सर्वप्रथम नमूद करू इच्छितो, राजकारणासंबंधी एक्स्पर्ट कॉमेंट देणे हा माझा प्रांत नाही तर उगाच उसना आव आणायचा नाहीये. सध्या आमच्या व्हॉट्सअॅप ग्रूप वर दोन गटात (खरे तर तीन गटात) पेटलेल्या चर्चेला इथे घेऊन आलोय.
विषय आहे - जर भाजपा आणि शिवसेनेत बिनसले आणि निवडणूकपूर्वी युती तुटली तर निकालात बाजी कोण मारेल?
१) मोदींच्या पुण्याईवर (कर्तुत्वावरही बोलू शकतो) भाजपा सरस ठरेल?
२) बाळासाहेबांच्या महाराष्ट्रात मराठी माणूस आजही शिवसेनेच्या बरोबर उभा राहील?
३) दोघांत भांडण तिसर्याचा लाभ, (ज्याची शक्यता फारच कमी दिसतेय सध्या) ?
माझे मत - मी लोकसभेत मोदींना बघून भाजपाच्या पारड्यात टाकले असले तरी विधानसभेत मराठी माणसांचा (म्हणवणारा) प्रादेशिक पक्ष शिवसेनेलाच प्राधान्य देईन. माझ्यामते बहुतांश मराठी माणूस उघडपणे कबूल करो वा न करो ऐनवेळी धनुष्यबाणावरच शिक्का मारून येईल. यात शिवसेनेला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास निकालानंतर पुन्हा युती होऊन ते भाजपाच्या सपोर्टवर सरकार स्थापतील. जेणेकरून केंद्रातील भाजपा सरकारशीही सूत जुळून राहील आणि महाराष्ट्राच्या विकासाला अडथळा येणार नाही.
अर्थात, बाळासाहेबांनतर शिवसेनेने जनतेचा विश्वास बरेपैकी गमावला असूनही दोघांमधील एक पर्याय निवडताना जनता आपले मत शिवसेनेच्या पारड्यात टाकेल. त्यामुळे मोदी यांच्या नावाची कितीही हवा झाली असली तरी भाजपा केवळ दबावतंत्र अवलंबवेल मात्र युती तोडायची हिम्मत ते शेवटपर्यंत दाखवणार नाहीत.
असो, याउपर युती फुटल्यास इतर मित्रपक्ष तसेच मनसे वगैरे काय कोणाशी युती करतील आणि काय नवीन गणिते बनतील यावर जाणकारांनी आपली मते मांडली तर त्यातील काही मुद्दे मला आमच्या ग्रूपवर टाकून राजकीय चर्चेत कच्चा लिंबू समजल्या जाणार्या माझ्या स्वताचा भाव वधारता येईल.
आभारी आहे,
ऋन्मेऽऽष
काही तुटत नाही युती....
काही तुटत नाही युती.... दबावतंत्र आहे. बाकी वर निर्देश केलेल्या "आर्थिक नाड्यांसाठी" वेगळा "धागा" काढावा..
युती तुटलीच पाहिजे. म्हणजे
युती तुटलीच पाहिजे. म्हणजे भाजपला किमान विकास तरी साधता येईल. >>>> हो, भाजपची स्वताचा विकास साधायचीच धडपड सुरू आहे, दिसतेय !
हो, भाजपची स्वताचा विकास
हो, भाजपची स्वताचा विकास साधायचीच धडपड सुरू आहे, दिसतेय !
<<
(No subject)
आतापर्यंत किती स्वत:चा विकास
आतापर्यंत किती स्वत:चा विकास केला एन डी ए ने, तो नाही का दिसला?
सेना भाजप एकत्रच लढणार हे आज
सेना भाजप एकत्रच लढणार हे आज निश्चित झालाय. सेना 150, भाजप 124 किंवा 126, छोटे पक्ष 14/12 असे सूत्र ठरला आहे. लोकसभेसारखाच विधान सभेत पण आघाडीचा सूप्डा साफ होणार.
