोरच पितील. कित्येकांच्या घरी पैश्यांची अडचण असेल. ती आता आणखी वाढेल. दारूचा खर्च जास्तच असतो. पिणारा माणूस पैश्यांचा विचार कमीच करतो हे पाहिले आहे. एकूणच कित्येक कुटुंबांना याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फटका बसेल याची मोजदाद नसेल. डोमेस्टीक वॉयलेन्सची वेळ येऊ शकते, सोसायटीत वा वस्तीत राडा होऊ शकतो. जे या लॉकडाऊन काळात परवडण्यासारखे नाही.
बरं ती दारू चढते तेव्हा ती मेंदूचा ताबा घेते. माणसाची हिंमत वाढते. दारूच्या नशेत लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवणे सहज शक्य आहे. एकूणच दारू डोक्याला त्रास होऊ शकते.
सरकारला काय हवेय? महसूल? लोकांना दारू पाजून तो कमावणार? त्यासाठी एवढी रिस्क? या महसूल मुद्द्यावरून दारू पिणारे अर्थव्यवस्थेचा कणा आहेत असे मेसेज व्हॉटसपवर फिरू लागलेत. पुढे याचे रुपांतर उन्मादात होऊ शकते.
मला कल्पना आहे की ईथल्या लोकांना वाटेल की आम्ही पितो लिमिटमध्ये. काही होत नाही असे. होऊ दे दुकाने चालू...
पण हा विषय तुमच्या किंवा माझ्या घरचा नाही. सध्या देशाच्या स्थितीचा विचार करा आणि प्रामाणिक मते मांडा.
धन्यवाद,
ऋन्मेष
न पिणाऱ्या लोकांनी बोंबाबोंव
न पिणाऱ्या लोकांनी बोंबाबोंव करून काय उपयोग?
>>>>
ईथे बोंबाबोंब करणारा पिणारा आहे की न पिणारा आहे हा मुद्दा गौण होता.
असो....
कारण,
कारण,
ते सरकार आहेत. आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांनी त्यांना निवडुन दिलय. त्यांना समजत की आपल्यासाठी काय चांगल आहे.
>>>>>
सरकारचे सारे पाच वर्षे मुकाटपणे मानायचे हे सर्व बाबींना लागू कि दारू पुरतेच हे लागू ?
मल्ल्याचे कर्ज उतरेल
मल्ल्याचे कर्ज उतरेल
पण सर्व पिणारे झिंगूनच पडतात
पण सर्व पिणारे झिंगूनच पडतात असं कुठंय? रोज थोडी घेत असतील.
दारू ही अल्कोहोल पासून बनवतात
दारू ही अल्कोहोल पासून बनवतात हे सर्व हुषार लोकांना माहिती असेलच. सध्या सर्व पेट्रोलच्या गाड्या बंद असल्याने पेट्रोल कंपन्यांकडचे साठे पडून आहेत. त्यामुळे त्यात मिसळणारे अल्कोहोल (इथॅनॉल) पेट्रोल कंपन्या घेत नाही आहेत.अल्कोहोल साखर कारखान्यात बनते. साखर कारखान्यांच्या टाक्या भरून आहेत. कारखाने बंद पडायची वेळ आलीय. आधीच साखरेचे भाव पडल्याने तीही एक अडचण आहेच. त्यामुळे जर दारू विक्रीस परवानगी दिली तर साखर कारखाने चालू होउन ग्रामीण अर्थव्यवस्थेस पाठबळ मिळेल हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. सरकारच्या तिजोरीत भर पडेल ही अजून एक जमेची बाजू.
शिवाय शहरी धनदांडग्यांच्या खिशातील गरीब जनतेकडून लुटलेली संपत्ती परत खेडेगावातील गोर्गरीब जनतेकडे उसाच्या देयकावाटे व सर्कारी कल्याण्कारी योजनांद्वारे पोहोचेल हे वेगळेच. पण तेच तुम्हाला खुपतेय असे दिसते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
- एक डावा हात्खुर्ची अर्थतज्ञ. (मणजे मी)![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण सर्व पिणारे झिंगूनच पडतात
पण सर्व पिणारे झिंगूनच पडतात असं कुठंय? रोज थोडी घेत असतील.
नवीन Submitted by Srd on 4 May, 2020 - 16:05
>>>
हो सर्व नाही
तरी मग किती?
व्हॉटसपवर एकेक अभूतपूर्व
व्हॉटसपवर एकेक अभूतपूर्व गर्दीचे फोटो आणि विडिओ फिरत आहेत. लोकं भरभरून दारू घेत आहेत. आणि आता घरीच डोळ्यासमोर स्टॉक असल्यावर साहजिकच् पिण्याचे प्रमाणही वाढेल.
