Submitted by दवबिंदू on 2 June, 2020 - 10:46
एक बाग - कोरोनाच्या दिवसांत
हिरवी मखमल अंथरलेली,
बाग एक फुललेली,
मुलांशिवाय हिरमुसलेली.
झोपाळा थांबलेला,
सी-साॅ झुकलेला,
घसरगुंडीचा चेहरा उतरलेला,
बाक एक एकटाच बसलेला.
फुलांनी विचारलं फुलपाखरांना,
"मुलं का येत नाहीत खेळायला?"
फुलपाखर॔ म्हणाली, "काही कळेना!
चिऊताईला सांगायला हवं.
खिडकीत त्यांच्या डोकावून ये.
काय? कसं? विचारुन ये."
भूभू म्हणाला, "मनीमाऊला,
"पिल्लांना सोबत घेऊन जाऊ.
मुलांशी दुरुन खेळून येऊ."
हिरवी मखमल अंथरलेली,
बाग एक फुललेली,
मुलांशिवाय हिरमुसलेली.
- दवबिंदू
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
फुलांनी विचारलं फुलपाखरांना,
फुलांनी विचारलं फुलपाखरांना,
"मुलं का येत नाहीत खेळायला?"
फुलपाखर॔ म्हणाली, "काही कळेना!
चिऊताईला सांगायला हवं.
खिडकीत त्यांच्या डोकावून ये.
काय? कसं? विचारुन ये."
कविता आवडली आणि बागेसाठी वाईट वाटलं
करोना मुळे जीवसृष्टी देखील
करोना मुळे जीवसृष्टी देखील व्याकुळ झाली आहे. छान भावना व्यक्त केल्या आहेत कवितेतून.
छान .
छान .