सर्वप्रथम नमूद करू इच्छितो, राजकारणासंबंधी एक्स्पर्ट कॉमेंट देणे हा माझा प्रांत नाही तर उगाच उसना आव आणायचा नाहीये. सध्या आमच्या व्हॉट्सअॅप ग्रूप वर दोन गटात (खरे तर तीन गटात) पेटलेल्या चर्चेला इथे घेऊन आलोय.
विषय आहे - जर भाजपा आणि शिवसेनेत बिनसले आणि निवडणूकपूर्वी युती तुटली तर निकालात बाजी कोण मारेल?
१) मोदींच्या पुण्याईवर (कर्तुत्वावरही बोलू शकतो) भाजपा सरस ठरेल?
२) बाळासाहेबांच्या महाराष्ट्रात मराठी माणूस आजही शिवसेनेच्या बरोबर उभा राहील?
३) दोघांत भांडण तिसर्याचा लाभ, (ज्याची शक्यता फारच कमी दिसतेय सध्या) ?
माझे मत - मी लोकसभेत मोदींना बघून भाजपाच्या पारड्यात टाकले असले तरी विधानसभेत मराठी माणसांचा (म्हणवणारा) प्रादेशिक पक्ष शिवसेनेलाच प्राधान्य देईन. माझ्यामते बहुतांश मराठी माणूस उघडपणे कबूल करो वा न करो ऐनवेळी धनुष्यबाणावरच शिक्का मारून येईल. यात शिवसेनेला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास निकालानंतर पुन्हा युती होऊन ते भाजपाच्या सपोर्टवर सरकार स्थापतील. जेणेकरून केंद्रातील भाजपा सरकारशीही सूत जुळून राहील आणि महाराष्ट्राच्या विकासाला अडथळा येणार नाही.
अर्थात, बाळासाहेबांनतर शिवसेनेने जनतेचा विश्वास बरेपैकी गमावला असूनही दोघांमधील एक पर्याय निवडताना जनता आपले मत शिवसेनेच्या पारड्यात टाकेल. त्यामुळे मोदी यांच्या नावाची कितीही हवा झाली असली तरी भाजपा केवळ दबावतंत्र अवलंबवेल मात्र युती तोडायची हिम्मत ते शेवटपर्यंत दाखवणार नाहीत.
असो, याउपर युती फुटल्यास इतर मित्रपक्ष तसेच मनसे वगैरे काय कोणाशी युती करतील आणि काय नवीन गणिते बनतील यावर जाणकारांनी आपली मते मांडली तर त्यातील काही मुद्दे मला आमच्या ग्रूपवर टाकून राजकीय चर्चेत कच्चा लिंबू समजल्या जाणार्या माझ्या स्वताचा भाव वधारता येईल.
आभारी आहे,
ऋन्मेऽऽष
केवळ प्रचारतंत्रामुळेच भाजपा
केवळ प्रचारतंत्रामुळेच भाजपा लोकसभा निवडणूका जिंकली असा बहुतेक काँग्रेस व राष्ट्रवादीने गोड गैसमज करून घेतला असावा. सध्यां टीव्हीवर त्यांच्या प्रचाराचा जो धडाका चालला आहे [ शासकीय निधी वापरून] त्याच्या अतिरेकाचा फायदा येत्या निवडणूकीत शिवसेना- भाजपा युतिलाच होण्याची शक्यता अधिक दिसते आहे. पण भाजप व शिवसेना यांच्यात एकोपा नाही याचा ढोल जर या दोन घटक पक्षांच्याच बोलण्या- वागण्यातून वाजत राहिला तर मात्र काँग्रेसच्या प्रचार मोहिमेला त्याच कारणामुळे आयतंच मूळ धरण्यासाठी पोषक वातावरण महाराष्ट्रात निर्माण होईल. धाग्याच्या शीर्षकात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर बव्हंशी यावरही अवलंबून असेल.
