सर्वप्रथम नमूद करू इच्छितो, राजकारणासंबंधी एक्स्पर्ट कॉमेंट देणे हा माझा प्रांत नाही तर उगाच उसना आव आणायचा नाहीये. सध्या आमच्या व्हॉट्सअॅप ग्रूप वर दोन गटात (खरे तर तीन गटात) पेटलेल्या चर्चेला इथे घेऊन आलोय.
विषय आहे - जर भाजपा आणि शिवसेनेत बिनसले आणि निवडणूकपूर्वी युती तुटली तर निकालात बाजी कोण मारेल?
१) मोदींच्या पुण्याईवर (कर्तुत्वावरही बोलू शकतो) भाजपा सरस ठरेल?
२) बाळासाहेबांच्या महाराष्ट्रात मराठी माणूस आजही शिवसेनेच्या बरोबर उभा राहील?
३) दोघांत भांडण तिसर्याचा लाभ, (ज्याची शक्यता फारच कमी दिसतेय सध्या) ?
माझे मत - मी लोकसभेत मोदींना बघून भाजपाच्या पारड्यात टाकले असले तरी विधानसभेत मराठी माणसांचा (म्हणवणारा) प्रादेशिक पक्ष शिवसेनेलाच प्राधान्य देईन. माझ्यामते बहुतांश मराठी माणूस उघडपणे कबूल करो वा न करो ऐनवेळी धनुष्यबाणावरच शिक्का मारून येईल. यात शिवसेनेला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास निकालानंतर पुन्हा युती होऊन ते भाजपाच्या सपोर्टवर सरकार स्थापतील. जेणेकरून केंद्रातील भाजपा सरकारशीही सूत जुळून राहील आणि महाराष्ट्राच्या विकासाला अडथळा येणार नाही.
अर्थात, बाळासाहेबांनतर शिवसेनेने जनतेचा विश्वास बरेपैकी गमावला असूनही दोघांमधील एक पर्याय निवडताना जनता आपले मत शिवसेनेच्या पारड्यात टाकेल. त्यामुळे मोदी यांच्या नावाची कितीही हवा झाली असली तरी भाजपा केवळ दबावतंत्र अवलंबवेल मात्र युती तोडायची हिम्मत ते शेवटपर्यंत दाखवणार नाहीत.
असो, याउपर युती फुटल्यास इतर मित्रपक्ष तसेच मनसे वगैरे काय कोणाशी युती करतील आणि काय नवीन गणिते बनतील यावर जाणकारांनी आपली मते मांडली तर त्यातील काही मुद्दे मला आमच्या ग्रूपवर टाकून राजकीय चर्चेत कच्चा लिंबू समजल्या जाणार्या माझ्या स्वताचा भाव वधारता येईल.
आभारी आहे,
ऋन्मेऽऽष
(No subject)
राज्यातील २७ ते ३० प्रतिशत
राज्यातील २७ ते ३० प्रतिशत मराठा समाज जर राष्ट्रवादी च्या मागे एकवटला तर या निवडणुकी मध्ये राष्ट्रवादी सगळ्यात मोठा लाभार्थी ठरू शकतो
भाजपाने सावध पवित्रा घेत
भाजपाने सावध पवित्रा घेत शिवसेनेवर आम्ही टिका करणार नाही अशी चाल खेळलीय.
पण शिवसैनिक बहुधा या खेळीला बळी न पडता भाजपवर टिका करायची संधी सोडणार नाही असे वाटतेय.
त्यानंतर मग पुन्हा भाजप काय पवित्रा घेते आणि नरेंद्र मोदी या मुंबई नगरी असलेल्या महाराष्ट्र राज्यास काबीज करायला स्वताची पत कितपत वापरतात हे बघणे रोचक.
कितीही सडके राजकारण का असेना, धम्माल आहे आता पुढचे काही दिवस.
महाराष्ट्रात गोंधळाची स्थिती
महाराष्ट्रात गोंधळाची स्थिती ठेवणं सर्वच पक्षांच्या केंद्रीय नेतृत्वाला हिताचं वाटत असावं , असा एकच अर्थ या तुटी-फुटीतून माझ्यासारख्या अनभिज्ञाने काढला तर .... !
भाऊसाहेबः मला अनभिज्ञाला तर
भाऊसाहेबः मला अनभिज्ञाला तर असे पण वाततेय कि, वाढत्या महागाईत वाटुन खाणे परवडेना म्हणुन जिंकुन खाण्याचे निर्णय होताहेत कि काय?
