मागच्या आठवड्यात महाराष्ट्रात दोन सार्वजनिक कार्येक्रम झाले ज्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पंतप्रधान मोदींबरोबर होते. या कार्येक्रमात " मोदी -मोदी" या घोषणा झाल्या. पंतप्रधान मोदी निवडणुकीच्या वातावरणातुन केव्हाच बाहेर आले आहेत परंतु भाजप कार्यकर्ते किंवा जनता अजुनही अश्याच दमदार भाषणांच्या मुड मधे असेल त्यामुळे या घोषणा दिल्या गेल्या असाव्यात.
हा प्रकार हरियाणात सुध्दा झाला जिथे मुख्यमंत्री हुडा यांच्याबरोबर स्टेजवर असताना " मोदी -मोदी " चा नारा झाला आणि मुख्यमंत्री हुडा संतापले आणि यापुढे पंतप्रधान मोदींबरोबर स्टेजवर जाणार नाही अशी घोषणा केली.
त्या घोषणेचा पाढा वाचत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मी पण नाही जाणार असा हट्ट करत आज महाराष्ट्रात नागपुरमध्ये प्रोटोकॉल असताना गैरहजर रहाणार आहेत.
मोदीजींनी आपल्या भाषणात हे सर्व प्रकल्प केंद्रातले सरकार आल्यामुळे दावा केलेला नाही. ना प्रांतीय राजकारण शोधुन स्थानिक विषयांवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण किंवा मुख्यमंत्री हुडा यांच्यावर टीका केली आहे.
अस असताना, दोन्ही मुख्यमंत्र्यांचा हा पवित्रा अनाकलनीय आहे. यातुन राजकीय प्रगल्भता दिसण्या ऐवजी अपरीपक्वता दिसते.
आज झारखंड मध्ये तिथले मुख्यमंत्री सुध्दा अश्याच कार्येक्रमात उपस्थित रहाणार आहेत पण त्यांनी एक पत्र लिहुन नाराजी व्यक्त केली आहे.
जेव्हा मोदीजी राज्य आणि केंद्र यांचे विकासाच्या कार्येक्रमात काही वेगळेच स्थान असेल. सहभागीता असेल असा नारा देत असताना सर्वच मुख्यमंत्री मात्र याभुमीकेपासुन लांब जात आहेत तेही एका शुल्लक कारणावरुन.
आधी या प्रकारचे कार्येक्रम कधी दिसले नाहीत. मनमोहनसिंग यांच्या बरोबर कोणत्याही भाजप/ अन्य पक्षाच्या मुख्यमंत्र्याला विकासाच्या स्थानिक कार्येक्रमात सहभागी होताना पाहिल्याचे स्मरत नाही. अश्या वेळी हा पायंडा विकासाच्या कार्येक्रमात राज- केंद्र यांच्या सहभाग असा दिसतो जो चांगला आहे.
अॅड्मिनचा इशारा लक्षात घेऊन राजकीय चर्चेत आपल्या भुमिका /विचार चर्चेसाठी आमंत्रीत करित आहे.
अहो नितीनचंद्र, साधी गोष्ट
अहो नितीनचंद्र, साधी गोष्ट आहे. मोदींची लोकप्रियता इतकी प्रचंड आहे की लोकांना बाकी कोणाचे बोलणे ऐकायचेच नसते.
मोदी आयत्या बिळावर नागोबा बनत
मोदी आयत्या बिळावर नागोबा बनत आहे म्हणून त्याचा बहिष्कार केला![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
अतिउत्तम निर्णय
मा. अॅडमिन. कुरापत
मा. अॅडमिन.
कुरापत काढण्यासाठी मुद्दाम काढलेला धागा, या कलमाखाली हा धागा बंद करण्यात यावा ही नम्र विनंती.
नितीनचंद्र या आयडीकडून या प्रकारचे अनेक धागे यापूर्वीही आलेले आहेत, याची नोंद घ्यावी.
धन्यवाद.
* फाइल परत करा! एका ज्येष्ठ
* फाइल परत करा!
एका ज्येष्ठ मंत्र्याच्या पुत्राने कुणा उद्योगपतीकडून कामाची फाइल घेतली. फाइल घेताच पुत्राला पंतप्रधानांकडून बोलावणे आले. पुत्र खुशीत बुके वगैरे घेऊन पोहोचले पण, पंतप्रधानांनी बुके स्वीकारण्याऐवजी 'आधी फाइल परत करा व भविष्यात असे उपद्व्याप करू नका', असे खडसावले.
