पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचे अतिप्रमाणात वार्तांकन केल्याप्रकरणी केंद्र सरकारने एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला एक दिवसासाठी प्रक्षेपण बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी पहिल्यांदाच एखाद्या वाहिनीवर कारवाई करण्यात आली आहे.
जानेवारी महिन्यात पठाणकोट येथे हवाई दलाच्या तळावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याचे वार्ताकन करताना ‘एनडीटीव्ही हिंदी’ या वृत्तवाहिनीने हवाई तळावर मिग आणि लढाऊ विमाने, रॉकेट लाँचर्स, तोफगोळे, हेलिकॉप्टर्स आणि दारूगोळा याचा ठावठिकाणा सांगणारे तपशीलवार वार्ताकन केले होते. यामुळे दहशतवादी हल्ला करणा-यांना आणखी माहिती मिळाली असती असा निष्कर्ष केंद्राच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या समितीने काढला होता. त्यानुसार एनडीटीव्हीवर एक दिवसांसाठी प्रक्षेपण बंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
..
माझ्या आठवणीप्रमाणे 26/11 मुंबई हल्ल्याच्यावेळीही एका वाहिनीने (हीच होती का?) उत्साहात वा ब्रेकींग न्यूज साठी वा आणखी एखाद्या स्वार्थासाठी दहशतवाद्यांना फायदेशीर ठरेन असे चित्रकरण केल्याचा आवाज सोशलसाईटवर उठला होता. पुढे तो आवाज बहुधा सोशलसाईटवरच दबला.
जर एखाद्या वाहिनीमुळे थेट देशाची सुरक्षाच धोक्यात येत असेल तर अशी कारवाई करत त्यांना सक्त ताकीद देणे वरकरणी योग्य वाटत आहे.
पण आपला देश लोकशाहीने नटलेला आहे. ईथे अतिरेक्यांचा एनकाऊंटर झाला म्हणून मानवतावादी संघटना आवाज उठवू शकतात, ईथे कसाबसारख्या एखाद्या दहशतवाद्यालाही कोर्ट कचेरीच्या मार्गानेच शिक्षा ठोठावली जाते. अशी लोकशाही ज्या देशात जपली जाते तिथे एखाद्या वृत्तवाहिनीवरील बंदीच्या कारवाईला समर्थन न देणारी मते नक्कीच असतील. ती देखील जाणून घ्यायला आवडतील. आणि हो, यात कुठलाही उपरोध नाही.
झाली का बोंबाबोंब आणि चर्चा
झाली का बोंबाबोंब आणि चर्चा सुरु..
एन डी टी व्ही ने (किंवा कोणत्याही वाहिनीने) देशाच्या सुरक्षेला बाधा निर्माण असे प्रसारीत करायचे आणि नंतर सरकारने नुसती तंबी द्यायची? दंड का करायचा नाही? आपल्याकडे केलेल्या चुकिबद्दल / गैरप्रकाराबद्दल शिक्षा दिल्यावर लगेच एवढे रान का पेटते? आपली चुक झाली हे मान्य करून दिलेली शिक्षा का भोगली जात नाही? लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून सतत प्रत्येक मुद्द्यावरुन आरडाओरडा, एकाच पक्षाला / माणसाला टारगेट करणे हे सगळे चालते तेव्हा त्याचा प्रॉब्लेम का होत नाही? ह्या वाहिनीवर कायमची बंदी आणली नाही. एक दिवसच प्रक्षेपण बंद करणार आहेत ना.. म्हणजे लगेच गळचेपी झाली का? सरकारने नुसती तंबी दिली तर नंतर परत हीच चुक करायला लोक मागेपुढे बघणार नाहीत. सरकार दंड करू शकते हे सुद्धा लोकांना कळालेच पाहिजे आणि स्वतःच्या जबाब्दारीची जाणीव व्हायलाच हवी.
