चांदमारा (अ वेअरवुल्फ)

Submitted by सामो on 17 June, 2023 - 07:09

मी आजवर वाचलेल्या सर्वोत्तम कवितांपैकी एका कवितेबद्दल हा धागा आहे. "आर्ट इज नॉट आर्ट अनटिल इट डिस्टर्ब्स यु" हे वाक्य या पुढील कवितेबद्दल तंतोतंत खरे आहे. ल्युसिल क्लिफ्टन या कवयित्रीची पराकोटीची दाहक, इन्टेन्स कविता आहे ही अतिशय वेगळ्या विषयावरील ही कविता वाचकाच्या हृदयात भीती, घृणा, वात्सल्य आणि करुणा यांचा कल्लोळ माजवते, या सर्व भावना एकाच वेळी उद्दीपीत करते.
या विषयावर मी वाचलेली ही पहीलीच कविता. माझा ल्युसिल क्लिफ्टन या कवयित्रीला , तिच्यातील प्रतिभेला तसेच स्वतःची कहाणी जगापुढे मांडण्याकरता लागणार्‍या धैर्याला कडक सॅल्यूट.
.

शेपशिफ्टर्स पोएम

.
https://t3.ftcdn.net/jpg/03/85/94/34/360_F_385943408_Qfx4q47rBfG0na38PatmPquOZssTzFzF.jpg
.

पहील्या कडव्यांतच आपल्याला चाहूल लागते की बायका-बायकांमध्येच रहाणार्‍या, बोलल्या जाणार्‍या कोणत्या तरी दंतकथेबद्दल ही कविता असावी. कवयित्री सांगते - रात्री चंद्र डोक्यावर आला, की काही पुरुषांना काही बाधा होते - 'चांदमारा' म्हणा ना. असे हे वखवखलेले, हिंस्त्र, ओंगळ चांदमारा घराघरांत फिरु लागतात, आणि लहानग्या मुलींना अनाकलनिय आणि भितीदायक वाटू लागतात. त्या मुलींना या चांदमार्‍यापासून वाचविणारे असे मग कोण? कोणाकडे तिने आश्रय मागायचा? खिडकी? जी हे सारे पाहून तटस्थ रहाते? ( ही उपमा आई-आज्जी करता असेल का? असा विचार येउन धस्स धस्स होते!) की आधार मागावा त्या सैतानी चंद्राकडे ज्याच्या प्रभावाखालीच तर हे अभद्र रोज चालू होते. एक हतबलता आहे या कड्व्यात दाखविलेली. ज्या व्यक्तीकडे आधार मागावा ती व्यक्तीच सैतानी तरी आहे नाहीतर तटस्थ. या कडव्यात कवयित्रीने केलेली घूबडाचा घूत्कार, चंद्राचा गूढ आणि भयावह प्रकाश अशी वातावरणनिर्मिती येते. रोज रात्र झाली की या लहानग्या अगदी शहाण्यासारख्या वागू लागतात. अजिबात दंगामस्ती नाही निपचित पडून रहातात, अगदी आपल्या कोशात, आवाज होउ न देता. का? त्यांना वाटते आपण शहाण्यासारखे वागलो तर आज तरी चांदमारा त्यांना एकटं सोडेल. त्याचे केसाळ हात , आपल्या अंगावरुन फिरणार नाहीत. त्या रोज रोज विचार करतात आज मी कुठे चुकले मी. आज तर मी शहाण्यासारखा वागण्याचा प्रयत्न केला, आणि तरी आज ही शिक्षा का?
शेवटच्या कडव्यात, कवयित्री खंत व्यक्त करते - समाजाला जाब विचारते - अनेक कविता होतात लढाईच्या, जीवनाबद्दलच्या, पण हा विषय दुर्लक्षित रहातो. प्रत्येक रात्री, मुलींच्या किंकाळ्या जशा उशीत दाबल्या जातात अगदी तसाच हा विषय साहित्य किंवा वाद, चर्चा यांतून बादच रहातो. तो कोणत्याच घरातून बाहेर पडत नाही. तो घराच्या ४ भिंतीतच रहातो हे भयप्रद नाही का?
.
ल्युसिलची ती पहीली कविता वाचेपर्यंत मला माहीतच नव्हते की "चाइल्ड अ‍ॅब्युझ" या विषयावर कविता ही कोणी करु शकते. "The language of life - Bill Moyers" या पुस्तकात मुलाखतीत ल्युसिल छान सांगते - जरी "shapeshifter poem" मधील मुलगी ही मीच असले तरी ती माझी "identity" नाही. ना त्या कवितेतील वडील ही माझ्या वडीलांची "संपूर्ण identity" आहे. अन पुढे ती बरच लिहीते. पैकी एक जरुर कृतज्ञतेने सांगते - I inherited from him so many strong & good qualities, including stubbornness, strength, intelligence & curiocity. He was a remarkable man.
.
अजुन एक ल्युसिलचीच कविता - मुन चाइल्ड

we girls were ten years old and giggling
in our hand-me-downs. we wanted breasts,
pretended that we had them, tissued
our undershirts. jay johnson is teaching
me to french kiss, ella bragged, who
is teaching you? how do you say; my father?
.
the moon is queen of everything.
she rules the oceans, rivers, rain.
when I am asked whose tears these are
I always blame the moon