* उद्योपतींना बोलवा!
एका मंत्र्याने बडे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याकडे भोजन घेतले. रात्री ११ वाजता पंतप्रधानांचा मंत्र्यांना फोन गेला, 'उद्योगपतींसोबत भोजन करण्याचा इतकाच शौक असेल तर त्यांना घरी किंवा कार्यालयात बोलवा', असे सांगितले गेले.
* जीन्स, टी शर्ट
एक मंत्री सायंकाळी एका पार्टीत जीन्स आणि टी शर्ट घालून पोहोचले. पंतप्रधानांनी त्यांना लगेच फोन केला. 'प्रत्येकाला खासगी आयुष्य असते याची कल्पना आहे पण, आपण आता मंत्री आहात. त्यामुळे असे परिधान योग्य नाही, यापुढे खबरदारी घ्या', अशी सूचना केली गेली.
* राजीनामा द्या!
एका गर्भश्रीमंत मंत्र्यांच्या कन्येचा अमेरिकेतील विद्यापीठात दीक्षांत सोहळा होता. मंत्र्यांनी पंतप्रधान कार्यालयात अमेरिकेला जाण्याची परवानगी मागितली. मात्र, 'आधी राजीनामा द्या आणि नंतर अमेरिकेला जा', अशी सूचना करण्यात आली.
डीआरडीओ मधे मोदींनी केलेलं
डीआरडीओ मधे मोदींनी केलेलं खरंच चांगलं होतं. लाल किल्ल्यावरून दिलेलं भाषण हे तितकंसं अपील झालं नव्हतं. आता निवडणुकांचा हंगाम मागे पडलेला आहे. त्या काळात मोदींनी केलेली टिंगलटवाळी, दिलेली आश्वासने आणि काहीच केलं नाही ही टीका हे मागं पडलेलं आहे. सुरेश भटेवरा या पत्रकाराने सांगितल्याप्रमाणे मोदींच्या प्रत्येक भाषणाला जी फळी पहिल्या रांगेत बसवली जाते त्याटलेच काही चेहरे मुख्यमंत्र्यांसोबतच्या शासकीय कार्यक्रमाला होते. त्यांच्या घोषणाबाजीमुळे कार्यक्रमाला राजकीय रंग लागला. हे खरं असेल तर बहीष्कारामागची भावना समजून घेता येऊ शकते. पण प्रोटोकॉल पाळला गेला पाहीजे. अर्थात हे सांगण्याचा मोदींना कितपत अधिकार आहे याबद्दल शंका आहे. कारण १५ ऑगस्टला लाल किल्ल्याहून केलेल्या भाषणाकडे देशाला उद्देशून केलेलं भाषण म्हणून पहायचं असतं असे संकेत, परंपरा पूर्वीपासून पाळल्या गेल्या आहेत. कुठल्याही राजकीय नेत्याने त्या भाषणाला आव्हान देण्याचा पायंडा आजवर पाडला नव्हता हे पण लक्षात ठेवायला पाहीजे.
मनमोहनसिंह हे काही वक्ते नव्हेत. पण १५ ऑगस्टच्या दिवशी केलेल्या भाषणामधे आजवर कुणीही एंटरटेनमेंट व्हॅल्यू शोधण्याचा प्रयत्न केलेला नाही. भाजपकडे मोदींसारखा वक्ता आल्यानंतर त्यांनी हा प्रचार सुरू केला. थोडक्यात लक्षात आणून देण्याचा कार्यक्रम अनेक माध्यमातून आणि मोहीमांमधून यशस्वीपणे राबवला गेला. हा प्रचार लोकांना पटला. नरसिंहराव सारख्या दाक्षिणात्य नेत्याला हिंदीमधून छान भाषण करणे जमणार नाही म्हणून क्षमता असेल तरी त्याने पीएम व्हायचं की नाही हा प्रश्न त्यामुळे उभा राहतो. पण असे प्रश्न कुणाला पड्त नाहीत. पडले तरी आवाज दाबून टाकता येतो किंवा मग सरळ हास्यास्पद ठरवता येतं. थोडक्यात व्यंकय्या नायडू हे कधीच पीएम होऊ शकणार नाहीत हे म्हणता येऊ शकेल. अर्थात भाजपच्या पॉलिसीज या बदलत्या असतात. कधी काळी पुण्यात रेसकोर्सवर अटलजींनी ३३% मते घेतलेला पक्ष देशाचा सत्ताधारी होतो यावर केलेल्या भाषणाचं कौतुक कालपरवापर्यंत होत होतं. आज ते विस्मरणात टाकणे भागच आहे.
