सल्ला मदत हवी आहे - ज्येष्ठपणा कडे झुकणा-या नातेवाइका साठी ,

Submitted by सरळ on 4 May, 2023 - 04:57

नमस्कार मायबोलीकर, मी बरीच वर्ष रोमात आहे मायबोलीवर आणी आज ब-याच वर्षानी इथे लिहितो आहे. एका गोष्टीविषयी तुमचा सल्ला / विचार हवा आहे.

एक जवळची नात्यातील चुलत बहीण आहे जिच्याविषयी सल्ला हवा आहे. ही बहीण सध्या नाशिक जवळ एका तालुक्याच्या ठिकाणी तिच्या नव-याबरोबर राहते पण तिच लग्न register नाहि. नव-याकडुन सतत बोलणी आणी त्रास आहे. माझे काका/काकु आता हयात नाहीत आणी तिला सख्खा भाउ/बहीण कीन्वा मावशी कोणी नाहिये.. बहीणीच वय ५४ आहे ..

तीला जर कुठल्या सन्स्ठेत किन्वा आश्रमात सुरक्शीतपणे रहायची सोय होण्यासारखी असेल तर pls. सुचवा. मी भारताबाहेर असल्याने मला ईछा असुनही सारख जाण शक्य होणार नाहिये आणी बहिणीच्या वयामुळे आणी शिक्षणामुळे तिला इथे आणणे शक्य नाहीये. नव-याशी भांडण आणी court Case हे शक्यतो नको आहे.

क्रुपया काही माहिती असेल तर सांगा जी उपयोगी होइल. धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण तब्बल ५४ वर्षं (चल लग्नाची २५ धर) त्रास नव्हता आणि अचानक त्रास आहे, इतका की घर सोडायचय. त्याबद्दल मला तरी नक्की त्रास काय आहे - >>> जन्मल्यावर लग्न झालेल नाहीये, ५४ हे त्याच वय आहे.
त्रास नव्हता हे कशावरुन म्हणु शकता? त्रास असेलच पण आपल्याकडे मुलिच अपब्रिन्गिग सहन करा, अ‍ॅडजस्ट करा, पडती बाजु घ्या, साभाळुन घ्या हे एकत बघत झालेल असत. तु मुलगी/बाइ/स्त्री आहेस म्हणजे कमी आहेस हेच बिबवल जात.
अस असताना जनरली साभाळुन घेण्याकडेच कल असतो.
असो! घटस्फोट घेवुन स्वतःच्या पायावर पुर्णपणे उभ राहण यासाठी लागणारी मानसिक तयारी त्याना करावी लागेल.
एखाद्या व्याक्तीने फक्त ती आर्थिकद्र्ध्ट्या सक्षम नाही म्हणून अब्युजिव्ह रिलेशिनमधेच राहाव ही अपेक्षा इनह्युमन आहे.

बाईंना मुळात वाद होण्याचा वेळ कमी करायचा असेल तर जवळपास शांत मंदिरात जाऊन मेडिटेशन चे बरेच युट्युब व्हिडीओ आहेत ते बघून मेडिटेशन, एखादा इंटरेस्टिंग ग्रंथ वाचनास घेणे हे करता येईल.पैसे खर्च न करता करमणूक मार्ग-बागेत जाऊन बसता येईल.एखादा विनामूल्य संस्कार किंवा गोष्टी सांगण्याचा वर्ग लहान मुलांना जमवून चालवता येईल.
वाती वळून देणे किंवा असे काही फार जास्त अटेंशन न लागणारे छोटे काम घेता येईल.कधीकधी खूप जास्त वेळ लोक घरात एकतर राहिल्याने वादविवाद वाढतात.सहवास कमी करून त्रास कमी करता येईल.आणि आत्मविश्वास असं करून वाढला की मग बाहेर निघणे ,आश्रम,तत्सम मार्ग.

स्वाती२ - वकिलांना सल्ला विचारलेला मागच्या वर्षी तेव्हा वकिलांनी हे clear केलेल की आपण पोटगी मागु शकतो पण तीला घराबाहेर पडाव लागेल. आणी असही आपल्याकडे कोर्ट केसेस वर्षानुवर्ष चालतात त्यामुळे तो मार्ग शक्यतो नको असा विचार आहे.

आधी तीला जास्त त्रास होता कारण अंगावर हात उचलायचा नवरा पण मधे एकदा बोलुन ते बन्द केल (पोलिसाना involve करु सांगुन).

बहिणीला मुल-बाळ नाही त्यामुळे एका अर्थी सुटवंग आहे.

शितलकृष्ण- ती मदतनीस म्हणुन काम करु शकेल पण रहायची सोय आधी करावी लागेल मला.

