सर्वप्रथम नमूद करू इच्छितो, राजकारणासंबंधी एक्स्पर्ट कॉमेंट देणे हा माझा प्रांत नाही तर उगाच उसना आव आणायचा नाहीये. सध्या आमच्या व्हॉट्सअॅप ग्रूप वर दोन गटात (खरे तर तीन गटात) पेटलेल्या चर्चेला इथे घेऊन आलोय.
विषय आहे - जर भाजपा आणि शिवसेनेत बिनसले आणि निवडणूकपूर्वी युती तुटली तर निकालात बाजी कोण मारेल?
१) मोदींच्या पुण्याईवर (कर्तुत्वावरही बोलू शकतो) भाजपा सरस ठरेल?
२) बाळासाहेबांच्या महाराष्ट्रात मराठी माणूस आजही शिवसेनेच्या बरोबर उभा राहील?
३) दोघांत भांडण तिसर्याचा लाभ, (ज्याची शक्यता फारच कमी दिसतेय सध्या) ?
माझे मत - मी लोकसभेत मोदींना बघून भाजपाच्या पारड्यात टाकले असले तरी विधानसभेत मराठी माणसांचा (म्हणवणारा) प्रादेशिक पक्ष शिवसेनेलाच प्राधान्य देईन. माझ्यामते बहुतांश मराठी माणूस उघडपणे कबूल करो वा न करो ऐनवेळी धनुष्यबाणावरच शिक्का मारून येईल. यात शिवसेनेला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास निकालानंतर पुन्हा युती होऊन ते भाजपाच्या सपोर्टवर सरकार स्थापतील. जेणेकरून केंद्रातील भाजपा सरकारशीही सूत जुळून राहील आणि महाराष्ट्राच्या विकासाला अडथळा येणार नाही.
अर्थात, बाळासाहेबांनतर शिवसेनेने जनतेचा विश्वास बरेपैकी गमावला असूनही दोघांमधील एक पर्याय निवडताना जनता आपले मत शिवसेनेच्या पारड्यात टाकेल. त्यामुळे मोदी यांच्या नावाची कितीही हवा झाली असली तरी भाजपा केवळ दबावतंत्र अवलंबवेल मात्र युती तोडायची हिम्मत ते शेवटपर्यंत दाखवणार नाहीत.
असो, याउपर युती फुटल्यास इतर मित्रपक्ष तसेच मनसे वगैरे काय कोणाशी युती करतील आणि काय नवीन गणिते बनतील यावर जाणकारांनी आपली मते मांडली तर त्यातील काही मुद्दे मला आमच्या ग्रूपवर टाकून राजकीय चर्चेत कच्चा लिंबू समजल्या जाणार्या माझ्या स्वताचा भाव वधारता येईल.
आभारी आहे,
ऋन्मेऽऽष
बास कि....दोन तीन दिवसात दहा
बास कि....दोन तीन दिवसात दहा बारा लेख ! बोटारीया ची लक्षणं आहेत.
कथा कादंब-यांवर लक्ष द्या आपलं.
>>>त्यातील काही मुद्दे मला
>>>त्यातील काही मुद्दे मला आमच्या ग्रूपवर टाकून राजकीय चर्चेत कच्चा लिंबू समजल्या जाणार्या माझ्या स्वताचा भाव वधारता येईल.<<< हे मस्तच!
अॅक्चुअली राजकीय कारणांसाठीच ही युती कितीही अंतर्गत भांडणे झाली तरी हे लोक फुटू देणार नाहीत असे मला वाटते.
पण तूर्त मोदींची हवा असल्याने मोदीनामाची पुण्याई ह्याही निवडणूकीत भाजपाला साथ देईल असेही वाटते.
लोकसभेच्या निवडणुकीत रालोआने
लोकसभेच्या निवडणुकीत रालोआने मोदींच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या 'हवेमुळे' दणदणीत विजय मिळवला. पण त्यानंतर २ महिन्यात झालेल्या उत्तराखंड येथिल विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला ३ पैकी ३ जागांवर विजय मिळाला. यापैकी २ जागा भाजपाच्या ताब्यात होत्या. यामुळे महराष्ट्रात मोदी लाट अजुनही टिकुन असेल का, याबद्दल साशंकता आहे. केंद्रात असलेल्या सरकारकडुन भाजपाचे खासदार आपापल्या भागात लगेच निधी उपलब्ध करुन घेऊन शिवसेनेवर मात करण्याचा प्रयत्न करतील हे नक्कीच. पण तळागाळात पसरलेले शिवसेनेचे कार्यकर्ते ही त्यांची खरी ताकद आहे.