मोदींच्या नेतृत्वाबद्दल चांगलं अन्यत्र ... या धाग्याचा तो विषय नाही.
जैसी करणी वैसी भरनी
जैसी करणी वैसी भरनी![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
नितीनचन्द्र, अहो पृथ्वीराज
नितीनचन्द्र, अहो पृथ्वीराज चव्हाण ते मोदी मोदी घोषणेमुळे एवढे चिडलेले नाहीयेत. मेट्रो प्रकल्प आधी पुणे येथे जाहीर केलेला असताना, त्याला परवानगी द्यायच्या ऐवजी नागपूर मध्ये मेट्रो प्रकल्प आधी सुरु करतायत, त्यामुळे मुख्यमन्त्री नाराज आहेत.
नागपूरमध्ये बहुतेक गडकरी लुशुन बसले असतील ना, आमी नै ज्या. आदी आदी माह्याकड ती मेट्रो चालू करा न बाप्पा म्हणले असतील. आणी गडकरी शेवटी रस्ते वाहतुक मन्त्री ( मेट्रो भुमीगत करायची असेल तर आधी त्याना मनवा ना )
आता या धाग्यात एवढे भडकायचे पेट्रोल आहे?:अओ:
पुण्याचा मेट्रो प्रकल्प रद्द
पुण्याचा मेट्रो प्रकल्प रद्द केला तरी चालेल. काय त्या खर्चाच्या रकमा. एव्हढं करून अद्याप नागरीक कुठून कुठे जातात याचा सर्व्हे नाही. कुणाला सोयीचा पडेल हे कसं ठवरलं हे माहीत नाही. चार एफएसआय वर डोळा आणि हजारो कोटी रुपयांची कंत्रांटं सर्वपक्षीय नेते लाटणार आहेत.
नागपूरच्या मेट्रोचा अभ्यास नाही म्हणून पास.
समजा उद्य भाजपाचं सरकार राज्यात आलं आणि त्यांनी आहे तोच प्रकल्प आहे तसा राबवला तर ? १६ मे पूर्वीची भाषणे आणि नंतर घेतलेले यू टर्न पाहता हे होण्याची शक्यता जास्त वाटते.
पृथ्वीराज चव्हाण हे
पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे आहेत का फक्त पुण्याचे, मग मेट्रो आधी नागपुरात सुरु झाली काय किंव्हा पुण्यात काय फरक पडतो.
त्यात सध्या काँग्रेज मध्ये नाराजी नाट्यच प्रमाण तसे फारच वाढलेय.
लोकांना मोदींचे भाषण ऐकायचे
लोकांना मोदींचे भाषण ऐकायचे असते. इतरांचे नाही. सध्या मोदी प्रचंड लोकप्रिय आहेत. तेंव्हा असे होणे, हे काही नवीन नाही. मागे एकदा राहुल गांधी विदर्भात आले होते, तेंव्हा सुद्धा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जास्त बोलु दिले नव्हते. त्याचा, त्यावेळी किंवा त्यानंतर, चव्हाणांनी इश्यु केला नाही. तसाच समजुतदारपणा यावेळीही भारतातल्या एका राज्याचे मुख्यमंत्री म्हणुन दाखवला असता तर ते त्यांच्या 'सुसंकृत मुख्यमंत्री' ह्या छबीस धरुनच असले असते.
रांचो, काय सांगता ? सरकारी
रांचो,
काय सांगता ?
सरकारी उदघाटनाच्या सभा आणि राजकीय सभा यातला फारसा फरक सामान्या लोकांना माहित नसतो. यात राजकिय पक्षाचे कार्यकर्ते सुध्दा आलेच.