शिवसेना-मनसे नेते
शिवसेना-मनसे नेते संपर्कात?
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/Shivsena-MNS/a...
^^^^^^^
इथे आता काही नवीन समीकरणे जुळू पाहताहेत.
एकेकाळी कित्येक लोकांना मराठी माणसाच्या भल्यासाठी दोन भावांनी एकत्र यावेसे वाटत होते. आताही हे काही दिवसांपूर्वी झाले असते तर कदाचित चित्र वेगळे असते पण आता लोक या तमाशाला वैतागलेल्या स्थितीत असताना सेना-मनसे युती झाली तर त्याचा कितपत सकारात्मक परीणाम होईल याबाबत मी साशंक.
काही का असेना,
यावेळी महाराष्ट्राबद्दल कळकळ असलेल्या मराठी माणसाने चिडचीड झटकून जास्तीत जास्त संख्येने मतदानाला उतरावे. जे काही सरकार येवो ते मराठी माणसाने निवडलेले यावे.
बाजी कोणीही मारू दे शेवटी
बाजी कोणीही मारू दे शेवटी दोघेही एकत्र येतील
समजा निवडनुकी नंतर भाजप अन
समजा निवडनुकी नंतर भाजप अन शिवसेना पुन्हा एकत्र आले .. तर रा काँ अन काँ. एकत्र येणार का?
जे दोन एकत्र येऊन सत्ता
जे दोन एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतील असेच एकत्र येणार.
दिल्लीमध्ये आपने काँग्रेसशी युती केल्याने भाजपाने त्यांच्यावर टिका केली होती, पण महाराष्ट्रात सुद्धा भाजपा हि वेळप्रसंगी राष्ट्रवादीशी युती करू शकतेच. सध्या ते नाही म्हणत असले तरी निवडणूकीपुर्वीच शक्यता आहे बोलून मतदारांचा विश्वास गमावण्याएवढे बावळट आहेत का ते ..
सध्या ते नाही म्हणत असले तरी
सध्या ते नाही म्हणत असले तरी निवडणूकीपुर्वीच शक्यता आहे बोलून मतदारांचा विश्वास गमावण्याएवढे बावळट आहेत का ते ..
>>
छे , ते कसले बावळट ! बावळट तर मतदार आहेत. भाजप हा राष्ट्रवादीचा शत्रु आहे म्हणून राष्ट्र वादीचे विरोधक भाजपला आणि भाजपचे विरोध राष्ट्रवादेला मते देतील आणि निवडणुकीनन्तर ते यु-घाडी किंवा आघा-ती करतील आणि मतदाराना त्यांच्या बावळटपणाची शिक्षा देतील....
प्रतिष्ठेचा प्रश्न करून किंवा
प्रतिष्ठेचा प्रश्न करून किंवा इतर कोणत्याही कारणामुळे तडकाफडकीं तुटफूटीचे निर्णय घेण्याइतपत सर्वच संबंधित पक्षांचे नेते भावनाविवश होणारे आहेत, यावर विश्वास ठेवणं अशक्य आहे. लोकांवर किंवा राज्यावर असल्या निर्णयाचा काय परिणाम होऊं शकतो हें त्यांच्या दृष्टीने फार महत्वाचं नाहीच पण स्वतःवर व स्वतःच्या पक्षावर [ म्हणजे आज ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षावर ] याचा काय परिणाम होईल याबाबतची मात्र त्यांची जागरुकता संशयातित आहे. त्यामुळे, हे सर्व राजकारण आधींपासूनच शिजत असावं व निवडणूकीनंतरचे डांवपेंचही आंतून ठरलेलेच असावेत, असं मला तरी वाटतं. जरी सर्व पक्षांचे केंद्रीय नेते यांत प्रत्यक्ष उतरलेले नसले तरीही 'बोलवते धनी' तेच आहेत, याबाबतही शंका नसावी.
[मीं स्वतःला राजकारणात खरंच अनभिज्ञ समजतो म्हणूनच हें सर्व ठामपणे म्हणूं शकतों ! ]
(No subject)
भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल
भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल असा माझा विश्वास आहे. ज्या पध्दतीने श्री मोदी यांनी देशात विश्वासाची लाट आपल्या कामाद्वारे निर्माण केली आहे त्यावरुन महाराष्ट्राची जनता त्यांच्या पाठीशी उभी नक्कीच राहिल.
