हे घडेल का महाराष्ट्रात ?
(माणिक मुंढे नावाच्या व्यक्तीचा लेख असलेली एक पिडीएफ फाईल मेल मधे आली होती, ती टंकत आहे येथे. मुंढे यांना संपर्क करू शकलो नाहीये, पण त्यांचा काही आक्षेप असेल असे वाटत नाही. त्यामुळे कृपया कोणत्याही कुरापती काढू नयेत ही विनंती).
झोप झालेली नसते त्यावेळेस अहमदाबाद येतं. सकाळ काहीशी निळसर वाटते. थांबल्यासारखी. दिवस उजाडण्यापुर्वी भरून राहिलेलं एक नि:शब्द जग. अहमदाबादला उतरतो, घ्यायला गाडी आलेली असते. मला गांधीनगरला जायच असतं. गाडीत बसतो. अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर कायम गर्दी असते. काही जण अजुनही झोपेतच असतात. पण गाडी गांधीनगर रस्त्याला लागली की शहर भर्र्कन संपल्यासारखं वाटतं. शहरात कुठेही राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या होर्डिंग्ज दिसत नाहीत. अहो आश्चर्यम.
अहमदाबाद कुठे संपतं आणि कुठे गांधीनगर सुरू होतं हे लक्षात येत नाही. पण गाडी चकाचक रस्त्यांना लागली, ट्रॅफिकचे साईन बोर्ड सगळे जिथल्या तिथे दिसले, थोडीशी झाडी दिसायला लागली, स्वच्छ चौपदरी रस्ता लागला की आपण गांधीनगरमधे असल्याचं ओळखायचं. माझी आणखी एक खूण, गाडीने नर्मदेचा पाण्याने भरलेला कॅनॉल ओलांडला की गांधीनगरमधे पोहोचल्याची पक्की खूण पटते.मला ही जास्त जवळची वाटते, कारण हे शांतपणे वाहणारे पाणी सातपुड्याच्या डोंगरात पडलेले असेल ज्याने गुजरात समृद्ध होतोय.
गांधीनगर हे राजधानीचे शहर, पण गुजरातची आर्थिक राजधानी अहमदाबादच. सगळे बाजार, व्यवहार अहमदाबादमधेच. काही मोठी खरेदी करायची झाली तरी गांधीनगरहून अहमदाबादला आलेलंच बरं. २० कि.मी. पाऊणतासाचा रस्ता. अहमदाबाद-गांधीनगर म्हणजे दोन जुळी शहरे. सिकंदराबाद-हैद्राबाद, पुणे-पिंपरी चिंचवडसारखी.
जसे अहमदाबादमधे कुठल्या पक्षाचे पोस्टर्स दिसत नाहीत तसे गांधीनगरमधेही नाहीत. ना काँग्रेस, ना भाजपा, ना नरेंद्र मोदी. गेल्या तिन एक महिन्यांपासुन माझी कधी महिन्याला तर कधी पंधरा दिवसाला मुंबई-अहमदाबाद-गांधीनगर अशी फेरी असते, होत राहतील, आमचे एक घर सद्ध्या गांधीनगरला आहे.
गांधीनगरला होणार्या चकरांनी माझ्यात सर्वात मोठा बदल कोणता झाला असेल तर मला वाटते मोदींबाबत माझे मत पुर्णपणे बदलले. मत बनविण्याची माझी एक पद्धत आहे. कोणी कितीही सांगितले तरी इतरांच्या सांगण्यावरून माझे अमुक अमुक म्हणुन मत बनत नाही. एक तर प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा प्रयत्न करतो किंवा मग सारासार विचाराची फूटपट्टी लावतो. मोदींबाबतही तसेच.
मोदींबाबत पाच सहा वर्षांपासुन उलटसुलट बरच काही ऐकून झालय. त्यामुळे नैसर्गिकरित्या एक प्रतिमा डोक्यात तयार झाली. गुजरात दंगे घडवणारे मोदी. ते वास्तव आहेच. ते मोदीही नाकारणार नाहीत. पण तरीही मी मोदींच्या नेतृत्वाने भारावलोय.
गुजरातमधे सद्ध्या व्हायब्रंट गुजरात समिट सुरू आहे. हे पाचवे जागतिक संमेलन. जवळपास ८० देशातुन उद्योगपती गांधीनगरला तीन दिवसांसाठी एकत्र आलेत. गुजरातच्या विविध भागात गुंतवणूक होण्यासाठी मोदींनी सुरू केलेले हे संमेलन दरवर्षी भरते. एका व्यासपीठावर येण्याचे टाळणारे अंबानी बंधू मोदींच्या दोन्ही बाजुला बसलेले दिसतायत. एवढेच नाही तर टाटा, गोदरेज, महिंद्रा ही मंडळीही व्यासपीठावर आहेत. त्यांच्यासोबर देशोदेशीचे उद्योगपती गुजरातच्या गुंतवणुकीवर चर्चा करतायत. मोदींना हे जे जमलय ते केंद्राला तरी जमेल ?
