मध्यंतरी जिओच्या जाहीरातीत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी दिसल्याने वाद उद्भवला होता. मी मोदी भक्त नाही की द्वेषी नाही, (हे हल्ली आवर्जून सांगावेच लागते) पण मलाही ते खटकले होते. मात्र त्यानंतर पुढे क्लीअर झाले होते की मोदींचा फोटो त्यांच्या परवानगीशिवाय वापरण्यात आला होता. पुढे कायद्यानुसार काय ती कारवाई होईलच असे समजून मी तो विषय डोक्यातून तेव्हाच काढून टाकला होता. किंबहुना मोदींच्या जागी जिओच्या जाहीरातीत शाहरूख खान आल्याने आनंदच झाला होता.
असो, पण आज त्या कारवाईची बातमी कानावर आली, आणि तिने थोडे चकीत केले आहे. कारण याची शिक्षा म्हणून रिलायन्सला फक्त ५००/- रुपये दंड होण्याची शक्यता वर्तवली आहे.
सविस्तर बातमी ईथे या लिंकवर -
‘जिओ’च्या जाहिरातीत मोदींचा फोटो वापरल्यामुळे रिलायन्सला ५०० रूपयांचा दंड
http://www.loksatta.com/desh-videsh-news/jio-could-face-rs-500-fine-for-...
याचा माझ्या सामान्य ज्ञानाने लावलेला साधासोपा अर्थ असा की कोणीही आपल्या प्रॉडक्टच्या जाहीरातीसाठी पंतप्रधान किंवा त्या दर्जाचे पद असलेल्या राजकीय नेत्याचा वा कोणत्याही सेलिब्रेटीचा फोटो त्याच्या परवानगीशिवाय लाऊ शकतो. आणि मग ओरडा झाल्यावर तो काढून फक्त ५०० रुपये भरून सुटू शकतो. याचा अर्थ थोड्या काळासाठी का होईना मी कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तीचा फोटो (भले मग तो शाहरूख खान का असेना) त्यांच्या संमतीशिवाय फक्त ५०० रुपये या क्षुल्लक रकमेत म्हणजे जवळपास फुकटच वापरू शकतो.
मी लावलेला अर्थ बरोबर आहे? का ही वरची स्पेशल केस आहे? माबोवरचे कायद्याचे जाणकार यावर प्रकाश टाकतील.
विषय जिओ आणि मोदींच्या केसवरून सुचला असला तरी चर्चा केवळ यावरच अपेक्षित नाहीये.
एक गंमत म्हणजे बातमीच्या निमित्ताने का होईना हा वरचा फोटो त्या लिंकवर सापडला. म्हणजेच तांत्रिकदृष्ट्या मोदींच्या फोटोसोबत जिओच्या नावाची जाहीरात अजूनही होत आहेच
दंडाच्या रकमा न्यायालयाने
दंडाच्या रकमा न्यायालयाने सुधरवायला हव्यात, बाबा आदमच्या जमान्याच्या वाटतात. कोणते तरी गुन्हावरचे चॅनल आहे, त्यात मोठ्या गुन्ह्याला, ज्यात त्याने लाखोंच्यावर कमालवले असतील, त्यात आरोपी पकडल्या गेला आणि त्याला पाच हजाराचा दंड ठोठावला हे अशा थाटात सांगतात जसे काही भली मोठी शिक्षा ठोठावली.
पाचशे रुपये दंड! काय पण.
अत्यंत चुकीचा निर्णय आहे. आज
अत्यंत चुकीचा निर्णय आहे.
आज प्रधान सेवकांना सारा देश देवाच्या ठिकाणी मानतो.
घरातल्या शुभकार्याच्या पत्रिकेवर आपण आपापल्या ईष्ट देवतेचा फोटो छापतो तेव्हा काय परमिशन घेतो?
सरकारने हा अत्यंत चुकीचा निर्णय घेतला आहे.
उद्यापासून कुठलीही पत्रिका छापायची तर आम्हाला जाऊन पहिलं गणपतीच्या देवळात ५०० रु टेकवून पुजार्याची परमिशन घ्यावी लागेल.
निषेध! निषेध! निषेध!
सरकारी प्रधानमंत्री सरकारी
सरकारी प्रधानमंत्री सरकारी फोन कंपनी कार्यरत असताना खाजगी फोन कंपनीत लोकाना जा म्हणतो.
सरकारी डॉक्टराने खाजगी ल्याबात पेशंटाना जा म्हटले तर बोंब का होते म्हणे ?
आम्हालाही अधिकार नकोत का ? आँ ?