.
ही कविता जरी घरामधून होणार्‍या लैंगिक शोषणाची असली तरी हे अनुभव चर्च मध्ये, मैत्रिणीकडे गेलेले असताना, अगदी गर्दीतही ओंगळपणा अनुभवास येउ शकतो. ल्युसिलसारखी मनस्वी आणि प्रतिभावान स्त्री हा विषय कवितेमधुन हाताळते - हेच इतकं नवीन आणि सिम्प्ली अमेझिंग वाटलेले मला. क्लोजर अ‍ॅट एनी कॉस्ट! प्रत्येक व्यक्तीने हाताळलेले , वापरलेले साधन - कविता, स्पिरिच्युअ‍ॅलिटी, हातात तलवार घेउन संताप व्यक्त करणे, जनप्रबोधन करणे वेगळे असू शकते मग त्यात मी तलवार घेउन लढते आणि तू त्यात अध्यात्म आणतेस म्हणजे मी योग्य तू अयोग्य असे काही नसते. अध्यात्म आणणार्‍यांना आसाराम बापू क्षमेस पात्र वाटतात असे अजिबात नसते. आपापली प्रोजेक्शन्स आपल्या पुरता ठेउन सर्वांनी आपल्या परीने व्यक्त व्हावे. कोणताही एक पवित्रा फार आदर्श असे काही नसते. क्लोजर अ‍ॅट एनी कॉस्ट!! व्यक्ती ढवळून निघालेली असते. हा अनुभव, फेस्टर होणारी ही जखम प्रत्येक व्यक्ती तिच्या परीने 'डील' करते. कोणी डेटॉल लावुन, कोणी शस्त्रक्रिया करुन, कोणी अन्य मार्गाने.

या पोस्टवर सर्व विचारांचे स्वागत आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

who is there to protect her
from the hands of the father
not the windows which see and
say nothing not the moon>>> भयानक!!!!

खूप छान लिहिले आहे सामो....
खरं आहे, प्रत्येकाची डील करायची पद्धती वेगवेगळी असेल... पण ही वेळच कुणावर येऊ नये नं...

मी परवा अच्युत गोडबोले चं 'मुसाफिर' वाचत होते. त्यात त्यांनी त्यांच्या तुरुंगातल्या दिवसांचा उल्लेख केलाय. (एका चळवळी निमित्त काही दिवस ते तुरुंगात होते ) तिथे भेटलेल्या कैद्याबद्दल त्यांनी उल्लेख केलाय. माझं लक्ष दोन शब्दांनी वेधलं.... "आईवर बलात्कार " करणारे....
माणूस किती खालच्या पातळीला जाऊ शकतो....

ज्या व्यक्तीकडे आधार मागावा ती व्यक्तीच सैतानी तरी आहे नाहीतर तटस्थ. >>>> सगळ्यात खालची पातळी.

कोणाकडे तिने आश्रय मागायचा? खिडकी? जी हे सारे पाहून तटस्थ रहाते? ( ही उपमा आई-आज्जी करता असेल का? असा विचार येउन धस्स धस्स होते!)
>>>
कहानी -२ मधे हा विषय हाताळला आहे.

छान तरी कसं म्हणावं.
खरंच डिस्टर्ब करणारी कविता आहे.
बर्याच वेळा डोमेस्टिक चाइल्ड अब्यूज सहन करावा लागतो त्याला कारण घरातील इतर व्यक्ती. काय सांगायचं हे त्या लहानग्यांना कळतच नाही. आणि ज्यांना न सांगता ही सगळं कळतं ते डोळे, कान आणि मेंदू बंद करून बसतात. मग ही मुलं मोठी होता होता पूर्ण मिटून तरी जातात किंवा कमालीची हिंसक होतात.

बिटर चॉकलेट हे पिंकी विरानी यांचे पुस्तक फार पूर्वी वाचलेले होते. ते याच विषयावरती होते. भयानक आहे हा प्रकार आणि ही विकृती. लहान पुलांना नातेवाईकांकडे रहायला पाठविण्यापूर्वी विचार करावा. तसेच आईची घारीसारखी नजर हवी. जर कधी काही वाईट प्रकार घडला असेल तर सायकिअ‍ॅट्रिस्टची मदत आवश्यकच आहे. मग ते मूल "नाही" का म्हणेना. त्या मूलाला थोडीच कळते त्याला काय उपचार हवेत हे. वडीलधार्‍यांनीच तो निर्णय घ्यायचा असतो.

छान लिहिलेय सामो
त्या दिवशीच वाचलेले. प्रतिसाद काय द्यायचे सुचले नव्हते. माझाच मूड ऑफ होता. त्यात हे असे डिस्टर्ब करणारे वास्तव वाचले की अजून त्रास होतो..

त्या दोन्ही कविता नि त्यावर तुझे भाष्य भयंकर डीप्रेसिंग नि डिस्टर्बिंग आहे. कवितेची प्रत्येक ओळ न ओळ निखार्‍यासारखी अंगावर येते . तुझे "आपापली प्रोजेक्शन्स आपल्या पुरता ठेउन सर्वांनी आपल्या परीने व्यक्त व्हावे." हे म्हणणे तू स्वतः अमलात आणलेस हे आवडले.

चांगलं लिहिलय.
कविता पण केलेल्या वातवरणनिर्मितीमुळे अंगावर येते.