सल्ला मदत हवी आहे - ज्येष्ठपणा कडे झुकणा-या नातेवाइका साठी ,

Submitted by सरळ on 4 May, 2023 - 04:57

नमस्कार मायबोलीकर, मी बरीच वर्ष रोमात आहे मायबोलीवर आणी आज ब-याच वर्षानी इथे लिहितो आहे. एका गोष्टीविषयी तुमचा सल्ला / विचार हवा आहे.

एक जवळची नात्यातील चुलत बहीण आहे जिच्याविषयी सल्ला हवा आहे. ही बहीण सध्या नाशिक जवळ एका तालुक्याच्या ठिकाणी तिच्या नव-याबरोबर राहते पण तिच लग्न register नाहि. नव-याकडुन सतत बोलणी आणी त्रास आहे. माझे काका/काकु आता हयात नाहीत आणी तिला सख्खा भाउ/बहीण कीन्वा मावशी कोणी नाहिये.. बहीणीच वय ५४ आहे ..

तीला जर कुठल्या सन्स्ठेत किन्वा आश्रमात सुरक्शीतपणे रहायची सोय होण्यासारखी असेल तर pls. सुचवा. मी भारताबाहेर असल्याने मला ईछा असुनही सारख जाण शक्य होणार नाहिये आणी बहिणीच्या वयामुळे आणी शिक्षणामुळे तिला इथे आणणे शक्य नाहीये. नव-याशी भांडण आणी court Case हे शक्यतो नको आहे.

क्रुपया काही माहिती असेल तर सांगा जी उपयोगी होइल. धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लग्न register नाही.
भांडण आणि court Case हे शक्यतो नको आहे
हे लग्न झाल्या वेळीचे फोटो, निमंत्रण पत्रिका आहे का? हक्क वगैरे मिळवणे हे पुढे.

एक यादी आहे जी साधारण बैठकीच्यावेळी बनावतात ज्यावर नव-याच्या भावाच्या सह्या आहेत.

हा प्रश्न पुढील काहीच वर्षात गंभीर रूप घेणार आहे.
कुटुंब व्यवस्था नष्ट होण्याचे हे दुष्परिणाम आहेत.
अफाट पैसा असेल आणि प्रेमाचे कोणीच नसेल.
शरीर नी साथ सोडून दिली तर अतिशय बिकट अवस्था होते.
संस्था आहेत,अनाथ आश्रम आहेत,वृद्ध आश्रम आहेत..
पण ते भारताची सर्व परंपरा पुढे चालवत आहेत.
म्हणजे फक्त भ्रष्ट कारभार.
कोणी बघणारे नसेल तर पूर्ण दुर्लक्ष.

लग्न रजिस्टर नसले तरी हिंदू पद्धतीने सप्तपदी वगैरे विधी होवून लग्न झाले आहे, इतकी वर्षे नवरा-बायको नात्याने रहात आहेत तर ते लग्न कायदा मान्य करतो.
नवर्‍याशी भांडण, कोर्ट केस वगैरे नको असले तरी बहिणीच्या पतीकडून घर सोडल्यावर त्रास होण्यची शक्यता उरतेच. त्यामुळे चांगल्या वकिलांचा सल्ला घ्या . जिल्ह्याच्या ठिकाणच्या सेवाभावी संस्थेत याबाबत मदत मिळेल.

अशा संस्था किंवा आश्रम याबद्दल मला माहिती नाही.
चुलत बहीण आर्थिक दृष्ट्या समर्थ आहे किंवा कसे, हे नमुद करा म्हणजे त्यानुसार इथे लोक सुचवू शकतील, सल्ला देउ शकतील.

नाहि , तीचं शिक्षण कमी असल्यामुळे नोकरी नाहि केली त्यामुळे आर्थिकद्रुष्ट्या नव-यावर अवलंबुन आहे.. पण मी ईथून आर्थिक मदत करु शकेन.

