गुजरात मधील विजयाचे रहस्य !

Submitted by महेश on 5 January, 2013 - 04:46

हे घडेल का महाराष्ट्रात ?

(माणिक मुंढे नावाच्या व्यक्तीचा लेख असलेली एक पिडीएफ फाईल मेल मधे आली होती, ती टंकत आहे येथे. मुंढे यांना संपर्क करू शकलो नाहीये, पण त्यांचा काही आक्षेप असेल असे वाटत नाही. त्यामुळे कृपया कोणत्याही कुरापती काढू नयेत ही विनंती).

झोप झालेली नसते त्यावेळेस अहमदाबाद येतं. सकाळ काहीशी निळसर वाटते. थांबल्यासारखी. दिवस उजाडण्यापुर्वी भरून राहिलेलं एक नि:शब्द जग. अहमदाबादला उतरतो, घ्यायला गाडी आलेली असते. मला गांधीनगरला जायच असतं. गाडीत बसतो. अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर कायम गर्दी असते. काही जण अजुनही झोपेतच असतात. पण गाडी गांधीनगर रस्त्याला लागली की शहर भर्र्कन संपल्यासारखं वाटतं. शहरात कुठेही राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या होर्डिंग्ज दिसत नाहीत. अहो आश्चर्यम.

अहमदाबाद कुठे संपतं आणि कुठे गांधीनगर सुरू होतं हे लक्षात येत नाही. पण गाडी चकाचक रस्त्यांना लागली, ट्रॅफिकचे साईन बोर्ड सगळे जिथल्या तिथे दिसले, थोडीशी झाडी दिसायला लागली, स्वच्छ चौपदरी रस्ता लागला की आपण गांधीनगरमधे असल्याचं ओळखायचं. माझी आणखी एक खूण, गाडीने नर्मदेचा पाण्याने भरलेला कॅनॉल ओलांडला की गांधीनगरमधे पोहोचल्याची पक्की खूण पटते.मला ही जास्त जवळची वाटते, कारण हे शांतपणे वाहणारे पाणी सातपुड्याच्या डोंगरात पडलेले असेल ज्याने गुजरात समृद्ध होतोय.

गांधीनगर हे राजधानीचे शहर, पण गुजरातची आर्थिक राजधानी अहमदाबादच. सगळे बाजार, व्यवहार अहमदाबादमधेच. काही मोठी खरेदी करायची झाली तरी गांधीनगरहून अहमदाबादला आलेलंच बरं. २० कि.मी. पाऊणतासाचा रस्ता. अहमदाबाद-गांधीनगर म्हणजे दोन जुळी शहरे. सिकंदराबाद-हैद्राबाद, पुणे-पिंपरी चिंचवडसारखी.

जसे अहमदाबादमधे कुठल्या पक्षाचे पोस्टर्स दिसत नाहीत तसे गांधीनगरमधेही नाहीत. ना काँग्रेस, ना भाजपा, ना नरेंद्र मोदी. गेल्या तिन एक महिन्यांपासुन माझी कधी महिन्याला तर कधी पंधरा दिवसाला मुंबई-अहमदाबाद-गांधीनगर अशी फेरी असते, होत राहतील, आमचे एक घर सद्ध्या गांधीनगरला आहे.

गांधीनगरला होणार्‍या चकरांनी माझ्यात सर्वात मोठा बदल कोणता झाला असेल तर मला वाटते मोदींबाबत माझे मत पुर्णपणे बदलले. मत बनविण्याची माझी एक पद्धत आहे. कोणी कितीही सांगितले तरी इतरांच्या सांगण्यावरून माझे अमुक अमुक म्हणुन मत बनत नाही. एक तर प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा प्रयत्न करतो किंवा मग सारासार विचाराची फूटपट्टी लावतो. मोदींबाबतही तसेच.

मोदींबाबत पाच सहा वर्षांपासुन उलटसुलट बरच काही ऐकून झालय. त्यामुळे नैसर्गिकरित्या एक प्रतिमा डोक्यात तयार झाली. गुजरात दंगे घडवणारे मोदी. ते वास्तव आहेच. ते मोदीही नाकारणार नाहीत. पण तरीही मी मोदींच्या नेतृत्वाने भारावलोय.

