पंतप्रधानांचा / सेलिब्रेटींचा फोटो जाहीरातीसाठी वापरणे ५००/- रुपये फक्त?
मध्यंतरी जिओच्या जाहीरातीत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी दिसल्याने वाद उद्भवला होता. मी मोदी भक्त नाही की द्वेषी नाही, (हे हल्ली आवर्जून सांगावेच लागते) पण मलाही ते खटकले होते. मात्र त्यानंतर पुढे क्लीअर झाले होते की मोदींचा फोटो त्यांच्या परवानगीशिवाय वापरण्यात आला होता. पुढे कायद्यानुसार काय ती कारवाई होईलच असे समजून मी तो विषय डोक्यातून तेव्हाच काढून टाकला होता. किंबहुना मोदींच्या जागी जिओच्या जाहीरातीत शाहरूख खान आल्याने आनंदच झाला होता.