भारताचे पंतप्रधान आदरणिय श्रीयुत नरेंद्रजी मोदीजी यांचे कालचे भाषण समजले नाही. कालचे भाषण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असावे हे माझे गृहीतक आहे. हे चुकीचे असेल तर माझी चूक झाली हे कबूल करतो.
जर गृहीतक योग्य असेल तर
चालत जाणा-या मजुरांची व्यवस्था
पीपीई कीट्सचे वाटप
महाराष्ट्र राज्यासहीत प्रत्येक राज्याच्या वाट्याला येणारा निधी अथवा मदत किती व कशी
झालेल्या चुका टाळण्याचा प्रयत्न
या मुद्द्यांवर ते काय बोलले हे मला समजलेले नाही. ज्यांना यातली माहिती असेल त्यांनी कृपया माझ्या ज्ञानात भर घालावी ही नम्र विनंती.
Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा
.________
२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.
लोकशाही धोक्यात येऊ शकते का?
मी यंदा मतदान केले नाही. कोणीही त्या योग्यतेचा वाटला नाही. ना उमेदवार ना पक्ष. हे आमच्या ऒफिसमध्ये सर्वांना ठाऊक आहे.
तर परवा निकालानंतर ऑफिसमध्ये चर्चा चालू होती. एकाने चुकीचा मुद्दा उपस्थित करताच मी तो खोडायला गेले. तसे ती व्यक्ती लगेच म्हणाली, तू मतदान केले नाहीस तुला बोलायचा अधिकारच नाही.
मोदी वि. ईतर... भाजपा वि. ईतर... गांधी कुटुंब वि. ईतर.. अशा अनेक वाद विवादांतून, चर्चा, प्रसंगी वैयक्तीक टीकांतून एक बाब प्रामुख्याने समोर येते ती म्हणजे स्वतंत्र भारताच्या गेल्या ७ दशकात, विशेषतः गेल्या दशकात आपली मते, भूमिका, विचारसारणी ही बर्यापैकी 'ठाम' असते. यात संस्कार, शिक्षण, मिडीया सर्वांचाच मोठा वाटा असतो. त्यामूळे व्यक्तीसापेक्षतेच्या कसोटीवर चूक व बरोबर, फायद्याचे का तोट्याचे याचे नेमकी ऊत्तर सापडणे मुश्कील असते. त्यातही भारता सारख्या महाकाय लोकशाही मधील प्रांत, भाषा, संस्क्रुती, ई.
१ फेब्रुवारीपासून अंमलात आणला जाणारा हा निर्णय सरकारच्या २०१४ च्या एफडीआय सबंधित पॉलिसीशी आणि मोदींच्या परकीय गुंतवणूक भारतात आणण्याच्या प्रत्य्त्नांशी एकदम विसंगत आहे.
ह्या घुमजाव निर्णयाचे विपरित परिणाम फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, वॉलमार्ट सारख्या कंपन्यांवर आणि तदनुषंगाने फॉरेन कंपन्यांच्या भारतातल्या ई-कॉमर्स क्षेत्रातल्या गुंतवणीकीवर थेट होणार असले तरी... दूरगामी परिणाम मोदी सरकारच्या एकूण विश्वासार्हतेवर होणार आहे असे प्रार्थमिक माहितीतून वाटते आहे.
महिन्याअखेरीस दहाबारा हजारांचा ओवरटाईम हातात पडतो तेव्हा आपली तर ऐश झाली असे वाटले. खरे तर असतो आपल्याच मेहनतीचा पैसा. पण तरीही नेहमीच्या पगारापेक्षा जास्त म्हणून वरकमाई झाल्यासारखे वाटते. शॉपिंग होते, हॉटेलिंग होते, गर्लफ्रेंडसोबत डेटींग होते. फक्त त्या दहा बारा हजारांच्या ज्यादा कमाईत. मग हे अकरा हजार कोटींचे घोटाळे करणारे आनंदाने मरत कसे नाहीत?
नमस्कार मित्रों !
माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयानंतर, देशात चलनाचा तुटवडा भासु लागला. रोखीने व्यवहार करणार्या सर्वच नागरिकांना हा धक्का होता !
परंतु, शिक्षण व नोकरीसाठी परदेशात सात वर्षे राहणार्या मला हा अजिबात धक्का नव्हता! कारण त्या सात वर्षात मी युरोप व ऑस्ट्रेलियात कधीही एका वेळी ३० युरो किंवा डॉलर पेक्षा जास्त रक्कम ए.टी.एम. मधुन काढली नव्हती. कारण तेथील बहुतांश व्यवहार कॅशलेस / कार्ड पेमेंट नेच होत असत.
हीच पद्धत भारतात आणण्याच्या माननीय पंतप्रधानांच्या योजनेला अनुसरुन एक नवा व्यवसाय सुरु करित आहे!
मध्यंतरी जिओच्या जाहीरातीत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी दिसल्याने वाद उद्भवला होता. मी मोदी भक्त नाही की द्वेषी नाही, (हे हल्ली आवर्जून सांगावेच लागते) पण मलाही ते खटकले होते. मात्र त्यानंतर पुढे क्लीअर झाले होते की मोदींचा फोटो त्यांच्या परवानगीशिवाय वापरण्यात आला होता. पुढे कायद्यानुसार काय ती कारवाई होईलच असे समजून मी तो विषय डोक्यातून तेव्हाच काढून टाकला होता. किंबहुना मोदींच्या जागी जिओच्या जाहीरातीत शाहरूख खान आल्याने आनंदच झाला होता.
. . . . . काश्मीरच्या उरी सेक्टरमधे दहशतवाद्यांनी भारताच्या तथाकथित शस्त्रसज्जतेचं पितळ उघडं पाडलं. भारतातले जिनावादी पाकिस्तानधार्जिणे कोण ते बघण्यासाठी दिव्यचक्षूंची गरज नाही. गुजरातमधून आलेले, उलटं घड्याळ बांधणारे ढोकळीखाऊ पंतप्रधान नरेन्द्र दामोदरदास मोदी हे पाकिस्तानचे पंतप्रधान मियां नवाझ़ शरीफ ह्यांच्या मातोश्रींना दंडवत घालून आलेे. अरे, आख्ख्या जगात तुला हीच एक वयोवृद्धा सापडली काय ?
काल आईचा फोन आला. अरे रुनम्या ते रिलायन्स फुकटात फोन वाटतेय. स्वस्तात ऑफर देतेय. ईथे त्यांच्या दुकानात लोकांची झुंबड उडालीय. बिल्डींगमधील पोरांनीही लाईन लावलीय. यांची (म्हणजे माझ्या वडीलांची) एक ओळख निघालीय. रांग न लावता आपले काम होईल. तुला काही घ्यायचेय का?
स्मार्टफोन नावालाच वापरणारया आणि ईंटरनेटचा ई सुद्धा ढुंकून न बघणारया माझ्या आईच्या तोंडची ही वाक्ये. रिलायन्स आणि मोदी सरकार काहीतरी स्वस्तात वाटतेय आणि आपला मुलगा त्या लाभापासून वंचित राहू नये ईतकाच प्रामाणिक हेतू.
मोदी सरकार म्हटले तर अच्छे दिन च हे तिचे मत.