गुजरातमधे सद्ध्या व्हायब्रंट गुजरात समिट सुरू आहे. हे पाचवे जागतिक संमेलन. जवळपास ८० देशातुन उद्योगपती गांधीनगरला तीन दिवसांसाठी एकत्र आलेत. गुजरातच्या विविध भागात गुंतवणूक होण्यासाठी मोदींनी सुरू केलेले हे संमेलन दरवर्षी भरते. एका व्यासपीठावर येण्याचे टाळणारे अंबानी बंधू मोदींच्या दोन्ही बाजुला बसलेले दिसतायत. एवढेच नाही तर टाटा, गोदरेज, महिंद्रा ही मंडळीही व्यासपीठावर आहेत. त्यांच्यासोबर देशोदेशीचे उद्योगपती गुजरातच्या गुंतवणुकीवर चर्चा करतायत. मोदींना हे जे जमलय ते केंद्राला तरी जमेल ?

गुजरात हे उद्योगी लोकांचे राज्य आहे. इथले लोक रेल्वेत टक्क्यांच्याच गप्पा मारतात हा माझा अनुभव. पण मोदींनी फक्त व्यापार्‍यांचेच हित सांभाळले का ? नाही. मोदींनी गेल्या काही काळात राबवलेल्या काही भन्नाट आयडीया त्याचा पुरावा. काही आठवड्यांपुर्वी गेलो होतो त्यावेळेस तिथे मोदींच्या 'स्वागतम'ची चर्चा सुरू होती. मी थोडीशी माहिती घेतली आणि अवाक झालो.

स्वागतमची आयडिया अशी. समजा तुमचे एखादे काम भूमी अभिलेख कार्यालयात आहे आणि तिथला अधिकारी ते करत नसेल तर ते काम घेऊन तुम्ही तालुका 'स्वागतम'मधे जायचे. तहसिलदार दर्जाचा किंवा वरिष्ठाकडे तक्रार द्यायची. समजा त्यानेही काम नाही केले तर 'जिल्हा स्वागतम'मधे जिल्हाधिकार्‍यांकडे जायचे. तिथेही तक्रारीची दखल घेतली नाही तर मोदींकडे जायचे. मोदी 'स्वागतम'मधे आलेल्या तक्रारी संबंधित विभागांकडे पाठविल्या जातात. संबंधित अधिकार्‍यांसह राज्यभरातले जिल्हाधिकारी, एसपी मोदींसमोर लाईव्ह असतात. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दर काही महिन्यांनी सीएम स्वागतम असतेच.

तक्रारदाराला मोदी बाजुच्या खुर्चीवर बसवतात आणि संबंधित अधिकार्‍याला जाब विचारतात, का रे बाबा या व्यक्तीचे काम का नाही झाले ? अधिकार्‍याने जर सांगितले की तक्रारदाराने आवश्यक असलेले कागदपत्रे पुरवली नाहीत तर मोदी तक्रारदाराला विचारतात. समजा चूक अधिकार्‍याची असेल तर मोदी तिथेच आदेश जारी करतात. आणि समजा तक्रारदाराने आवश्यक बाबींची पुर्तता केली नसेल तर त्याला तसे सांगतात, पण मोदी निर्णय देतात हे नक्की. विशेष म्हणजे हिरोगिरी करत नाहीत. म्हणजे उगीचच अधिकार्‍यांना झापत नाहीत. किंवा तक्रारदार सरळ मोदींकडेच आला असेल तर त्याला अगोदर संबंधित पहिल्या अधिकार्‍याकडे पाठवतात. तालुका स्वागतम मधे हे विशेष.

स्वागतम मधे जाऊन आलेल्या एका पोलिस अधिकार्‍याने सांगितलेला अनुभव अधिक बोलका आहे. एकजण मोदी स्वागतम मधे एका अनधिकृत बिल्डिंगची तक्रार घेऊन गेला. बिल्डिंग तर अनधिकृत आहेच पण सोसायटीतले लोक त्रास देतायत अशी तक्रार. मोदींनी संबंधित शहराच्या जिल्हाधिकारी आणि संबंधित पालिकेच्या अधिकार्‍यांना विचारले की तक्रारीत किती तथ्य आहे ? अधिकार्‍याला स्पष्ट उत्तर देता येईना. त्याची तारांबळ उडाली. मोदींनी एक साधा प्रश्न विचारला की बिल्डिंग अनधिकृत आहे की नाही ? अधिकार्‍याने अखेर सांगितले हो --- अनधिकृत आहे --- मग पाडली का गेली नाही ? मोदींचा पुढचा प्रश्न. कारण बिल्डिंगमधे सगळे दादा लोक राहतात. अधिकार्‍याचे उत्तर --- मोदींनी फॅक्सवरून बिल्डिंगचे सगळे कागदपत्रं लगेचच मागवून घेतली. वरिष्ठ अधिकार्‍यांनी ती तिथेच तपासली आणि अनधिकृत असल्याचे सांगितले. मोदींनी आदेश दिला की ही बिल्डिंग उद्या संध्याकाळपर्यंत पडली पाहिजे मग ती कुणाचीही असो आणि तसा रिपोर्ट सादर करा --- मोदींचा झटपट निर्णय.