आधीच ठरले असणार यांचे, उगीच
आधीच ठरले असणार यांचे, उगीच स्वत:चा टीआरपी वाढवत होते दोन्ही पक्ष
अवजड उद्योग खातं फारच भारी
अवजड उद्योग खातं फारच भारी पडलं ब्वॉ
युती झाली? आघाडीची सध्याची
युती झाली?
आघाडीची सध्याची स्थिती.
तोकडिया सेनेला मतं देतील का
तोकडिया सेनेला मतं देतील का या खेपेला ?
आतापर्यंत किती स्वत:चा विकास
आतापर्यंत किती स्वत:चा विकास केला एन डी ए ने, तो नाही का दिसला?
<<
हो ना!
विकसनशील सगळे एन्डीए कॅडेट्स त्वरेने भाजपा केडरमधे घुसलेत.
अन त्यांनी शेण खाल्ले, युतीवाल्यांनी जास्त काही करून दाखवले पाहिजे की नाही? @ "त्यांच्याकडे पहा" युक्तिवाद.
अरेच्चा विदूषक आणि विजय
अरेच्चा
विदूषक आणि विजय आंग्रे यांनी एकाच संस्थळावरून स्मायली लोड केल्यात बहुतेक..
चेतन, पाहुणे घायकुतीला आले.
चेतन,
पाहुणे घायकुतीला आले. "आम्हाला अर्धी + अर्धी मिळून एक चपाती देखील चालेल पण तुमचे भांडण लवकर संपवा पाहू" असे काकूळतीला येऊन म्हणू लागले.
पाहुण्यांच्या तोंडून हे वाक्य निघावे हेच नवरा बायकोच्या भांडणाचे प्रयोजन होते आणि ते साध्य झाले.
>>>>>>>>>
आपण बरोबर म्हणालेलात, पत्ता तर सध्या हाच असाच फेकलाय ! पाहुणे स्वताहून तर काही म्हणाले नाहीत, पण बघूया आता काय म्हणताहेत.
कमळं नैव बाणं नैव सेनाभाजप
कमळं नैव बाणं नैव सेनाभाजप नैव च
शेट्टी आठवलें बलिं दद्यात मोदी दुर्बलघातकः
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/Sena-BJP-allia...
तुटली युती फायनली !!!!
या धाग्याने भविष्यच वर्तवले !! शाब्बास ऋन्मेष द णॉस्ट्राडेमस !!
आघाडी बिघडली युती फुटली 5
आघाडी बिघडली
युती फुटली
5 मुख्य पक्ष लढणार आता
आघाडी बिघडली नव्हे तुटली
आघाडी बिघडली नव्हे तुटली
मी काय शब्द वापरावे हे मी
मी काय शब्द वापरावे हे मी ठरवतो डिविनिती
आपल्या सल्ल्याची आवश्यकता नाही
धन्स सांगितल्याबद्दल
धन्स सांगितल्याबद्दल बर्का!
पण हा सल्ला नव्हताच बातमी होती.
असावी धन्स? म्हणजे?
असावी
धन्स? म्हणजे?
धन्यवाद शब्दाचे थ्यान्क्स
धन्यवाद शब्दाचे थ्यान्क्स सारखे तयार केलेले रुप धन्स.
हॅ मायबोलिवरच असते. कुठेही शब्दकोशात नाही.
आता बहुतेक कोणालाहि बहुमत
आता बहुतेक कोणालाहि बहुमत मिलणार नाहि.. आणि शरद पवार रिझल्ट नंतर तिसरी आघाडि उघडनार.. अपक्षां ना बरोबर घेवुन..
कारण रा.कॉ. आणि कॉ. एकमेकांची मते खानार.. मनसे ही शिवसेना आणि भाजपा दोघांचि ही मते खानार.. आणि उरलेलि मते शिवसेना आणि भाजपात विभागली जानार.. म्हंजे या पाचा पैकी कोनिहि निवडुन येनार नाहि.. आणि अपक्ष आणि मजा म्हणुन उभे राहिलेले यापैकी कोनितरि नवीनच निवडुन येनार.. त्यामुळे अपक्षांचि संख्या वाढनार आणि शरद पवार आता रिकामिच आहेत.. ते ह्या सगळ्या अपक्षांना घेवुन आपलि पोळि भाजनार..
सगळा घोडे बाजार..