Man khurd 1 km line
Man khurd
1 km line
किती री काळजी जनतेची
किती री काळजी जनतेची
मला तर रुभाऊंचे कोमल हृदय बघून टचकन पाणीच आले डोळ्यात
ते एकदा शाहरुख ला विचारा की त्याला मिळाली का नाही
बिचारा सवय नसेल तर उन्हातान्हात रांगेत उभे राहून त्रास होईल हो बिचाऱ्याला
सेलिब्रिटी झाला म्हणून काय शेवटी माणूस आहे तो
दया करा पामरावर
तरी मग किती? >> हे पिणारा,
तरी मग किती? >> हे पिणारा, पचवण्याची ताकद आणि मुख्य म्हणजे ब्रँड वर अवलंबून आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर मी किंगफिशर मजबूतचा एक मग घेऊ शकतो, पण याच ठिकाणी टुबोर्ग मजबूत असेल किंवा आपली कार्ल्सबर्ग हत्ती मजबूत असेल तर २ किंवा ३ आरामात घेईन. अर्थात त्याला वेळ सुद्धा तेवढा लागेल. आणि हो, मला पर्सनली ब्रूवारीत बनलेली क्राफ्टेड जास्त आवडते (त्यात अलकोहोल bottled बीअरपेक्षा जास्त असतं. तुम्हाला जर हलकी किक हवी असेल तरच ह्या प्रकारात पडायचं. नसता आपले आपले पेगच बरे. बिअरने फक्त पॉट भरतं, आणि वाढतं सुद्धा.
ऋन्मेशशी सहमत.
ऋन्मेशशी सहमत.
दारू दुकाने उघडण्याचा निर्णय चुकीचाच आहे. त्यापेक्षा होम डिलिव्हरीला परवानगी देणे(एका विशिष्ट वेळेत) अधिक योग्य ठरले असते.
3 कर्ल्सबर्ग हत्ती म्हणजे लै
3 कर्ल्सबर्ग हत्ती म्हणजे लै झाले हो
मला दीड बास होतो
अगदीच निवांत रमत गमत असेल तर 2
पण त्यापेक्षा जास्त आजवर कधीच नाही
या उन्हाळ्यात ती मिळणे म्हणजे सुख होतं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण काय आता विघ्नसंतोषी लोकं भरलेत जगात
ट्रॅव्हल करताना एके काळी
ट्रॅव्हल करताना एके काळी स्नेक वेणम बियर पिली होती -65% अल्कोहोल... एका बाटलीत गार...
हि स्नेक व्हेनम बियर,
हि स्नेक व्हेनम बियर, भारतातील वाईनशॉप मिळते काय?
तरी मग किती?
तरी मग किती?
>>
याचे ऊत्तर किती पिल्यावर झिण्गतात या स्वरुपात नको
तर किती लोकं साधारण झिंगतात या टक्केवारीत वा आकडेवारीत विचारले होते.
तुम्ही तुमचा अंदज सांगू शकता
अधिकृत आकडेवारी मिळून शोधायचा प्रयत्न करूया.
दारूमुळे किती मरतात हे देखील अभ्यासूया
अर्थात या लॉकडाऊन काळत आणखी वेगळ्याही समस्या असणार आहेत ज्या वर धाग्यात नमूद केल्या आहेत..
किती सेलिब्रिटी दारूची
किती सेलिब्रिटी दारूची जाहिरात करतात हेही बघूया![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्यांचे चाहते त्याबद्दल काय म्हणतात तेही बघूया
इतक्या लोकांच्या मरण्याला कारणीभूत असल्याबद्दल आपण त्यांच्यावर काही गुन्हा नोंदवू शकतो का?
चर्रप्स भाऊ
चर्रप्स भाऊ
स्नेक व्हॅनम बियर बद्दल पहिल्यांदाच ऐकले
कुठे मिळाली? चव कशी होती?
कारण 65 टक्के म्हणजे कैच्याकै स्ट्रॉंग आहे
इतक्या लोकांच्या मरण्याला
इतक्या लोकांच्या मरण्याला कारणीभूत असल्याबद्दल आपण त्यांच्यावर काही गुन्हा नोंदवू शकतो का?
नवीन Submitted by आशुचँप on 4 May, 2020 - 18:49
>>>
कायद्याने नाही
कारण परवानगी खुद्द सरकार देते
पण निषेध करू शकतो. तसेच जे मद्याच्य जाहीराती नाकारतात त्यांचे कौतुक करू शकतो.
पण त्यासाठी आधी स्वत: मद्य पिणे आणि त्यावर चवीच्या गप्पा मारणे सोडायला हवे.
मी तो निषेध करू शकतो. आणि करतो !
