गेल्या वर्षी ‘हमीद अन्सारी’ नाव असलेल्या एका व्यक्तीला भक्तांनी मनसोक्त शिव्या घातल्या होत्या.
त्यावेळी आमच्यासारख्या काही मुर्खांनी भक्तांना समजावण्यासाठी प्रोटोकॉल वगैरेची माहिती देण्याचा प्रयत्न केला होता.
"तिरंग्यापुढे कसला आलाय प्रोटोकॉल?", "इच्छा असती, तर एका सेकंदात प्रोटोकॉल तोडला असता", ’पाकिस्तान... देशद्रोही...’ तेव्हा अशी नेहमीची काहीबाही उत्तरे मिळाली होती.
कधीतरीच मी फेसबूकवर जातो आणि नेमके चक्रावणारे प्रकार बघतो.
आजही फेसबूकवर गेलो, गणपतीबाप्पांचे फोटो अपलोड करायला आणि ईतरांनी अपलोड केलेले बघायला.
आमच्या बाप्पांचा फोटो अपलोड केला आणि तासाभराने फिरून आलो तर १५ भाविकांनी त्याला लाईक ठोकले होते.
कोणी कोणी लाईक केले ते बघूया म्हटले तर धक्काच बसला. सर्व लाईक एकाचेच !! हे कसे शक्य आहे?? निरखून पाहिले तर नाही, सारेच वेगवेगळे होते. पण सर्वांनीच आपला फोटो तिरंग्यामध्ये रंगवून घेतला असल्याने ते एकसारखेच वाटत होते.
असे, खालीलप्रमाणे (आंतरजालावरून साभार)