सरपंच
लोकप्रतिनिधींची निषेधार्ह कृत्ये (पक्षनिरपेक्ष)
पाच वर्षांतून एकदा मतं घेऊन गेले की निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नेमकं काय करतात हे सर्वांपर्यंत पोहोचत नाही.
भारतात सगळं सुरळित चालू आहे ह्यावर माझ्यासारख्या अनेकांचा विश्वास नाही. लोकप्रतिनिधींच्या न पटणार्या गोष्टींबद्दल जाब विचारणे ही आपली जबाबदारी आणि हक्क आहे.
इथे कुठल्याही एका पक्षाच्या नेत्यांबद्दल लिहिणं अपेक्षित नाही. सर्व पक्ष एकाच तराजूत ठेवून फक्त बातम्या देऊन त्यावर घडलेली गोष्ट योग्य की अयोग्य अशा पद्धतीची चर्चा अपेक्षित आहे.
नम्र विनंती - सर्वांनी अपशब्द टाळून सभ्य भाषेत लिहू या.
त्याला लागते जातीचे, येरे गबाळ्याचे काम नव्हे
गेल्या वर्षी झालेल्या जम्मू काश्मीर मधल्या पंचायती निवडणुका इस्लाम विरोधी ठरवून लष्करे तोयबा, हिजबूल मुजाहदीन आणि जैशे मोहमद सारख्या दहशतवादी संघटनांनी एका पत्रका द्वारे फतवा काढून खोऱ्यातील गावांतल्या सरपंचांनी राजीनामे देण्यात यावेत असे आवाहन केले. या आवाहनाला जेव्हा कोणी बळी पडत नाही असे जाणवले तसे धाक घालण्यासाठी दहशदवाद्यांनी सरपंचांना गोळ्या घालून मारण्यास सुरवात केली आहे. पंच मुहंमद शफी तेली ह्यांची गेल्या आठवड्यात हत्या करण्यात आली. आता पर्यंत चार सरपंचांना गोळ्या घालून मारण्यात आले आहे. हे सर्व उत्तर काश्मीर बारामूल्ला भागात घडले. मुहंमद शफी तेली क्रिरी भागातला होता.
तहसीलदाराने वाचविले...
मी इतर लोकांबरोबर तहसील कोर्टाच्या आवारात कडूनिंबाच्या झाडाखाली पुकार्याची वाट पाहत बसलो होतो. बर्याच वेळाने चपरश्याने दरवाज्याच्या जवळ येउन आमच्या नावांचा पुकारा केला. आम्ही सर्वजन आंतमध्ये गेलो.
तहसिलदार साहेब समोर खुर्चीत टेबलाजवळ बसले होते. त्यांच्या बाजूला एक बाबू बसला होता. त्याच्या समोर टेबलवर टाईपिंग मशिन ठेवली होती.
आम्ही सर्वजन आंत एका रांगेमध्ये उभे राहिलो. तहसिलदार साहेबांनी आम्हा सर्वांना निरखून पाहिले
‘तूझे नांव कायरे ?‘ माझ्याकडे डोळे रोखून विचारले.
‘रामराव.’
‘पुर्ण नांव सांग.’
रामराव कोंडुजी जुमळे.’
‘काय करतो?’
‘शिकत आहे’