काल पुण्यामधे सभा घेण्यासाठी "निर्भय बनो" चे पत्रकार/सुधारक श्री. निखिल वागळे आणि समविचारी जाणार होते. सभेला जात असणार्या त्यांच्या ताफ्यावर काही भ्याड गुंडांनी अत्यंत सुनियोजीत रितीने प्राणघातक हल्ला केला. बैठकीला जात असणार्या या ताफ्यावर अनेक वेळा हल्ला झाला, त्यांच्या गाडीचा पाठलाग करण्यात आला, गाडीच्या काचा फोडल्याचे व्हिडिओ सर्वत्र पसरत आहेत. अशा प्रकारच्या सर्वच हल्ल्यांचा निषेध करावा तेव्हढा थोडा आहे.
लोकशाहीत, मतदार राजा असतो असे म्हणतात! त्याची संपत्ती काय तर त्याचे एक मत! मतदानाच्या दिवशी तो ती ही संपत्ती देऊन भिकारी होतो, एकाच आशेवर, की वचन पूर्तता होईल, राज्य सुखी होईल. पण..
वचन पूर्तता व्हावी म्हणुनी
राजा एक भिकारी होतो
एक मताचा मारून शिक्का,
राज्य दुज्याच्या नावे करतो
दुजा असे ना भरत तरीही
राम खुशीने वनी राहतो
करील अयोध्या सुखी आपुली
असली आशा लावून बसतो
इकडे रामा काटे वनीचे
मुळे कंद फल खाऊन जगतो
कधी शबरीची बोरे उष्टी
हसत मुखाने चाखून बघतो
लोकशाही धोक्यात येऊ शकते का?
मी यंदा मतदान केले नाही. कोणीही त्या योग्यतेचा वाटला नाही. ना उमेदवार ना पक्ष. हे आमच्या ऒफिसमध्ये सर्वांना ठाऊक आहे.
तर परवा निकालानंतर ऑफिसमध्ये चर्चा चालू होती. एकाने चुकीचा मुद्दा उपस्थित करताच मी तो खोडायला गेले. तसे ती व्यक्ती लगेच म्हणाली, तू मतदान केले नाहीस तुला बोलायचा अधिकारच नाही.
मतदान हे नागरिकाचे कर्तव्य असल्याने मी ते नुकतेच पार पाडले. नित्यनेमाने विविध निवडणुका येतात अन आपण आपला हा हक्क बजावतो. पुढे त्यांचे निकाल लागतात. कधी आपल्या पसंतीचा पक्ष येतो तर कधी नाही. पण हे रहाटगाडगे चालूच राहते. जगातील बऱ्याच देशांत लोकशाही आता रुजली आहे. ‘अजून चांगला पर्याय’ सापडेपर्यंतची योग्य राज्यव्यवस्था, असे आपण तिचे वर्णन करतो.
शाळेत लोकशाही शिकलो ती 'लोकांनी लोकांसाठी चालवलेले सरकार' अशी. तेव्हा मला वाटायचं मला सगळं कळत, म्हणून माझ्या मताला देशात किंमत मिळायला हवी. पण वय वाढतंय तसं कळतंय मला फार कमी ज्ञान आहे, किंबहुना सामान्य माणसाला त्याच्या आवडीच्या आणि तो ज्यात काम करतो त्या क्षेत्रातलं प्रचंड ज्ञान असलं तरी सगळ्याच क्षेत्रातलं ज्ञान नसत. किंबहुना तुम्हाला जर स्वैपाकातलं काही काळात नसेल तर तुमची आई/बायको किंवा अगदी स्वैपाक करण्यासाठी ठेवलेली मोलकरीण तरी तुम्हाला स्वैपाक कसा करायचा या बद्दल मत विचारेल का आणि तुम्ही जरी स्वतःहून सांगितलं तर लक्ष देईल का?
नो वन किल्ड डेमोक्रॉसी!
आणुया मशाल लोकशाहीची
कर विटंबना रोज खुशाल लोकशाहीची
माफ करते प्रजा विशाल लोकशाहीची
जातपात धर्मापायी फुंकती घरदार
अन करीती जनता हलाल लोकशाहीची
ओठात एक आणि पोटात एक हिच निती
कोल्ह्याने पांघरली खाल लोकशाहीची
थकला काफिला असा चालून रात्रंदिवस
कोठवर वाहावी पखाल लोकशाहीची
बहुमत नसता होती वेडे राजकारणी
पळवापळवी चाले कमाल लोकशाहीची
कुणा भरवी तुपाशी कुणी भणंग उपाशी
अशीच असे सारी धमाल लोकशाहीची
झोपडीत युगायुगांचा दाटला अंधार
चला आणुया फिरुन मशाल लोकशाहीची
© दत्तात्रय साळुंके
आता आताचं ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या.गाव गावचं पुढारी निवडण्यात अालं.या गाव पातळीवरच्या निवडणूकात भी भारी रंगत अाली.नात्या गोत्यात,पावण्या रावळयातचं फाईटी लागल्या.सख्या सासू सुना आमने सामने अाल्या.भावा भावातल्या दुश्मन्या टोकाला गेल्या.
पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचे अतिप्रमाणात वार्तांकन केल्याप्रकरणी केंद्र सरकारने एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला एक दिवसासाठी प्रक्षेपण बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी पहिल्यांदाच एखाद्या वाहिनीवर कारवाई करण्यात आली आहे.
पाच वर्षांतून एकदा मतं घेऊन गेले की निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नेमकं काय करतात हे सर्वांपर्यंत पोहोचत नाही.
भारतात सगळं सुरळित चालू आहे ह्यावर माझ्यासारख्या अनेकांचा विश्वास नाही. लोकप्रतिनिधींच्या न पटणार्या गोष्टींबद्दल जाब विचारणे ही आपली जबाबदारी आणि हक्क आहे.
इथे कुठल्याही एका पक्षाच्या नेत्यांबद्दल लिहिणं अपेक्षित नाही. सर्व पक्ष एकाच तराजूत ठेवून फक्त बातम्या देऊन त्यावर घडलेली गोष्ट योग्य की अयोग्य अशा पद्धतीची चर्चा अपेक्षित आहे.
नम्र विनंती - सर्वांनी अपशब्द टाळून सभ्य भाषेत लिहू या.