गुजरात हे उद्योगी लोकांचे राज्य आहे. इथले लोक रेल्वेत टक्क्यांच्याच गप्पा मारतात हा माझा अनुभव. पण मोदींनी फक्त व्यापार्यांचेच हित सांभाळले का ? नाही. मोदींनी गेल्या काही काळात राबवलेल्या काही भन्नाट आयडीया त्याचा पुरावा. काही आठवड्यांपुर्वी गेलो होतो त्यावेळेस तिथे मोदींच्या 'स्वागतम'ची चर्चा सुरू होती. मी थोडीशी माहिती घेतली आणि अवाक झालो.
स्वागतमची आयडिया अशी. समजा तुमचे एखादे काम भूमी अभिलेख कार्यालयात आहे आणि तिथला अधिकारी ते करत नसेल तर ते काम घेऊन तुम्ही तालुका 'स्वागतम'मधे जायचे. तहसिलदार दर्जाचा किंवा वरिष्ठाकडे तक्रार द्यायची. समजा त्यानेही काम नाही केले तर 'जिल्हा स्वागतम'मधे जिल्हाधिकार्यांकडे जायचे. तिथेही तक्रारीची दखल घेतली नाही तर मोदींकडे जायचे. मोदी 'स्वागतम'मधे आलेल्या तक्रारी संबंधित विभागांकडे पाठविल्या जातात. संबंधित अधिकार्यांसह राज्यभरातले जिल्हाधिकारी, एसपी मोदींसमोर लाईव्ह असतात. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दर काही महिन्यांनी सीएम स्वागतम असतेच.
तक्रारदाराला मोदी बाजुच्या खुर्चीवर बसवतात आणि संबंधित अधिकार्याला जाब विचारतात, का रे बाबा या व्यक्तीचे काम का नाही झाले ? अधिकार्याने जर सांगितले की तक्रारदाराने आवश्यक असलेले कागदपत्रे पुरवली नाहीत तर मोदी तक्रारदाराला विचारतात. समजा चूक अधिकार्याची असेल तर मोदी तिथेच आदेश जारी करतात. आणि समजा तक्रारदाराने आवश्यक बाबींची पुर्तता केली नसेल तर त्याला तसे सांगतात, पण मोदी निर्णय देतात हे नक्की. विशेष म्हणजे हिरोगिरी करत नाहीत. म्हणजे उगीचच अधिकार्यांना झापत नाहीत. किंवा तक्रारदार सरळ मोदींकडेच आला असेल तर त्याला अगोदर संबंधित पहिल्या अधिकार्याकडे पाठवतात. तालुका स्वागतम मधे हे विशेष.
स्वागतम मधे जाऊन आलेल्या एका पोलिस अधिकार्याने सांगितलेला अनुभव अधिक बोलका आहे. एकजण मोदी स्वागतम मधे एका अनधिकृत बिल्डिंगची तक्रार घेऊन गेला. बिल्डिंग तर अनधिकृत आहेच पण सोसायटीतले लोक त्रास देतायत अशी तक्रार. मोदींनी संबंधित शहराच्या जिल्हाधिकारी आणि संबंधित पालिकेच्या अधिकार्यांना विचारले की तक्रारीत किती तथ्य आहे ? अधिकार्याला स्पष्ट उत्तर देता येईना. त्याची तारांबळ उडाली. मोदींनी एक साधा प्रश्न विचारला की बिल्डिंग अनधिकृत आहे की नाही ? अधिकार्याने अखेर सांगितले हो --- अनधिकृत आहे --- मग पाडली का गेली नाही ? मोदींचा पुढचा प्रश्न. कारण बिल्डिंगमधे सगळे दादा लोक राहतात. अधिकार्याचे उत्तर --- मोदींनी फॅक्सवरून बिल्डिंगचे सगळे कागदपत्रं लगेचच मागवून घेतली. वरिष्ठ अधिकार्यांनी ती तिथेच तपासली आणि अनधिकृत असल्याचे सांगितले. मोदींनी आदेश दिला की ही बिल्डिंग उद्या संध्याकाळपर्यंत पडली पाहिजे मग ती कुणाचीही असो आणि तसा रिपोर्ट सादर करा --- मोदींचा झटपट निर्णय.
या स्वागतमचा परिणाम असा आहे की कुठलाच अधिकारी एखाद्या व्यक्तीला भेटायचे टाळू शकत नाही. कारण भेट टाळली तर तो तक्रार मोदींकडे घेऊन जाईल अशी भीती. त्यातुन अधिकार्यांना फक्त भेट घ्यायचीय असे नाही तर तक्रारीचे निवारणही करायचेय म्हणजेच काहीही करून कामातुन सुटका नाही. आपल्याकडे हे कधी होईल ? आमदार, मंत्र्यांचा दरबार भरवला तर त्यात तेच गायब असतात आणि अधिकारी तिकडे फिरकत नाहीत.
