✪ समाजातल्या अवघड प्रश्नांना सोडवण्याचा ध्यास
✪ पंखास या बळ दे नवे, झेपावया आकाश दे
✪ कर्तृत्वाचा व दातृत्वाचा "सेतू"
✪ अनाथ असण्यापासून सनाथ होण्याचा प्रवास- गायत्री पाठक
✪ गुंतागुंतीच्या प्रश्नांवर मिळूनी करू मात
✪ "तुम्ही जे कराल, तेच तुमच्याकडे फिरून येईल"
✪ अनाथ मुलींना मिळणार हक्काचं माहेर
✪ कौन कहता है कि आसमां में छेद नहीं हो सकता
पेंटरचा व्यवसाय असलेल्या एका कामगाराचे मदतीचे आवाहन त्यांच्याच शब्दात.


पेंटर सारखे काम असल्याने नियोजन करता येत नाही. हातावर पोट आहे. इन्श्युरन्स नाही.
तरीही त्यांनी लाखभर रूपये बचतीतून जमा केले. पण त्यांना लागणारी रक्कम प्रचंड आहे. ती मदतीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मिलाप या फंडरेजरद्वारे मदतीसाठी आवाहन केले आहे.
मी आजवर वाचलेल्या सर्वोत्तम कवितांपैकी एका कवितेबद्दल हा धागा आहे. "आर्ट इज नॉट आर्ट अनटिल इट डिस्टर्ब्स यु" हे वाक्य या पुढील कवितेबद्दल तंतोतंत खरे आहे. ल्युसिल क्लिफ्टन या कवयित्रीची पराकोटीची दाहक, इन्टेन्स कविता आहे ही अतिशय वेगळ्या विषयावरील ही कविता वाचकाच्या हृदयात भीती, घृणा, वात्सल्य आणि करुणा यांचा कल्लोळ माजवते, या सर्व भावना एकाच वेळी उद्दीपीत करते.
या विषयावर मी वाचलेली ही पहीलीच कविता. माझा ल्युसिल क्लिफ्टन या कवयित्रीला , तिच्यातील प्रतिभेला तसेच स्वतःची कहाणी जगापुढे मांडण्याकरता लागणार्या धैर्याला कडक सॅल्यूट.
.
नमस्कार मायबोलीकर, मी बरीच वर्ष रोमात आहे मायबोलीवर आणी आज ब-याच वर्षानी इथे लिहितो आहे. एका गोष्टीविषयी तुमचा सल्ला / विचार हवा आहे.
एक जवळची नात्यातील चुलत बहीण आहे जिच्याविषयी सल्ला हवा आहे. ही बहीण सध्या नाशिक जवळ एका तालुक्याच्या ठिकाणी तिच्या नव-याबरोबर राहते पण तिच लग्न register नाहि. नव-याकडुन सतत बोलणी आणी त्रास आहे. माझे काका/काकु आता हयात नाहीत आणी तिला सख्खा भाउ/बहीण कीन्वा मावशी कोणी नाहिये.. बहीणीच वय ५४ आहे ..
प्रिय चहास,
सकाळी जाग येते ती स्वयंपाकघरातून येणाऱ्या तुझ्याच सुंदर वासाने, त्यातच कधी आल्याचा तर कधी वेलचीचा मिसळलेला तुझा सुगंध ! माझ्या आवडत्या कपातून तुला मस्त वाफाळता असताना घेतलेले घुटके! अहाहा!! धरती पर गर कही स्वर्ग है तो बस चाय से है!
तशी तुझी अनेक रूपे आहेत. रस्त्यावरच्या टपऱ्यातून काचेच्या ग्लासातून ,कधी अमृततुल्य नावाने मिळणारा, तर कधी स्टार बक्स सारखया ठिकाणी मिळणारा चाय लाटे ! रूपे अनंत ! पण अनंत कोटी ब्रह्मांड नायक चहा - तुझ्या शिवाय बुवा माझा दिवस काही सुरु होत नाही!
नमस्कार, मर्मबंधातील एखादे नाते हा विषय वाचला आणि माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला तो म्हणजे विनू ;माझा पहिल्या कंपनीतला मित्र.
आमची ओळख कशी झाली हा एक किस्साच आहे. कंपनीत अंतर्गत मेल एप्लिकेशन होतं. तिथे सेटिंग्स मध्ये आम्ही आमचा एक मेसेज लिहायचो. समजा अ व्यक्तीने ब व्यक्तीला मेल केला तर त्याला ब व्यक्तीने सेट केलेला मेसेज दिसायचा.
एकदा मी एक स्टेटस रिपोर्ट पाठवला होता. रेसिपियंटसमध्ये विनू होता. त्यावेळी मला त्याचा “only crying babies get milk” असा काहीसा मेसेज वाचायला मिळाला.
भीड ही भिकेची बहिण आहे. तरीसुध्दा आर्थिक व्यवहारात सुध्दा आपण काहीवेळा भिडस्त राहून फसवणूक करून घेतो.
त्यातून शिकून पुढच्यावेळी जास्त दक्ष रहातो. अशा दक्षपणाचे, पक्केपणाचे किस्से येऊद्यात.
भारतातील सर्व दिव्यांग अनाथ अनुसूचित जाती जमाती व आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी मोफत निवासी प्रशिक्षण आणि उच्च शिक्षणाच्या माध्यमातून उत्तम आयुष्य घडवण्यासाठी ही एक सुवर्णसंधी.
दीपस्तंभ फाउंडेशन ही सेवाभावी संस्था 2009 पासून जळगाव व पुणे येथे कार्यरत आहे ही संस्था विशेषतः दिव्यांग , अनाथ आई-वडील दोघे नाहीत) आणि वंचित युवकांच्या दर्जेदार शिक्षणासाठी लोकसहभागातून खालील मोफत प्रशिक्षण आणि शिक्षण उपलब्ध करते