५४ म्हणजे आजच्या काळात धरले तर वय तसे कमीच आहे. तुम्ही आर्थिक मदत करायला तयार आहात ही जमेची बाजू पण तरीही आजकालचे वाढलेले आयुर्मान विचारात घेता पुढे २० ते २५ वर्षांची तरतूद हवी. त्यातून तुम्ही सोडल्यास इतर काही आधार नाही अशा परीस्थितीत बहिणीला स्वतःचा काहीतरी इनकम सोर्स असणे अधिक सुरक्षित करेल. शिक्षण कमी असले तरी शारीरिक दृष्ट्या काम करणे शक्य असल्यास लहान मुले/ स्पेशल नीड्स व्यक्ती/वृद्धांसाठीच्या संस्थेत नोकरी- तिथेच रहाण्याची सोय किंवा लहान मुले/वृद्ध व्यक्ती यासाठी मदतनीस म्हणून क्लायंटकडे रहायची सोय असे काही करायची तयारी आहे का? चांगल्या वर्तनाची विश्वासू व्यक्ती म्हणून नोकरी मिळून सन्मानाने जगता येइल.

<<नाहि , तीचं शिक्षण कमी असल्यामुळे नोकरी नाहि केली त्यामुळे आर्थिकद्रुष्ट्या नव-यावर अवलंबुन आहे.. पण मी ईथून आर्थिक मदत करु शकेन.>>
त्यांना आधी मनाची उभारी द्या की शिक्षण कमी असले तरी त्या काही ना काही छोटे मोठे काम करू शकतात. आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होणे या केसमधे तर अतिशय जरुरीचे आहे.
मागे पुढे तुमच्या मदतीला पण मर्यादा येणार.
माझ्या ओळखीत काहीजणी महिला उद्योगात/ पोळीभाजीचे घरगुती डबे देणे / घरगुती पिठाची चक्की घेऊन दळण दळून देणे / घरगुती मसाले भाजणी करून देणे इ. मधून स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. तुम्ही यात मदत करा त्यांना. 54 म्हणजे खूपच जास्त वय नाही.
यातून त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि कदाचित टोमणे कमी होतील. Fingers crossed..
किंवा त्या स्वतंत्र राहू शकतात. स्वतःचे पैसे नसतील तर ते अवघड पडेल.

जर नवऱ्यापासून वेगळे होताना हातात पैसा शून्य असेल तर एवढी वर्षे हाऊसवाईफ म्हणून जे काम केले ते फुकट गेले का?

पोटगी मिळेल पण त्यासाठी कोर्टकचेरी करावीच लागेल.

किंवा मग कोर्टात गेले तर अमुकतमुक रक्कम मला द्यावी लागेल त्याऐवजी थोडी कमी रक्कम तू मला दे असे नवऱ्याला सांगून बघता येईल.

आपल्याला कोर्टकचेरी नकोय हे समोरच्याला आधीच सांगितले की समोरचा चढून बसणार. त्यापेक्षा गरज पडली तर कोर्टाची पायरी चढेन असेच सांगा.

पण त्याआधी एक प्रश्न पडलाय तो असा की नवऱ्यापासून वेगळे राहताना त्याच्याशी सारे संबंध तोडूनच वेगळे व्हायचे आहे का?
लग्न रजिस्टर नसले तरी पारंपारीक लग्नाचे विधी करून एवढे वर्षे नवराबायको म्हणून संसार करत असतील तर ते लग्न आहेच. घटस्फोट घ्यायचा तर कायदेशीर पद्धतीनेच घ्यावा लागेल. रजिस्टर नाही तर लग्नच नाही असा दावा आपल्य सोयीने कुठलीही पार्टी करू शकत नाही.