त्याच बरोबर स्वतंत्र विदर्भाला पाठिंबा असल्यामुळे भाजपाच्या विदर्भातुन ८०% जागा नक्कीच येतील.
इतर पक्षांची आवश्यकता आता भाजपाला राहणार नाही तरी बहुमत मिळाल्यावर शिवसेना आणि समविचारी पक्षांना आपल्याबरोबर येण्याचे आवाहन श्री. मोदी करतीलच. त्यांचे मन साफ आहे. श्री मोदी कोणताही पुर्वग्रह न ठेवता शिवसेनेला माफ करतील.
प्रतिष्ठेचा प्रश्न करून किंवा
प्रतिष्ठेचा प्रश्न करून किंवा इतर कोणत्याही कारणामुळे तडकाफडकीं तुटफूटीचे निर्णय घेण्याइतपत सर्वच संबंधित पक्षांचे नेते भावनाविवश होणारे आहेत, यावर विश्वास ठेवणं अशक्य आहे.
>>>>>>>
सहमत आहे.
मी लोकसभेच्या वेळी मोदी समर्थक होतो. पण यावेळी माझ्या मते भाजपाने चुकीची (किंवा घाण) खेळी केली आहे. जर त्यांचे उद्दीष्ट महाराष्ट्राचा विकास होता तर त्यांनी शिवसेनेशी युती का तोडली. भाजपा स्वबळावर महाराष्ट्रात निवडून येऊ शकत नाही हे त्यांच्या पक्षातील पोरगा पण सांगेल. अश्यावेळी ते राष्ट्रवादीशी युती करण्याचेही संकेत मिळत आहेत. माझ्यामते तरी असे झाले तर तो दोन्हीकडच्या मतदारांचा प्रचंड विश्वासघात असेल. बरे परत ते निकालानंतर शिवसेनेशीच युती करतील म्हणावे तर मग हे निवडणूक आधीच का नाही? का एवढी मोठी रिस्क घेतली? फक्त स्वताची स्वतंत्र ताकद आजमावण्यासाठी वा ती शिवसेनेपेक्षा जास्त आहे हे दाखवण्यासाठी? मला नाही वाटत, कारण त्यातून काही साध्यही होत नाही. देव करो यामागे फार सडके राजकारण असल्याचा माझा अंदाज चुको. पण शक्यता लक्षात घेता मला तरी भाजपा आणि शिवसेनेत आज शिवसेनेच्या पारड्यात मत टाकायची इच्छा होत आहे.
आजच्या परिस्थितीत गोपीनाथ मुंडे नसणे हे भाजपाचे नाही तर महाराष्ट्राचे दुर्दैव !
<< श्री मोदी कोणताही
<< श्री मोदी कोणताही पुर्वग्रह न ठेवता शिवसेनेला माफ करतील.>> पण माफ करण्यासाठी आधी गुन्हेगार कोण व कोणाचे हें तर स्पष्ट व्हायला हवं ना ! सध्या तरी राज्यातले मतदार या अक्षम्य गोंधळासाठी कुणालाही माफ करण्याच्या मनःस्थितीत नसावेत, इतकंच स्पष्ट आहे.
खरे तर ५-१० जागांसाठी भाजपाने
खरे तर ५-१० जागांसाठी भाजपाने युती तोडली.. परंतु आज चित्र असे आहे की बर्याच मतदार संघात भाजपाने कोंग्रेस किंवा सेनेच्याच इच्छुकांना तिकीत देवुन उभे केले आहे.. जर पुरेसे उमेदवार नव्हते तर जागा वाढवुन मागण्याचा अट्टाहास का..?
मोदींच्या सभा "लावुन" उमेदवार
मोदींच्या सभा "लावुन" उमेदवार निवडुन आणण्याचे मनसुबे भाजपा रचत असेल. पण आता मोदींकडे कुठलेच नविन मुद्दे शिल्लक नाहीत. महाराष्ट्रातले उद्योग बाहेर जातात म्हटलं तर ते जातायंत गुजरातेत. उद्या समजा भाजपाचं सरकार आलं महाराष्टात तर मोदी परत करणार का हे कारखाने वगैरे?? भ्रष्टाचाराबद्दल बोलायंच तर त्यांनीच राष्ट्रवादी- काँग्रेसच्या मंत्र्यांना-नेत्यांना आपल्याकडुन उभं केलंय. बरं केंद्रात तर अजुन काही दिवे लावलेले नाहीत. मग मतं मागणार कशाच्या जोरावर??