दुसरे असे की महाराष्ट्राचे विभाजन करुन विदर्भ हे राज्य निर्माण करायचे हा भाजपाचा खुला अजेंडा आहे. राज्य फोडणार्यांना मते कशासाठी द्यायची??
भाजपासाठी मनसेचे दरवाजे आधीपासुन उघडे आहेत. पण मुळात राज ठाकरेंचीच जादु हरवल्याने या युतीचा फायदा भाजपला कमीच होईल असे दिसते आहे.
निवडणुकीनंतर माझ्या मते दोन्ही आघाड्यांमधे फार थोड्या जागांचा फरक असेल.
ऋन्मेऽऽष श्रावण संपला की
ऋन्मेऽऽष
श्रावण संपला की नाही?
विधानसभेत भाजपा विरुद्ध
विधानसभेत भाजपा विरुद्ध शिवसेना झाल्यास कोण मारेल बाजी?
शिवसेना बाजी मारू शकते. असे काही झाल्यास शिवसेनेचाच विरोधी पक्ष नेता होईल ह्यात शंका नसावी
सप... फारच आशावादी आहात
सप... फारच आशावादी आहात तुम्ही
सप चहा घ्या तरतरी येईल.
सप चहा घ्या तरतरी येईल.
सप चहा घ्या तरतरी येईल.<<<
सप चहा घ्या तरतरी येईल.<<<
डी, कोनाला कशाचं तर कोणाला
डी, कोनाला कशाचं तर कोणाला कशाचं
सध्या महाराष्ट्रात भाजपचा
सध्या महाराष्ट्रात भाजपचा विरोधी पक्ष नेता आहे . परंतु जर युती नसेल नि भाजपा नि शिवसेना स्वतंत्र लढले तर मात्र शिवसेनेकडेच विरोधी पक्षनेतेपद येईल. कारण शिवसेनेने मुंबई पालिकेत विकासासाठी केलेली अफाट कामे. गुळगुळीत रस्ते. कचरामुक्त मुंबई हि कामे लोकांच्या नजरेपुढे आहेत.
पगारेजी, तुम्ही 'लोकसभेतील
पगारेजी,
तुम्ही 'लोकसभेतील दारुण पराभवाच्या' धक्क्यातुन अजुन सावरलेले दिसत नाही.
विआ तुम्हाला माझे मत पटलेले
विआ तुम्हाला माझे मत पटलेले दिसत नाही. तुम्हाला विरोधी पक्ष नेतेपद भाजपला मिळेल असे वाटते का ?
भाजपा मोदी लाटेच्या आशेने युती तोडायला बघतेय पण आता लाट ओसरली नि नुसता चिखल राहिलाय. नि महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास शिवसेनेशिवाय भाजपा शुन्य आहे. ते शिवसेनेशी युती तोडूच शकत नाहीत. दबावतंत्र वापरून पाच दहा वाढीव जागा झोळीत पडतायत का हे ते पाहतात हे स्पष्ट आहे
भाजपा मोदी लाटेच्या आशेने
भाजपा मोदी लाटेच्या आशेने युती तोडायला बघतेय
<<
<<
ही बातमी तुम्हाला कोठुन मिळाली पगारेजी.
विधानसभेत भाजपा विरुद्ध
विधानसभेत भाजपा विरुद्ध शिवसेना झाल्यास >>>>>> हा कल्पनाविलास समजायचा का आशावाद?
भाजपा मोदी लाटेच्या आशेने
भाजपा मोदी लाटेच्या आशेने युती तोडायला बघतेय पण महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास शिवसेनेशिवाय भाजपा शुन्य आहे>>>. हे काय ते सत्य आहे, बाकी खरच मिथ्या आहे.
