Submitted by मंगेश विर्धे on 8 June, 2020 - 15:35
गरजा सगळ्या भागून जातील
तू थोडा तगून राहा
माणसंच तुझ्या कामी येतील
जरा भलं वागून राहा
चालायचंच आहे उद्या परत
आज घरी राहून पाहा,
होऊ शकते शब्दांची भ्रांत
आज सुचतायत, लिहून पाहा
कवितेतून व्यथा कसली मांडतोयस?
आर्त पीडितांचे पाश पाहा.
मुडदे मोजवे लागत नाहीयेत तुला,
यातच समाधानी हो, खुश राहा.
- मंगेश विर्धे
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
सत्य परिस्थिती योग्य शब्दात मांडलीये..
याच आशयावर आधारीत माझी एक कविता.. रेंगाळतो आहे..
https://www.maayboli.com/node/74819
छान
छान
खूप संवेदनशील कविता
खूप संवेदनशील कविता
खूप धन्यवाद _/\_ प्रियानिल,
खूप धन्यवाद _/\_ प्रियानिल, धनवंती आणि मन्या
लॉकडाऊन परिस्थिती सुंदर
लॉकडाऊन परिस्थिती सुंदर साकारली आहे.
संशिप्त पण गोड!
संशिप्त पण गोड!
@किशोर मुंढे, @चंद्रमा
@किशोर मुंढे, @चंद्रमा
धन्यवाद_/\_