या स्वागतमचा परिणाम असा आहे की कुठलाच अधिकारी एखाद्या व्यक्तीला भेटायचे टाळू शकत नाही. कारण भेट टाळली तर तो तक्रार मोदींकडे घेऊन जाईल अशी भीती. त्यातुन अधिकार्‍यांना फक्त भेट घ्यायचीय असे नाही तर तक्रारीचे निवारणही करायचेय म्हणजेच काहीही करून कामातुन सुटका नाही. आपल्याकडे हे कधी होईल ? आमदार, मंत्र्यांचा दरबार भरवला तर त्यात तेच गायब असतात आणि अधिकारी तिकडे फिरकत नाहीत.

मोदींनी इतर राबवलेल्या काही कल्पनांनी तर अवाक व्हायला होते. गुजरातला वाचते करायचे तर काय करावे ? मोदींनी सांगितले, ' वाँच्छे गुजरात '. म्हणजे राज्यातल्या सामान्य लोकांसह सगळे अधिकारी मग तो कारकून असो की सुपर क्लास वन. सगळ्यांनी कुठल्याही वाचनालयात जाऊन तासभर वाचायचे. काहीही वाचा पण वाचा. त्याची सुरूवात खुद्द मोदींनी केली. मोदीच गेले म्हटल्यावर मंत्री गेले, आख्खे मंत्रीमंडळ गेले म्हणजे अधिकारीही गेलेच, जावेच लागणार तसा अधिकृत आदेश असतो. अन्यथा कारवाई त्यामुळे दांडीला संधी कमी. वाचनाचा अहवाल अधिकार्‍यांना सादर करावा लागतो, त्यावर चर्चा होते. आपल्याकडे जसे ज्ञानेश्वरीचे पारायण होते तसे गुजरातमधे वाँछे गुजरातची पारायणे लागली. आख्खे गुजरात वाचत राहिले. एका कल्पनेने आख्खा गुजरात जोडला गेला. करिश्मा तयार होणार नाही तर काय ?

पुढच्या दोन आयडिया ऐकल्यानंतर तर तुम्हीही मोदींना दाद द्याल. मोदींनी ' गुणोत्सव ' नावाचा कार्यक्रम राबवला. म्हणजे राज्यातल्या सगळ्या अधिकार्‍यांनी मग तो क्लास वन असो की सुपर क्लास वन, प्रत्येक दिवशी पाच असे तीन दिवस १५ शाळांमधे जाऊन शिकवायचे. तीन दिवसांसाठी ही त्यांची अधिकृत ड्युटी. राज्याच्या मुख्य सचिवाचीही सुटका नाही. काय शिकवले त्याचा अहवाल सादर करायचा. कुठल्या अधिकार्‍याने कुठल्या शाळेत शिकवायचे याची अधिकृत लिस्ट दिली जाते. कुणीही उठून कुठेही जायचे नाही आणि पाट्या टाकून यायचे नाही. गावात गेल्यानंतर अधिकार्‍यांनी गावकर्‍यांशी बोलायचे. पुस्तके, गणवेषाचा प्रश्न असेल तर तो तिथेच सोडवायचा. परिणाम असा की राज्याच्या मुख्य सचिवालाही शाळेची काय स्थिती आहे हे कळते आणि लोकांनाही सरकार आपल्या शाळेत येते याचे समाधान वाटते. परिणाम गुजरातमधल्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या. मतदानाची टक्केवारी होती ९२ टक्के. सत्ता अर्थातच भाजपाचीच म्हणजेच मोदींचीच.

