गेल्या वर्षी ‘हमीद अन्सारी’ नाव असलेल्या एका व्यक्तीला भक्तांनी मनसोक्त शिव्या घातल्या होत्या.
त्यावेळी आमच्यासारख्या काही मुर्खांनी भक्तांना समजावण्यासाठी प्रोटोकॉल वगैरेची माहिती देण्याचा प्रयत्न केला होता.
"तिरंग्यापुढे कसला आलाय प्रोटोकॉल?", "इच्छा असती, तर एका सेकंदात प्रोटोकॉल तोडला असता", ’पाकिस्तान... देशद्रोही...’ तेव्हा अशी नेहमीची काहीबाही उत्तरे मिळाली होती.
आम्ही आता घरी आलो होतो. एकमेकांची सवय होऊ लागली होती आणि हळू हळू स्वभाव देखील समजू-जाणवू लागले होते. अर्थात निश्चित स्वरूपात नाही. पण एक अंदाज येऊ लागला होता एवढं मात्र खरं! काही वेळेस त्यामुळे खटके देखील उडायचे.जेवण झाल्यावर गाणी ऐकायची मला लहानपणापासून सवय. त्यात 'जो जीता वोही सिकंदर' किंवा 'दिलवाले दुल्हनिया जायेंगे' मधली गाणी अगदी विशेष आवडीने. कधी कधी 'अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का' होऊन जायचं. अधून मधून ८० च्या दशकातील आर.डी बर्मन ची गाणी किंवा त्याचीच '१९४२ - अ लव्ह स्टोरी' मधली गाणी असायची. कधी कधी 'तेझाब', 'बेटा' वगेरे सिनेमे हजेरी लावायचे.
प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात एक असा दिवस येतो जेव्हा त्याची चौकशी आणि उलटतपासणी एकदम होते! आणि साहजिकच तो दिवस त्याला स्वच्छ आठवतो. म्हणूनच ह्या गोष्टीची सुरुवात 'तो दिवस मला स्वच्छ आठवतो' ह्याच वाक्याने करतो आहे. अनेक मुलीकडल्यांच्या - पोलिस स्टेशनच्या पायऱ्या चढाव्या तशा - पायऱ्या चढून आणि तिथे 'चौकशी' शिवाय काहीही हाती न लागून आम्ही ह्या घराचे दार वाजवले. आधी एवढे अनुभव घेतल्यामुळे आमच्या घरच्यांचे चेहरे 'इथे तरी न्याय मिळेल काय' असे झाले होते. मी मात्र 'आता पुढे काय' असे भाव ठेवून होतो.
“हे मोदीसाहेब खरोखरच ग्रेट आहेत. वा...वा... आधी काय तर सगळा भारत झाडून काढा,” पेपरातलं आपलं डोकंबाहेर काढत अण्णाभाऊ उद्गारले. सकाळचा पेपर अगदी अथपासून इतिपर्यंत वाचून काढल्याशिवाय ते खाली ठेवत नसत. पण पहिल्याच पानावर असताना त्यानी पेपरातून डोकं बाजूला काढलेलं पाहून स्नेहाताई , म्हणजे अण्णाभाऊंच्या अर्धांगिनी आश्चर्यचकित झाल्या. असं यापूर्वी दोनदाच झालेलं त्याना आठवत होतं. एकदा हिमेश दालमियाला सर्वोत्कृष्ट गायक म्हणून "पद्मश्री" मिळाली तेव्हा वैतागून, आणि एकदा पाखी सावंत महाराष्ट्राची मुख्यमंत्री होणार हे वाचून.
सर्वप्रथम नमूद करू इच्छितो, राजकारणासंबंधी एक्स्पर्ट कॉमेंट देणे हा माझा प्रांत नाही तर उगाच उसना आव आणायचा नाहीये. सध्या आमच्या व्हॉट्सअॅप ग्रूप वर दोन गटात (खरे तर तीन गटात) पेटलेल्या चर्चेला इथे घेऊन आलोय.
विषय आहे - जर भाजपा आणि शिवसेनेत बिनसले आणि निवडणूकपूर्वी युती तुटली तर निकालात बाजी कोण मारेल?
१) मोदींच्या पुण्याईवर (कर्तुत्वावरही बोलू शकतो) भाजपा सरस ठरेल?
२) बाळासाहेबांच्या महाराष्ट्रात मराठी माणूस आजही शिवसेनेच्या बरोबर उभा राहील?
३) दोघांत भांडण तिसर्याचा लाभ, (ज्याची शक्यता फारच कमी दिसतेय सध्या) ?
मागच्या आठवड्यात महाराष्ट्रात दोन सार्वजनिक कार्येक्रम झाले ज्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पंतप्रधान मोदींबरोबर होते. या कार्येक्रमात " मोदी -मोदी" या घोषणा झाल्या. पंतप्रधान मोदी निवडणुकीच्या वातावरणातुन केव्हाच बाहेर आले आहेत परंतु भाजप कार्यकर्ते किंवा जनता अजुनही अश्याच दमदार भाषणांच्या मुड मधे असेल त्यामुळे या घोषणा दिल्या गेल्या असाव्यात.
हा प्रकार हरियाणात सुध्दा झाला जिथे मुख्यमंत्री हुडा यांच्याबरोबर स्टेजवर असताना " मोदी -मोदी " चा नारा झाला आणि मुख्यमंत्री हुडा संतापले आणि यापुढे पंतप्रधान मोदींबरोबर स्टेजवर जाणार नाही अशी घोषणा केली.
हे घडेल का महाराष्ट्रात ?
(माणिक मुंढे नावाच्या व्यक्तीचा लेख असलेली एक पिडीएफ फाईल मेल मधे आली होती, ती टंकत आहे येथे. मुंढे यांना संपर्क करू शकलो नाहीये, पण त्यांचा काही आक्षेप असेल असे वाटत नाही. त्यामुळे कृपया कोणत्याही कुरापती काढू नयेत ही विनंती).