हास्यावली दिवाळी अंकासाठी
अधिक माहितीसाठी इथे टिचकी मारा...
मोदी लाटेला अटकाव पंतप्रधान
मोदी लाटेला अटकाव
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देशव्यापी लाटेवर स्वार होत लोकसभा निवडणुकीत तमाम विरोधकांना पाणी पाजणाऱ्या भाजपला बिहारमध्ये नितीशकुमार यांचा ‘जदयू’, लालूप्रसाद यादव यांचा ‘राजद’ आणि काँग्रेस यांच्या आघाडीने जमिनीवर आणले आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/madi-wave-stopped/articles...
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
या पार्श्वभूमीवर काहीही गृहीत धरत युती तोडायचे धाडस कठीणच. किंबहुना भाऊ म्हणतात तसे दोन्ही पक्षात सारे काही आलबेल नाही याचा ढोल वाजत राहणेही चांगले नाही. मोदी सरकारच्या राज्यात सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय महागाई बाबत तर त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. भले मग कोणीही त्याचे कितीही स्पष्टीकरण देवो. आपचे विमान जसे दणक्यात आदळले तसेच मोदी लाट हळूहळू ओसरण्याची शक्यता आहेच, फक्त ती कुठे येऊन स्थिरावते हे आता बघणे.
लोकांमध्ये केंद्रातील
लोकांमध्ये केंद्रातील युपीएच्या १० वर्षाच्या कारभारापेक्षा पण जास्त नाराजी राज्यात गेली १५ वर्षे असणार्या आघाडी सरकार विरुद्ध आहे. उत्तरेत मोदी लाट होती पण महाराष्ट्रात आघाडीचे जे पानिपत झाले त्याला मोदिन्बरोबरच आघाडी सरकारचा नाकर्तेपणा, भ्रष्टाचार, गलथानपणा तसेच सेना-भाजप महायुतीची मोट (स्व मुंडे आणि उद्धव ठाकरेंचे नेतृत्व ) हे सगळे मुद्दे होते. तेव्हा नुसत्या मोदी लाटेने आपण हरलो आणि नंतरच्या ४-६ महिन्यात ही लाट कमी होईल अश्या भ्रमात कॉंग्रेस-एनसीपीवाले राहिले तर त्यांची अजूनच धूळधाण होणार आहे. लोकांमध्ये आघाडीबद्दल फार नाराजी आहे आणि हे त्यांचे कार्यकर्ते/नेते पण जाणून आहेत.
<< लोकांमध्ये आघाडीबद्दल फार
<< लोकांमध्ये आघाडीबद्दल फार नाराजी आहे आणि हे त्यांचे कार्यकर्ते/नेते पण जाणून आहेत.>> म्हणूनच युतिवर आपापसांतले मतभेत मतभेद बाजूला ठेवून, निदान त्यांचा जाहीर बाऊ न करतां, लोकांपुढे चांगला पर्याय ठेवण्याची जबाबदारी येते !
सेना भाजपा नि मित्रपक्ष
सेना भाजपा नि मित्रपक्ष ह्यांची जर खरच महायुती झाली तर त्यांना शंभरच्या आसपास जागा मिळण्याची शक्यता वाटतेय. पृथ्वीराज ह्यांनी ज्या शिस्तीने राज्यकारभार केला ते पाहता तेच पुन्हा मुख्यमंत्री बनतील असे वाटते.
निवडणूक लढवायच्या जीन्स हा
निवडणूक लढवायच्या जीन्स हा काय प्रकार आहे?
