कोविड

ईज्जत द्या

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 January, 2022 - 12:41

मंगळवारी बायकोला लक्षणे दिसली.
बुधवारी तिची टेस्ट केली.
गुरुवारी तिचा रिपोर्ट आला.
कोविड पोजिटीव्ह!

बुधवारी मला लक्षणे दिसली.
गुरुवारी माझी टेस्ट केली.
शुक्रवारी माझा रिपोर्ट आला.
कोविड पोजिटीव्ह!

महेशच्या डॅम ईट स्टाईलमध्ये आपल्याच हातावर मूठ मारली आणि आनंदाने म्हणालो, येस्स!
त्याच उत्साहात बिग बॉसला फोन लावला. आता चार दिवस आराम करतोय, तू आणि तुझी कंपनी गेली तेल लावत हे सांगायला. अर्थात हे मनातल्या मनात. खरे तर कधी नव्हे ते त्याकडून थोडेसे आंजारून गोंजारून घ्यायचे होते. तर लावला फोन...

विषय: 

एका आय. सी. यू . मधल्या डॉक्टरचे मनोगत .....

Submitted by palas on 24 April, 2021 - 10:23

एका आय. सी. यू . मधल्या डॉक्टरचे मनोगत

मी प्रथम वर्षाची निवासी डॉक्टर आहे.

मी आजपर्यंत पाहिलेला पहिला मृत्यू 30 मार्च 2021 रोजी झाला - आदल्या रात्री एक कोव्हीड रूग्ण आमच्या आयसीयूमध्ये दाखल झाला. त्याची प्रकृती चिंताजनक होती, परंतु तो केवळ 40 वर्ष्यांचा होता, मला वाटले की तो त्यातून वाचेल. पण दुसर्‍याच दिवशी त्याचा मृत्यू झाला - मी सुन्न झाले.

शब्दखुणा: 

ठाण्यामध्ये वेंटिलेटर बेड ऊपलब्धता.

Submitted by मी अश्विनी on 16 April, 2021 - 20:50

कृपया,
ठाण्यामध्ये कुठल्या हॉस्पिटलमध्ये कोविड पॉझिटिव पेशंट साठी वेंटिलेटर बेड ऊपलब्ध असलयास कोणी कळवेल का?
असा बेड सापडण्यास कोणी मदत करू शकेल का?
वॉर रूम वगैरे सगळे प्रयत्न करून झाले पण कोठेच काही मदत मिळत नाहीये. सिनिअर सिटीझन पेशंट अत्यवस्थ स्थितीमध्ये आहे, बाकीही सगळे प्रयत्न चालूच आहेत.
वेंटिलेटर बेड असलेले खाजगी किंवा सरकारी हॉस्पिटल कसे शोधावे ह्याचीही माहिती मिळाल्यास मदत होईल.
काही मदतनीसांचे काँटॅक्ट मिळाले तरी चालेल.

धन्यवाद

कोविड १९ : वर्षपूर्ती आणि लसीकरण

Submitted by कुमार१ on 7 December, 2020 - 07:30

या विषयाचे आधीचे संदर्भ :

१. हात, जंतू, पाणी आणि साबण (https://www.maayboli.com/node/73752)

२. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज (https://www.maayboli.com/node/75123)

३.कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य (https://www.maayboli.com/node/75809)

विषय: 
शब्दखुणा: 

मेडीकल इन्शुरन्स

Submitted by एविता on 11 November, 2020 - 00:12

" जया, अगं काय सर्फिंग करते आहेस एवढं?"

" अमेझॉन, दिवाळी जवळ आली, आता नव्या खरेदीसाठी काय काय मिळतंय ते बघते."

" छान, बेझोसच्या घश्यात घाल तू तुझे कष्टाने कमावलेले पैसे."

" अरे, अरे, अरे..! जणू काय तू ऑनलाईन घेतच नाहीस कधी?"

"घेते की. पण अगदी आवश्यक तेच आणि फक्त आईसाठीच घेते, माझ्यासाठी नाही. आणि दिवाळीला तर नाहीच."

"अरे हो. विसरलेच की. अग काय देऊ गं मी आई बाबांना गिफ्ट?"

"वय काय आहे गं आई बाबांचं?"

"बाबा एकसष्ट, आई अठ्ठावन."

"मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी आहे का त्यांची?"

इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजारः जगावरचे संकट

Submitted by पाषाणभेद on 24 August, 2020 - 00:22

(महाराष्ट्रीय राज्य पाठ्यपुस्तक अनावलोकन व टिप्पणी असंशोधीत खाजगी मंडळ, पुणे-१२)

इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजारः जगावरचे संकट

(प्रस्तावना: कोरोना आजारापश्चात एखाद्या इयत्तेतील अभ्यासक्रमात एखादा पाठ कसा असू शकेल हे लेखकाच्या मनात आल्याने "इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजारः जगावरचे संकट" हा पाठ लिहीला आहे. )

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - कोविड