>>या हल्ल्याचे वार्ताकन
>>या हल्ल्याचे वार्ताकन करताना ‘एनडीटीव्ही हिंदी’ या वृत्तवाहिनीने हवाई तळावर मिग आणि लढाऊ विमाने, रॉकेट लाँचर्स, तोफगोळे, हेलिकॉप्टर्स आणि दारूगोळा याचा ठावठिकाणा सांगणारे तपशीलवार वार्ताकन केले होते. <<
अशा प्रकारची सेंसिटिव माहिती मिडियाला मुळात एक्सपोजच का केली जाते? त्यांन प्रवेश/परवानगी देताना बंधनं का घातली जात नाहित? हे मिडियावाले टिआर्पी साठी कुठल्याहि स्तरावर जातील, लष्कराचे या बाबतीत सिक्युरीटी गाईडलाईन्स असतीलच ना? आणि जर का एन्डिटिवीने ते नियम धाब्यावर बसवुन बाईट दिला असेल तर दंड सणकुन दिला पाहिजे, एकच दिवस का नैवेद्य दिल्यासारखा?..
काँग्रेसच्या काळात म्हणूनच
काँग्रेसच्या काळात म्हणूनच आर्मीच्या पराक्रमाच्या बातम्या येत नव्हत्या.
एन्डीटीव्हीचं म्हणणं आहे जी
एन्डीटीव्हीचं म्हणणं आहे जी माहिती सांगितली ती सगळी पब्लिक डोमेनमध्ये होती. अतिरेक्यांना तर यापेक्षा जास्त माहिती असणार.
आजच्या बातम्या म्हणताहेत की जेव्हा ही सगळी माहिती सांगितली तोवर जे दोन अतिरेकी होते असं मानलं गेलं ते असल्याचा कोणताही पुरावा नाही.
आता सरकारच्या, सरकाती यंत्रणांच्या कोणत्याही कृतींबद्दल प्रश्न विचारायचे नाहीत असेही आदेश आहेत. तर आपण उत्तर कोरियात राहतो असं समजून घेऊया.
ऋन्मेष, लोकशाहीचे पहिले तीन
ऋन्मेष, लोकशाहीचे पहिले तीन स्तंभ कोणते असतात हे तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल आणि हो, यात कुठलाही उपरोध नाही.
हर्पेन, बच्चेकी जान लोगे
हर्पेन,
बच्चेकी जान लोगे क्या?
मै सातवे आसमान्में हुं म्हटल्यावर तू म्हणशील पहिल्या सहा आसमानांच्या कक्षा दाखव नाहीतर नावे सांग!
साती - नाय गो बाय, ऋनम्या
साती - नाय गो बाय, ऋनम्या स्तंभ वगैरे भारी भारी शब्दप्रयोग घडी घडी करतो त्याचं कौतुकच आहे. पण घडा कच्चा आहे की पक्का हे सगळ्यांना क ळू नये म्हणून तो देतो ती कोलांटी उत्तरे वाचायला मला जास्त आवडतात.
मै सातवे आसमान्में हुं
मै सातवे आसमान्में हुं म्हटल्यावर तू म्हणशील पहिल्या सहा आसमानांच्या कक्षा दाखव नाहीतर नावे सांग!
बरं सुचवलंस हे पुढच्या खेपेस विचारेन
साती तुम्हाला वाटतं तितकाही
साती तुम्हाला वाटतं तितकाही तो बच्चा नाहीये. ☺
हर्पेन. लोकशाहीत कोणीही
हर्पेन. लोकशाहीत कोणीही कोणाला प्रश्न विचारत त्याची परीक्षा घेऊ शकतो. नेहमीच मोठेच का लहानग्यांची घेणार. असे चार पर्याय मीच तुम्हाला देतो
1. प्रेम, विश्वास, परंपरा
2. ब्रह्मा, विष्णू, महेश
3. पैसा, सत्ता, ताकद
4. लोकसभा (विधीमंडळ), प्रशासन, न्यायालय
ऋन्म्या, तुला वाटतो तितका
ऋन्म्या, तुला वाटतो तितका मोठा मी नाहीये
बघा मी म्हणलं नव्हतं☺
बघा मी म्हणलं नव्हतं☺ क्रमवारी चुकल्यासारखी वाटतीये रे बाळा पण
स्तंभांचेही क्रम असतात का?