दोन्हीकडे तडजोड आहेच. रहाते घर तिने सोडू नये - असे प्रकर्षाने वाटते. कारण एक रस्ता घेतला की लगोलग दुसरा न घेतलेला पथ, जास्त सावलीचा वाटू लागतो. माणसाचा स्वभाव आहे. ५४ वर्षे जर तडजोड केलेली आहे तर अजुन थोडी. तुम्हाला काही झाले (देव न करो) तर ती रस्त्यावर येणार ना. तेव्हा तिला रहाते घर सोडू देउ नका.

बहिणीला अपत्य नाही का?
इकडे स्वयंपाकाची कामे करुन चांगले कमवू शकतात. आर्थिक स्वातंत्र्य महत्त्वाचे.
Full time house help c करू शकतात का? तसे असेल तर राहणे कमवणे एकत्र होउन जाते.

तरीही अस स्वतंत्र राहिले तर नवरा त्रास देणार का? हे पण पाहिले पाहिजे.

माझ्या माहितीत एकजण आहेत, त्यांना अशा मदतनीसची गरज आहे. तुमची बहिण तयार असेल तर कळवा

स्वाती मग काय तिने रस्त्यावर यायचं का? लेखक म्हणतायत ते पैसे पाठवतील. इज दॅट अ पर्मनंट सोल्युशन? लेखकांना (देव न करो) काही झालं
उदा - जॉब गेला, किंवा काहीही तर त्या कुठेजाणार?

हा धागा ती वेळ येऊ न देण्याबद्दलच आहे ना? त्याचा पर्याय अब्यूसिव रिलेशनशिपमध्ये राहाणं हा कसा होऊ शकतो?!

>>>>>>>>अब्यूसिव रिलेशनशिप
नक्की काय अ‍ॅब्युस आहे, कोणाची चूकी आहे काहीही कल्पना नाहीये. त्यामुळे तू म्हणतेस तसेही ठामपणे सांगता येत नाहीये की मी म्हणते तसेही. खरं तर लेखकाने पूर्ण चित्र द्यायला हवे आहे.

मग त्यांना स्वत:च्या पायावर उभं राहू शकण्याबद्दल सल्ला द्यायचा (जसा स्वाती२, धनवन्ती यांनी दिला आहे), की राहा खितपत म्हणायचं? कशाला हवं आहे पूर्ण चित्र? त्रास आहे हे लिहिलेलं पुरेसं नाही का? असो.

उठाउठी घर सोडायला त्या नक्कीच नव्या नव्या नवरी नाहीत की ब्वॉ थोडा तडजोडीचा काळ असतो नवीन लग्नात. पण तब्बल ५४ वर्षं (चल लग्नाची २५ धर) त्रास नव्हता आणि अचानक त्रास आहे, इतका की घर सोडायचय. त्याबद्दल मला तरी नक्की त्रास काय आहे - सहन करणेबल आहे का हे पहावेसे वाटते. प्रतिगामी म्हण, पारंपारिक म्हण, जुन्या वळणाची म्हण . पण जर तड्जोड सगळीकडे आहे तर घर सोडू नये असे वाटते. आपलं छप्पर सोडायचं नसतं. हक्काचं असतं ते. हां सिव्हिअर अ‍ॅब्युझ असेल तर वेगळे.
बाकी नाही तर मग आपल्यात बळ हवं - आर्थिक व मानसिक.
---------------------
माबोवरती समाजाचे क्रॉसेक्शन असल्याने, विविध स्तरातील मतप्रवाह कळतात. पैकी तुझा आणि माझा थोडा वेगळा आहे. पण मी यावर ठाम आहे की - लग्नातच (जर सिव्हिअर अ‍ॅब्युझ नसेल तर) सामंजस्याने घ्यावे. बाकी कोणाचे पुनर्वसन करण्यास कोणाला किती वेळ आहे, शक्ती आहे - त्यावरही अवलंबून आहे.

