आता हे "डिजिटल ईंडिया" काय आहे भाऊ ?

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 September, 2015 - 15:23

कधीतरीच मी फेसबूकवर जातो आणि नेमके चक्रावणारे प्रकार बघतो.

आजही फेसबूकवर गेलो, गणपतीबाप्पांचे फोटो अपलोड करायला आणि ईतरांनी अपलोड केलेले बघायला.
आमच्या बाप्पांचा फोटो अपलोड केला आणि तासाभराने फिरून आलो तर १५ भाविकांनी त्याला लाईक ठोकले होते.
कोणी कोणी लाईक केले ते बघूया म्हटले तर धक्काच बसला. सर्व लाईक एकाचेच !! हे कसे शक्य आहे?? निरखून पाहिले तर नाही, सारेच वेगवेगळे होते. पण सर्वांनीच आपला फोटो तिरंग्यामध्ये रंगवून घेतला असल्याने ते एकसारखेच वाटत होते.

असे, खालीलप्रमाणे (आंतरजालावरून साभार)

digital india.jpg

चौकशी करता समजले की स्वच्छ भारत अभियानाच्या यशानंतर मोदींनी आता देशाला डिजिटल ईंडिया बनवायचे मनावर घेतले आहे.

मुद्दाम खोड काढायला म्हणून ओळखीतील एका मोदीविरोधकाला पिन मारली, तर त्याने असे उत्तर दिले.

"" डिजीटल इंडीयाचे जनक राजीव गांधी जर आज हयात असते तर त्यावेळी त्यांना बैलगाडीतुन मोर्चा काढुन विरोध करणार्‍यांचे आज सत्तेत आल्यावर झालेले मतपरीवर्तन बघून चक्रावले असते. ""

असो, तो झाला एक भूतकाळ.

मग मी फेसबूक प्रोफाईल पिक रंगवणार्‍यांकडे आपला मोर्चा वळवला, की बाबांनो हा डिजिटल ईंडिया काय प्रकार आहे ? हे कसे शक्य होणार आहे? यासाठी जे बेसिक ईन्फ्रास्ट्रक्चर लागेल ते कोण कसे पुरवणार आहे? यात सरकारची नेमकी भुमिका काय? वगैरे वगैरे.. ना मला नेमके काय प्रश्न विचारायचे ते माहीत होते, ना कोण्या रंगीत प्रोफाईल पिक वाल्याला त्यांची नेमकी उत्तरे ठाऊक होती.

तर लोकहो ईथे कोणाला काही कल्पना? खरेच डिजिटल ईंडिया होणार आहे की हा देखील नुसता एक फेसबूकछाप स्टंट आहे?
आणि सर्वात महत्वाचा प्रश्न - तुम्ही रंगवले का आपले फेसबूक प्रोफाईल चित्र Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेष, जरा धीर धर. तात्पुरता रुमाल......

बाकी, तुम लढो हम कपडा संभालता हूँ! असा एक पाॅपकाॅर्न छाप धागा.

अरे नाही आधीच पॉपकॉर्न छाप वगैरे डिक्लेअर करू नका. दोन्ही बाजूंनी योग्य अयोग्य अन सविस्तर माहिती मिळायची मायबोली हीच एकमेव् जागा माझ्या पाहण्यात आहे. फक्त काही पोस्ट इग्नोर मारायचे धैर्य आणि संयम दाखवायचे ईतकेच. असो, उद्या तुमचा रुमाल उठलेला बघेन, शुभरात्री.

की बाबांनो हा डिजिटल ईंडिया काय प्रकार आहे ?>>>

माझ्या कल्पने प्रमाने डिजिटल इंडिया म्हणजे........खेड्या-पाड्याने जिल्हा-तालुका,गाव-शहर अशा ठिकाणी मोठ्ठेमोठ्ठे - डिजिटल बोर्ड लावायचे ज्यावर एक मोठ्ठा मोदींचा फोटो व खाली मोठ्ठ्या अक्षरात 'डिजिटल इंडिया ' असे शब्द.
आता जिथे-जिथे बिजली आहे तिथे-तिथे बोर्ड जगमगनार जि थे बिजली नाही तिथे लोकांनी वर्गनी गोळा करायची व जनरेटर बसवायचा आणि 'डिजिटल इंडिया' ला जगमगावायचे. मग बघा भारत कसा 'डिजीटल इंडिया'मय दिसनार.

ही माझी कल्पना.

डिजिटल इंडियाला सपोर्ट म्हणून अनेकांनी फेसबुकवर आपले प्रोफाईल पिक्चर तिरंग्यात रंगवून घेतले. त्यावर आपल्या सजग मिडियाने लगेच आपल्या लौकिकाला जागून त्याविषयी बातमी दिली. खालील बातमी पहा आणि त्याखालील आयटी क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींच्या प्रतिक्रिया वाचा म्हणजे आपल्या मिडियाचा उताविळपणा लगेच लक्षात येईल. आता वोट्स अ‍ॅपवर यावरून ऑलरेडी तुंबळ युध्द चालू झालेले आहेच. मायबोलीवरील आयटी क्षेत्रातील तज्ञ यावर नक्कीच प्रकाश पाडू शकतील.

http://zeenews.india.com/marathi/news/international/your-tricolor-profil...

