गुजरात मधील विजयाचे रहस्य !

Submitted by महेश on 5 January, 2013 - 04:46

हे घडेल का महाराष्ट्रात ?

(माणिक मुंढे नावाच्या व्यक्तीचा लेख असलेली एक पिडीएफ फाईल मेल मधे आली होती, ती टंकत आहे येथे. मुंढे यांना संपर्क करू शकलो नाहीये, पण त्यांचा काही आक्षेप असेल असे वाटत नाही. त्यामुळे कृपया कोणत्याही कुरापती काढू नयेत ही विनंती).

झोप झालेली नसते त्यावेळेस अहमदाबाद येतं. सकाळ काहीशी निळसर वाटते. थांबल्यासारखी. दिवस उजाडण्यापुर्वी भरून राहिलेलं एक नि:शब्द जग. अहमदाबादला उतरतो, घ्यायला गाडी आलेली असते. मला गांधीनगरला जायच असतं. गाडीत बसतो. अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर कायम गर्दी असते. काही जण अजुनही झोपेतच असतात. पण गाडी गांधीनगर रस्त्याला लागली की शहर भर्र्कन संपल्यासारखं वाटतं. शहरात कुठेही राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या होर्डिंग्ज दिसत नाहीत. अहो आश्चर्यम.

अहमदाबाद कुठे संपतं आणि कुठे गांधीनगर सुरू होतं हे लक्षात येत नाही. पण गाडी चकाचक रस्त्यांना लागली, ट्रॅफिकचे साईन बोर्ड सगळे जिथल्या तिथे दिसले, थोडीशी झाडी दिसायला लागली, स्वच्छ चौपदरी रस्ता लागला की आपण गांधीनगरमधे असल्याचं ओळखायचं. माझी आणखी एक खूण, गाडीने नर्मदेचा पाण्याने भरलेला कॅनॉल ओलांडला की गांधीनगरमधे पोहोचल्याची पक्की खूण पटते.मला ही जास्त जवळची वाटते, कारण हे शांतपणे वाहणारे पाणी सातपुड्याच्या डोंगरात पडलेले असेल ज्याने गुजरात समृद्ध होतोय.

गांधीनगर हे राजधानीचे शहर, पण गुजरातची आर्थिक राजधानी अहमदाबादच. सगळे बाजार, व्यवहार अहमदाबादमधेच. काही मोठी खरेदी करायची झाली तरी गांधीनगरहून अहमदाबादला आलेलंच बरं. २० कि.मी. पाऊणतासाचा रस्ता. अहमदाबाद-गांधीनगर म्हणजे दोन जुळी शहरे. सिकंदराबाद-हैद्राबाद, पुणे-पिंपरी चिंचवडसारखी.

जसे अहमदाबादमधे कुठल्या पक्षाचे पोस्टर्स दिसत नाहीत तसे गांधीनगरमधेही नाहीत. ना काँग्रेस, ना भाजपा, ना नरेंद्र मोदी. गेल्या तिन एक महिन्यांपासुन माझी कधी महिन्याला तर कधी पंधरा दिवसाला मुंबई-अहमदाबाद-गांधीनगर अशी फेरी असते, होत राहतील, आमचे एक घर सद्ध्या गांधीनगरला आहे.

गांधीनगरला होणार्‍या चकरांनी माझ्यात सर्वात मोठा बदल कोणता झाला असेल तर मला वाटते मोदींबाबत माझे मत पुर्णपणे बदलले. मत बनविण्याची माझी एक पद्धत आहे. कोणी कितीही सांगितले तरी इतरांच्या सांगण्यावरून माझे अमुक अमुक म्हणुन मत बनत नाही. एक तर प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा प्रयत्न करतो किंवा मग सारासार विचाराची फूटपट्टी लावतो. मोदींबाबतही तसेच.

मोदींबाबत पाच सहा वर्षांपासुन उलटसुलट बरच काही ऐकून झालय. त्यामुळे नैसर्गिकरित्या एक प्रतिमा डोक्यात तयार झाली. गुजरात दंगे घडवणारे मोदी. ते वास्तव आहेच. ते मोदीही नाकारणार नाहीत. पण तरीही मी मोदींच्या नेतृत्वाने भारावलोय.

गुजरातमधे सद्ध्या व्हायब्रंट गुजरात समिट सुरू आहे. हे पाचवे जागतिक संमेलन. जवळपास ८० देशातुन उद्योगपती गांधीनगरला तीन दिवसांसाठी एकत्र आलेत. गुजरातच्या विविध भागात गुंतवणूक होण्यासाठी मोदींनी सुरू केलेले हे संमेलन दरवर्षी भरते. एका व्यासपीठावर येण्याचे टाळणारे अंबानी बंधू मोदींच्या दोन्ही बाजुला बसलेले दिसतायत. एवढेच नाही तर टाटा, गोदरेज, महिंद्रा ही मंडळीही व्यासपीठावर आहेत. त्यांच्यासोबर देशोदेशीचे उद्योगपती गुजरातच्या गुंतवणुकीवर चर्चा करतायत. मोदींना हे जे जमलय ते केंद्राला तरी जमेल ?

