लोकप्रतिनिधींची निषेधार्ह कृत्ये (पक्षनिरपेक्ष)

Submitted by मिर्ची on 31 March, 2015 - 04:40

पाच वर्षांतून एकदा मतं घेऊन गेले की निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नेमकं काय करतात हे सर्वांपर्यंत पोहोचत नाही.
भारतात सगळं सुरळित चालू आहे ह्यावर माझ्यासारख्या अनेकांचा विश्वास नाही. लोकप्रतिनिधींच्या न पटणार्‍या गोष्टींबद्दल जाब विचारणे ही आपली जबाबदारी आणि हक्क आहे.
इथे कुठल्याही एका पक्षाच्या नेत्यांबद्दल लिहिणं अपेक्षित नाही. सर्व पक्ष एकाच तराजूत ठेवून फक्त बातम्या देऊन त्यावर घडलेली गोष्ट योग्य की अयोग्य अशा पद्धतीची चर्चा अपेक्षित आहे.
नम्र विनंती - सर्वांनी अपशब्द टाळून सभ्य भाषेत लिहू या.

वि.सू. - नकारात्मक गोष्टी वाचल्याने त्रास होणार्‍यांनी धाग्यापासून लांब रहावे. चिडचिड होणे, रक्त उसळणे असे आजार उद्भवल्यास धागाकर्ती जबाबदार नाही. Proud (स्वानुभव)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! आयडीया,
'अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग २' ह्या धाग्यावरुन लक्ष वळवायची.

सुरूवात बहुतेक कुमार विश्वास यांच्यापासून करावी लागेल. पण त्याचं अजून नक्की काय साटंलोटं आहे ते अद्याप बाहेर आलेलं नाही. त्यामुळे तूर्तास प्रतीक्षामोडात.

इतरांनी आपापाले बॅशिंग चालू कराच. येऊद्यात. मोदी, राहुल, अम्मा, ममता, यादव, पवार, केजरीवाल आणि अजून कुणाकुणाचं बॅशिंग करायचं आहे त्यांनी यथेच्छ चालू करा. शिमगा नुकताच झालाय, इथं कायमचा शिमगा!!

आयना का बायना, घेतल्याबिगर जायना!!!

नाही का? शिवराज यांच्या मागे अंघोळ करुन तुमची लोक का बरे लागली होतीत ? कि इतरांनी बदलले तर आरडाओरडा करायचा ही सवय आहे?

शोकसभेत देखील सारखे कपडे बदलायची असतात का? व्वा व्वा
सगळ्या जगात प्रश्न विचारत आहे.

Lol भ्रष्टाचार चे एकही प्रकरण शोधुन शोधुन सापडले नाही तर असले काही मागे लावुन द्यायचे
फारच जुनी वृत्ती आहे

Any clips of Mr. Kumar vista's affairs which some bjp mlas can watch during assembly sessions or a pic of the woman in question they can ogle at, again during assembly.

कुमार विश्वासांबद्दल आपच्या धाग्यावर लिहिलं आहे. इच्छुकांनी वाचनप्रसादाचा लाभ घ्यावा.

कर्नाटक विधानसभेत आमदारांचे पगार वाढवण्याचं बिल पास झालं.
" Karnataka Legislative Assembly on Monday passed a bill to increase salaries of all MLAs by nearly 100 per cent. The hike puts them in the bracket of some of the highest paid law makers in the country. "

आमदारांचे वेतन करदात्यांच्या पैशातून दिलं जातं. त्यांचं वेतन ते स्वतः १००% ने वाढवून घेतात हे अयोग्य वाटतं. वेतन वाढवून घ्यायचं असेल तर त्यासाठी त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या कामाचं रिपोर्ट कार्ड करदात्यांना दाखवायला नको का?

महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन कमरेला पिस्तूल लावून मूकबधिर विद्यार्थ्यांच्या शालेत कार्यक्रमाला. जिल्हाधिकारी आणि एस पी च्या उपस्थितीत.

Maharashtra: BJP Minister Girish Mahajan addresses kids with revolver tucked in belt

आणि कळस म्हणजे माननिय मुख्यमंत्री यांना काहीच चुकीचे वाटत नाही.
हेच जर राष्ट्रवादी या काँग्रेसच्या कोणत्या नेत्याने या कार्यकर्त्याने तरी केले असते तर याच मुख्यमंत्र्यांनी विरोधीपक्षात असताना किती आणि कोणत्याप्रकारे आरडाओरडा केला असता ही कल्पनाच केलेली बरी Wink

महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन कमरेला पिस्तूल लावून मूकबधिर विद्यार्थ्यांच्या शालेत कार्यक्रमाला. जिल्हाधिकारी आणि एस पी च्या उपस्थितीत.
<<
<<
फारच वाईट केले महाजनानी. Sad

फारच वाईट केले महाजनानी.
>>
असे शुचिर्भूत मुख्यमंत्र्याना वाटत नाहीये पण.
त्यांचे साधे टेक्निकल म्हनणे आहे हे कृत्य गुन्ह्यात मोडत नाही.

अरे वा साती. लोकांनी दबाव आणून ते बिल रद्द करायला लावायला हवं.

पिस्तुलाची गोष्ट खरी की खोटी हे इथे पाहता येईल. स्वसंरक्षणासाठी पिस्तुल बाळगणं आवश्यक असेल तरी ते डिसप्ले करणं चूक आहे. मुलांसमोर तर अगदीच चूक.

केला होता... बस? आता ते रेग्ञुलराईज झालं का? सत्कृत्यात समाविष्ट झालं का?

देशाचे परिवहन मंत्री विना हेल्मेटचे स्कूटरव्र प्रवास करतात. हाही गुन्हा नाही का?
<<
<<
फारच भयंकर गुन्हा आहे तो. ताबडतोप गडकरींना अटक करुन कारागृहात डांबायला हवे होते, नागपुर पोलिसांनी.

या कर्नाटकाच्या आमदारांचा आम्ही आमच्या गावात मोर्चा काढून निषेध केला. >> संसदेत देखील प्रकार घडला आहे. कर्मचारी स्वतःच पगार घ्यायला लागले तर कंपनीचे दिवाळे वाजायला वेळ लागत नाही

मला सगळ्यात गंमत वाटते. जी गोष्ट न केल्याने स्वतः सोडून इतरांना काहीही नुकसान होत नाही त्या गोष्टीसाठी भरमसाठ दंड आकारला जातो. मात्र गाडी चालवताना गाडी चालवताना मोबाईलवर बोलत असलेले असंख्य लोक मी रोज बघतो, त्यांना का नाही पोलीस तितक्याच तत्परतेने पकडत? अपघात आणि ट्रॅफिक जॅम हे दोन्ही होऊ शकतं अशा लोकांमुळे.

Pages