देशाच्या पंतप्रधानाचा फोटो
देशाच्या पंतप्रधानाचा फोटो ,आपल्या प्रॉडक्टच्या जाहिरातीसाठी वापरणे/वापरायला देणे निषेधार्ह आहे.
दंडाच्या रकमा न्यायालयाने
दंडाच्या रकमा न्यायालयाने सुधरवायला हव्यात
>>>
दंडाच्या रकमा न्यायलय ठरवीत नसून विधिमंडळ ठरवते.
सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन वावरणार्याला १० रु दंड आहे.
लोकप्रतिनिधीनी अथवा त्यांच्या मुलांनी गुन्हा केल्यास ( हीच शक्यता जास्त असते)त्याला जास्त दंड होऊ नये म्हणून बहुधा दंडाच्या रकमा वाढवीत नसावेत.
देशाच्या पंतप्रधानाचा फोटो
देशाच्या पंतप्रधानाचा फोटो ,आपल्या प्रॉडक्टच्या जाहिरातीसाठी वापरणे/वापरायला देणे निषेधार्ह आहे.
>>
निषेध हा काही दण्ड नव्हे ::फिदी:
फोटो वापरून जेव्हढी कमाई
फोटो वापरून जेव्हढी कमाई कंपनीने केली असेल त्याच्या ५ पट दंड वसूल केला तर चालेल का ? कि ५०० पट हवा?
{{{ कोणीही आपल्या
{{{ कोणीही आपल्या प्रॉडक्टच्या जाहीरातीसाठी पंतप्रधान किंवा त्या दर्जाचे पद असलेल्या राजकीय नेत्याचा वा कोणत्याही सेलिब्रेटीचा फोटो त्याच्या परवानगीशिवाय लाऊ शकतो. आणि मग ओरडा झाल्यावर तो काढून फक्त ५०० रुपये भरून सुटू शकतो. }}}
cUkIcA artha kaaDhalA aahe. udyA tumhI shaahrukhacA phoTo jaahiraaTIta vaaparalA tara tumhI 500/- rupaye bharun suTU shakata nAhI. to siddha karUn daakhaVel kI yaapUrvI tyaachaa phoTo vaaparaNaaRya kaMpanyaaMnI tyaalaa saraasarI kitI rakkam dilI aahe. tumhAlaa tevaDhI rakkam + daMD bharaavaaca laagel.
P.M. ase kaahI siddha karu shakata nasalyaane tyaaMcyaa kesamadhye jaasta daMD jhaalelaa naahI.
माझ्या सामान्य ज्ञानाने
माझ्या सामान्य ज्ञानाने लावलेला साधासोपा अर्थ असा की कोणीही आपल्या प्रॉडक्टच्या जाहीरातीसाठी पंतप्रधान किंवा त्या दर्जाचे पद असलेल्या राजकीय नेत्याचा वा कोणत्याही सेलिब्रेटीचा फोटो त्याच्या परवानगीशिवाय लाऊ शकतो. आणि मग ओरडा झाल्यावर तो काढून फक्त ५०० रुपये भरून सुटू शकतो. याचा अर्थ थोड्या काळासाठी का होईना मी कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तीचा फोटो (भले मग तो शाहरूख खान का असेना) त्यांच्या संमतीशिवाय फक्त ५०० रुपये या क्षुल्लक रकमेत म्हणजे जवळपास फुकटच वापरू शकतो.>>>>>>>
अगदी बरोबर, तुम्ही परवानगीशिवाय फोटो वापरताय आणि नंतर केस झाल्यावर दंड किती तर ५०० रुपये ,हे अस असेल तर मग आक्षेपच कशाला ??????(नुसता timepass वाटतोय )
नाहीतर सरळ नियमांमध्ये बदल हवा ,जो सामान्य जनतेलाही पटेल....
उद्यापासून कुठलीही पत्रिका
उद्यापासून कुठलीही पत्रिका छापायची तर आम्हाला जाऊन पहिलं गणपतीच्या देवळात ५०० रु टेकवून पुजार्याची परमिशन घ्यावी लागेल.
>>
पुजार्याचा काय संबंध? डायरेक्ट गणपतीने परमिशन द्यायला हवी ना?
पहा, oh my god पुजारी
पहा, oh my god
पुजारी =बाप्पाचे भूलोकाशी असलेले कनेक्शन
ओह माय गॉड मध्ये
ओह माय गॉड मध्ये दाखवल्याप्रमाणे देवाचे पृथ्वीतलावरचे मॅनेजर म्हणजे देवळाच्या विश्वस्तांची (पूजारी नाही) परवानगी गरजेचे.