गुजरात हे उद्योगी लोकांचे राज्य आहे. इथले लोक रेल्वेत टक्क्यांच्याच गप्पा मारतात हा माझा अनुभव. पण मोदींनी फक्त व्यापार्‍यांचेच हित सांभाळले का ? नाही. मोदींनी गेल्या काही काळात राबवलेल्या काही भन्नाट आयडीया त्याचा पुरावा. काही आठवड्यांपुर्वी गेलो होतो त्यावेळेस तिथे मोदींच्या 'स्वागतम'ची चर्चा सुरू होती. मी थोडीशी माहिती घेतली आणि अवाक झालो.

स्वागतमची आयडिया अशी. समजा तुमचे एखादे काम भूमी अभिलेख कार्यालयात आहे आणि तिथला अधिकारी ते करत नसेल तर ते काम घेऊन तुम्ही तालुका 'स्वागतम'मधे जायचे. तहसिलदार दर्जाचा किंवा वरिष्ठाकडे तक्रार द्यायची. समजा त्यानेही काम नाही केले तर 'जिल्हा स्वागतम'मधे जिल्हाधिकार्‍यांकडे जायचे. तिथेही तक्रारीची दखल घेतली नाही तर मोदींकडे जायचे. मोदी 'स्वागतम'मधे आलेल्या तक्रारी संबंधित विभागांकडे पाठविल्या जातात. संबंधित अधिकार्‍यांसह राज्यभरातले जिल्हाधिकारी, एसपी मोदींसमोर लाईव्ह असतात. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दर काही महिन्यांनी सीएम स्वागतम असतेच.

तक्रारदाराला मोदी बाजुच्या खुर्चीवर बसवतात आणि संबंधित अधिकार्‍याला जाब विचारतात, का रे बाबा या व्यक्तीचे काम का नाही झाले ? अधिकार्‍याने जर सांगितले की तक्रारदाराने आवश्यक असलेले कागदपत्रे पुरवली नाहीत तर मोदी तक्रारदाराला विचारतात. समजा चूक अधिकार्‍याची असेल तर मोदी तिथेच आदेश जारी करतात. आणि समजा तक्रारदाराने आवश्यक बाबींची पुर्तता केली नसेल तर त्याला तसे सांगतात, पण मोदी निर्णय देतात हे नक्की. विशेष म्हणजे हिरोगिरी करत नाहीत. म्हणजे उगीचच अधिकार्‍यांना झापत नाहीत. किंवा तक्रारदार सरळ मोदींकडेच आला असेल तर त्याला अगोदर संबंधित पहिल्या अधिकार्‍याकडे पाठवतात. तालुका स्वागतम मधे हे विशेष.

स्वागतम मधे जाऊन आलेल्या एका पोलिस अधिकार्‍याने सांगितलेला अनुभव अधिक बोलका आहे. एकजण मोदी स्वागतम मधे एका अनधिकृत बिल्डिंगची तक्रार घेऊन गेला. बिल्डिंग तर अनधिकृत आहेच पण सोसायटीतले लोक त्रास देतायत अशी तक्रार. मोदींनी संबंधित शहराच्या जिल्हाधिकारी आणि संबंधित पालिकेच्या अधिकार्‍यांना विचारले की तक्रारीत किती तथ्य आहे ? अधिकार्‍याला स्पष्ट उत्तर देता येईना. त्याची तारांबळ उडाली. मोदींनी एक साधा प्रश्न विचारला की बिल्डिंग अनधिकृत आहे की नाही ? अधिकार्‍याने अखेर सांगितले हो --- अनधिकृत आहे --- मग पाडली का गेली नाही ? मोदींचा पुढचा प्रश्न. कारण बिल्डिंगमधे सगळे दादा लोक राहतात. अधिकार्‍याचे उत्तर --- मोदींनी फॅक्सवरून बिल्डिंगचे सगळे कागदपत्रं लगेचच मागवून घेतली. वरिष्ठ अधिकार्‍यांनी ती तिथेच तपासली आणि अनधिकृत असल्याचे सांगितले. मोदींनी आदेश दिला की ही बिल्डिंग उद्या संध्याकाळपर्यंत पडली पाहिजे मग ती कुणाचीही असो आणि तसा रिपोर्ट सादर करा --- मोदींचा झटपट निर्णय.