लोक आणि प्रशासन यांच्यातले अंतर मिटवायचे ? काय करावे ? मोदींनी सांगितले ' खेलोत्सव ' म्हणजे अख्ख्या गुजरातने खेळायचे. कल्पना चांगली आहे पण वाटते तितकी सोपी नाही. पैसा, व्यवस्था राबवावी लागते. पण ती हिट झाली. खेलोत्सवमधे अगोदर गाव पातळीवर लोक, स्थानिक नेते, अधिकार्‍यांनी खेळायचे. खेळ कुठलाही असो. खेळायचे. नंतर तालुक्यावर खेळायचे त्यानंतर जिल्ह्यावर नंतर विभागावर आणि नंतर फायनल राज्यपातळीवर. इथेही सगळे अधिकृत... खेळासाठी मोदी सरकार पैसे उपलब्ध करते. खेळणार्‍या अधिकार्‍यांच्या ड्युट्या तशा लावल्या जातात. गाव, तालुका, जिल्हा, विभाग सगळीकडे खेळ होतायत म्हणजेच आपोआपच मैदाने तयार झाली, असलेली सुधारली, नविन खेळाडू मिळाले. अधिकार्‍यांसोबत दोन हात करायची संधी लोकांना मिळाली. लोकांचा आणि अधिकार्‍यांचा उत्साह ओसंडून वाहणारा. काही अधिकारी त्यांच्या टीमची चर्चा करतायत हे दृश्यच मला सुखावणारं होतं. मोदी द ग्रेट.

आणखी एक गोष्ट सांगण्याचा मोह आवरत नाही. आता ज्या ठिकाणी व्हायब्रंट गुजरात समिट होतेय तिथेच मोदींनी महात्मा मंदिर उभारलंय. मंदिर म्हणजे गांधीजींचे मंदिर नाही तर त्यांच्या नावावर एक मोठी वास्तू उभी केली आहे, ज्यात समिट होत आहे. महात्मा मंदिराची उभारणीही भन्नाट झाली. मंदिराच्या पायाभरणीचा दिवस ठरवला. त्या दिवशी प्रत्येक गावच्या सरपंचाला गावची माती आणि पाणी घेऊन गांधीनगरला बोलावले. खुद्द मोदींनी प्रत्येक सरपंचाकडून माती-पाणी स्विकारले आणि त्यातून पायाभरणी झाली. प्रत्येक जोडप्याची व्यवस्थित आणून सोय केली. बोलावले आणि वार्‍यावर सोडले असे नाही. मोदींच्या एका कल्पनेने दूर गावत असलेला गावकरी आणि समिटमधे बसून चर्चा करणारा उदयोगपती जोडला गेला. चर्चा करणारे कुठल्या तरी दुसर्‍या जगातले लोक आहेत ही भावना त्या गावकर्‍यांच्या मनात येण्याऐवजी तो आपसूकच उद्योगपतींशी जोडला जातो. म्हणजे भारत आणि इंडिया मोदींनी एका कल्पनेने जोडण्याचा प्रयत्न केलाय.

गुजरात आणि महाराष्ट्र दोन्ही जुळी भावंडे. दोन्ही सुवर्णमहोत्सव साजरा करतायत. मला महाराष्ट्रात त्याचा फील आला नाही. गुजरातमधे त्याचा विसर पडत नाही. मी इथे एकही प्रश्न उपस्थित करणार नाही, कारण हे वाचल्यानंतर जे तुमच्या मनात येईल तेच माझ्या मनात आहे.

पुढची निवडणूक ज्यावेळेस येईल त्यावेळेस जर राहुल गांधींना मतदान द्यायचे की पंतप्रधानपदासाठी मोदींना तर मी मोदींची निवड करण्याचे निश्चित केलय. कारण दंगली कोण घडवत नाही ? पण एखादा तरी सुपर क्लास वन अधिकारी मग तो आयएएस असो की आयपीएस मला माझ्या गावात येताना पहायचय जे सद्ध्या अशक्य वाटते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुढचे लिहिलेले आपण वाचलेले दिसत नाही त्या बद्दल बीजेपीची पेड आर्मीचे काय मत आहे

आता मोदींसाठी तक्षशिला बिहार मधे स्थापण करणार आहात का ?

मौर्याचा पुर्नजन्म गुप्त घराण्यात करणार का ?

कि सिकंदर ला गंगेत स्नान करायला लावणार

Biggrin

काही वर्षांपूर्वी (नेमकी किती आठवत नाही) पण कॉन्ग्रेसने देशभरच्या वर्तमानपत्रात विंचु/साप्/अक्राळविक्राळ श्वापदे वापरुन विरोधीपक्षाविरोधात जाहिराती केल्या होत्या, त्याचा जो कॉन्ग्रेसविरोधी परिणाम झाला होता, तोच परिणाम सध्याच्या कॉन्गी "फेकूचन्द" मोहिमेने होणारे, हे कॉन्गीन्च्या लक्षात कसे येत नाही? Wink

काय परिणाम झालेला ... ? सांगा जरा .. की हे ही फेकनेच आहे तुमचे

विरोधी पक्षाविरुध्द २००९ ला जाहीरात केलेली बीजेपी ने.. अडवाणी च्या नेतृत्वाखाली..काय हाल झाले बघितलेच आहेत तुम्ही.....