देव फार मोठा माणूस आहे, तो असा थेट कोणाला भेटत नाही
बिपीनचंद्र, तुम्हाला असे
बिपीनचंद्र,
तुम्हाला असे म्हणायचे आहे की ज्याने आधी कधी मॉडेलिंग केली नाही किंवा या कामासाठी लाखो घेतले नाही अश्याचा फोटो फक्त बिनधास्त ५०० रुपयात वापरू शकतो. कारण त्याची किंमत आधी कोणी ठरवली नसते?
असेच म्हणायचे आहे का हे मराठीत क्लीअर केलेत तर पुढची शंका विचारतो.
ऋन्मेष, मी " कोणीही आपल्या
ऋन्मेष,
मी
" कोणीही आपल्या प्रॉडक्टच्या जाहीरातीसाठी पंतप्रधान किंवा त्या दर्जाचे पद असलेल्या राजकीय नेत्याचा वा कोणत्याही सेलिब्रेटीचा फोटो त्याच्या परवानगीशिवाय लाऊ शकतो. आणि मग ओरडा झाल्यावर तो काढून फक्त ५०० रुपये भरून सुटू शकतो."
हा अर्थ चूकीचा आहे असे सांगितलेय. मराठीतच लिहायचा प्रयत्न केला होता पण आमचा सन् २००० चा पेन्टीयम कॉप्युटर चालू झाल्यावर सुरुवातीची पंधरावीस मिनिटे गरम झाल्याशिवाय नीट मराठी अक्षरे स्क्रीनवर उमटवित नाही.
पीएमओने रुपये ५००/- पेक्षा अधिक दंड न करण्याची एक शक्यता मी वर्तविलीय ती अशी की त्यांना त्या छायाचित्राचे अशा कामासंबंधीचे मूल्य सिद्ध करता येणे अवघड वाटलेअ असावे.
{{{ ज्याने आधी कधी मॉडेलिंग केली नाही किंवा या कामासाठी लाखो घेतले नाही अश्याचा फोटो}}}
याबद्द्ल मी काही भाष्य केलेले नाही.
एम्ब्लेम्स अँड नेम्स
एम्ब्लेम्स अँड नेम्स (प्रिव्हेन्शन ऑफ इम्प्रॉपर युज) अॅक्ट
पंतप्रधानांच्या नावाचा ( व अन्य बर्याच गोष्टींचा), परवानगी न घेता, व्यावसायिक हेतूने वापर करण्यावर बंदी आहे. आणि कायद्यात त्यासाठी ५०० रुपये दंड ठरवलेला आहे.
आता अशा प्रकारचं हे पहिलंच प्रकरण असेल का हे जाणून घेणं इंटरेस्टिंग असेल.
जियोला दंड ठोठावलाय. पेटीएमला ठोठावलाय का? की त्यांनी परवानगी घेतली होती?
. दंडाचे म्हणाल तर पीएमचा
. दंडाचे म्हणाल तर पीएमचा फोटो वापरून किती कमाई केली याचे उत्तर शून्य येते (.मोफत ). शून्याच्या कितीही पटीत दंड शून्यच. पाचशे हा आकडा बहुतेक कायदे , नियम अपडेट न केल्याने आलेला असावा.
मुद्दा पीएम चा फोटो वापरण्याचा आहे. त्ती गंभीर चूक आहे. परवानगीनेही शक्य नाही. कारण यामुळे देशाचे सर्वोच्च पद एखाद्या उद्योगपतीकडे झुकलेले आहे असा त्याचा संदेश जातो. याचा इतरांवर आणि बाजारावरही परिणाम होऊ शकतो. देशाचे पीएम मनाला येईल तसे वागू शकत नाहीत.
उद्या राहुलकुमार बजाज पीएम झाले तर त्यांनाही बहुतेक आपला फोटो कंपनीच्या उत्पादनांसाठी वापरता येणार नाही. आधार कार्डासाठी जेव्हां नीलकेणींची नियुक्ती झाली होती तेव्हां त्यांनी इन्फोसिसशी असलेले आपले संबंध तोडले होते. तसा नियम असावा.शकतो
अशाच प्रकारे पुण्यातच एका बांधकाम व्यावसायिकाने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत स्कीम आहे म्हणून त्यांचा फोटो वापरला तेव्हां त्याला अटक होणार होती बहुधा. त्याला किती दंड झाला हे लक्षात नाही. पण ५०० पेक्षा खूपच मोठी रक्कम होती हे नक्की !