या स्वागतमचा परिणाम असा आहे की कुठलाच अधिकारी एखाद्या व्यक्तीला भेटायचे टाळू शकत नाही. कारण भेट टाळली तर तो तक्रार मोदींकडे घेऊन जाईल अशी भीती. त्यातुन अधिकार्‍यांना फक्त भेट घ्यायचीय असे नाही तर तक्रारीचे निवारणही करायचेय म्हणजेच काहीही करून कामातुन सुटका नाही. आपल्याकडे हे कधी होईल ? आमदार, मंत्र्यांचा दरबार भरवला तर त्यात तेच गायब असतात आणि अधिकारी तिकडे फिरकत नाहीत.

मोदींनी इतर राबवलेल्या काही कल्पनांनी तर अवाक व्हायला होते. गुजरातला वाचते करायचे तर काय करावे ? मोदींनी सांगितले, ' वाँच्छे गुजरात '. म्हणजे राज्यातल्या सामान्य लोकांसह सगळे अधिकारी मग तो कारकून असो की सुपर क्लास वन. सगळ्यांनी कुठल्याही वाचनालयात जाऊन तासभर वाचायचे. काहीही वाचा पण वाचा. त्याची सुरूवात खुद्द मोदींनी केली. मोदीच गेले म्हटल्यावर मंत्री गेले, आख्खे मंत्रीमंडळ गेले म्हणजे अधिकारीही गेलेच, जावेच लागणार तसा अधिकृत आदेश असतो. अन्यथा कारवाई त्यामुळे दांडीला संधी कमी. वाचनाचा अहवाल अधिकार्‍यांना सादर करावा लागतो, त्यावर चर्चा होते. आपल्याकडे जसे ज्ञानेश्वरीचे पारायण होते तसे गुजरातमधे वाँछे गुजरातची पारायणे लागली. आख्खे गुजरात वाचत राहिले. एका कल्पनेने आख्खा गुजरात जोडला गेला. करिश्मा तयार होणार नाही तर काय ?

पुढच्या दोन आयडिया ऐकल्यानंतर तर तुम्हीही मोदींना दाद द्याल. मोदींनी ' गुणोत्सव ' नावाचा कार्यक्रम राबवला. म्हणजे राज्यातल्या सगळ्या अधिकार्‍यांनी मग तो क्लास वन असो की सुपर क्लास वन, प्रत्येक दिवशी पाच असे तीन दिवस १५ शाळांमधे जाऊन शिकवायचे. तीन दिवसांसाठी ही त्यांची अधिकृत ड्युटी. राज्याच्या मुख्य सचिवाचीही सुटका नाही. काय शिकवले त्याचा अहवाल सादर करायचा. कुठल्या अधिकार्‍याने कुठल्या शाळेत शिकवायचे याची अधिकृत लिस्ट दिली जाते. कुणीही उठून कुठेही जायचे नाही आणि पाट्या टाकून यायचे नाही. गावात गेल्यानंतर अधिकार्‍यांनी गावकर्‍यांशी बोलायचे. पुस्तके, गणवेषाचा प्रश्न असेल तर तो तिथेच सोडवायचा. परिणाम असा की राज्याच्या मुख्य सचिवालाही शाळेची काय स्थिती आहे हे कळते आणि लोकांनाही सरकार आपल्या शाळेत येते याचे समाधान वाटते. परिणाम गुजरातमधल्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या. मतदानाची टक्केवारी होती ९२ टक्के. सत्ता अर्थातच भाजपाचीच म्हणजेच मोदींचीच.

लोक आणि प्रशासन यांच्यातले अंतर मिटवायचे ? काय करावे ? मोदींनी सांगितले ' खेलोत्सव ' म्हणजे अख्ख्या गुजरातने खेळायचे. कल्पना चांगली आहे पण वाटते तितकी सोपी नाही. पैसा, व्यवस्था राबवावी लागते. पण ती हिट झाली. खेलोत्सवमधे अगोदर गाव पातळीवर लोक, स्थानिक नेते, अधिकार्‍यांनी खेळायचे. खेळ कुठलाही असो. खेळायचे. नंतर तालुक्यावर खेळायचे त्यानंतर जिल्ह्यावर नंतर विभागावर आणि नंतर फायनल राज्यपातळीवर. इथेही सगळे अधिकृत... खेळासाठी मोदी सरकार पैसे उपलब्ध करते. खेळणार्‍या अधिकार्‍यांच्या ड्युट्या तशा लावल्या जातात. गाव, तालुका, जिल्हा, विभाग सगळीकडे खेळ होतायत म्हणजेच आपोआपच मैदाने तयार झाली, असलेली सुधारली, नविन खेळाडू मिळाले. अधिकार्‍यांसोबत दोन हात करायची संधी लोकांना मिळाली. लोकांचा आणि अधिकार्‍यांचा उत्साह ओसंडून वाहणारा. काही अधिकारी त्यांच्या टीमची चर्चा करतायत हे दृश्यच मला सुखावणारं होतं. मोदी द ग्रेट.

