कृत्रिम प्रज्ञा आणि समुपदेशन - एक सांगड

Submitted by सामो on 9 January, 2024 - 11:07

आज खालील रोचक लेख वाचनात आला.
LGBTQ लोकांच्यासाठी अमेरीकेत एक हॉटलाइन आहे. त्या हॉटलाईनचा ज्या प्रकल्पामध्ये अंतर्भाव होतो त्या प्रकल्पाचे नाव आहे 'ट्रेव्हर प्रकल्प.' या हॉटलाईनवरती आत्महत्येस उद्युक्त होणारे टीनेजर्स कॉन्टॅक्ट करु शकतात किंबहुना अशा व्यक्तींना मदत करणे हाच या प्रॉजेक्टचा उद्देश्य आहे. तर या प्रॉजेक्टवरील समुपदेशकांना पहील्यांदा काल्पनिक रोलप्ले मध्ये ट्रेन केले जाते. म्हणजे तुमचा टीम मेंबर, त्या डिप्रेस्ड आणि आत्महत्या करण्यास प्रवृत्त झालेल्या टीनची भूमिका निभावतो. तुम्ही त्या व्यक्तीशी बोलून, समजूतदारपणे, तिच्या अंतरंगात डोकवायचे असते, तिला होइल तितकी मदत करुन, आत्महत्येपासून त्या व्यक्तीस परावृत्त करायचे असते. मग त्यात अनेक बाबींचा अंतर्भाव असतो जसे की या आधी कधी असे आत्महत्येचे विचार मनात आलेले होते का? कधी कोणापुढे त्याने/तिने मन मोकळे केले का? केले असल्यास त्या व्यक्तीची प्रतिक्रिया काय होती? सकारात्मक की नकारात्मक? अशी चाचपणी करुन मग हे ठरवावे लागते की हा टीन, 'हाय रिस्क' कॅटॅगरीत मोडतो की अन्य वगैरे. यामध्ये त्या व्यक्तीवर दबाव तर येत नाही ना हे कटाक्षाने पहावे लागते. दबाव चालत नाही.

होते काय की अमेरीकेत दर वर्षी १.८ मिलिअन तरुण, LGBTQ व्यक्ती आत्महत्येचे विचार करतात. पण ट्रेव्हर प्रॉजेक्टवरती आहेत जवळपास ६०० समुपदेशक. म्हणजे गरज फार मोठी आहे आणि पुरवठा अतिशय तोकडा. तेव्हा आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स करता इथे खूप स्कोप आहे. म्हणजे जेव्हा समुपदेशकांना ट्रेन केले जाते तेव्हा त्यांच्याबरोबर एखादा चॅटबॉट रोलप्ले करु शकतो. या चॅटबॉटला ज्याला 'रिले' म्हणु यात, आधीच्या अनेक ट्रान्स्क्रिप्टस फीड केलेल्या असतात. या चॅटबॉटचा ट्रान्स्फॉर्मर GPT-2 नावाचा आहे. त्याला ४५ मिलिअन वेब पेजेस फीड करुन भाषेची संरचना, व्याकरण शिकवण्यात आलेले आहे. त्यामुळे 'रिले'ला समुपदेशकाच्या प्रश्नांना तर्कशुद्ध, व्यवहारी उत्तरे देता येतात्. हा जो ए आय पॉवरड ट्रेनिंग रोलप्ले आहे त्याला म्हणतात क्रायसिस कॉन्टॅक्ट सिम्युलेटर. याच्या निर्मीतीत गुगलचा हातभार आहे. कोण व्यक्ती हाय रिस्क कॅटॅगरीत येते याचा अचूक अंदाज या अल्गॉरिदमला आहे. कधीकधी काही केसेसमध्ये तर माणसाच्या अंदाजाहूनही अचूक अंदाज ए आय अल्गोला येतो. हा चॅटबॉट वापरल्याने समुपदेशकांचे ट्रेनिंग वेगाने व अधिक अचूकतेने होइल असा अंदाज आहे.

गेल्या वर्षी झालेल्या, एका संशोधनानुसार, असे आढळून आले आहे की जरी एक प्रौढ व्यक्ती जर LGBTQ टीनला समजून घेत असेल , तिला पाठींबा देत असेल तर त्या टीनच्या आत्महत्येच्या प्रयत्नांचे प्रमाण ४०% नी घटते. परंतु हा चॅटबॉट सध्यातरी समुपदेशकाची जागा घेत नाही. कारण मी ट्रेव्हर हॉटलाईनवरती फोन करते ते खऱ्याखुऱ्या व्यक्तीशी बोलून मनावरच्या ताणाचा निचरा व्हावा म्हणुन. तेव्हा जर चॅटबॉट त्या जागी स्थापित केला तर तो एकप्रकारचा विश्वासघात होइल. पण डाउन द लाईन ही एक शक्यता विचारात घेतली जाणार आहे. सध्यातरी समुपदेशकांच्या ट्रेनिंगकरता फक्त 'रिले' वापरला जातो.

Group content visibility: 
Public - accessible to all site users