"डिजिटल ईंडिया" काय आहे भाऊ ?

भारतात गेल्या ६५ वर्षांत झालेल्या विकासाच्या कामाला गालबोट लावणे म्हणजे "डिजिटल ईंडिया"

मोदी तिथे अमेरिकेत असतानाच ईथे लोक विचारत आहेत की "डिजिटल ईंडिया" करणार पण त्यासाठी
खेडोपाड्यात वीज कुठे आहे ? हे म्हणजे जरा अतीच होत आहे ! "डिजिटल ईंडिया" पण करायच त्या साठी लागणारी विज सुद्ध निर्माण करायची ? काय काय आणी किती किती करणार् ते एकटे मोदी ?
ह्याच उत्तर गेली ६५ वर्षे विकास करणार्या पार्टीने द्यावे.

डिजिटल इंडिया और नेट न्यूट्रलिटी की तो किस प्रकार ज़ुकरबुर्ग हमारे भावनाओं का इस्तेमाल अपने internet.org को सफल (या नेट न्यूट्रलिटी को विफल) करने के लिए कर रहे हैं वो उनकी चालाकी से ज़्यादा हमारी बेवकूफी को दर्शाता है। जैसे हर चमकती चीज़ सोना नहीं होती वैसे ही ज़रूरी नहीं की राष्ट्रध्वज से रंग से मिलती हुई हर चीज़ राष्ट्रहित में हो। चाहे कोई हर चीज़ मुफ़्त में बाँट रहा हो या हर चीज़ महंगी कर रहा हो (क्योंकि 4-5 हज़ार की चीज़ तो हम बिना सोचे खरीद लेते हैं ) , आँखें बंद करके दोनों पे भरोसा करना सरासर गलत है। लोकतंत्र है, समर्थक और विरोधी बनिए, फैन या हेटर नहीं।

तिरंग्यातील फेसबूक प्रोफाइल मागील घाणेरडं सत्य
>>>>
शॉकिंग आहे. हे खरे आहे का? असू शकते का? ही फसवणूक नाही का झाली?

कृपया नरेश माने यांनी दिलेली लि़ंक उघडा. आणि त्यावर खाली ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत प्रोग्रामर लोकांनी दिलेल्या त्या नीट वाचा. आणि मगच कळफलक बडवा.

http://zeenews.india.com/marathi/news/international/your-tricolor-profil...

ऋन्मेऽऽष | 29 September, 2015 - 03:44 नवीन
तिरंग्यातील फेसबूक प्रोफाइल मागील घाणेरडं सत्य
>>>>
शॉकिंग आहे. हे खरे आहे का? असू शकते का? ही फसवणूक नाही का झाली?

हे एवढच लिहायला ईतका द्रविडी प्राणायाम कश्याला केला ? सरळ विचारायच होत , ते ताकाला जाउन भांड
लपवण्याच काम नाही !

तुला ही फसवणुक वाटत असेल तर सिद्ध कर स्वतः !!

ऋन्मेष, मी दिलेली लिंक उघडून त्याखालील आयटी तज्ञांच्या प्रतिक्रिया वाच. म्हणजे लोकांची दिशाभुल कशी करतात मिडियावाले आणि काही स्वयंघोषित भारतीय समाजाच्या सेवेचे व्रत घेतलेले ढोंगी सेवेकरी ते सुध्दा समजेल तुला. हा प्रकार म्हणजे साप!साप! ओरडून दोरखंडाला मारण्याचा प्रकार आहे.

हो हो.. त्याखालचे प्रतिसाद वाचले आता. बरे झाले ती न्यूज घाईघाईत कोणाला शेअर नाही केली.. साला न्यूज पण आता विश्वासार्ह सोर्स उरला नाहीये..

सर्च कर रे जरा … दर वेळी आपलं मत काय विचारतो!
सर्व्हे कंपनीत आहेस का? Light 1

हे घे काही लिंकस … वाचो, समझो!

https://en.wikipedia.org/wiki/Digital_India
http://www.digitalindia.gov.in/

माने,

ती लिंक वाचली! काय पण लोक्स असतात … div tag वरून कशाला सपोर्ट जाणारे होय! माझ ज्ञान वाढल!

