कोरोना
मुडदे मोजवे लागत नाहीयेत तुला
गरजा सगळ्या भागून जातील
तू थोडा तगून राहा
माणसंच तुझ्या कामी येतील
जरा भलं वागून राहा
चालायचंच आहे उद्या परत
आज घरी राहून पाहा,
होऊ शकते शब्दांची भ्रांत
आज सुचतायत, लिहून पाहा
कवितेतून व्यथा कसली मांडतोयस?
आर्त पीडितांचे पाश पाहा.
मुडदे मोजवे लागत नाहीयेत तुला,
यातच समाधानी हो, खुश राहा.
- मंगेश विर्धे
एक बाग - कोरोनाच्या दिवसांत
एक बाग - कोरोनाच्या दिवसांत
हिरवी मखमल अंथरलेली,
बाग एक फुललेली,
मुलांशिवाय हिरमुसलेली.
झोपाळा थांबलेला,
सी-साॅ झुकलेला,
घसरगुंडीचा चेहरा उतरलेला,
बाक एक एकटाच बसलेला.
फुलांनी विचारलं फुलपाखरांना,
"मुलं का येत नाहीत खेळायला?"
फुलपाखर॔ म्हणाली, "काही कळेना!
चिऊताईला सांगायला हवं.
खिडकीत त्यांच्या डोकावून ये.
काय? कसं? विचारुन ये."
भूभू म्हणाला, "मनीमाऊला,
"पिल्लांना सोबत घेऊन जाऊ.
मुलांशी दुरुन खेळून येऊ."
हिरवी मखमल अंथरलेली,
बाग एक फुललेली,
मुलांशिवाय हिरमुसलेली.
विश्वाचिया आर्ता
विश्वाचिया आर्ता
***************
पांगुळले जग
चालवी रे दत्ता
हरवूनी सत्ता
विषाणूंची ॥
भिंगुळले डोळे
तोषवी रे दत्ता
दावूनिया वाटा
रुळलेल्या ॥
घाबरले जन
सावर रे दत्ता
बळ देत चित्ता
विश्वासाचे ॥
हरली उमेद
जागव रे दत्ता
चालण्यास रस्ता
दृढ बळे ॥
आणि चालणाऱ्या
सांभाळ रे दत्ता
शितल प्रारब्धा
करुनिया ॥
थांबव चालणे
वणवण दत्ता
निर्विष जगता
पुन्हा करी ॥
विक्रांत मागतो
तुजला श्री दत्ता
विश्वाचिया आर्ता
धाव घेई ॥
****
मृत्यूबीज
मृत्यूबीज
********
कोरोना वार्डात मी
रेंगाळतो आहे..
रेंगाळतो आहे..
आजतोवर वाचलास तु
हा एक योगायोग आहे
एक नजर टाक बाहेर
तुझा मृत्यु दारात रेंगाळतो आहे
भरल्यापोटीचे तुझे भुकेचे डोहाळे
काही केल्या संपत नाहीत
डोळे उघडुन बघ जरासे
गरजुंची आज दैना आहे
एक नजर टाक बाहेर
तुझा मृत्यु दारात रेंगाळतो आहे
अपेयासाठी रांगा लावुनी
काय तु कमावतो आहेस?
आज तु वाचलास परि
तु उद्याचे बुकींग करुन ठेवतो आहेस
जीवाचा आटापिटा करत
तुझ्याच हितासाठी
देव स्वतः झुंजतो आहे
तरीही क्षुल्लक कारणे देऊन
तु रस्ते धुंडाळतो आहेस
आदरणिय श्री मोदीजींचे कालचे भाषण
भारताचे पंतप्रधान आदरणिय श्रीयुत नरेंद्रजी मोदीजी यांचे कालचे भाषण समजले नाही. कालचे भाषण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असावे हे माझे गृहीतक आहे. हे चुकीचे असेल तर माझी चूक झाली हे कबूल करतो.
जर गृहीतक योग्य असेल तर
चालत जाणा-या मजुरांची व्यवस्था
पीपीई कीट्सचे वाटप
महाराष्ट्र राज्यासहीत प्रत्येक राज्याच्या वाट्याला येणारा निधी अथवा मदत किती व कशी
झालेल्या चुका टाळण्याचा प्रयत्न
या मुद्द्यांवर ते काय बोलले हे मला समजलेले नाही. ज्यांना यातली माहिती असेल त्यांनी कृपया माझ्या ज्ञानात भर घालावी ही नम्र विनंती.
देखणे ते हात ज्यांना सेवेचे डोहाळे
हात आहेत प्रत्येकाला दोन .
त्याचं काही कौतुक नाही ,कारण हात सगळ्यांनाच आहेत . सगळ्यांनाच असणारे दिवस-रात्र सोबत असणारे हात ईश्वरी रुपांप्रमाणे वेगवेगळ्या स्वरूपात समोर येतात.
चला हातांची विविध रूपे आपण पाहूया.
स्वतःचं पहिलं अपत्य हातात घेऊन नर्स येते आणि आपल्या हातावर आणून ठेवते ,आपण त्याला उराशी कवटाळतो ते हात .
पहिलं पाऊल टाकायला सुरुवात करणाऱ्या बाळाचा हात हातात घेऊन चालवणारे हात.
लेखनाचा श्रीगणेशा करताना लेखणी हातात धरून लिहायला लावणारे हात आणि लिहून घेणारे हात.
प्रेयसीचा हात हातात धरून प्रेमाची पावती मागणारे प्रियकराचे हात .
चीन शी व्यापार करावा की नाही ?
चीन आणि पाकिस्तान आपली शेजारी राष्ट्रे ज्यांनी वारंवार आपल्या परराष्ट्रीय धोरणांमधल्या त्रूटी किंवा राजकीय नेत्यांचा अतिविश्वास शोधून विश्वासघात केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनशी पुढे व्यापार करावा की नाही, पाकिस्तान ला औषधे द्यावी किंवा नाही यावर नागरिक मत प्रदर्शन करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शन करण्यासाठी छ.शिवाजी महाराज दगाबाज शत्रूशी कसे वागले ही इतिहासप्रेमी निनाद बेडेकरांनी चिंचवड मधील जिजाऊ व्याख्यानमालेमधील अपरिचीत गोष्ट सांगाविशी वाटते.
आता पुढील शब्द निनाद बेडेकरांचे आहेत जे अनेक वर्ष मनात, हृदयात साठवलेले आहेत.
Pages