मोदींनी इतर राबवलेल्या काही कल्पनांनी तर अवाक व्हायला होते. गुजरातला वाचते करायचे तर काय करावे ? मोदींनी सांगितले, ' वाँच्छे गुजरात '. म्हणजे राज्यातल्या सामान्य लोकांसह सगळे अधिकारी मग तो कारकून असो की सुपर क्लास वन. सगळ्यांनी कुठल्याही वाचनालयात जाऊन तासभर वाचायचे. काहीही वाचा पण वाचा. त्याची सुरूवात खुद्द मोदींनी केली. मोदीच गेले म्हटल्यावर मंत्री गेले, आख्खे मंत्रीमंडळ गेले म्हणजे अधिकारीही गेलेच, जावेच लागणार तसा अधिकृत आदेश असतो. अन्यथा कारवाई त्यामुळे दांडीला संधी कमी. वाचनाचा अहवाल अधिकार्यांना सादर करावा लागतो, त्यावर चर्चा होते. आपल्याकडे जसे ज्ञानेश्वरीचे पारायण होते तसे गुजरातमधे वाँछे गुजरातची पारायणे लागली. आख्खे गुजरात वाचत राहिले. एका कल्पनेने आख्खा गुजरात जोडला गेला. करिश्मा तयार होणार नाही तर काय ?
पुढच्या दोन आयडिया ऐकल्यानंतर तर तुम्हीही मोदींना दाद द्याल. मोदींनी ' गुणोत्सव ' नावाचा कार्यक्रम राबवला. म्हणजे राज्यातल्या सगळ्या अधिकार्यांनी मग तो क्लास वन असो की सुपर क्लास वन, प्रत्येक दिवशी पाच असे तीन दिवस १५ शाळांमधे जाऊन शिकवायचे. तीन दिवसांसाठी ही त्यांची अधिकृत ड्युटी. राज्याच्या मुख्य सचिवाचीही सुटका नाही. काय शिकवले त्याचा अहवाल सादर करायचा. कुठल्या अधिकार्याने कुठल्या शाळेत शिकवायचे याची अधिकृत लिस्ट दिली जाते. कुणीही उठून कुठेही जायचे नाही आणि पाट्या टाकून यायचे नाही. गावात गेल्यानंतर अधिकार्यांनी गावकर्यांशी बोलायचे. पुस्तके, गणवेषाचा प्रश्न असेल तर तो तिथेच सोडवायचा. परिणाम असा की राज्याच्या मुख्य सचिवालाही शाळेची काय स्थिती आहे हे कळते आणि लोकांनाही सरकार आपल्या शाळेत येते याचे समाधान वाटते. परिणाम गुजरातमधल्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या. मतदानाची टक्केवारी होती ९२ टक्के. सत्ता अर्थातच भाजपाचीच म्हणजेच मोदींचीच.
लोक आणि प्रशासन यांच्यातले अंतर मिटवायचे ? काय करावे ? मोदींनी सांगितले ' खेलोत्सव ' म्हणजे अख्ख्या गुजरातने खेळायचे. कल्पना चांगली आहे पण वाटते तितकी सोपी नाही. पैसा, व्यवस्था राबवावी लागते. पण ती हिट झाली. खेलोत्सवमधे अगोदर गाव पातळीवर लोक, स्थानिक नेते, अधिकार्यांनी खेळायचे. खेळ कुठलाही असो. खेळायचे. नंतर तालुक्यावर खेळायचे त्यानंतर जिल्ह्यावर नंतर विभागावर आणि नंतर फायनल राज्यपातळीवर. इथेही सगळे अधिकृत... खेळासाठी मोदी सरकार पैसे उपलब्ध करते. खेळणार्या अधिकार्यांच्या ड्युट्या तशा लावल्या जातात. गाव, तालुका, जिल्हा, विभाग सगळीकडे खेळ होतायत म्हणजेच आपोआपच मैदाने तयार झाली, असलेली सुधारली, नविन खेळाडू मिळाले. अधिकार्यांसोबत दोन हात करायची संधी लोकांना मिळाली. लोकांचा आणि अधिकार्यांचा उत्साह ओसंडून वाहणारा. काही अधिकारी त्यांच्या टीमची चर्चा करतायत हे दृश्यच मला सुखावणारं होतं. मोदी द ग्रेट.