तसेच इंडीया शायनिंग ची जाहिरात सुध्दा तुम्हाला कामी आली नाही..... जर काही काम केले होते तर परत निवडुन का नाही आलात.... ?

जसे २००९ ला काँग्रेस काम केले म्हणुन निवडुन आली.......?

उगाच ६ वर्षाची फेक मारत बसायची ...आम्ही यांव केले त्यांव केले.. केले तर निवडुन का नाही आले याचे उत्तर नाही Biggrin

काँग्र्स काम करते....निवडुन येते

भाजप काम करते...... घरी बसते Biggrin

इथल्या प्रतिक्रिया आणि लिंका भारताबाहेरील माबोकरांनी वाचल्या तर भारत विकसीत देश झाला आहे याची त्यांना खात्री पटेल.

या प्रतिक्रियांना मनोरंजकही म्हणवत नाही. नुसती चिखलफेक किती वेळ मनोरंजन करणार?

भारताबाहेरील माबोकरांच्या करमणुकीसाठी माझीही एक काडी…. हलकेच घ्या

मध्य प्रदेश कॉंग्रेसने निवडणूक आयोगाला विनंती केली आहे कि, तलावातील सर्व कमळे झाकून ठेवावीत.

सकाळीच हि बातमी ऐकली आणि सर्व चहा अंगावर पाडून घेतला.

सुनटुन्या, हो ती बातमी कालच पाहिली आहे आणि हसता हसता ऑफिसातच खुर्चीवरुन पडलो. इतके घाबरले का आहेत हे लोक?

मग आता सगळ्यांनी आपापले पंजे खिशात ठेवायचे का? आणि साडी नेसणार्‍या बायकांनी काय करायचे मग? पंजे कापणार की काय त्यांचे?

बिहार / झारखंड मधे कंदील ब्यान करणार की काय?

आता सायकल चालवणे पण बंद करवणार का?

मग घड्याळांच्या दुकानावर बंदी आणणार की काय महाराष्ट्रात Proud

Rofl

उप्र मधे हत्तीचे पुतळे झाकावेत असा अर्ज उप्र भाजपने केला होता. Wink
-------------------------------------------
मन जो कहे वही करेंगे

अर्थातच ते बरोबरच आहे.

मध्य प्रदेशात व इतर ठिकाणी कमळाची रितसर शेती होते. शिवाय नैसर्गिकरित्या उगवतात ते वेगळंच.
हत्तीचे पुतळे हे मायावतीनेच उभे केले होते तिच्या पक्षाची जाहीरात करायला. खरेखुरे जिवंत हत्ती झाकायला नव्ह्ते सांगितले, तिनेच उभे केलेले पुतळे झाकायची विनंती केली होती.

दोन गोष्टींमधला फरक कळत नसेल तर कठीण आहे.

हत्तींच्या मिरवणुका, सार्वजनिक ठिकानी नैसर्गिक हत्तीचे प्रदर्शन यावरही बंदी घालण्याचा उल्लेख होता अर्जात Lol

हो का? तो अर्ज इथे टाका पाहू. मग आपण बोलू Happy

मिरवणुकांमधे हत्ती हवेत अशी काही प्रथा नाही. मुद्दामून मिरवणुका माणसे काढतात.
प्रदर्शन या शब्दातच कृत्रीमपणा आहे.
हत्ती नैसर्गिक असले तरी प्रदर्शन माणूस घडवून आणतो ना? Happy
जंगलतले हत्ती झाका असे तर नव्हते ना अर्जात? प्लीज ग्रो अप.

माझ्या वरच्या प्रश्नांना उत्तरे द्या Happy

मिरवणुकांमधे हत्ती हवेत अशी काही प्रथा नाही. मुद्दामून मिरवणुका माणसे काढतात.
प्रदर्शन या शब्दातच कृत्रीमपणा आहे. हत्ती नैसर्गिक असले तरी प्रदर्शन माणूस घडवून आणतो ना? Happy
जंगलतले हत्ती झाका असे तर नव्हते ना अर्जात? प्लीज ग्रो अप.

मग तो अर्ज बरोबरच आहे.

Pages