भरत - वृद्धश्रमात job आणी रहाणं ह्या दोन्ही सोयी असतील तर ते शक्य होइल.

देवकी - फ़ेसबूक लिंक साठी धन्यवाद , पुर्ण पान एकदा वाचुन माहिती गोळा करेन.

वैद्यबुवा - बहिणीला शक्यतो निघायचं नाहिये तिथुन कारण बहुदा आता सवय झाल्येय तिला त्या जागेची पण त्रास जास्त वाढला तर काय करायचं हा विचार ह्या प्रश्नामागे आहे.

मैत्रेयी - छान पोस्ट

सरळ - जाणकारांनी वर सल्ले दिलेले आहेत. बहिणीला या परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी सुरक्षित मार्ग मिळावा यासाठी माझ्या शुभेच्छा.

या व इतर अनेक घटनांवरुन प्रत्येक व्यक्तीने (विशेषत: स्त्री वर्गाने ) आर्थिक स्वावलंबनाचे महत्व जाणायला हवे.

वैद्यबुवा - बहिणीला शक्यतो निघायचं नाहिये तिथुन कारण बहुदा आता सवय झाल्येय तिला>>>>>>> एग्जॅक्टली माय पॉईंट.

त्या जागेची पण त्रास जास्त वाढला तर काय करायचं हा विचार ह्या प्रश्नामागे आहे.>>>>> एकदम बरोबर. आणि आधीचं उदाहरण बघता वाढायचे चान्सेस पण जास्त आहेत. बाहेर निघालेलच बरं पण त्यांनी हिंमत करणे/दाखवणे गरजेचे आहे.

<<<शितलकृष्ण- ती मदतनीस म्हणुन काम करु शकेल पण रहायची सोय आधी करावी लागेल मला.>>> जिकडे मदतनीस हवीये त्यांच्याकडे राहु शकणार नाहीत का? ते करतील सोय.

वैद्यबुवा - बहिणीला शक्यतो निघायचं नाहिये तिथुन कारण बहुदा आता सवय झाल्येय तिला>>>>>>> एग्जॅक्टली माय पॉईंट.>>>>
मग कस शक्य आहे..

सरळ,

पहिल्यांदा म्हणजे तुम्ही मदत करत रहाणार आहात हे मनात ठेवा व सतत बोलु नका.
त्या बाईंना आधी कल्पना द्या की, आर्थिक बाजूचा विचार हा "त्यांना" आधी करावा लागेल व तुम्ही लागलीच तर मदत कराल.
नाहितर सगळं प्रकरण डोइजड होइल तुम्हाला व त्यांना सुद्धा. माझे अनुभव आहेत. मुद्दा हा की, तुम्हाला त्यांना खंबीर बनवायचे आहे, अवलंबित नाही व वाढत्या अपेक्षा हि नकोत ज्यावेळी अश्या परीस्थितीतून व्यक्ति बाहेर येते तिला सवय लागू नये.

दुसरे म्हणजे, घर नसेल(च), नवर्‍याच्या घरातून लगेच बाहेर पडल्यवर( केस नाहि करायची, घर नाही आहे) तर आश्रमात नोकरी हाच उत्तम पर्याय असेल.

सध्या तरी छुपे रुस्तमपण प्लॅन आखावा , म्हणजे जोवर आर्थिक प्रश्ण निकालात येत नाही. तुम्ही सुद्धा उत्साहाच्या भरात, मीच बघेन सर्व असे शक्यतो म्हणू नका.
पहिल्यांदा आर्थिक आणि निवारा प्रश्ण निकालात निघाला की, गपचुप घरातून आपले सामान घेवून बाहेर जायचे. अश्या नवर्‍याच्या कानाला खबर न लागता. कारण वरील लिहिण्यावरून काय प्रकारची व्यक्ती आहे हि पुर्ण कल्पना येत नसली तरी असे प्लॅन गपचुपच करावे.

तेव्हा तुम्ही आधी, त्यांना नोकरीसाठीची मदत करा. नुसते पैसे पाठवत बसू नका. आणि रहाण्याचे पर्याय काय , कसे वघा. नाहितर, उद्या कोणी काय व कसा मदत करणार्‍यालाच दोष देइल सांगता येत नाही. हात पोळले आहेत (स्वानुभव). उद्या असे नको व्हायला की, तू म्हणाली म्हणून मी घर सोडलं / नवरा सोडला वगैरे वगैरे आणि आता तुच बघ सगळं...

तुम्ही वरील पोस्टचा चांगला अर्थ घ्याला ही अपेक्षा. नाहिच समजली तर सोडून द्या. बाकीच्यांनी पोस्ट समजूनच घ्यावी असा काहिहि आग्रह नाही.