निवडणूक लढवायच्या जीन्स हा
निवडणूक लढवायच्या जीन्स हा काय प्रकार आहे?>>>>> हा आपल्या आवाक्याबाहेरचा प्रश्न आहे.ह्याचे चांगले उत्तर कोणी संघपरिवाराशी संबंधित असतील ते चांगले देवू शकतील
सेना भाजपा नि मित्रपक्ष
सेना भाजपा नि मित्रपक्ष ह्यांची जर खरच महायुती झाली तर त्यांना शंभरच्या आसपास जागा मिळण्याची शक्यता वाटतेय. पृथ्वीराज ह्यांनी ज्या शिस्तीने राज्यकारभार केला ते पाहता तेच पुन्हा मुख्यमंत्री बनतील असे वाटते.
>>> थोडावेळ वाटलं की मुक्ताफळांचा धागा वाचतोय.
<<पृथ्वीराज ह्यांनी ज्या
<<पृथ्वीराज ह्यांनी ज्या शिस्तीने राज्यकारभार केला ते पाहता तेच पुन्हा मुख्यमंत्री बनतील असे वाटते.>>
सचीन पगारें ना कसली शीस्त दिसलि???? आता २ महिन्यात योजनांचा सपाटा लावलाय.. मागची ५ वर्ष झोपल होता...
मटा ऑनलाइन वृत्त ।
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/Divorce-Non-pe...
विधानसभेच्या जागावाटपावरून एकमेकांविरोधात गुरगुरत असलेल्या शिवसेना-भाजपमध्ये आता सरळसरळ शाब्दिक युद्ध रंगले आहे. अति'कामेच्छा' घटस्फोटाचे कारण ठरू शकते, अशा शब्दांत भाजपला सुनावणाऱ्या शिवसेनेला भाजपने जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. नपुंसकतेमुळेही घटस्फोट होऊ शकतो, असा सणसणीत टोला भाजपने शिवसेनेला हाणला आहे.
>>>>>>>
काही महिन्यांपूर्वी सेना-मनसे जसे रस्त्यावर उतरून भांडत होते तसला प्रकार आता सेना-भाजपा युतीमध्ये चालू आहे. पक्षश्रेष्ठीच नाही तर फेसबूकवरचे कार्यकर्ते सुद्धा जाम पेटलेत. या सर्वामध्ये महाराष्ट्रातला मतदार ज्याला हे लोक गृहीत धरत आहेत तो, तसेच मराठी माणसांचा एक वर्ग जो एकेकाळी सेना-मनसे (राज-उद्धव) सुद्धा एक होतील अशी वेडी आशा धरून होता तो नक्की कोणाला मत द्यायचे याबाबत पार गोंधळून जाणार आहे.
विधानसभा निवडणूकात बहुतेक
विधानसभा निवडणूकात बहुतेक वेळा उमेदवार पाहून मतदान केले जाते (पक्ष पाहून नव्हे) ,याचे मुख्य कारण कोणताही पक्ष अगदी भाजप कॉग्रेस राष्ट्रवादी किंवा शिवसेना इतका प्रबळ नाही कि एकहाती सत्ता मिळवू शकेल, खासदारकिच्या निवडणूकीत शिवसेनेला मोदी फॅक्टरचा फायदा झाला असला तरी जे उमेदवार निवडून आलेत त्यातील ८० % हे त्या त्या भागाचे प्रबळ होते फायदा केवळ उर्वरीत २० % उमेदवारांना झाला असेल.
महाराष्ट्राचे राजकारंण पाहता आजही ग्रामीण भागातील ,वाड्यावस्त्यातील मते डोळे झाकून पंजाकडे जातात (अपवाद आहेत) , तसेच पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे पाय अजूनही भक्कम आहेत. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र हा मोदी प्रभावित आहे. असे असताना आघाडी आणि महायुती जवळपास निम्या जागांवर शिक्कमोर्तब करतील असे वाटते.
युती सरकारला एकदा संधी मिळाल्यानंतर त्याचे सोने करताना त्यांची दमछाक झाली, स्थानिक पातळीवर मोदी फॅकटर तितकासा प्रभाव पाडू शकणार नाही, महायुतीत जागावाटबाबत उद्भवणारे वाद शेवटी कॉगेसच्या पथ्यावर पडणार आहेत.