त्या बाईंना,त्यांच्या नवऱ्याचा त्रास असह्य वाटत असेल म्हणून तर धागकर्त्याने हा प्रश्न विचारला आहे.बाईंचे वयही जास्त आहे.
त्यांची घर सोडण्याची तयारी असेल तर खालील लिंक पहा.हेच गृहस्थ नव्हे तर अजून काही आहेत की ज्यांनी निराधारासाठी वृद्धश्राम सुरू केले आहेत.

https://www.facebook.com/groups/331285451630205/permalink/946599606765450/

आपण (मी) काय "तुम आगे बढो, हम कपडे संभालते है' क्राऊड.
>>>>

हसायला आले पटकन हे वाचून.
पण यात खरेच तथ्य आहे. ईथे कोणीही टोकाचा सल्ला सहज देऊ नये. झाल्यास दोन्ही बाजू दाखवाव्यात आणि स्वताही तसा विचार करावा.

ईथे सल्ला मागितलाय म्हणजे त्रास असह्य असेल हे देखील एक गृहीतक आहे. ते फॅक्ट पकडून विचार करू नये.

ऋन्मेष माझ्या नात्यातील ७३ वर्षे वयाच्या एका बाईना (सूनेचा) असह्य झाला म्हणुन ती हट्टाने परदेश सोडून त्या इथे आल्या. आर्थ्रायटीस व मानसिक कमकुवतपणा, दोन्ही गुडग्याचे रिप्लेसमेन्ट. आधी रात्री कामाला/ सोबतीला बाई ठरवली. मग ती बाईच येइना. आता परत परदेशी जायचे आहे. तेव्हा आता परत मुलगा येइल घ्यायला. एक मार्ग घेतला व चोखाळला की कळतं अरे इथेही उनच उन आहे. मग आधीचा घ्यावा का. हे असेच आंदुळत बसायचय का?
अर्थात माझा हा अनुभव ताजा आहे. त्यामुळे पूर्वग्रहदूषित नजर आहे.

>>>>>>कोणीही टोकाचा सल्ला सहज देऊ नये
का नाही? प्रत्येकाचे मतप्रवाह आहेत. पण धागाकर्ते त्यातील योग्य तो निवडतील. Happy

एखाद्या वृद्धाश्रमात निवासी नोकरी करणे आणि तिथे मिळणार्‍या पगारातून बचत करीत आपल्या भविष्याची तरतूद करीत राहणे हा एक पर्याय सुचतो. वय वाढल्यावर काम झेपेनासं झालं की तिथेच राहायची सोय होईल.

पण धागाकर्ते त्यातील योग्य तो निवडतील. Happy
>>>
चिंता याचीच वाटते. सल्ला मागणारी व्यक्ती तसा योग्य विचार करायच्या मनस्थितीत असेल का.. त्यामुळे ईथे कोणालही एकाच बाजूने सल्ला न देता त्यांना दोन्ही बाजूचे फायदे तोटे दाखवावेत. ते चर्घेत घ्यावे असे वाटते. जेणे करून त्यांना योग्य निर्णय घ्यायला मदत होईल. आपल्या मताचा त्यावर प्रभाव नसेल.

सामो,
टोकाचा सल्ला देणारे आपण कोण? लेखकाने नवरा त्रास देतोय तर काय करावे, घर सोडावे का असे विचारलेले नसून घराबाहेर पडल्यावर पर्याय काय असे विचारलेले आहे. त्यावरून जो काही टोकाचा निर्णय आहे तो त्या बाईने ऑलरेडी घेतलेला दिसतोय.किंवा घ्यायची तयारी असावी असे दिसते आहे. म्हणजे तेवढा त्रास असेल म्हणूनच घेतला असेल ना निर्णय.
अशा केस मधे " घर सोडताना अमूक तमूक फॅक्टर्स चा विचार करून निर्णय घ्या" असे म्हणणे वेगळे, पण त्रास होतोय म्हणून, (आर्थिक दृष्ट्या सक्षम नसताना देखिल) सुटकेसाठी कुणीतरी घराबाहेर पडण्याचा पर्याय शोधत असेल तर "अजून जरा त्रास सहन कर " हा काही सल्ला असू शकत नाही ना! किंवा दिल्यास ते इन्सेन्सिटिव होईल.