स्तंभांचेही क्रम असतात का?
असो. सक्सेस्फुल विषयांतर करून धाग्याचे स्तंभन केल्याबद्दल संबंधितांचे अबिनंदण व आबार!.
स्तंभन शब्द अश्लील
स्तंभन शब्द अश्लील आहे!
निषेध!
हो म्हणजे शाळेत तरी कायम एकाच
हो म्हणजे शाळेत तरी कायम एकाच क्रमाने असल्याचे आठवते. तसे नसते तर प्रसारमाध्यमे चौथाच का पहिलाच का नाही? असे प्रश्न आले असते.
माझ्या माहितीनुसार न्यायपालिका आधी येते मग प्रशासन
तुमचीही कमाल आहे, ऋ च्या
तुमचीही कमाल आहे, ऋ च्या धाग्यावर तुम्ही विषयांतर झाले म्हणून विचारता? इथे काहीही बोला, कसेही बोला, बस टीआरपी वाढला पाहिजे.
शासन , प्रशासन , न्याय व
शासन , प्रशासन , न्याय व वृत्तपत्र
आशु, चौथा म्हणतात कारण खरे
आशु, चौथा म्हणतात कारण खरे खांब तीनच.
कसेही गोल गोल मोजा.
चौथा मागाहून अॅड केलेला आहे.
अचेंनी लिहिलेल्या क्रमाने नागरिकशास्त्रात पाठ केलेले आठवते.
आशूचॅम्प, क्रमवारीची कल्पना
आशूचॅम्प, क्रमवारीची कल्पना नाही. म्हणजे असते हे देखील माहीत नव्हते. क्रमवारीसोबत ती तशी का असते हे जाणून घ्यायला आवडेन.
झाडू, चार ईकडच्या तिकडच्या पोस्टींनी धागा भरकटत नाही. उलट अवांतर माहीतीच मिळले. बाकी जिथे तुम्ही योग्य पोस्ट टाकाल तिथे धागा लाईनीवर येईन.
आमच्या काँग्रेसच्या काळात
आमच्या काँग्रेसच्या काळात असेच होते.
आताच्या सर्कारचं माहीत नाही.
लोकप्रतिनिधी हे
लोकप्रतिनिधी हे उच्चस्तरावरावर.
त्यांच्या योजना प्रशासन अमलात आणते . म्हणुन ते दोन नम्बरच्या स्तरावर.
त्यांच्यातील अंमलबजावणीतील अन्याय निवारायला न्यायलय .
हे सगळेच झोपले तर घंटा बडवायला वृत्तपत्रे
एवढ्या खात्रीने सांगताय
एवढ्या खात्रीने सांगताय म्हणजे तसेच असेल.
साती - अहो मध्ये अण्णा हजारेंचे आंदोलन सुरु होते तेव्हा त्यांना लोकशाहीचा पाचवा स्तंभ म्हणत होते. आता त्याचे पुढे काय झाले माहीती नाही.
तसंतर अर्णव गोस्वामीला पण
तसंतर अर्णव गोस्वामीला पण म्हणत होते.
आर आय पी!
साती, स्तंभन म्हणजे रोखणे,
साती, स्तंभन म्हणजे रोखणे, थांबवणे. अरिष्टस्तंभनकारिणी असे रेणुकेचे एक नाव आहे.
अके, माहित्येय! पण बरेच शब्द
अके,
माहित्येय!
पण बरेच शब्द द्वियर्थी असतात.