आणखी एक गोष्ट सांगण्याचा मोह आवरत नाही. आता ज्या ठिकाणी व्हायब्रंट गुजरात समिट होतेय तिथेच मोदींनी महात्मा मंदिर उभारलंय. मंदिर म्हणजे गांधीजींचे मंदिर नाही तर त्यांच्या नावावर एक मोठी वास्तू उभी केली आहे, ज्यात समिट होत आहे. महात्मा मंदिराची उभारणीही भन्नाट झाली. मंदिराच्या पायाभरणीचा दिवस ठरवला. त्या दिवशी प्रत्येक गावच्या सरपंचाला गावची माती आणि पाणी घेऊन गांधीनगरला बोलावले. खुद्द मोदींनी प्रत्येक सरपंचाकडून माती-पाणी स्विकारले आणि त्यातून पायाभरणी झाली. प्रत्येक जोडप्याची व्यवस्थित आणून सोय केली. बोलावले आणि वार्‍यावर सोडले असे नाही. मोदींच्या एका कल्पनेने दूर गावत असलेला गावकरी आणि समिटमधे बसून चर्चा करणारा उदयोगपती जोडला गेला. चर्चा करणारे कुठल्या तरी दुसर्‍या जगातले लोक आहेत ही भावना त्या गावकर्‍यांच्या मनात येण्याऐवजी तो आपसूकच उद्योगपतींशी जोडला जातो. म्हणजे भारत आणि इंडिया मोदींनी एका कल्पनेने जोडण्याचा प्रयत्न केलाय.

गुजरात आणि महाराष्ट्र दोन्ही जुळी भावंडे. दोन्ही सुवर्णमहोत्सव साजरा करतायत. मला महाराष्ट्रात त्याचा फील आला नाही. गुजरातमधे त्याचा विसर पडत नाही. मी इथे एकही प्रश्न उपस्थित करणार नाही, कारण हे वाचल्यानंतर जे तुमच्या मनात येईल तेच माझ्या मनात आहे.

पुढची निवडणूक ज्यावेळेस येईल त्यावेळेस जर राहुल गांधींना मतदान द्यायचे की पंतप्रधानपदासाठी मोदींना तर मी मोदींची निवड करण्याचे निश्चित केलय. कारण दंगली कोण घडवत नाही ? पण एखादा तरी सुपर क्लास वन अधिकारी मग तो आयएएस असो की आयपीएस मला माझ्या गावात येताना पहायचय जे सद्ध्या अशक्य वाटते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गतशतकानुशतके भरतवर्षावर परकीय आक्रमणे झाली; तयांनी मुंडराशी उभा करून आसुरी आनंद उपभोगला, युद्धाच्या नीती बाजूला सारून भोळ्याभाबड्या जनतेच्या अमानुष कत्तली केल्या, आम्हांवर त्यांचा अधर्म लादला, आमच्या कलाकृती भग्न केल्या, आमचे ग्रंथ जाळून टाकले, अपरिमित अत्याचार केले या संदर्भात आपले कर्मविपाकासंदर्भातील ज्ञान काय प्रकाश पाडते? कधीकाळी भरतवर्षातील भारतीयांनीदेखील तसा अत्याचार केला होता का हो? का याउलट अद्यापि फिटांफिट व्हायची आहे? सांगा बर?
.
.
.

अनादिकालापासून आमच्या धर्मात घरभेदी उपजलेले आहेत. त्यांनी आपापल्या कुवतीनुसार हिंदूधर्मातील संकल्पना घेऊन निरनिराळे पंथ (धर्म) उभारले. प्राचीन काळी चार्वाकऋष्यादी होऊन गेले. सांप्रत सूर्यचिलीटन्यायाने आम्बात्रयादि (तसेच नरेंद्रादि) महर्षी कार्यरत आहेत. दुर्दैवाने बहुतांशी भ्रमवृंदच होते आणि आहेत. त्यामुळे आम्बात्रयमहर्षी देखील भ्रमवृंदांच्याच जातीकुळातील असावेत अशी शंका आहे. खरेखोटे तेच जाणोत. आणि दुर्दैवाने जर ते खरे असेल त्यांनीदेखील 48 भोगलेले आहे आणि आता स्वतः धर्मभ्रष्ट होऊन धर्मनिंदेचे जे कूकर्म करत आहेत त्याचा कर्मविपाक कसा असेल याची जिज्ञासा आहे. आणि जर खोटे असेल तर एकवेळ स्वधर्म प्रकट करू नये पण "मी हिंदू नाही'' एवढे लिहीण्याचे तरी धाडस दाखवावे.

हे "tulips in twilight" या ब्लॉग वर १९ जाने २०११ ला पोस्ट केलय..
मला वाचल्याचं आठवतं माबो वरच बहुधा ट्युलीप नी लिहलं होतं

http://tulipsintwilght.wordpress.com/

महेश, व तमाम मायबोलीकर.
हा माझा मूळ आयडी आहे.
ई या दीर्घ अक्षरापासून सुरू होणारा आयडी अ‍ॅडमिनकडे तक्रार करूनही इथे सुरूच आहे.