आणखी एक गोष्ट सांगण्याचा मोह आवरत नाही. आता ज्या ठिकाणी व्हायब्रंट गुजरात समिट होतेय तिथेच मोदींनी महात्मा मंदिर उभारलंय. मंदिर म्हणजे गांधीजींचे मंदिर नाही तर त्यांच्या नावावर एक मोठी वास्तू उभी केली आहे, ज्यात समिट होत आहे. महात्मा मंदिराची उभारणीही भन्नाट झाली. मंदिराच्या पायाभरणीचा दिवस ठरवला. त्या दिवशी प्रत्येक गावच्या सरपंचाला गावची माती आणि पाणी घेऊन गांधीनगरला बोलावले. खुद्द मोदींनी प्रत्येक सरपंचाकडून माती-पाणी स्विकारले आणि त्यातून पायाभरणी झाली. प्रत्येक जोडप्याची व्यवस्थित आणून सोय केली. बोलावले आणि वार्यावर सोडले असे नाही. मोदींच्या एका कल्पनेने दूर गावत असलेला गावकरी आणि समिटमधे बसून चर्चा करणारा उदयोगपती जोडला गेला. चर्चा करणारे कुठल्या तरी दुसर्या जगातले लोक आहेत ही भावना त्या गावकर्यांच्या मनात येण्याऐवजी तो आपसूकच उद्योगपतींशी जोडला जातो. म्हणजे भारत आणि इंडिया मोदींनी एका कल्पनेने जोडण्याचा प्रयत्न केलाय.
गुजरात आणि महाराष्ट्र दोन्ही जुळी भावंडे. दोन्ही सुवर्णमहोत्सव साजरा करतायत. मला महाराष्ट्रात त्याचा फील आला नाही. गुजरातमधे त्याचा विसर पडत नाही. मी इथे एकही प्रश्न उपस्थित करणार नाही, कारण हे वाचल्यानंतर जे तुमच्या मनात येईल तेच माझ्या मनात आहे.
पुढची निवडणूक ज्यावेळेस येईल त्यावेळेस जर राहुल गांधींना मतदान द्यायचे की पंतप्रधानपदासाठी मोदींना तर मी मोदींची निवड करण्याचे निश्चित केलय. कारण दंगली कोण घडवत नाही ? पण एखादा तरी सुपर क्लास वन अधिकारी मग तो आयएएस असो की आयपीएस मला माझ्या गावात येताना पहायचय जे सद्ध्या अशक्य वाटते.
खरंच चांगले उपक्रम आहेत हे.
खरंच चांगले उपक्रम आहेत हे. लोकांशी संवाद साधायचे नवे नवे कल्पक मार्ग शोधले आहेत.
मोदिंची ही बाजू आज समजली.
मोदिंची ही बाजू आज समजली.
दिनेशदा, खरेतर अशासारखे
दिनेशदा, खरेतर अशासारखे उपक्रम इतर ठि़काणी इतर लोकांनी वापरले असते किंवा अजुनही वापरले तरी फरक पडू शकेल. कोणी अडविले आहे का ? पण त्यांना इतर चांगल्या (?) कामांमधुन वेळ मिळेल तर ना.
आजच्या पिढीला कदाचित हे माहित
आजच्या पिढीला कदाचित हे माहित नसेल म्हणून लिहितो.
माझ्या आठवणीप्रमाणे १९६९चे आगेमागे जवळजवळ दरवर्षी अहमदाबादमध्ये जगन्नाथाच्या रथाच्या मिरवणुकीच्या वेळेस अल्पसंख्य समाजाकडून वारंवार दंगल घडवून आणली जायची. आणी त्याबद्दलच्या बातम्या त्याकाळात 'एका जमातीच्या ' अशा पद्धतीने दिल्या जायच्या. दंगल शमायला खूप दिवस लागायचे. स्वयंघोषित सेक्युलॅरिस्टच राज्यकर्ते असल्याने मतपेट्या मजबूत ठेवण्याचाच उद्योग चालायचा.
गुजरातेत नरेंद्र मोदींच्या काळात झालेल्या दंगलींना गोध्रा येथे रेल्वेच्या डब्याला आग लावून जे हिंदू कॄरपणे जाळून मारण्यात आले होते ते कारण होते हे का मांडले जात नाही? तरीही आधीच्या काळांमध्ये झालेल्या दंगलींच्या तुलनेने ही दंगल त्यांनी खूप लवकर आटोक्यात आणली.
एवढेच नव्हे तर गुजरात दंगलमुक्त केले.
दिल्लीत लष्कर हाताशी असतांना पंप्र राजीव गांधी ३००० शिखांना का वाचवू शकले नाहीत? उलट ती नैसर्गिक प्रतिक्रीया होती असे म्हटले गेले.
तेव्हा हे गुजरात दंगलींचे उल्लेख करीत राहाणे हे आपण सेक्युलॅरिस्ट आहोत हे दाखवण्यासाठीच असतात हे लक्षात घेतले पाहिजे.
साधारण अशीच मते व्यक्त करणारा
साधारण अशीच मते व्यक्त करणारा लेख मी इंग्रजी पेपरमध्ये सुमारे दोन वर्षांपूर्वी वाचल्याचे आठवते. पण्त्या लेखकाचे नाव वेगळे होते. त्याने आणखीही कांही माहिती दिली होती.