मूळ प्रश्न
विधानसभेत भाजपा विरुद्ध शिवसेना झाल्यास कोण मारेल बाजी?
असे होऊ नये , झाल्यास कॉगेस बाजी मारेल , सध्या दोन्ही पक्ष बळाने सारखे झाले आहेत.
राज्यात शिवसेनेच्या साह्यानेच
राज्यात शिवसेनेच्या साह्यानेच भाजप वाढला आहे.मुंबई ठाण्यात सेनेचे संघटन मजबूत आहेच पण शिवसेनेचा बेस ग्रामीण भागात आणि सर्व समाजापर्यंत आहेत.प्रत्यक्ष काम करणारे निष्ठ्वान सैनिक सेनेकडे आहेत तसे भाजपचे नाही. महाराष्ट्र भाजपच्या एकही नेत्याला दिल्लीत स्व. मुंडे किंवा गडकरी एवढे स्थान नाही. समजा तावडे-फडणवीस-खडसे पैकी कुणी मुख्यमंत्री झालेच तर त्याला दर वेळेस मोदी-शहांकडे विचारूनच निर्णय घ्यावे लागतील (कॉंग्रेसच्या हाय कमांडसारख). तेव्हा राज्यात सेनेचा मुख्यमंत्री असणेच हिताचे आहे. महायुतीकडे संपूर्ण राज्यभर मान्यत पावलेला नेता उद्धव ठाकरेच आहेत. उद्धव यांनी सेनेची बांधणी चांगली केली आहे. दोन्ही पक्षांनी एकत्रच लढावे. भाजपने निम्म्याच जागा पाहिजेत असला हट्ट सोडून द्यावा. आजच्या पोटनिवडणुकांत युपी, राजस्थान आणि अगदी गुजरातमध्ये पण भाजपला जागा गमवाव्या लागल्या आहेत (तीन राज्यात मिळून २६ जागा मुळच्या भाजपच्या होत्या त्यातल्या १३ गमावल्या आहेत). लोकसभेला भाजप आणि विधानसभेला शिवसेना जास्त जागा लढवते हे जुनेच सूत्र आहे वर छोट्या पक्षांना पण काही जागा दोघांना द्याव्या लागतील. लवकर जागावाटप करून प्रचाराला लागावे. निवडून आल्यावर ठरवा मुख्यमंत्री कोण आणि उपमुख्यमंत्री कोण ते. माझ्या मते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनू शकतात किंवा दुसरा पर्याय म्हणजे सेना भाजप २.५/२.५ वर्षे वाटून पण घेवू शकते. पण युती करूनच लढा.भाजपने निम्म्या जागांचा हट्ट सोडवा.
दोघानी स्वतंतपणे लढावे
दोघानी स्वतंतपणे लढावे
"भाजपला निम्मा जागा कोणत्याही
"भाजपला निम्मा जागा कोणत्याही परिस्थित देणार नाही"
- शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे.
निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला आठवलेली ही अवदसा आहे. नारायण राणे म्हणतात त्याप्रमाणे 'लग्नाचा मांडव अजुन सजला नाही, आणि मुख्यंत्री होण्यासाठी गुडघ्याला बांशींग बांधुन बसलेत हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे'.
कर्तुत्व काय यांचे, लोकसभेत यांना मिळालेला विजय हा केवळ मोदींचा महीमा होता, हे अजुन यांना कळलेले दिसत नाही. स्वतंत्र लढयाचा निर्णय घेतलाच यांनी (दोन्ही पक्षानी) तर ह्यानी 'स्वत:चा पाय कुर्हाडी नेऊन मारला' याचेच प्रत्यंतर १९ ऑक्टोबरला यांना येईल.
अवदसा असे म्हणता येणार नाही.