राजकीय सभेत मुख्य वक्ता येई पर्यंत ( दुसर्या आणि तिसर्या फळीतल्या कार्यकर्त्यांना पाच / दहा हजार लोकांसमोर बोलायचे कसे याची कार्यशाळा चालु असते ) याला राजकीय भाषेत दळण दळणे असे ही म्हणतात. दरम्यान मुख्य वक्ता सभास्थानी यायला निघाला असुन इथपर्यंत पोहोचला/ तिथपर्यंत पोहोचला ही कॉमेंट्री सुरुच असते.
एकदा का मुख्य वक्ता सभास्थानी पोहोचला की श्रोत्यांचा संयम संपतो आणि दळण दळणार्याने जर ज्वारीवर भाजणी टाकली की सामान्यातला सामान्य माणुस टाळ्या वाजवुन वेळ संपल्याची सुचना देतात. ही सिरियसली न घेता जर दळण दळ्णार्याने आणखी काही दळायला घेतले की मग संयम संपतो आणि हुट आऊट होते.
मला एक सभा आठवते. बाळासाहेब ठाकरेंची सभा जी दगडूशेठ हलवाई गणेशौत्सव जो १०० वर्ष म्हणुन सारस बागेत झाला होती. या सभेला अध्यक्ष प्रा. शिवाजीराव भोसले होते. त्यांना समजले होते की लोक प्रमुख वक्त्याला ऐकायला आलेले आहेत. त्यांनी कितीही प्रभावी वक्ते असले तरी भाषण अवघ्या काही शब्दात आवरले.
इतका संयम भाषणबाजीत असेल तर ही अवस्था होत नाही.
ज्या अटलबिहारींची उत्तम वक्ता म्हणुन ख्याती होती त्यांची लाँग पॉज साठी पुढे हेटाळणीही झाली. केव्हा बोलायचे आणि कधी थांबायचे याचे तारतम्य असेल तर हुट औट कोण करणार नाही.
जास्त बोलायला नको. उगाच आयडी
जास्त बोलायला नको. उगाच आयडी उडायचा. आजच आलाय
इतकी वर्षे कॉंग्रेस होती
इतकी वर्षे कॉंग्रेस होती तेव्हा कुठे पुण्यात मेट्रो झाली ? मुख्य मंत्र्यांना काहीतरी कारण पाहिजे बास.
मला नाही वाटत हा धागा मुद्दाम कुरापत काढण्यासाठी काढलाय म्हणून . तो काढून टाकण्याची काही गरज नाहीये
पण चांगला सुज्ञ निर्णय काम
पण चांगला सुज्ञ निर्णय![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
काम करणारे दुसरे आणि त्यावरचे क्रेडीट खाणारे भलतेच होत आहेत
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंडमध्ये ग्रिड योजनेचं उद्घाटन करण्यासाठी दाखल झाले आहेत. जाहीर भाषणादरम्यान मोदींच्या सभेत जेव्हा सोरेन यांनी भाषण देण्यास सुरुवात केली तेव्हा गर्दीनं हुल्लडबाजी सुरू केली. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरु होती. पंतप्रधान मोदींच्या समोरच ही हुल्लडबाजी सुरू होती. त्यामुळे पंतप्रधानांना गर्दीसमोर शांततेचं आवाहन करावं लागलं.
------------------
हे मुद्दामुनच भाजपातर्फे चालु केलेले आहे.. यातुन दोन तीर मारण्याचा प्रयत्न .. एक तर जनता मुख्यमंत्र्यांच्या विरुध्द आहे दुसरा म्हणजे जनते मधे अजुन मोदी आहे.... जर जनतेला गोंधळच करायचा असता तर तो मोदी नसताना देखील इतर सभेत जिथे मुख्यमंत्री जातात तिथे देखील गोंधळ करु शकतात .. पण मात्र तिथे असा गोंधळ होतच नाही.. हीच गोष्ट आहे भाजपा मुद्दामुन खालच्या दर्जाचे राजकारण करत आहे .. प्रोटोकॉल हिशोबाने मुख्यमंत्र्यांना तिथे जावेच लागते .. गेले की टर उडवायची आणि नाही गेले तर प्रोटोकॉल पाळत नाही म्हणुन गावभर नमोरुग्णांना बोंबलत फिरवायचे
नितीनचंद्र, आपल्या "काय
नितीनचंद्र, आपल्या "काय सांगता?" ह्या प्रश्नाचे प्रयोजन केवळ अनुमोदन - हेतु इतकाच असावा.
आणखी काही असल्यास, जरा विस्कटुन सांगाल काय?