सरळ,
घर सोडायच्या आधी, त्यांना नोकरी करायला मिळेल का? की नवरा एकदमच बेकार माणूस आहे? थोडी सवय लागू दे त्यांना नोकरी करायची.
चार तास तरी कुठे मुलं सांभाळायची, जेवणाची कामं , त्यांचा नवरा बाहेर गेला की करतील काय त्या?

नाहितर खुपच कठिण प्रकरण आहे. आधीच त्या सवयीच्या गुलाम आहेत इतकी वर्षे . त्यात कामच कधी केले नाही... घराबाहेर पडल्याच नाहीत तर कठिण प्रश्ण आहे त्यांना उभे करण्याचा.
आजकाल, खर्च काय कमी नसतो ५४ नंतर....

शितलकृष्ण - ती तिथे राहु शकेल.. विपु मधे काही contact number कळवलात तर मी त्याना संपर्क करु शकेन.

झंपी - धन्यवाद , मी एक-दोन महीन्यात तिथे जाइन तेव्हा बोलायचा विचार आहे , तेव्हा बाहेर पडायची वेळ आली तर माहिती जमा करत आहे.

आता नवऱ्याला बायको नकोशी वाटू लागली असेल. मग काही सौम्य वागणूकींतून/ प्रकारांनी नवरा तसे जाणवून देऊ लागला असण्याची शक्यता आहे. पण समजा नवराच आजारी पडला तर त्याच्या स्वार्थी वागणुकीत लगेच बदल होणार. शेवा कोण करणार त्याची? नवरा ज्या नातलगांच्या खात्रीवर गुर्मीत आहे ते योग्य वेळी फिरणारच.

बाकी बाहेर पडून आसरा शोधणे कठीणच आहे. त्यांनाही नंतर नकोसे वाटल्यावर( म्हणजे राहून नोकरी ही शेवटी नोकरीच असते. नोकरच आजारी पडल्यास ते दुसरा नोकर शोधणार) आसराही जाईल आणि आवकही जाणार.

एक तर्क वर्तवला आहे ,सल्ला देत नाही.

त्यांचे वय 54 वर्ष आहे म्हणजे त्यांच्या नवऱ्याचे वय 60 च्य आसपास असेल .
म्हणजे वयाच्या अशा टप्यात आहे की बऱ्याच रोज च्या activity, साठी दुसऱ्या ची मदत घेणे गरजेचे आहे.
शरीर साथ. त्या व्यक्ती ला पण देत नसेल.
अशा वयात माणसाचा स्वभाव पूर्ण बदलतो.
आधार ची गरज असते शरीर कुरकुर करत असते .
म्हणजे अगदी जिना उतरून भाजी आणायला पण जाणे मोठे काम वाटत.
मला नाही वाटत ह्या वयात तो त्रास देईल.

माणसाचं वय झालं , आजारी पडला, कमजोर झाला तरी स्वभाव बदलतोच असं नाही. विशेषतः ज्याला दुसर्‍यावर सत्ता गाजवायची सवय आहे, अशा पुरुषाच्या बाबतीत.

बाहेर पडायचं आहे हे त्या स्त्रीला स्वतःहून वाटलं तरच अर्थ आहे.

तुमची आर्थिक मदत करायची तयारी आहे , तर त्यांना नोकरी करण्यासाठी ( सद्य स्थितीत तरी वृद्धाश्रम इ. ठिकाणी निवासी नोकरीच उत्तम) उयुक्त केल्यावर येत्या चार पाच वर्षांत त्यांच्या नावावर इन्शुरन्स कंपन्यांच्या पेन्शन प्लानमध्ये पैसे भरा. वाटलं तर मुद्दल त्यांच्यानंतर तुमच्या वारसांना मिळेल असा पर्याय निवडा.

अशा प्रश्नांवर प्रतिसाद देणं माझ्यासारख्यांना अवघड वाटतं. वाचतोय. छान प्रतिसाद आहेत सर्वांचे.

एक गोष्ट सांगाविशी वाटते. अध्यात्म, मेडीटेशन हे समस्येवर उपाय म्हणून अंमलात आणताना हेतू कितपत साध्य होतो याची शंका आहे. या गोष्टींची आवड असणे, शिकून घेतलेले असणे, सराव करणे आणि नियमित छोट्या मोठ्या समस्येच्या वेळी मनाचे संतुलन राखण्यासाठी त्याचा उपयोग करणे यासाठी स्वतःला ट्रेन केलेले असेल तर कदाचित उपयोग होत असावा. समस्या आहे म्हणून सुरूवात केली तर कसे हे ठाऊक नाही.