भास्कर, गुजरात दंगलींचा, ८४
भास्कर, गुजरात दंगलींचा, ८४ मधे झालेल्या दंगलींचा विषय अनेकवेळा चर्चेत येतो, त्यामधे ज्यांचे नुकसान झाले त्यांना खुप सहानुभुती क्वचित न्याय आणि भरपाई देखील मिळाली असेल. पण ४८ च्या दंगलींचे काय ? तेव्हा काय काय झाले याचे नामोनिशाण पण नाही. कोण कुणाकडे फिर्याद करणार आणि दाद मागणार ?
मी भास्कर, दोन विचार धारेतला
मी भास्कर,
दोन विचार धारेतला हा फरक आहे.
नेहरु प्रणित विचारधारा म्हणते की अल्पसंख्यांकाना विषेश सवलती दिल्या जाव्यात.
भाजप प्रणित विचार धारा म्हणते की त्यांनी आपला धर्म घरात जपत राष्ट्रीय प्रवाहात सामिल व्हाव.
या निवडणुकीत गुजराथमधे १८ असे मतदार संघ होते जिथे मुसलमान मते निर्णायक होती. इथे एकही मुसलमान उमेदवार न देता १३ ठिकाणी भाजप उमेदवार जिंकले. ( माझ्या मते ) हा भाजप प्रणित विचारधारेचा विजय आहे.
तरी सुध्दा नेहरु प्रणित विचारधारेला कुणाची दाढी कुरवाळायचीच असेल तर आपण काय म्हणणार. लोकशाहीत आपले म्हणणे ( खोटे सुध्दा ) मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे.
मला तर हे वाचल्यावर 'नायक'
मला तर हे वाचल्यावर 'नायक' चित्रपट (मुळ तमिळ चित्रपट 'मुधलवन') आठवला.
महेश, मोदींबद्दल फारच चांगली
महेश,
मोदींबद्दल फारच चांगली माहिती दिलीत.
सहाजिकच ही माहिती बर्याच लोकांच्या पचनी पडणार नाही पण तरीही दिलीत म्ह्णून धन्यवाद !!
नितीनचंद्र, अहो, नेहरू
नितीनचंद्र,
अहो, नेहरू प्रणित विचारधारा आताश्या फक्त काँग्रेसी लोकांनाच एकत्र घेऊन चालते.
सामान्य जन त्याबरोबर जाऊ शकत नाहीत,
त्या ऊलट गांधीविचारांच्या लोकांनाही संपवायला हे लोक मागे पुढे पहात नाहीत.
कुत्रे (Doggy) अंगावर सोडतात.
>>सहाजिकच ही माहिती बर्याच
>>सहाजिकच ही माहिती बर्याच लोकांच्या पचनी पडणार नाही पण तरीही दिलीत म्ह्णून धन्यवाद !!
अहो ते पचनी पडून घेणार नाहीत. मनातुन जरी कितीही योग्य वाटले तरी आता आपली मुळ भुमिका कशी बदलायची असा पेचप्रसंग येईल.
महेश, १९४७ ला मिडीया तितका
महेश, १९४७ ला मिडीया तितका प्रभावशाली नव्हता. त्यामूळे अनेक गोष्टी प्रकाशात आल्याच नाहीत.
त्यावेळी म्हणजे १९७० पर्यंत, आजचा बांगला देश, पूर्व पाकिस्तान होता, आणि त्या देशाचे दोन तूकडे अलग पडले आणि आपण त्यांच्या मधे आलो, हे नेहरुंना खुपत होते. त्यांना दोन भागांना जोडणारा कॉरीडॉर ( वहिवाट ) द्यायची होती. आजच्या पूर्वाचलातले अनेक पारंपारीक नैसर्गिक जलमार्ग बंद झाले. असलेले पूल तोडण्यात आले. सिल्हेट, चितगाँव वगैरे भागात तर कमालीचा अन्याय झाला. ( अविनाश बिनीवाले या इतिहासाबद्दल कळकळीने लिहित असतात.) त्यामुळे ते सगळे सुधारायचे तर.. असो. आपल्या देशात ती सवलत नाही. त्यामूळे जे हातात आहे तेच राखू या.
महेश.... पुढेमागे केव्हातरी
महेश....
पुढेमागे केव्हातरी श्री.माणिक मुंढे यांच्याशी संपर्क साधला गेलाच तर त्याना जरूर आमच्याकडून या प्रभावी माहितीबद्दल धन्यवाद कळविणे. अहमदाबादच नव्हे तर राजकोट, बडोदा आणि सूरत या आणखीन् तीनचार महत्वाच्या शहरात कामानिमित्य येजा करणार्या काही मित्रांनी मला तेथील बदलत्या वातावरणाची माहिती दिली आहे, जी वरील लेखात प्रकट झाली आहे.