अवदसा असे म्हणता येणार नाही. भाजपला दुर्मीळ बहुमत (केंद्रात) मिळालेले आहे ह्याचा अर्थ शिवसेना अचानक नगण्य ठरतो असा नाही हे शिवसेना सांगू पाहात आहे. मला शिवसेना किंवा भाजप किंवा कोणत्याच पक्षाबद्दल अती आस्था वगैरे नाही. पण सद्य परिस्थितीत मला असे वाटते की केंद्रातील विजयाच्या धुंदीत भाजप सरकारने राहू नये. उत्तरेत काय झाले ते दिसतच आहे.
येथेही मयेकर म्हणतात त्याप्रमाणे 'सत्तेत आलात हे ठीक आहे, पण आता कामाबाबत बोला' हेच लिहावेसे वाटते.
उगाच स्थानिक पातळीला सेनेला दुखावणे बरे नाही असे वाटत आहे.
< समजा तांडव-फडणवीस-खडसे पैकी
< समजा तांडव-फडणवीस-खडसे पैकी कुणी मुख्यमंत्री झालेच> तांडव कोण?
भाजपकडे स्वतःचे कार्यकर्ते नसले तरी(मला असे वाटत नाही, पण प्रतिसादात म्हटले आहे म्हणून) संघाचे पाठबळ, संख्याबळ आहे. लोकसभा निवडणुकीत सं.स्वंनी महत्त्वाचे काम केल्याचे बोलले जाते.
बोललेच जाते ना! मला वाटले
बोललेच जाते ना! मला वाटले बोलल्या जाते की काय!
१९९९ आणि २००४ मध्ये याच
१९९९ आणि २००४ मध्ये याच दळभद्री पणाने युती ने सत्ता गमावली . मी भाजप आणि मोदी भक्त नाही . असलोच तर टीकाकार आहे . पण महाराष्ट्र पुरत बोलायचं झाल्यास आघाडी सरकार ला बदलण्याची नितांत गरज आहे . मग भले युती असो वा तिसरी आघाडी . साली साडेसाती पण साडेसात वर्षात जाते पण हे आघाडी सरकार १५ वर्षापासून डोक्यावर बसले आहेत . सेना भाजप ने हि संधी दवडली तर सलग ४ टर्म मिळवतील हे दरोडेखोर . मोदी , उद्धव , शहा यांना याची जाणीव असेल हि अपेक्षा
>>>साली साडेसाती पण साडेसात
>>>साली साडेसाती पण साडेसात वर्षात जाते पण हे आघाडी सरकार १५ वर्षापासून डोक्यावर बसले आहेत . सेना भाजप ने हि संधी दवडली तर सलग ४ टर्म मिळवतील हे दरोडेखोर . मोदी , उद्धव , शहा यांना याची जाणीव असेल हि अपेक्षा<<<
अमित शहा वेगळ्याच धुंदीत दिसतात. (व्यक्तीशः मला तो माणूस अत्यंत बेरकी, आपमतलबी, मूंह मे राम बगलमे छुरी स्वरुपाचा आणि कोणाशीच निष्ठावान नसलेला वाटतो, पण असे म्हणणे हे धागा हायजॅक करणे ठरू शकेल).
उद्धव ठाकरेंनी घेतलेला स्टँड स्तुत्य वाटतो. सगळीकडे जर भाजपपुढेच मान तुकवायची असेल तर 'आमचे कितीका निवडून येईनात, आम्ही आपले स्वतंत्र लढतो' ही भूमिका गैर नाही. भाजपच्या डोक्यात नशा गेलेली दिसते. मोदी तर बहुधा अश्या मानसिकतेत असावेत की 'महाराष्ट्र-बिहाराष्ट्रकडे मी कशाला बघायला हवे'!
एवढे होऊनही आबा-बाबा-दादा हे सरकार जायला हवे असे खरंच वाटते. प्रिय मित्र इब्लिसांच्या भाषेत 'बिल झाले'!