>>>>>लेखकाने नवरा त्रास देतोय तर काय करावे, घर सोडावे का असे विचारलेले नसून घराबाहेर पडल्यावर पर्याय काय असे विचारलेले आहे.
येस द प्रॉब्लेम स्टेटमेन्ट इज क्लिअर नाऊ Happy

आताचे वय पाहता हाती पायी धड़ आहेत पण पुढे जावून कोण काळजी घेणार (आर्थिक / उदरभरण आणि शारीरिक / आरोग्य) असा प्रश्न असेल / असावा तर सोपे सहज उत्तर म्हणजे वर उल्लेख केलेल्या अनेक वृद्धाश्रम संस्था मध्ये आता पूर्ण वेळ स्थायी नोकरी मिळत असेल तर करावी ज्यातून वेळेची गुंतवणूक योग्य ठिकाणी झाल्याने समवयस्क व्यक्तींच्या सहवासात एकटे पणाची भावना बहुतांश दूर होण्यास मदत होईल शिवाय मन गुंतल्याने मिळणारी सकारात्मक ऊर्जा / विचार येणारा काळ सुसह्य करेल. परिस्थितिजन्य परावलंबी मानसिकता माणसाला अधिकच सोशिक पण निराश बनवत राहते त्यामुळे मुक्तपणे विचार करण्याची कुवत हरवल्याने नेटका मार्ग समोर उपलब्ध असतानाही दिसू शकत नाही आणि आता सुटकेचा काहीच मार्ग नाही ही भावना अजुनच नैराश्य देत राहते.
येत्या १० वर्षातील पगाराचा पुढील उर्वरित आयुष्यातील तजवीज करण्यासाठी उपयोग त्याच ठिकाणी राहून करता येऊ शकेल

सत्तावीस पोस्टी झाल्या तरी बाईलाच समुपदेशनाचा सल्ला कुणीच नाही दिला. मायबोली पूर्वीची उरली नाही हेच खरं.
बेस्ट क्वालिटीचे हेडफोन्स पाठवा आणि विषय मिटवा. काका बडबडायला लागले की काकूंना नॉईज-कॅन्सलिंग हेडफोन्स घालायला बरे.

अग्री वित मै. तसा डायरेक्ट सल्ला इन्सेन्सिटिव ठरेल.
त्याच बरोबर इतर स्वतःच्या पायावर उभे राहायचे सल्ले पण स्वागतार्ह वाटले तरी प्रॅक्टिकल नाही वाटत ह्या केस मध्ये. ५४ वय तसं कमी आहे पण तालुक्याच्या ठिकाणी राहतात आणि कमीत कमी तीसेक वर्षाचा संसार झालेला असावा. त्याच बरोबर सरळ ह्यांनी संस्था/आश्रम अशी चौकशी केली आहे त्यावरुनच त्या नोकरी वगैरे करणार्‍या नाही वाटत.

जवळच्या फॅमिली मध्ये सिमिलर केस आहे. वय साधारण ६० च्या आसपास. त्यांना मदत ऑफर करुनही त्या घराच्या बाहेर निघायला धजत नाहीत कारण त्यांना कॉन्फिडन्स नाही वाटत आपण बाहेर कोणा दुसर्‍याच्या मदतीनी सेटल होऊ शकू. इतके वर्ष झालेला संसार तोही त्याच घरात, त्यामुळे टोटली इन्स्टिट्युश्नलाईज्ड झाल्याची केस आहे (बर्‍याच केसेस अशाच असतात).
अर्थात घरात अब्युजची लेवल किती आहे त्या वर पण बरच अवलंबून आहे. वर सरळ ह्यांनी विचारपूस केलीये त्यामुळे असं गृहित धरु की बहिण बाहेर पडायला तयार आहेत.
I hope something works out. Truly a hard problem to solve.

Pages