सरकारी कार्यालयेतील बदल तर लक्षणीय दिसतोच खाजगी व्यवसाय क्षेत्रात 'पीआरओ' नामक मध्यस्थ ग्राहकाप्रती जी भूमिका बजावित आहेत ती पाहून कुणीही असेच म्हणेल की पैसा खर्च करावा तो इथेच. वर मुस्लिम मतांचा प्रभाव असलेल्या मतदारसंघाचा उल्लेख करून तिथूनही भाजपचे उमेदवार विजयी झाल्याचा उल्लेख केला आहे. माझे तेथील मित्र म्हणतात, 'आम्ही या उमेदवारांना मते दिली ती ते भाजपचे आहेच या पेक्षाही ते नरेन्द्र मोदी यांचे उमेदवार या नात्याने...'
हा करिश्मा फार प्रभावी आहे. नरेन्द्र मोदी खर्या अर्थाने 'सी.ई.ओ.' सिद्ध झाले आहेत....ज्याची या देशाला फार गरज आहे.
अशोक पाटील
माणिक मुंढें ह्यांनी हा लेख
माणिक मुंढें ह्यांनी हा लेख मराठीत भाषांतरीत करून त्यांच्या नावावर खपवला आहे असे वाटन्यास वाव आहे कारण दोन अडिच वर्षांपूर्वी मी देखील हाच लेख इंग्रजीतून वाचला आहे. लिंक शोधत होतो, पण मिळत नाहीये, पण हे तंतोतंत भाषांतर आहे.
@महेश >>पण ४८ च्या दंगलींचे
@महेश
>>पण ४८ च्या दंगलींचे काय ? तेव्हा काय काय झाले याचे नामोनिशाण पण नाही. <<
सहमत!
लोहियांनी 'फाळणीचे गुन्हेगार' नावे लिहिलेल्या पुस्तकाची माहिती देणारा लेख मागील १५ ऑगस्टला माबोवर आला होता. त्यात खालील मत त्या लेख्काने मांडले होते.
"आपल्याला पुन्हा पुन्हा रक्तबंबाळ होण्याची वेळ येऊ नये यासाठी ’फाळणीच्या कारणांचे’ विस्मरण होता कामा नये; आणि ’पुन्हा असे होऊ नये यासाठीचे उपाय’ शोधायलाच हवेत. लोहियांचे पुस्तक ’फाळणी- लोहियांच्या आकलनातून’ या दृष्टीने वाचायला हवे.
अचानक फाळणी जाहीर झाल्यावर धार्मिक दंगलींमुळे सुमारे सहा लाख जीव बळी पडले आणि दीड कोटी लोकांना आपल्या घरादारास मुकावे लागले. त्या निरपराधांचे दिले गेलेले बळी मात्र ’आम्ही हिंसेविना स्वातंत्र्य मिळविले’ असे म्हणतांना आपल्याला आठवत नसतात.
या बळी गेलेल्या लोकांना ना क्रांतिकारकांप्रमाणे ’शहिदत्व’ प्राप्त झाले ना स्वातंत्र्यसैनिकांची प्रतिष्ठा! निव्वळ बळीचे बकरे ठरले ते!
लोहियांच्या पुस्तकात मात्र त्या अभाग्यांबद्दलची सहवेदना आणी त्याला कारणीभूत असलेल्यांविषयीची चीड जाणवते. "
पण यावरची चर्चा नेहमीच्या तंत्राने अशा वळणावर नेली गेली की प्रशासकांनी तो लेखच डिलिट केला.
प्रत्येक राज्यात असे एक मोदी
प्रत्येक राज्यात असे एक मोदी मुख्यमंत्रीपदी येवो.
चांगली माहिती. मोदींबद्दल
चांगली माहिती. मोदींबद्दल चांगले वाचायला/ऐकायला मिळते पण खरे सांगायचे तर २००२ मधल्या दंगलींबद्दल जे वाचलेले आहे त्यामुळे निर्विवाद पाठिंबा द्यावा असे अजूनही वाटत नाही.
आजचा बांगला देश, पूर्व पाकिस्तान होता, आणि त्या देशाचे दोन तूकडे अलग पडले आणि आपण त्यांच्या मधे आलो, हे नेहरुंना खुपत होते. >>> दिनेश, मला माहीत आहे त्यावरून नेहरू (पटेल व इतरही) मधली कॉरिडॉर देण्याच्या विरोधातच होते. आणि सुरूवातीला जीनांनी ती मागणी केल्यावर नंतर लगेच ती मागे पडली. देशाचे दोन तुकडे आणि मधे भारत हे भारतापेक्षा पाकलाच जास्त अडचणीचे होते.
धन्यवाद महेशजी ,उत्तम
धन्यवाद महेशजी ,उत्तम माहिती...........