असो.

आंबा३,

>> पूर्वी बहुजनाना पाणी, शिक्षण दिले नाही, त्यांच्या झोपड्या जाळल्या, त्यांच्या कानात शिसे घातले.....
>> या सगळ्याचा कर्मविपाक म्हणून भ्रमवृंदांची घरं जळाली!

लई भारी तर्कट!

१. कशावरून ब्राह्मणांनी ही पापं केली?

२. जरी ब्राह्मणांनी की पापं केली असं गृहीत धरलं तरी तेच ब्राह्मण पुढील जन्मांतही ब्राह्मण म्हणून निपजले हे कशावरून?

३. आपलं तर्कट विशिष्ट पंथीयांनाही लावायचं का? एका धर्मग्रंथात लिहिल्याप्रमाणे विशिष्टपंथीय त्यांच्याच भाऊबंदांना मारताहेत असं समजावं का? भरपूर उदाहरणे आहेत : इराण-इराक युद्ध, तालिबान अफगाण चकमकी, शिया सुन्नी वाद, लिबियातले युद्ध, सीरीयामधील मारामारी.

आ.न.,
-गा.पै.

आंबा ३

<<<<मोदीचा धागा आणि चर्चा मात्र पाकिस्तान आणि फाळणी !! सोमनाथाची आरती म्हणता म्हणता गझनीचा इतिहास चालू >> असे म्हणणारे तुम्ही स्वता: काय केले,

हिंदु-धर्म कर्मविपाक अन काय काय ?? वड्याच तेल वांग्यावर ??

हरीहर,....

त्यांच्या G मध्ये दम नाहीच,

महेश,

माफि काय मागता ?

इब्लिस आणि ईब्लिस असे दोन वेगळे आयडी आहेत असे गृहित धरून क्षमस्व म्हणालो त्यात काही अनुचित आहे असे वाटत नाही.

असो, मला एका गोष्टीची गंमत वाटत आहे, इतर वेळी जसे लोक हिरिरीने वाद घालत असतात, तसे या धाग्यावर कोणी काही विरोधी लिहित नाहीये, वाद घालत नाहीये,
कारण मुळात मोदी यांचे लेखात उल्लेख केलेले कार्य एवढे चांगले आणि जबरदस्त आहे की त्यावर कोण काय बोलणार ? या सर्व कार्यात त्यांनी कोणत्याही प्रकारचा जातिभेद, धर्मभेद, इ. केलेला दिसून येत नाहीये. हा आहे खरा सर्वधर्मसमभाव !

पैलवान आण्णा, पेशंटच्या हिस्टरीवरुन डॉक्टर मंडळी गृहीतक मांडतात... तसे ब्राह्मणांची जळितं आणि त्यांची पापं याबाबत ते मी मांडलेले ते गृहीतक आहे.

मी केवळ गृहीतक मांडलेआहे, मला केवळ तेवढेच जमते.

पण आपण महान आहात.. पास्ट लाईफ रिग्रेशनच्या बीबीवर आपला विचारवारू सोमरस झोकलेल्या घोड्यागत खिंकाळत फिरत होता, हे आपण व मायबोलीवाले विसरले नसतीलच. Proud ( हे आम्ही पास्ट आय डी रिग्रेशन ज्ञानाने जाणले. )

पास्ट लाईफ रिग्रेशनात इतके अगाध ज्ञान असलेल्या तुमच्या सारख्या मानवाने याबाबत मलाच पुरावा मागणे, हे म्हणजे शेळीने मांजराकडे मूठभर लेंडकं मागण्याचा प्रकार आहे. Proud

आपण या विषयातील जाणकार असल्याने दोन जळित ब्राह्मणे पकडावीत व तुमच्या पास्ट लाइफ रिग्रेशन प्रयोगाने सत्य जाणून सर्वांस उपकृत करावे..

तोपर्यंत, एक गृहीतक म्हणून आमचे मौलिक विचार तसेच गृहीतक म्हणून राहू द्यावेत.

हिरव्या धर्मात पुनर्जन्म नाही, त्यामुळे आपल्या तालीबानी शंकेबाबत उत्तर देण्यास आमची मती अक्षम आहे.

---- पास्ट आय डी रिग्रेशन होत असलेला आंबा.

मोदींच्या कर्यकुशलतेवर बोलावे तितके कमी आहे. माझे मोठे दिर सिव्हिल इं आहेत गोल्ड मेडेलिस्ट गुजरात युनिवर्सिटीतून. रिंग रोडच्या प्रकल्पानिमित्त मोदींनी हुशार इंजिनियर्स ना इंटरव्हुय साठी बोलाविले होते. मोदिंनी स्वतः सगळ्याचे इंटेर्व्हियुस घेतले आणि विशेष म्हणजे एकालाही आच पैसे न देता क्लास वन ऑफिसरची नोकरी मिळाली. जे भारताच्या इतर कुठल्याही राज्यात केवळे अशक्य आहे.
म्हणूनच मला आजही सासर (बडोदा) सोडून पुण्यात येताना हळहळ वाटते का या महान(?) राष्ट्रात यावे लागतेय याची !!

