आता हे "डिजिटल ईंडिया" काय आहे भाऊ ?

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 September, 2015 - 15:23

कधीतरीच मी फेसबूकवर जातो आणि नेमके चक्रावणारे प्रकार बघतो.

आजही फेसबूकवर गेलो, गणपतीबाप्पांचे फोटो अपलोड करायला आणि ईतरांनी अपलोड केलेले बघायला.
आमच्या बाप्पांचा फोटो अपलोड केला आणि तासाभराने फिरून आलो तर १५ भाविकांनी त्याला लाईक ठोकले होते.
कोणी कोणी लाईक केले ते बघूया म्हटले तर धक्काच बसला. सर्व लाईक एकाचेच !! हे कसे शक्य आहे?? निरखून पाहिले तर नाही, सारेच वेगवेगळे होते. पण सर्वांनीच आपला फोटो तिरंग्यामध्ये रंगवून घेतला असल्याने ते एकसारखेच वाटत होते.

असे, खालीलप्रमाणे (आंतरजालावरून साभार)

digital india.jpg

चौकशी करता समजले की स्वच्छ भारत अभियानाच्या यशानंतर मोदींनी आता देशाला डिजिटल ईंडिया बनवायचे मनावर घेतले आहे.

मुद्दाम खोड काढायला म्हणून ओळखीतील एका मोदीविरोधकाला पिन मारली, तर त्याने असे उत्तर दिले.

"" डिजीटल इंडीयाचे जनक राजीव गांधी जर आज हयात असते तर त्यावेळी त्यांना बैलगाडीतुन मोर्चा काढुन विरोध करणार्‍यांचे आज सत्तेत आल्यावर झालेले मतपरीवर्तन बघून चक्रावले असते. ""

असो, तो झाला एक भूतकाळ.

मग मी फेसबूक प्रोफाईल पिक रंगवणार्‍यांकडे आपला मोर्चा वळवला, की बाबांनो हा डिजिटल ईंडिया काय प्रकार आहे ? हे कसे शक्य होणार आहे? यासाठी जे बेसिक ईन्फ्रास्ट्रक्चर लागेल ते कोण कसे पुरवणार आहे? यात सरकारची नेमकी भुमिका काय? वगैरे वगैरे.. ना मला नेमके काय प्रश्न विचारायचे ते माहीत होते, ना कोण्या रंगीत प्रोफाईल पिक वाल्याला त्यांची नेमकी उत्तरे ठाऊक होती.

तर लोकहो ईथे कोणाला काही कल्पना? खरेच डिजिटल ईंडिया होणार आहे की हा देखील नुसता एक फेसबूकछाप स्टंट आहे?
आणि सर्वात महत्वाचा प्रश्न - तुम्ही रंगवले का आपले फेसबूक प्रोफाईल चित्र Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा असली नकली मेसेज काल व्हॉटसपवर फिरताना पाहिला. जाणकारांच्या मते आधीच्या सरकारच्या योजना फक्त कागदावर असायच्या, आताचे सरकार अंमलात आणतेय. आणि त्या केसमध्ये मग त्यांनी त्याच नावाने चालवून आधीच्या सरकारला फुकटचे श्रेय का बरे द्यावे? नामांतर साहजिकच आहे.

हा असली नकली मेसेज काल व्हॉटसपवर फिरताना पाहिला. जाणकारांच्या मते आधीच्या सरकारच्या योजना फक्त कागदावर असायच्या, आताचे सरकार अंमलात आणतेय. आणि त्या केसमध्ये मग त्यांनी त्याच नावाने चालवून आधीच्या सरकारला फुकटचे श्रेय का बरे द्यावे? नामांतर साहजिकच आहे.

जाणकार म्हणजे कशाचे ?
कागदावरच मंगळयान उडालं. आताचं सरकार आलं म्हणूनच ते पोहोचलं. अग्नी ५ कागदावरच बनलं आणि ब्रह्मोस सुद्धा. कागदावरच ब्रह्मोसला परदेशाकडून ओर्डर्स आल्या .

Pages