महाराष्ट्रातील जनतेच्या मनात
महाराष्ट्रातील जनतेच्या मनात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या भोंगळ आणि भ्रष्टाचाराने भरलेल्या कारभाराचा फार राग आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपा युतीला सरकार सत्ता संपादन करण्याकरिता यंदा चांगली संधी आहे, त्यामुळे युती तुटण्याची शक्यता कमी वाटत आहे. लोकसभेत जरी भाजपाला शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळाल्या असल्या तरी त्याला कारणीभुत होते ते आघाडीतुन भाजपामध्ये सामील झालेले काही नेते आणि मोदी लाट. परंतु लोकसभेचे मापदंड विधानसभा निवडणुकांना लागु होत नसतात विधानसभेच्या निवडणुका वेगळ्या मुद्दांवर लढल्या जातात. आणि म्हणुनच जर युती तुटली तर शिवसेनाच बाजी मारेल असे वाटते कारण शिवसेना हा प्रादेशिक पक्ष असुन महाराष्ट्रात तळागाळापर्यंत रूजलेला आहे.
महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय
महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय भाजपा शुन्य आहे.
त्याच प्रमाणे भाजपा शिवाय शिवसेनेची अवस्था हि पंख कापलेल्या गरुडा प्रमाणे होणार.
हे दोन्ही पक्षांना चांगलेच माहित आहे.त्यामुळे दोघेही हि युती तोडू शकत नाहीत.
भाजपा निवडणूकपूर्व दबावतंत्र वापरत आहे परंतु पाच ते दहा जागा झोळीत पडल्यावर तेही गप्प बसतील.
असे काही झाल्यास शिवसेनेचाच
असे काही झाल्यास शिवसेनेचाच विरोधी पक्ष नेता होईल ह्यात शंका नसावी >>
कारण शिवसेनेने मुंबई पालिकेत
कारण शिवसेनेने मुंबई पालिकेत विकासासाठी केलेली अफाट कामे. गुळगुळीत रस्ते. कचरामुक्त मुंबई हि कामे लोकांच्या नजरेपुढे आहेत.
मुंबईकरान्नो हे खरे आहे का ?
मी १६/१७ ऑगस्ट ला मुंबईत होतो. ज्यायला माझी टॅक्सी अक्षरशः घसरली(स्केट सारखी) असे ड्रायव्हर म्हणाला होता गुळगुळीत रस्त्यावरुन, माझा डोळा लागलेला असल्याने मला कळले नसावे
पण त्यानंतर २ महिन्यात
पण त्यानंतर २ महिन्यात झालेल्या उत्तराखंड येथिल विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला ३ पैकी ३ जागांवर विजय मिळाला. यापैकी २ जागा भाजपाच्या ताब्यात होत्या. यामुळे महराष्ट्रात मोदी लाट अजुनही टिकुन असेल का, याबद्दल साशंकता आहे.
>>>>>>>>>>>>>
काँग्रेसविरोधी लाट आहे याबद्दल तर साशंकता नसावी.
राज्यातील गलथान कारभाराला अजून उत्तर देणे बाकी आहे.
(No subject)
भाजपा नि शिवसेना जर ह्या
भाजपा नि शिवसेना जर ह्या निवडणुकीत एकत्र लढले नाहीत तर त्यांचे पानिपत निश्चित आहे. महाराष्ट्रात शिवसेना हा भाजपपेक्षा बलाढ्य पक्ष आहे. परंतु देशात सरकार आल्याने भाजपच्या महत्वाकांक्षेला आता धुमारे फुटले आहेत ते महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणू पाहत आहे पण महाराष्ट्रात भाजपची स्वबळावर सत्ता कधीही येवू शकत नाही त्यांना मित्रपक्षांचा टेकू लागणारच. महाराष्ट्राच्या खडकाळ भूमीत कमळ हे काही रुजू शकणार नाही जे थोडेफार रूज ल्या सारखे वाटते त्याचे कारण फक्त एकच ते म्हणजे शिवसेनेशी असलेली युती..
पगारे तरतरीत झाले
पगारे तरतरीत झाले
पार्टी बदली की काय?
पार्टी बदली की काय? पगारेजी.
तुमच्या वरिल एकाही पोष्ट मध्ये कॉग्रेज, राष्ट्रवादीचा साधा 'उल्लेख' देखील नाही.