नरेंद्र मोदी ना पर्याय नाही ........2014 ...पंतप्रधान नरेंद्र मोदीच हवेत
मुस्लिम कॉरिडॉर >>> फाळणी
मुस्लिम कॉरिडॉर >>> फाळणी बद्दल सय्यद शहाबुद्दीन यांना काय वाटत हे वाचण्या सारख आहे.
http://www.arabnews.com/reality-pakistan-after-60-years
http://www.arabnews.com/muslims-subcontinent-60-years-after-partition
ही खर तर तीन भागांची लेखमाला आहे पण तिसरा भाग
http://www.arabnews.com/author/Syed%20Shahabuddin इथे शोधून ही सापडला नाही अन पेपर मी रद्दीत टाकून दिलय; नाही तर सारांश तरी मायबोलीकरांसाठी लिहिला असता.
श्रीकांत, उत्तम माहिती. लेख
श्रीकांत,
उत्तम माहिती. लेख वाचले. थोडक्यात सांगायचं झालं तर शहाबुद्दीन माजलाय! म.फि.हुसेनला जसा पळवून लावला तसाच यालाही हाकलला पाहिजे. मात्र अकबरूद्दीन ओवैसीला ज्यामुळे पळून जावं लागलं तशी भडक वक्तव्ये शहाबुद्दीन करीत नाहीये. हळूहळू डाव साधतोय.
लेखात द्विराष्ट्रसिद्धांताचा उल्लेख आहे, मात्र सय्यद अहमदबद्दल चकार शब्द नाही. मुस्लिम लीग कोणी आणि कशाला स्थापिली त्याबद्दल मूग गिळून बसलाय. मुस्लिमांचा प्रत्येक उल्लेख मुस्लिम इंडियन असा केलाय. इंडियन मुस्लिम असा कुठेच नाहीये. यावरून त्याची मनोवृत्ती स्पष्ट दिसते. मुस्लिम अगोदर मुस्लिम आहे आणि मगच भारतीय.
पाकिस्तानची मृत्युघंटा वाजत असतांना असला माज दाखवतोय. काय नक्की साधायचंय यातून त्याला? हा त्याचा उतारा :
The prevalent view in Pakistan is that the Muslims of the minority provinces were expected to “sacrifice themselves for the benefit of the Muslims in Pakistan and for the glory of Islam.” In fact they did. Was it bravado or stupidity? In any case Muslim Indians received no reward, not even acknowledgment for the “sacrifice.”
जो प्रश्न विचारलाय, त्याचं उत्तर Both! हे आहे. It was bravado as well as stupidity. त्याला बहुतेक bravery म्हणायचं होतं. हिंदूंचा द्वेष नसानसांत इतका भिनलाय की, इंग्रजी पण धडपणे लिहिता येत नाही. असल्या सडकछाप इसमाला त्याची लायकी दाखवून दिली पाहिजे. भारतात राहून हिंदूंशी वैर महागात पडेल याची ठिक्क जाणीव करून द्यायला हवी.
पाकिस्तान वेगळा झाल्याने मुस्लिमांची हानी झाली याचीच त्याला चिंता लागून राहिलीये. भारतात मुस्लिमबहुल प्रदेश त्याला वेगळे हवे आहेत. याचाच अर्थ त्याला भारताची दुसरी फाळणी करायची आहे. पण भाषा मात्र भारत-पाक एकीकरणाची!
या दुतोंडी सापाला वारंवार खोपच्यात घेऊन नमवला पाहिजे.
आ.न.,
-गा.पै.
हा करिश्मा फार प्रभावी आहे.
हा करिश्मा फार प्रभावी आहे. नरेन्द्र मोदी खर्या अर्थाने 'सी.ई.ओ.' सिद्ध झाले आहेत....ज्याची या देशाला फार गरज आहे.
<<
नमो हे खर्या अर्थाने 'सी.ई.ओ.' सिद्ध झाले आहेतच, प्रभावी राजकीय नेते असूनही!
दिलेली आश्वासने पाळण्याकरिता जिवाचे रान करणारा अतिशय कल्पक नेता आहे तो. अशा स्वच्छ प्रतिमेच्या, धडाडीने काम करणार्या, आधुनिक दृष्टिकोन असणार्या आणि आत्मविश्वास बाळगणार्या नेत्याची देशाला फार फार गरज आहे.
मोदीचा धागा आणि चर्चा मात्र
मोदीचा धागा आणि चर्चा मात्र पाकिस्तान आणि फाळणी !! सोमनाथाची आरती म्हणता म्हणता गझनीचा इतिहास चालू ..
मोदीने मुस्लिम उमेदवार दिला नाही, यात विषेश काय! चांगल्या मुस्लिम उमेदवारांची त्यांच्याकडे कमी असेल! काँग्रेसकडून मात्र काही मुस्लिम उमेदवार निवडून आलेले आहेत.
मोदीच्या आणि भाजपाच्या कृतीने ते संकुचित आणि इतर धर्म विरोधी आहेत, हे स्पष्ट झालेले आहेच. त्याची फळे त्याना भोगावी लागतीलच.