नारायण राणे म्हणतात
नारायण राणे म्हणतात त्याप्रमाणे 'लग्नाचा मांडव अजुन सजला नाही, आणि मुख्यंत्री होण्यासाठी गुडघ्याला बांशींग बांधुन बसलेत हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे'.<<<<<
खरं म्हणजे नारायण राणे हे स्वता बध्द्ल बोलत असतील.
डॉ. पतंगराव कदम म्हणाले की
डॉ. पतंगराव कदम म्हणाले की राकाँ विसर्जीत / विलीन करा.
असे सेनेबद्दल बोलण्याची एकाही भाजपवाल्याची हिम्मतदेखील नाही हे सुखद आहे.
उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांनंतर सेना व्यवस्थित हँडल केलेली आहे असेच दिसते ह्यातून!
(अर्थात सेना ही भाजपपासून फुटलेली नसल्याने असे विधान कोणी करणारच नाही हे वेगळे).
पण बीजेपी शूड नॉट अन्डरएस्टिमेट सेना!
(विच दे सीम टू बी डूईंग)
कमळाबाईंची ओटी भरुन त्यांना
कमळाबाईंची ओटी भरुन त्यांना नारळ ध्यायची वेळ आलेली आहे...
शिवसेनेचे नेते किमान
शिवसेनेचे नेते किमान जनसंपर्कात आहेत, भाजपचे टीव्ही आणि पेपरवर बोलघेवड्याचे काम करण्यात दंग आहेत. महायुतीपेक्षा युतीच बरी होती असे स्पष्ट मत (जागाबाबत उघड्यापाशी नागडे गेले ... असे नको व्हायला), २-४ खेपास निवडून आलेला कोणताही नगरसेवक किंवा झेपी/पं समिती सदस्य आमकारकीची अपेक्षा ठेवतोच. त्यातून निर्माण होणारी तेढ फूटीरकिच्या किंवा छूप्या फूटीरकीच्या वाटेवर नेऊन ठेवत आहे.
आतापर्येंत कॉग्रेस स्थिर आहे असे चित्र आता बदलले आहे याचा फायदा युतीने उचललाच पाहिजे त्यासाठी अंतर्गत वाद करण्यात काय अर्थ आहे हे काय दोन्ही पक्षांना कळत नाही का.
काँग्रेसची प्रतिमा बाबांच्या कृपेने अजून जनमतात चांगली आहे. मात्र गेल्या दहा वर्षाचा लेखाजोखा बघता शहरी भागाचे आधूनिकेकरण (उड्डाणपूल, रस्ते, आय टी सेंटर, एमायडीसी वगैरे) आणि ग्रामीण भागात योजनांचा (लाभार्थीपर्यंत पोहचता न आलेल्या) निरर्थक पाउस याव्यतिरिक्त कुठलीच कामगिरी सांगता येण्यासारखी नाही. जे काही रोजगार उपलब्ध झाले ते प्रामुख्याने शहरी भागात तेही टीपीकल शहरी लोकांना सूट होतील असेल झाले आहेत. अजूनही ग्रामीण तरुणाकडे १०-१२ वीनंतर सटरफटर कंपनीत हेल्परची कामे करण्यापलिकडे पर्याय उपलब्ध नाहीत याची खंत वाटते.
सध्या मतदारांस शिवसेनेचा मुख्यमंत्री हवाय मात्र त्यांच्या आमदारकीचा उमेदवार त्यांनी आधीच ठरवलाय जो कोणत्याही पक्षाचा असू शकतो.
< समजा तांडव-फडणवीस-खडसे पैकी
< समजा तांडव-फडणवीस-खडसे पैकी कुणी मुख्यमंत्री झालेच>
टायपो एरर : 'तावडे-फडणवीस-खडसे' असे वाचावे.
.