नागपुर में PM मोदी को काले
नागपुर में PM मोदी को काले झंडे दिखाने वाले हिरासत में
और भी... http://aajtak.intoday.in/story/breaking-news-1-59000.html
---------- याला माज म्हणतात ....
यांच्या रुग्णांनी इतर मुख्यमंत्र्यांची हुल्लडबाजी जाहीर रित्या करायची त्यांच्यावर काहीच कारवाई नाही पण नुसते काळे झेंडे दाखवले तर तुरुंगात रवाणगी...
नितीनचंद्र, आपल्या "काय
नितीनचंद्र, आपल्या "काय सांगता?" ह्या प्रश्नाचे प्रयोजन केवळ अनुमोदन - हेतु इतकाच असावा.
आणखी काही असल्यास, जरा विस्कटुन सांगाल काय? राहुल गांधींच्या कार्येक्रमात मुख्यमंत्री चव्हाण यांना बोलु दिले नाही ? काय सांगता ? इतकच. कारण हे घडल होत हे मला माहित नव्हत.
हे का घडत ( जनरली ) याची कारण मिमांसा खाली दिली आहे. बस ... अजुन काही नाही.
---------- याला माज म्हणतात
---------- याला माज म्हणतात ....
हरियाणा मध्ये काँग्रेस पक्षाचे राज्य आहे. पोलीसही त्याच राज्याचे असतात ( दिल्ली सारखे नाहीत ). महाराष्ट्रात ही महाराष्ट्राच्या पोलीसांनी कारवाई केली असेल. ह्या कारवाया करा ही सुचना ( प्रोअॅक्टीव्ह ) केंद्रीय ग्रुह खाते देत असेल तरी नेमके काय करायचे याचे स्वातंत्र्य राज्य सरकार यांना असते.
केंद्रातले पोलीस नेले नव्हते ना ? कारवाया करायला ? ते नेले असतील तर " माज " हा शब्द बरोबर आहे.
माजच आहे हा
माजच आहे हा
माज तर माज - काय फरक पडत
माज तर माज - काय फरक पडत नाही.
अॅडमिन साहेब, ईकडे उंदीर
अॅडमिन साहेब,
ईकडे उंदीर जास्त झालेत, सारखे नाचताहेत !
माजच आहे हा<< किती वाईट
माजच आहे हा<<
किती वाईट दिसतय वो ते
नागपुर में PM मोदी को काले
नागपुर में PM मोदी को काले झंडे दिखाने वाले हिरासत में
और भी... http://aajtak.intoday.in/story/breaking-news-1-59000.html
---------- याला माज म्हणतात ....
>>>>
पोलिस राज्य शासनाच्या अखत्यारित आहे. मग हा पोलिसांचा माज आहे असं म्हणायचं का? की राज्य-शासनाला माज आलाय असं म्हणायचं आहे उदयन?
पंतप्रधानने सुचना केली की
पंतप्रधानने सुचना केली की राज्य सरकारला एेकावेच लागते
पंतप्रधानने सुचना केली की
पंतप्रधानने सुचना केली की राज्य सरकारला एेकावेच लागते
>>इतक्या शुल्लक बाबीत पंतप्रधान लक्ष देत असतील असे वाटत नाही.
राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री
राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री येत नाहीत का? ऐकावंच लागत असेल तर मग मुख्यमंत्री कुठे गेले?
अहंकारी व्यक्ती शुल्लकच गोष्ट
अहंकारी व्यक्ती शुल्लकच गोष्ट पकडतो![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
जीन्स घातली की बोलने सुरू बाकी पर्यावरणची काशी केली त्यावर शब्द नाही बोलले, कोणी जेवायला गेले की बोलणे
असच असते
अजुन बरिच वर्ष जायची आहेत
अजुन बरिच वर्ष जायची आहेत (पुन्हा सत्ता मिळेपर्यंत) तोपर्यंत ह्या काँगी रुग्णांच काय होणार हे रागा-सोगा च जाणे.
बाळासाहेबांच्या सभेत कधी
बाळासाहेबांच्या सभेत कधी गोंधळ झाला की ते फक्त हात वर करत आणि सभा शांत होई. मोदिंचा तेव्हढा 'होल्ड' नाही आपल्या 'कार्यकर्त्यांवर' हेच या घटनांमुळे सिद्ध झाले.
Pages