सगळे ' उत्सव' फक्त स्टंट म्हणून केलेले आहेत, हे स्पष्ट आहे. गुजरातचे आरोग्य, बालकल्याण.. असे ढीगभर आकडे इतर राज्यांपेक्षा कमीच आहेत.
नासका आंबा बोललाच!!!
नासका आंबा बोललाच!!!
मोदीने मुस्लिम उमेदवार दिला
मोदीने मुस्लिम उमेदवार दिला नाही, यात विषेश काय! चांगल्या मुस्लिम उमेदवारांची त्यांच्याकडे कमी असेल! काँग्रेसकडून मात्र काही मुस्लिम उमेदवार निवडून आलेले आहेत.
------ काँग्रेसकडून मात्र काही चांगले मुस्लिम उमेदवार निवडून आलेले आहेत.
काँग्रेस म्हटले म्हणजे उमेदवार चांगलेच असणार पण हे सर्वानाच कुठे माहित असते म्हणुन लिहील.
गेली अनेक वर्षे गुजरातच्या
गेली अनेक वर्षे गुजरातच्या प्रगतीची साक्षीदार आहे.
इच्छुकांसाठी बेवसाईट पत्ता -http://www.narendramodi.in
दिनेशदा, भास्कर, मी जे म्हणत
दिनेशदा, भास्कर, मी जे म्हणत होतो ते फाळणीच्या वेळचे नाही. ४८ च्या दंगली म्हणजे गांधींच्या निधनानंतरच्या.
मँगोबा आणि उदय, हे असे प्रतिसाद येणार याची अपेक्षा होतीच. जे चांगले आहे त्याला चांगले म्हणा की मनापासुन.
मी तरी पुर्वी चव्हाण आणि काही अंशी पवार यांनी (म्हणजेच कॉन्ग्रेस, एनसीपी नाही) यांनी महाराष्ट्रात जी काही सहकाराची बीजे रोवली आणि इतर राज्यांपेक्षा प्रगती साधली त्याचे नक्कीच कौतुक करतो. पण नंतर जे " विना भ्रष्टाचार नाही उद्धार " सुरू झाले त्याने चांगले प्रगतीपथावर असलेले राज्य रसातळाला चालले आहे.
वर लेखात उल्लेख आहे तसे प्रगतीसाठी कार्य हे कोणत्या कॉन्ग्रेसी (खरे तर गुजरात सोडून इतर) राज्यात झालेले आहे ते दाखवून द्या. केवळ एकदोन उमेदवार चांगले असुन काय उपयोग ?
अनेकांना हे मान्य आहेच की भाजप पेक्षाही हा करिश्मा मोदींचा आहे. पण तुम्हाला ते दिसणार नाही ना ?
४८ च्या त्या दंगली
४८ च्या त्या दंगली होय!!!!!!!!!!!! तुमचा हिंदु धर्म कर्मविपाक सांगतो ना हो? म्हणजे पूर्वीच्या जन्मात पाप केले की तो विष्णू दुसरा जन्म देऊन त्यात ते भोगायला लावतो.... विसरलात का हो? पूर्वी बहुजनाना पाणी, शिक्षण दिले नाही, त्यांच्या झोपड्या जाळल्या, त्यांच्या कानात शिसे घातले..... या सगळ्याचा कर्मविपाक म्हणून भ्रमवृंदांची घरं जळाली!
मेल्यावर चित्रगुप्ताच्या डायरीत जाऊन जमाखर्च बघा.
--- आंबाराम पाडसे
>>४८ च्या त्या दंगली
>>४८ च्या त्या दंगली होय
अरेरे, मँगोबा, मला तर वाटले होते, तुम्हाला सर्वांच्या आधी कळेल अर्थ, पण तुम्ही देखील निराशा केलीत ना
बर तुमच्या म्हणण्याप्रमाणे सगळे हिशोब एकमेकांचे चुकते झाले असतील तर येथुन पुढे सलोख्याची चर्चा करून (स्वतःच्या तुंबड्या भरण्यापेक्षा) देशाचे भले कसे होईल ते पाहूयात का ? मोदींसारखे ?
आंबा३ हिंदु-धर्म
आंबा३
हिंदु-धर्म कर्मविपाक नी काय नी काय ??
लगे रहो
ईब्लिस, तुमच्याकडून एवढ्या
ईब्लिस, तुमच्याकडून एवढ्या संक्षिप्त आणि ते सुद्धा दुसर्यावर जबाबदारी ढकलणार्या प्रतिसादाची अपेक्षा नव्हती.
तुम्ही आणि तुमच्या सारखी विचारसरणी असणारे (आंबा, पेरू, चिक्कू, शेळी, बोकड, इ.) ज्या अर्थी येथे काही विरोधी लिहू शकत नाहीत यावरूनच मोदी सरकारने राबविलेले उपक्रम अतिशय चांगले असुन निदान माबोवर तरी कोणी याच्या विरोधात नाही असे समजण्यात येईल.
धन्यवाद !
Pages