भाजप लोकसभेत जास्त जागा लढेल आणि शिवसेना विधानसभेत हे सूत्र आहे. लोकसभेत का नाही मग सेनेला निम्म्या जागा दिल्या? भाजप निम्म्या जागांचा नाद सोडेल असेच आता चित्र आहे. गेल्या वेळेस सेना-भाजप १६९-११९ असे सूत्र होते ते आता साधारणपणे १५९-१२९ होईल आणि छोट्या घटक पक्षांना हे पक्ष आपल्या कोट्यातून प्रत्येकी ९-१० जागा सोडतील असे वाटते.
उद्धव ठाकरेंनी घेतलेला स्टँड
उद्धव ठाकरेंनी घेतलेला स्टँड स्तुत्य वाटतो. सगळीकडे जर भाजपपुढेच मान तुकवायची असेल तर 'आमचे कितीका निवडून येईनात, आम्ही आपले स्वतंत्र लढतो' ही भूमिका गैर नाही. भाजपच्या डोक्यात नशा गेलेली दिसते. मोदी तर बहुधा अश्या मानसिकतेत असावेत की 'महाराष्ट्र-बिहाराष्ट्रकडे मी कशाला बघायला हवे'!
+१
राणे स्वतः किती वेळा
राणे स्वतः किती वेळा कोलांट्या मारतात ते जगजाहीर आहे.दीड दोन महिन्यापूर्वी स्वताचा पक्ष आणि मुख्यमंत्र्यविरुद्ध जाहीर पाने गरळ ओकली, राजीनामा दिला, पराभव निश्चित आहे आणि मला त्यात वाटेकरी व्हायचे नाही, कॉंग्रेसने माझा 'गेम' केला वगैरे वगैरे बोलून झाल्यावर परत नांगी टाकून गप्प बसले.त्यामुळे त्यांना आता कोण गंभीर घेत नाही. सिंधुदुर्गात विधानसभेचे मतदार संघ आहेत तीन आणि त्यातले कॉंग्रेसच्या वाटेचे दोन्ही मतदार संघ राणे-पिता पुत्र लढणार यामुळे राष्ट्रवादी- कॉंग्रेस मधले नाराज महायुतीला रसद पुरवणार. राणेंची दहशत, हम करेसो कायदा, त्यांच्या मुलांची गुर्मी यामुळे लोकसभेत जे झाल तेच विधानसभेत होणार आहे.
मी गेले काही दिवस बरेच ठिकाणी
मी गेले काही दिवस बरेच ठिकाणी हा अंदाज घेतोय.
माझ्या स्वताच्या सर्वेक्षणानुसार भाजपा-सेना युती तुटली तर काँग्रेसविरोधी बहुतांश मते सेनेच्याच पारड्यात जाणार.
याचे सर्वात मोठे कारण म्हणजे,
सेना = मराठी माणसाचा विचार करणारा पक्ष = हे समीकरण लोकांच्या डोक्यात फिट दिसतेय.
याउलट,
भाजपा = मराठी माणसाचा वा महाराष्ट्राचा विचार कमी आणि इथल्या विकासाचा निधी गुजरातला घेऊन जातील हि भिती = भले हि खरी असो वा खोटी, डजण्ट मॅटर !
हे मत सर्वसामान्य माणसाचे आहे, भाजपाने याला इग्नोर केले तर तोंडावर पडतील.
>>भाजपाने याला इग्नोर केले तर
>>भाजपाने याला इग्नोर केले तर तोंडावर पडतील. <<
बरोबर. भाजपा - शिवसेना = मोठ्ठा शुन्य.
युती तुटली तर फायदा सेनेचाच आहे, आणि हि गोष्ट सेनेच्या नेत्यांना पक्की ठाउक आहे, आणि म्हणुनच भाजपाच्या नाड्या आवळल्या जात आहेत. पलट्लेल्या समिकरणांमुळे, सेनेचं पारडं - चित भी मेरी, पट भी मेरी या स्थितीत आहे...
(No subject)
Pages