आपण त ब्वा डिजिटल इंडिया ला पण सपोर्ट दिला आणि Internet.org ला पण! देतय न फेसबुक फुकट इंटरनेट, वापर लो Wink फुकट ते पौष्टिक Proud

पण दोन्ही वेळेला फेसबुकनी सेपरेट विचारलं बर! आणि ते Internet.org तर पार जुलैपासून सुरु आहे Happy

निरनिराळ्या सोयी सवलती देण्यासाठीच सरकार असतं ना? मग एकेका नेत्याच्या नावाने चांगभलं कशाला करतेत?
निराधार योजना असो अल्पबचत ठेवी असोत सबसिडी असोत सर्वांचीच नावे काढा.संस्थानं खालसा केली तसं..

काँग्रेसच्या काळात यांत्रिकीकरण , संगणकीकरण याला विरोध केलेल्या भाजपी सरड्याने हा बदललेला नवा रंग आहे.

वाचतोय लिंका.. इथे डकवल्याबद्दल धन्यवाद.. तसे डिजिटल ईंडिया म्हणजे काय असे शीर्षक असले तरी त्याबद्दल जुजबी माहिती होतेच, फक्त हा फेसबूक स्टंट काय आहे ते त्याच्याशी कसे रिलेट होते हा प्रश्न होता, कारण त्याबद्दल बरेच उलटसुलट ऐकू येत होते.

डिजिटल इंडियाचा एक ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर म्हणून अंकित फादिया यांची निवड झाली आहे. गजेंद्र चौहान यांच्याबद्दल मतभेद असतील पण त्यांनी चित्रपट सृष्टीत प्रामानिकपणे काम केले आहे हे त्यांचे विरोधकही मान्य करतील. अंकित फादिया म्हणजे निसत्याच लंब्या चौड्या बाता आणी इथून तिथून कॉपी केलेले प्रोग्रॅम. त्यांचे पुरते वस्त्रहरणही झालेले आहे.

विकू,

कृपया माफ करा !

पेपर मधल्या चुकीच्या बातमीने माझी धारणा झाली होती की सरकारने ह्या अंकितला नेमले ल नाही तर हा
स्वतःच नाचतोय !

परत एकदा क्षमस्व !

>किती मस्त पैकी ठोकुन देता तुम्ही !! छान चालल आहे !! किप ईट अप !

खाली दिलेली सरकारी साईट आहे.

http://pib.nic.in/newsite/PrintRelease.aspx?relid=128306

मी घेतलेला स्क्रीन शॉट.

Recently, in the last few days reports have indicated that a Digital India Brand Ambassador has been appointed.

As part of the Digital India week (July 1-7, 2015) following four Brand Ambassadors were nominated for a period of one year to propagate the product and applications being launched by the department under Digital India Programme:

1. Shri Satwat Jagwani, All India IIT-JEE —Advanced Topper -2015 (Student)

2. Ms. Krati Tiwari, All India IIT-JEE —Advanced Girl Topper -2015 (Student)

3. Mr Ankit Fadia, Author & Ethical Hacker

4. Shri Pranav Mistry, Samsung USA (Computer Scientist/ Author of 6th Sense)

Thereafter, no other person has been appointed as Brand Ambassador for Digital India.

The services of these Brand Ambassadors will be used, as and when required for generating mass awareness for the programme.

NNK/MD

गजाभाउ, चालायचच ! माझं ही होतं असं कधी कधी. म्हणून सरकारी बातमी बघिटली आणी लिहिलं.

अंकित फदियाला २०११ मध्ये नॅशनल टेलिकाॅम ॲवाॅर्ड मिळालंय, भारत सरकार कडुन. तेंव्हाहि तो फद्या होता कि नाहि याची कल्पना नाहि... Happy

समानशीले व्यसनेषु सख्यम

काँग्रेसचेच लोक आपल्या पक्षात घेऊन सत्ता हॅक करणार्‍या भाजपाला फदियासारखा हॅकरच आवडणार.

Proud

"अंकित फादियाला नॅशनल टेलिकॉम अवॉर्ड मिळालाय" तो भारत सरकारकडून का? केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते मिळालाय. पण तो भारत सरकारचा अवॉर्ड आहे का?

बाकी त्याने लिहिलेल्या या पुस्तकाला मागणी वाढणार. Wink

अंकित फादिया म्हणजे निसत्याच लंब्या चौड्या बाता आणी इथून तिथून कॉपी केलेले प्रोग्रॅम. त्यांचे पुरते वस्त्रहरणही झालेले आहे.

>>

हे बाकी खरे! त्याचे पुस्तकं एवढी काही जोरदार वाटली नव्हती Wink आणि ही टोपर मंडळी काय ब्रांड प्रायोजित करतील कोण जाणे! एखादा सेलिब्रिटी निवडला असता तर जोऱ्यात पसरले असते. आणि नुसताच अवेअरनेस येऊन काय फायदा जबतक गाव गाव इंटरनेटवा पहुचता नै Wink

स्वजो ला घेऊन टाकाव पुढल्या वर्षी!

डिजिट्ट्ट्ट्ट्ल इन्डीया हे मागच्य सरकारच्या योजना नव्यान वेस्टनात गुन्डाळून आमचा माल आहे अशी डिश देणे .

Pages