( हा प्रतिसाद वाचूनही ज्यांना अजूनही मी भक्त वगैरे आहे असे वाटत राहणार आहे त्यांच्याबद्दल यापुढे मनात अपार करुणा दाटून येणार आहे)
लोकसत्ता: जिओला ५०० रूपयांचा
लोकसत्ता: जिओला ५०० रूपयांचा दंड ठोठाविण्यात येण्याची शक्यता आहे
टाईम्स ऑफ इंडिया: Reliance Jio may end up paying a penalty of just up to Rs 500
दंडाचे म्हणाल तर पीएमचा फोटो
दंडाचे म्हणाल तर पीएमचा फोटो वापरून किती कमाई केली याचे उत्तर शून्य येते (.मोफत ).
फक्त फ्री काळासाठी उत्पन्न शून्य. नंतर अगणित आहे.
आणि पेटीएम चे काय ? ते तर ४ % चार्जेस घेतात ना?
अतुलपाटील, शक्यता आहे >>> हो
अतुलपाटील,
शक्यता आहे
>>>
हो मला माहीत आहे शक्यताच आहे, अजून फायनल नाही. पण ही शक्यता सत्यात उतरली तर हा निर्णय चूक असेल की बरोबर हे आपले मत आधीच जाणून घ्यायला आवडेल
तसेच मला हे चूक वाटत असल्याने शक्यता सत्यात उतरायच्या आधीच मी मायबोलीवर धागा काढत आवाज उठवला. आता बघूया या आपल्या आवाजाला घाबरून तरी दंडाची रक्कम वाढवली जाते का ते?
दंडाचे म्हणाल तर पीएमचा फोटो
दंडाचे म्हणाल तर पीएमचा फोटो वापरून किती कमाई केली याचे उत्तर शून्य येते (.मोफत ).
>>>
सपना हे जरा ईलॅबोरेट कराल का? कमाई शून्य का बोलत आहात? सध्या फ्री मध्ये सर्विस प्रोव्हाईड करत आहेत म्हणून का? ते फ्री म्हणजे अंबानी आपल्या खिशातून गोरगरीबांना वाटत आहेत असा तर आपला गैरसमज झाला नाही ना? बिजनेस आहे हो तो, ती गुंतवणूक आहे. असो, हे साधे लॉजिक आहे, माझ्यासारख्या धंदा न जमणार्या मराठी माणसालाही समजते. आपण काही दुसर्या कारणासाठी कमाई शून्य बोलत असाल तर ते जाणून घ्यायला आवडेल
पीएमओने रुपये ५००/- पेक्षा
पीएमओने रुपये ५००/- पेक्षा अधिक दंड न करण्याची एक शक्यता मी वर्तविलीय ती अशी की त्यांना त्या छायाचित्राचे अशा कामासंबंधीचे मूल्य सिद्ध करता येणे अवघड वाटलेअ असावे.
>>>>>
बिपीनचंद्र, हीच शक्यता तर समजत नाहीये. मूल्य ठरवणे अवघड वाटतेय म्हणून सरळ सोडूनच द्यायचे का?
जर शाहरूख खान काही करोड घेत असेल, किंवा समजा याच जिओच्या जाहीरातीसाठी त्याला पाच करोड मिळाले असतील, तर मोदींना किती मिळायला हवेत? माझ्यामते जास्त, कारण मी आजच्या तारखेला मोदींना शाहरूखपेक्षा मोठा ब्राण्ड समजतो.
आता मोदी ती किंमत (किंबहुना परवानगी न घेता बेकायदेशीर पद्धतीने छायाचित्र वापरले असल्याने त्याहीपेक्षा मोठी रक्कम) दंड म्हणून वसूल करून लोककल्याणाकरता नाही का वापरू शकत?
जर मोदी तसे करत नाहीत तर मोदींचीही याला छुपी परवानगी आहे असा अर्थ नाही का होणार?
मध्यंतरी त्या नोटाबंदीविरोधात अफवा उठलेली की अंबानीला आधीच हे होणार माहीत होते म्हणून त्याने मौक्याला चौका मारत जिओ आणले, तर या सर्वांमुळे त्या अफवेवर विश्वास नाही का बसणार?
ऋन्मेष बाळा तू सुद्धा एकच ओळ
ऋन्मेष बाळा
तू सुद्धा एकच ओळ वाचलेली दिसतेय. पुढची पोस्ट तुझ्या मैत्रिणी वाचून तुला समजावून सांगतीलच. तोपर्यंत फेसबुक वर फिरत असलेला हा विनोद पाहून खूष हो.
दंड कसा भरावा या विवंचनेत असताना धीर द्यायला आलेले हितचिंतक मित्र