@ गा. पै. - तुम्ही शेणात दगड टाकलाय त्यामुळे अंगावर शेण उडणारच. ह्या अनुभवावरुन शिका की कोणाला उत्तर द्यायचे आणि कोणाला ignore करायचे.

>> रिंग रोडच्या प्रकल्पानिमित्त मोदींनी हुशार इंजिनियर्स ना इंटरव्हुय साठी बोलाविले होते. मोदिंनी स्वतः सगळ्याचे इंटेर्व्हियुस घेतले आणि विशेष म्हणजे एकालाही आच पैसे न देता क्लास वन ऑफिसरची नोकरी मिळाली. जे भारताच्या इतर कुठल्याही राज्यात केवळे अशक्य आहे.

स्वप्ना, अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद, खरच असे सर्व राज्यांमधे घडू लागले तर बराच चांगला बदल होऊ शकेल देशात.

आंबा३,

>> पास्ट लाईफ रिग्रेशनच्या बीबीवर आपला विचारवारू सोमरस झोकलेल्या घोड्यागत खिंकाळत फिरत होता,

अगदी बरोबर. माझा विचारवारूने सोमरस प्यायलेला होताच. सोमलतेपासून काढलेला तो सोमरस. काही अज्ञ लोक त्यास बेवडा म्हणतात. यथोचित प्राशनामुळे विचारवारूस चांगलाच जोम चढला. म्हणून त्या रसास जोमरस असेदेखील संबोधण्यास हरकत नसावी. या जोमरसामुळेच aschig तसेच उदय यांच्यासारख्या दिग्गजांकडून टोकाचे मतभेद असतांनाही दाद मिळाली.

आ.न.,
-गा.पै.

इतना सन्नाटा क्युं है भई

कौन ले आया है दर बार की खामोशी
कितनी जानलेवा है दोपहर की खामोशी

खुश है दूसरों का घर वो जलाके लो कैसे
कल बताएगा वहीं अपने घर की खामोशी

अब समझ गया हुं मै, जिम लुटती है क्यूं
आबरू बचाये कैसे ये शहर की खामोशी

- किरण वंजारा
-------------------------------------------------------
जान से भी ज्यादा उन्हे प्यार किया करते थे
याद उन्हे दिन रात किया करते थे,
अब उन राहो से गुजरा(त) नही जाता
जहा बैठ कर उनका ईँतजार किया करते थे

सोनिया गांधींना अमेरिकन न्यायालयाचे समन्स

न्यूयॉर्क - नोव्हेंबर 1984 मध्ये शिखांविरोधात झालेल्या हल्ल्यांसदर्भात अमेरिकेतील एका शिख संघटनेने दाखल केलेल्या फिर्यादीवरून अमेरिकेतील न्यायालयाने कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना समन्स बजावले आहे. न्यूयॉर्कमधील जिल्हा न्यायालयात एका शिख मानवतावादी संघटनेने यासंदर्भात फिर्याद दाखल केली आहे. नोव्हेंबर 1984 मध्ये झालेल्या शिखविरोधी दंगलींसंदर्भात भरपाई देण्याची तसेच कारवाई करण्याची मागाणी करणारी ही फिर्याद गांधी यांच्या विरोधात दाखल करण्यात आली आहे.

गांधी या सध्या अमेरिकेमध्ये वैद्यकीय उपचारांसाठी आल्या आहेत. शिखविरोधी दंगलींमध्ये सहभागी असलेल्या कमल नाथ, सज्जन कुमार, जगदीश टायटलर व अन्य कॉंग्रेस नेत्यांना सोनिया गांधी संरक्षण देत असल्याचा आरोप या शिख संघटनेने केला आहे. यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या 27 पानी फिर्यादीमध्ये 1 ते 4 नोव्हेंबर 1984 मध्ये सुमारे 30 हजार लोकसंख्या असलेल्या शिख समुदायास भारतात सध्या सत्तास्थानी असलेल्या कॉंग्रेस नेत्यांकडून जाणीवपूर्वक लक्ष करण्यात आल्याचे म्हटले आहे. अमेरिकन कायद्यानुसार या समन्सचे उत्तर देण्यासाठी 120 दिवसांचा कालावधी देण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

किरण वंजारा?
कोण बरे हा थोर शायर? >>>

वेट. पुढच्या १५ ऑगस्टला मुंजाबाची बोळ इथून जिवंत भाषण करणार आहेत ते Proud

नोव्हेंबर 1984 मध्ये झालेल्या शिखविरोधी दंगलींमध्ये सहभागी असलेल्या कमल नाथ, सज्जन कुमार, जगदीश टायटलर व अन्य कॉंग्रेस नेत्यांना सोनिया गांधी संरक्षण देत असल्याचा आरोप या शिख संघटनेने केला आहे.<<

त्यावेळी खुद्द दिल्लीत सरकारच्या नाकावर टिच्चून कॉंग्रेस नेत्यांच्या पुढाकराने ३००० निरपराध शिखांची कत्तल केली गेली होती याची अमेरिकेतील मानवतावाद्यांना खबरबात नव्हती असे दिसते. माहित असते तर राजीव ते राहूल कोणाला तरी व्हिसा दिला असता का अमेरिकेने?