अंत्ययात्रेत ज्याप्रकारे
अंत्ययात्रेत ज्याप्रकारे थोड्या नर्वसपणे, बधीर मेंदूने हास्यविनोद सुरू असतात, तसे या धाग्यावरचे नर्मविनोदी प्रतिसाद वाटताहेत.
आर आय पी @ चौथा स्तंभ!
ऋनम्याचे बाफ वेगळेच असतात खरं
ऋनम्याचे बाफ वेगळेच असतात खरं तर मी फक्त मथळाच वाचला होता. आता वाचले तर हे काहीतरी वेगळेच निघाले.
ह्या बातमीनंतर मनात उठलेले तरंग
'आवडीने केला वर त्याला दिवसा खोकला रात्री ज्वर'
'म्हातारीला मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो'
'रोज मरे त्याला कोण रडे'
'जात्यातले रडतात, सुपातले हसतात'
'कोळसा उगाळावा तितका काळाच'
आपल्या माबोवरच्या अशा प्रकारच्या बाफ / प्रतिक्रियांचा डोलारा ज्या स्तंभांवर उभा आहे ते असे
आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून.
आवडतीचा शेंबुड गोड आणि नावडतीचे मीठ आळणी.
आपला तो बाळू दुसऱ्याचा तो कार्टा.
चौथा स्तंभ
माणुसकीचा गहिवर येतो ज्याला जेव्हा जसे सोयीचे
मग परत एकदा हा लेख आठवला.
http://www.loksatta.com/lokrang-news/article-about-durgabai-1147075/
ह्या लेखातलं काही आठवलं ते असं
चर्चा, चर्चा म्हणजे काय? तर तुम्ही कोणत्या बाजूचे आहात ते जाहीर करून टाका अन् कळपात सामील व्हा. या बाजूला, नाही तर त्या बाजूला. मध्यम मार्ग नाहीच. दारांवर फुल्या मारण्याचा धंदा सध्या तेजीत आहे.
आपण डावे-निधर्मी आहोत असं समजा एखाद्यानं सांगून टाकलं की डाव्यांपेक्षा हिंदुत्ववाद्यांना जास्त हायसं वाटतं. शत्रू कळला की काम सोपं होतं.
डाव्यांचं वेगळंच दुखणं आहे. ते प्रत्येक नागरिकाकडे संशयानं पाहत असतात. हा बहुधा संघवाला आहे.. आहे की नाही? मग बसा फुलाच्या पाकळ्या खुडत- ‘हा संघवाला आहे, हा संघवाला नाही, हा संघवाला आहे, हा संघवाला नाही.. होय, नाही.. नाही, होय.’
आपलाच विचार कसा श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्यासाठी आत्यंतिक टोकाची भूमिका घ्यायची, वस्तुस्थितीचा बिनदिक्कत विपर्यास करायचा असं दोन्हीकडून सर्रास सुरू असतं. चोरबाजारात सगळ्या मापाचे, आकाराचे कपडे मिळतात. इतिहासाचंदेखील असंच असतं. हवं ते सापडतं. पाहिजे ते उचला अन् उसवा, नाही तर चिंध्या करा. आपला माल विका. मुठय़ा आवळा. गर्जना करा. भांडा. एक-दुसऱ्याच्या अंगावर धावून जा. हेत्वारोप करत राहा. खऱ्याचं खोटं करा. संशयाचं जाळं विणा. सतत वरच्या पट्टीत बोलत राहा.
मग हर्पेन, तुम्ही काय ठरवलंत
मग हर्पेन, तुम्ही काय ठरवलंत स्वतःसाठी? हॅपी मोहर्रम म्हणायचं की नाही?
अरे वा, मस्त हा झाडू. जमतंय
अरे वा, मस्त हा झाडू. जमतंय
पाकळ्या संपल्यावर तुम्हीच करा
पाकळ्या संपल्यावर तुम्हीच करा उदघोषणा न काय आता
Pages