>> मोदी कोणताही पुर्वग्रह न
>> मोदी कोणताही पुर्वग्रह न ठेवता शिवसेनेला माफ करतील. <<
घोडामैदान जवळच आहे. हा आता सेनेचा प्रतीष्ठेचा आणि अस्तीत्वाचा प्रश्न झालेला आहे. सेना कमळाबाईंच्या नाकदुर्या काढते की नाकात वेसण घालते हे कळेलच लवकर.
सेना कमळाबाईंना वेसण
सेना कमळाबाईंना वेसण घालते?
खिक्क! अहो पलंगावरून खाली उतरायला तयार नाहियेत केंद्रात.
दिल्लीत हनिमून, गल्लीत काडीमोड असं चाल्लंय सगळं.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारिख काय आहे ? कुणी सांगावं, युति व/किंवा आघाडी तोपर्यंत जोडलीही जाणं अशक्य नाही !!!
भाऊ, लोकं पैसे खर्च करायला
भाऊ,
लोकं पैसे खर्च करायला लागलेत ऑलरेडी. आता हिम्मत नाही कुणाचीच तिकिटं परत घ्यायची.
अहो पलंगावरून खाली उतरायला
अहो पलंगावरून खाली उतरायला तयार नाहियेत केंद्रात.
>>>>>>>>>>
माझ्या मते तर पद सोडूही नये.
मराठी माणसाला दरवेळी स्वाभिमान दाखवायचा हट्ट नडतो.
कुणी सांगावं, युति व/किंवा आघाडी तोपर्यंत जोडलीही जाणं अशक्य नाही !!!
>>>>>>>>>>>
बीजेपी-एनसीपी दोघांचे मिलेजुले डोके असेल यामागे, म्हणजे आम्ही युती तोडतो आणि तुम्ही आघाडी तोडा, मग निकालानंतर एकत्र येऊया, तर मात्र याची शक्यता शून्य!
<<अहो पलंगावरून खाली उतरायला
<<अहो पलंगावरून खाली उतरायला तयार नाहियेत केंद्रात.>>
उगाचच उतारयच.. कोनि सांगितल नाहि काहि नाहि.
आणि उतरायच कशाला भाजप च पुर्ण बहुमतात सरकार.. लाथ मारा म्हणाव.. बघु किति हिम्मत आहे ती..
आणि लाथ मारत नाहित म्हंजे अजुन हि कुठेतरी साठ लोठ आहे...
हे राजकारण आहे भाओ.. कोणाचा इथे काहि सुध्दा नेम नाहि... गल्लित गोंधळ.. आणि दिल्लित केल तर ते राजकारण..
आजच शेवटची तारीख होती नावं
आजच शेवटची तारीख होती नावं मागे घ्यायची.
तीन मतदारसंघांत मतदानपत्रिका छापायला लागणार कारण उमेदवारांची संख्या ६४ पेक्षा जास्त आहे .
जास्तीत जास्त चार मतदानयंत्रांचं काहीतरी गणित आहे.
<< आजच शेवटची तारीख होती नावं
<< आजच शेवटची तारीख होती नावं मागे घ्यायची.>> म्हणजे नाटक एकांकीका नसून निवडणूकीच्या मध्यंतरानंतर दुसरा अंक आहेच !!!
आणि हो, लोकं पैसे खर्च करायला लागलेत हा मुद्दा किरकोळ आहे; खर्च होत असलेले पैसे खिशातले थोडेच आहेत त्यांच्या !
<सेना कमळाबाईंना वेसण
<सेना कमळाबाईंना वेसण घालते?
खिक्क! अहो पलंगावरून खाली उतरायला तयार नाहियेत केंद्रात.
दिल्लीत हनिमून, गल्लीत काडीमोड असं चाल्लंय सगळं. >
राजीनामे भिरकावले म्हणे ना?? अर्र..
>>अहो पलंगावरून खाली उतरायला
>>अहो पलंगावरून खाली उतरायला तयार नाहियेत केंद्रात. <<
छपरी पलंग आहे म्हणुन असेल कदाचित...
(No subject)
भाऊ नाद खुळा
भाऊ नाद खुळा
>>अहो पलंगावरून खाली उतरायला
>>अहो पलंगावरून खाली उतरायला तयार नाहियेत केंद्रात << एकट्या बिजेपिच्या जोरावर केंद्रात सत्ता आली का ? शिवसेनेने हि घाम गाळला आहे बिजेपिच्या उमेदवारांसाठी.......तेही राजीनामा देतील का खाजदारकीचा ??????
Pages