आणि कदाचीत रामदास आठ्वलेंची मुख्यमंत्री होन्याचि सुप्त इच्छा पुर्ण होणार बहुतेक..
मजाच मजा.. आणि महाराष्ट्रा ला
मजाच मजा.. आणि महाराष्ट्रा ला सजा...
अमित शहांनी जेव्हा महाराष्ट्रात पाय ठेवला तेव्हा हे स्पष्ट झाल होत कि आता भाजपा स्वताच वरचस्व गाजवण्याचा प्रयत्न करणार.. आणि पहिलि युती तोडनार..
भाजप्यांना त्यांची
भाजप्यांना त्यांची महाराष्ट्रातील जागा दाखवुन देण्याची वेळ आणि संधी आली आहे.
शिवसेने ने केंद्रातील सहभाग
शिवसेने ने केंद्रातील सहभाग काढुन घेतला आहे का ?
असल्यास तेल गेले तुप गेले हाती राहिले धुपाटने असे नको व्हायला
आता फक्त भगवाच.. भाजपाला
आता फक्त भगवाच..
भाजपाला त्यांच्या बुरे दिन मध्ये केवळ शिवसेनेने साथ दिली.. हे तो सोयिस्कर रीत्या विसरला आहे.. राजकीय अस्पृश असताना केवळ शिवसेनाच त्याच्या बरोबर होती.
जेव्हा गुजरात मध्ये राजकीय भुकंप झाला.. आणि वाघेला बाहेर पडले.. तेव्हा ते समर्थक आमदारांसह सेनेत येणार होते.. पण युती धर्म पाळण्यासाठी साहेबांनी त्यांना नकार दिला.. अन्यथा मोदी उदय झालाच नसता..
जेव्हा गुजरात दंगली नंतर बाजपेयिंनी राजधर्म पाळ्ण्याच्या गोष्टी केल्या.. आणि अवघे भाजप नेतृत्व मोदी विरोधात गेले .. तेव्हा साहेबांनी जाहीर सभेत व्यासपीठावरील अडवानींना "मोदींना हटवले तर गुजरात गेला" हे ठणकावुन सांगितले होते..
भाजपाचे दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे जेव्हा पक्ष सोडुन काँग्रेसच्या दारात जावुन पोहोचले होते.. तेव्हा त्यांना साहेबांनीच थांबवीले होते.. अन्यथा तेव्हा भाजपेयींची महाराष्ट्रातील ताकद निम्म्याने कमी झाली असती..
आता फक्त भगवाच..
हे सगळं सेनप्रमुखांनी केलं.
हे सगळं सेनप्रमुखांनी केलं. आता ते नाहीत, भाजपाचंही नेतृत्व संपूर्ण बदललंय. सगळे नवे लोक आहेत. त्यांना याच्याशी देणंघेणं नाही. जिथे त्यांनी स्वपक्षातल्या ज्येष्ठांना मोडीत काढलं, तिथे मित्रपक्षाची पत्रास ठेवतील? तसंच राकॉबरोबर फिक्सिंग असणारच.(आपल्या दोघांचा घरोबा होणार नसला तरी किमान तुमचंही घर मोडा असा) दोघांनी पुनर्विवाह नाही केला तरी अफेअर असणारच.
आजचा लोकसत्ता म्हणतोय, आजवर काँ, राकाँचे नेते तिथे जात होते, आता शिवसेनेचेही जातील.
महाराष्ट्रातील तमाम गड कील्ले
महाराष्ट्रातील तमाम गड कील्ले प्रेमींना खुषखबर ... निवडणुक निकालानंतर शिवसेना अध्यक्ष पुन्हा फोटोग्राफी साठी संपूर्ण वेळ देणार. परत एकदा हॅलिकॉप्टर मधुन सुंदर नजारे टिपण्यासाठी ... कारण इतर काही कामच नसणार हे आधीच त्यांना कळलं आहे ...
ओ बास करा, किती हसवाल.
ओ बास करा, किती हसवाल.:हाहा:
तुमचा अंदाज तर त्या
तुमचा अंदाज तर त्या झीचोवीसतासवाल्यांच्याही आधी आला होता. आणि तंतोतंत खरा ठरला की!
Pages