पुढच्या १५ ऑगस्टला मुंजाबाची बोळ इथून जिवंत भाषण करणार आहेत ते
<<
तुम्ही मूजाबाच्या बोळातील भाषणास जा आम्ही जाऊ लाल किल्ल्यावर!

गुजरात हा आर्थिकदृष्ट्या आघाडीवर आहे. पण इतर आघाड्यांवर फारच पिछाडीवर आहे. पैसा उद्योग वैगरे ठीक आहे. पण भारतीय लष्करात गुजराती लोक भरती व्हायचे टाळतात.देशाच्या संरक्षणात गुजरातमधील लोकांचा कसलाही सहभाग नाही. गुजराती लोक सैन्यात भरती होत नाहीत. महाराष्ट्र तील पोलीस दलात मुस्लीम, पंजाबी,तामिळी दिसतात पण गुजराती मात्र कधीच दिसत नाहीत.

लष्करात अनेक प्रांतांच्या रेजिमेंट आहेत गुजरातची सोडून 1965 साली भारतीय सैन्याने गुजरात रेजिमेंट उभारायचा प्रयत्न केला होता, पण तो प्रयत्न फसला, कारण गुजरात मधून कोणी भरती व्हायलाच तयार झाले नाही.

वरती लेखकाने खेलोत्सव ह्या प्रकाराबद्दल सांगितले आहे .पण खरी गोष्ट हि आहे कि गुजरात हा खेळांच्या बाबतीत अत्यंत ढ आहे. ऑलिम्पिक तर दूरच राहिले आशियाई खेळातही गुजराती खेळाडूना सुवर्ण तर राहू द्या कास्य पदक हि मिळालेले नाही. कारण गुजरात मध्ये फक्त पैशाला महत्व आहे. पण साहस, क्रीडा, विज्ञान ह्यात गुजरात हा अत्यंत मागासलेला आहे.

गुजरात हे भारतातले असे राज्य आज आहे कि जे एखाद्या विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळवते. पण इतर विषयात नापास ठरते.त्यामुळे गुजरातच्या प्रगतीचा विचार करताना इतर बाबींचाही विचार करावा.

धडाकेबाज,

>> देशाच्या संरक्षणात गुजरातमधील लोकांचा कसलाही सहभाग नाही.
...
>> पण साहस, क्रीडा, विज्ञान ह्यात गुजरात हा अत्यंत मागासलेला आहे.

अगदी बरोबर निरीक्षण. ही गुज्जू लोकांची मनोवृत्ती आहे. यात मोदींचा दोष नाही.

आ.न.,
-गा.पै.

मोदी स्वताही गुज्जुच आहेत. गुजराती समाज हा पहिल्यापासूनच उद्यमशील समाज आहे . पण त्यांच्यात जे साहस, क्रीडा, विज्ञान हे गुण कमी आहेत त्याचा विकास करणे हे हि सरकारचे कर्तव्य ठरते. त्यात हे सरकार अपयशी ठरलेय.

धडाकेबाज,मुळात इथे प्रश्नच गुजराथी लोकांचा नसून नरेंद्र मोदी आणि त्यांनी केलेल्या गुजराथ राज्याच्या विकासाचा आहे.
एकच व्यक्ती चित्रकार,खेळाडू,लेखक,वकील असू शकते का ? नाही ना मग गुजराथी लोकांना मध्ये हि गुण दोष असणारच. उद्या उठून तुम्ही म्हणाल गुजराथी लोक गुठखा फार खातात हे हि सरकारचेच अपयश आहे असे म्हणाल.
माझे अनेक वेळा गुजराथ राज्यात जाणे होते. आनंद, बडोदा, अहमदाबाद, बोरसत अश्या अनेक शहरे आणि गावे मी फिरलो आहे. मी तिथे अनेक दिवस राहिलो आहे. ( खेडे गावात) तिथे लोड शेडींग होत नाही. लाईट जात नाही. गुजराथ मधील रस्ते (खेड्या पाड्यात हि) उत्तम आहेत. मी गुजराथ मधील जगलात बाईक टूर देखील केली आहे. जगलात देखील रोड उत्तम आहेत. (अतिशोक्ती नाही) मी नर्मदा धरण पहिले आहे. पाण्याचे योग्य नियोजन करून मोदी सरकारने गुजराथ हरे भरे केले आहे. गुजराथ मध्ये शेतकरी आत्महत्या करत नाहीत. तर शेतकरी हि लाखो रुपये कमवितो. अश्या एक ना अनेक मुद्दे मी आपणास सांगू शकतो. हि प्रगती पहा ना खोड्या काय काढत बसलात.