कायद्याने का नाही
कायद्याने का नाही
एखादा माणूस दारू सारखे विष प्यायला उद्युक्त करत असेल आपल्या स्टारडम चा फायदा घेऊन तर तो त्यांच्या मरणाला कारणीभूत कसा होत नाही
सरकार म्हणत नाही या आणि दारू प्या
हे लोकं सारखे टीव्ही वर येऊन दारू पिणे कसे महत्वाचे, make it large असे तरुण पिढीच्या मनावर बिंबवतात तरी त्याला फॉलो करून आरत्या गाणारे लोक आहेत
त्यांच्यावर तरी गुन्हा दाखल व्हायलाच हवा
दारू पिल्यानंतर झोप येणे.
दारू पिल्यानंतर झोप येणे.
दारू पिल्यानंतर झिंगणे
दारू पिल्यानंतर आक्रमक होणे
दारू पिल्यानंतर बडबड करणे.
असे खूप प्रकार आहेत नाशेचे.
दारू पिऊन मायबोलीवर धागे
दारू पिऊन मायबोलीवर धागे काढणे येतं का याच्यात
ही नशा भल्याभल्याना थैमान घालायला लावते
नाशकात दारूविक्री बंद!!!
नाशकात दारूविक्री बंद!!!
जिल्हाधिकाऱयांचा निर्णय!
एक फरक लक्षात आलं असेल .
एक फरक लक्षात आलं असेल .
जेव्हा पासून दारू बंद आहे माय बोलीवर troling कमी झालंय.
नाहीच जवळजवळ.
प्रशांत तुम्ही आणि मी एकाच
प्रशांत तुम्ही आणि मी एकाच मायबोलीबद्दल बोलतोय ना?
एकदा तपासून घ्यावं म्हणून विचारलं बाकी काही नाही
नाशकात दारूविक्री बंद!!!
नाशकात दारूविक्री बंद!!!
आपल्या सुविद्य मुख्यमंत्र्यांचा निर्णय असा डावलता येतो. की साहेबांना गडचिरोलीला जायचे वेध लागलेत???? (पुर्वानुभव कॉस)
दारू पिऊन मायबोलीवर धागे काढणे येतं का याच्यात
इथे जमिनीवर हात आपटुन गडाबडा लोळत हसणारी इस्मायली कल्पावी.
आशुचँप याबद्द्ल तुम्हाला एक कडक चहा तुम्ही म्हणाल तिथे.
ओफिसात एक जण इतरांचा दारू
ओफिसात एक जण इतरांचा दारू संवाद बराच वेळ ऐकत होता. शेवटी तो म्हणाला " दारु दारू काय करता? माझी बायको बाटली संपत आली की दुसरी आणून ठेवते. रोज थोडी घेतो. " सगळ्यांनी खूप हेवा केला.
हा मनुष्य कधीही काही वाह्यात करताना ऐकलं नाही किंवा संसाराची वाट लावली नाही.
खुशवंत सिंगाची आई शेवटची घटका मोजत होती तेव्हा बोलली " वि ..स्की." हे लिहिलंय त्यांनी. दारू बनवणाऱ्या कंपन्या थोडीच असं सांगतात की भरपूर प्या मरा, तळी** व्हा? "चांगली प्या, आमची प्या."
बाकी भरपूर पिणे आणि ताठ उभे राहाणे , गाडी सरळ चालवणे, ही मर्दाची लक्षणं हे सांगणाऱ्यांपासून सावध राहा.
एखादा माणूस दारू सारखे विष
एखादा माणूस दारू सारखे विष प्यायला उद्युक्त करत असेल
>>>
तर गुन्हा दाखल करू शकतो.
हे लोकं सारखे टीव्ही वर येऊन
हे लोकं सारखे टीव्ही वर येऊन दारू पिणे कसे महत्वाचे, make it large
>>>
लिंक शेअर करा
माझी बायको बाटली संपत आली की
माझी बायको बाटली संपत आली की दुसरी आणून ठेवते. रोज थोडी घेतो. " सगळ्यांनी खूप हेवा केला.
>>>>
आई सहसा हे नाही करत..
एक फरक लक्षात आलं असेल .
एक फरक लक्षात आलं असेल .
जेव्हा पासून दारू बंद आहे माय बोलीवर troling कमी झालंय.
नाहीच जवळजवळ.
Submitted by prashant255 on 4 May, 2020 - 19:34
>>>
ट्रोलिंगबाबत सांगता येत नाही तो स्वभाव असतो.
मात्र मद्यप्राशनाने भाषेची पातळी घसरत जाते. शिव्या मुक्तपणे बाहेर पडतात हे मात्र खरेय..
जाने दे यार. पिएला है. क्या उसके मूह लगता है
हा सुप्रसिद्ध वाक्यप्रचार आहे.
Pages