भाजपा हा राष्ट्रीय पक्ष आहे
भाजपा हा राष्ट्रीय पक्ष आहे तर शिवसेना प्रादेशिक.शिवसेना नेतृत्वाला चांगलच माहित आहे त्यांच्या मदतीशिवाय भाजपा महाराष्ट्रात काही करू शकत नाही त्या पक्षाची तेव्हडी ताकदच नाही. त्यामुळे शिवसेनेने ताठर भूमिका घेतलीय कि एकही अतिरिक्त जागा भाजपला देणार नाही.त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने ती भूमिका योग्यच आहे. भाजपला इथे जास्त महत्व दिले तर भविष्यात ते आपल्या डोक्यावर मिरे वाटू शकतात हे शिवसेना चांगलेच जाणून आहे.उद्धव ठाकरे एखाद्या कसलेल्या राजकारण्याप्रमाणे डाव खेळत आहेत असे तरी सध्य स्थितीवरून वाटते
हि निवडणूक आघाडी आणि
हि निवडणूक आघाडी आणि शिवसेना-भाजप महायुती म्हणूच लढवतील.जागावाटपात कदाचित सेनेला काही जागा भाजप किंवा मित्रपक्षांना सोडाव्या लागतील मात्र तरीही वरचष्मा सेनेचाच राहील असे वाटतेय.राज्यात शिवसेनेची संघटना भाजपाहून नक्कीच उजवी आहे आणि सध्या सेनेत कॉंग्रेस आघाडीतून इनकमिंग जोरात चालू आहे. भाजपचे राज्य स्तरावरील नेतृत्व त्यांच्या दिल्ली हायकमांडच्या इशार्यावर चालते राज्यात त्यांच्याकडे तेवढा मोठा नेता नाही (अपवाद स्व. मुंडे आणि गडकरी जे केंद्रात गेले). मुंबई आणि राज्याचे प्रश्न सोडवायला हे लोक सतत दिल्लीकडे (मोदी-शहा) पाहत राहणार. म्हणजे याबाबतीत कॉंग्रेस सारखीच यांची गत असणार. त्यापेक्षा लोक शिवसेनेला पसंती देतील. उद्धव ठाकरेनी मुराब्बीपणे पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले आहेत त्याचा त्यांना नक्कीच लाभ होईल.राज्यात पुढचे सरकार महायुतीचे आणि मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल असेच सध्या चित्र आहे.
कधि नव्हे तो आज पगारे
कधि नव्हे तो आज पगारे साहेबांशी सहमत. मोदि लाटेचं भांडवल करुन भाजपाने दबावतंत्र अवलंबलं तर स्वतःच्याच पायावर कुर्हाड मारण्यासारखं आहे. "मला नाहि तुला नाहि, घाल कुत्र्याला" अशी परिस्थिती उद्भवु शकते.
आज बाळासाहेब असते तर या मुद्ध्यावरुन मोदिसकट सगळ्या भाजपाचे जाहिर वस्त्रहरण केले असते...
आज बाळासाहेब असते तर
आज बाळासाहेब असते तर ......... >>> तर सारी समीकरणेच वेगळी असती. भाजपाकडून कदाचित असा आवाजही उठला नसता. याउलट गेल्या काही काळात शिवसेनेचे मनोधैर्य खच्चीकरणासाठी वारंवार उद्धव यांच्या नेत्रुत्वालाही टारगेट केले जातेय. पण त्याचबरोबर सध्याचे चित्र पाहता असेही दिसून येतेय की शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहतोय. निर्विवादपणे हि बाळासाहेबांचीच पुण्याई. मी स्वता उद्धव ठाकरे यांचा फार मोठा चाहता नाही (किंवा याआधी तरी नव्हतो) पण बाळासाहेबांनतर पुरेसा मुत्सदीपणा ते वेळोवेळी दाखवत आहेत. अर्थात हे पक्षबांधणीचे झाले. पण सत्तेत आल्यावर सरकार किती सक्षमपणे चालवतील याबाबत मात्र अजूनही मी साशंकच.
बाळासाहेब होते तेंव्हा पाच
बाळासाहेब होते तेंव्हा पाच की दाहा वर्षे सोडली तर अखंड काँग्रेसचीच सत्ता होती
>>अखंड काँग्रेसचीच सत्ता होती
>>अखंड काँग्रेसचीच सत्ता होती <<
बरोबर, पण मुद्दा तो नाहि आहे. आता केंद्रात एकहाती सत्ता मिळाल्याने भाजपाची दादागिरी चालु झालेली आहे. बाळासाहेब असते तर वाढीव जागा, मुख्यमंत्री वगैरे विषयच निघालेच नसते अथवा "वस्त्रहरण" ठरलेले...
उद्धव नीड्स टु स्टेप अप अँड शो देम हु इज द बॉस इन महाराष्ट्र...
Pages