जयदीप२७८१ | 7 September, 2013 - 13:27नवीन
धडाकेबाज,मुळात इथे प्रश्नच गुजराथी लोकांचा नसून नरेंद्र मोदी आणि त्यांनी केलेल्या गुजराथ राज्याच्या विकासाचा आहे.
गुजराथ मध्ये शेतकरी आत्महत्या करत नाहीत. तर शेतकरी हि लाखो रुपये कमवितो. अश्या एक ना अनेक मुद्दे मी आपणास सांगू शकतो. हि प्रगती पहा ना खोड्या काय काढत बसलात.<<

+१
आर्थिक क्षेत्रात साहस गुजराती, मारवाडी दाखवतात तसे साह्स इतरांजवळ कमी आहे. पंजाब सैन्यात आघाडीवर आहे. डिफेन्स अकादमी महाराष्ट्रात आहे पण तेथे आपले प्रमाण कमीच आहे. शेतकयांची मुले म्हणवणारे सत्तेत असूनही शेतकरी आत्महत्त्या का करताहेत?
महाराष्ट्र एकेकाळी लढाऊ वृत्तीबद्दल प्रसिद्ध होता तेथे दहशतवादी हल्ले थांबायलाच तयार नाहीत पण केंद्राचे सहकार्य मिळत नसूनही गुजरात दहशत्वादी हल्ले व दंगली यापासून मुक्त ठेवला गेला आहे हे खरे तर केवढे मोठे यश आहे!
आम्हाला संपूर्ण भारतच दहशत्वादी हल्ले व दंगली यापासून मुक्त व्हायला हवा आहे. निरपराधांना ठार्/जखमी करणार्‍यां दहशतवाद्यांबाबत जे झिरो टॉलरन्सचे धोरण अंमलात आणण्याचा प्रयत्न गुजरातने केला त्यात काय चूक आहे?

गुजराथ मध्ये शेतकरी आत्महत्या करत नाहीत. तर शेतकरी हि लाखो रुपये कमवितो. अश्या एक ना अनेक मुद्दे मी आपणास सांगू शकतो. हि प्रगती पहा ना खोड्या काय काढत बसलात.<<>>>>>>>गुजरातमधील शीख शेतकऱ्यांची हि माहिती .

नरेंद्र मोदी सरकारकडून कच्छमधील शीख शेतक-यांचा छळ

कच्छमधील शीख शेतक-यांचे नेते सुरेंदर सिंग भुल्लर यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, १९७३ सालच्या ‘बॉम्बे टेनन्सी अँड अ‍ॅग्रीकल्चरल लँड्स अ‍ॅक्ट' जुनाट या कायद्याचा आधार घेऊन २०१० सालापासून नरेंद्र मोदी सरकार शीख शेतक-यांचा छळ करीत आहेत. सुमारे १ हजार शीख शेतक-यांचा जमीन मालकीवरील हक्क काढून घेण्यात आला आहे. "तुम्ही गुजराती नाही आहात, त्यामुळे तुम्हाला गुजरातमध्ये जमीन मालक होण्याचा अधिकारच नाही", असे मोदी सरकारने शीख शेतक-यांना सुनावले आहे. गुजरातच्या कच्छ भागात २० हजार एकर शीख शेतक-यांच्या मालकीची आहे. या जमिनीवर मोदी सरकार मधील माफियांचा डोळा आहे.

जंतर मंतरवर शीख समुदायाची निदर्शने

गुजरातमधील या सरकार समर्थित दहशतवादाच्या विरोधात सोमवार दि. ५ ऑगस्ट रोजी शीख समुदायाच्या वतीने राजधानी दिल्लीत जंतर मंतर येथे जोरदार निदर्शने केली. मोदी यांचा पुतळाही शिखांनी जाळला.

544792_420120228096934_1683303563_n.jpghttp://articles.timesofindia.indiatimes.com/2013-08-06/india/41130673_1_...

धडाकेबाज,

तुम्ही दिलेल्या दुव्यात म्हंटलंय की हा वाद न्यायालयाधीन आहे. अर्थात त्यावर आलयबाह्य तोडगा निघू शकतो. मोदी आणि बादल याविषयी एकमेकांच्या संपर्कात आहेत. मोदींनी शीख शेतकर्‍यांना भेटायचं कबूल केलं आहे. त्यांच्यावर अन्याय होणार नाही असंही आश्वासन दिलं आहे. तेव्हा मोदींना उगीच दोष देण्यात अर्थ नाही.

आ.न.,
-गा.पै.

Pages