केजरीवाल २०११ मध्ये अण्णांचे सहकारी म्हणुन जनतेच्या समोर आले. प्रसिध्दीचे वलय चालुन आल्यावर भल्याभल्यांना त्यातुन बाहेर न पडण्याचा मोह होतो त्यातलाच एक प्रकार असावा.
केजरीवाल त्या वेळे पर्यंत तरी मै अन्ना हु म्हणुन वागत होते.
बराच काळ खल झाल्यानंतर त्यांनी जन आंदोलनाचा एक पक्ष असावा असा मत प्रवाह निर्माण केला तेव्हा टोपीवरची अक्षरे जाऊन टोपी फक्त राहीली.
निवडणुकीचे निकाल आल्या आल्या केजरीवाल व त्यांच्या टिम ने केंद्र सरकारला भेटून दिल्लीला पुर्ण राज्य देण्यासंबंधी मागणी केली.
आता पर्यंत दिल्ली ही केंद्रशासित प्रदेश म्हणुन माहीती होती. मध्ये मध्ये दिल्लीला राज्य व्हावी अशी मागणी होत होती. पण त्याला पुर्णत: मान्यता मिळालेली नव्हती. गेले बरीच वर्षे दिल्लीत आणी केंद्रात काँग्रेसचे सरकार असुनही हा महत्वाचा निर्णय त्यावेळच्या संपुर्णपणे जनसेवेला वाहीलेल्या, सतर्क अश्या सरकार ने कधीही घेतला नाही. याचा अर्थ हा प्रश्न जनतेच्या प्रगतीशी पर्यायाने देश्याच्या भविष्याशी जोडलेला नसावा !!
केजरीवाल , जिंकण्यासाठी लढताय कि..[२]
छोटा सुमो आता अण्णा-सुमो नसून केजरीवाल-सुमो आहे.
अण्णा आणि केजरीवाल , तुमच्या प्रत्येकासमोर आता असे १०० अगडबंब सुमो कुस्तीसाठी उभे आहेत. आणि ते तुमच्याकडे या चित्रातील सूमोप्रमाणेच 'बच्चा है' अशा आविर्भावात पाहाताहेत हे नक्की.
केजरीवाल, तुम्ही राजकारणात उतरण्याचे ठरविल्यापासून तुमच्याकडे तर ते अधिक निर्विकारपणे पाहाताहेत, कारण तुम्ही त्यांना हव्या असलेल्या जागी कुस्तीसाठी आपणहून गेलेले आहात.