मन एकाग्र करण्याऐवजी सतत स्वतःला बिझी ठेवणे हा उत्तम उपाय वाटतो. परदेशात असल्याने वेळ नसेल तर कुणाला तरी मदतीसाठी फोनवरून सांगता येईल का ? या व्यक्तीला जमण्यासारखे काम / व्यवसाय सुरू करता येईल का ते बघता येईल. सिंहगड रोडवर स्त्रियांनी एकत्र येऊन अन्नपूर्णा नावाचे एक दुकान खूप वर्षे चालवलेले आहे. कुणीही उच्चशिक्षित दिसत नाहीत. वडापावा, भजी आणि असे न्याहरीचे पदार्थ बनवतात. ते चालते पण तुफान. असे काही त्या व्यक्तीला जमेल का ?

तुम्ही कदाचित पुरेशी मदत सुद्धा कराल. पण बर्‍याच जणांना आयुष्यभर कुणावर तरी ओझे बनून राहण्याचेही दडपण येऊ शकते. आई वडिलांच्या पश्चात सख्ख्या भावाच्या घरी कायमचे रहायला जायची कल्पना बहीणींना सुद्धा सहन होत नाही. अपवाद सोडून. त्यामुळे उत्पन्नाचे सोर्सेस हा वर अनेकांनी सुचवलेला मुद्दा योग्य वाटतो.

प्रतिसाद दोन तीन भागांत आहे तर खालील प्र माणे:

०१) इन्टरवेन्शन करायचे तर ते एकट्याने करु नका. एक इन्फॉर मल कमिटी बनवा. घर/ मित्र सर्कल ह्यात काका व काकू दोघांच्या बाजूचे वेल विशर्स असतील त्यांना पण इन्वॉल्व्ह करा. विचार विनिमया साठी तरी नक्की उपयोग होईल. आर्थिक ओझे कोण किती घेइल ते सांगता येत नाही पण काही नवे पर्याय निघू शकतील.
०२) काकांचे शारिरीक व मानसिक इव्हॅलुएशन गरजेचे आहे. म्हणजे समजायला की ते त्रास देतात त्यामागे काही मानसिक रोगाची पार्श्वभूमी आहे का? बाय पोलर/ स्किझोफ्रेनिआ/ डिप्रेशन असे काही आहे का ते कळेल. त्यावर औशधे व समु पदेशन घेतल्यास त्रास कमी होईल व त्रास देण्याची प्रवृत्ती कमी होईल. त्यांच्या जवळच्या कोणी फॅमिली मेंबर/ मित्र ह्यांच्या तर्फे ही सूचना करून बघा त्यांना.

०३) काकांच्या आर्थिक परिस्थितीचे पण मोजमाप घ्या. विल केले आहे का? परिस्थि ती उत्तम असल्यास त्यातील हिस्सा काकुंना मिळायला हवा.
ह्यासाठी फायनान्स प्लानर व वकिलाच्चा सल्ला घ्या. शी रिअली डिझर्व्ज इट. व वारस नसल्याने काकू तश्याच घराबाहेर पडल्यास इस्टेट चोरापोरी जाईल.

०४) घराबाहेर पडा यचे च तर काकुंचा पण आधी हेल्थ व मानसिक चेकप हो णे गर जेचे आहे. अब्युज सहन कर ताना त्यांनी नक्की तब्येतीकडे दुर्लक्ष केले असेल. पूर्ण हेल्थ चेक अप ह्याचे पॅकेज असते ते कर्वुन घ्या. मॅमोग्राम, बोन डेन्सिटोमेट्री नक्की करा कारन कॅल्शिअम आयर्न नक्की कमी असेल. व हाडे फ्रॅक्चर होउ शकतात. डेंटल चेक अप करवुन घ्या व चश्मा वगैरे गरज आहे का ते तपासा. ज्यांना सपोर्ट नसतो ते लोक्स सर्व अंगावर काढतात व कोण ऐकणार म्हणून तक्रार करत नाहीत. ५५ ते ६० आता शरीर कुरकुर सुरू करेल.

०५) अब्युज सहन करायचा नाही हे ठरवल्याबद्दल त्यांचे अभिंन्दन करा व पॉझिटिवि टी मेंटेन ठेवा. अगदी छोटी साधी अचीवमेंट पण मीन्स अ लॉट.
६) त्यांना मोबाईल.- स्मार्ट फोन - ब्यांक अकाउंट आहे का? ते नसल्यास देउन एनेबल करा. हे मॅनेज करणे गरजेचे आहे. पोस्टल सेविन्ग पण सुरू करता येइल

७) काकाने हेल्थ इन्सुअरन्स केलाच नसेल. चेकप नंतर काकुचा हेल्थ इन्सुअरन्स करवून घ्या हे सर्व आता लागणार आहे.
८) नाशीक मध्ये घरकूल एक संस्था आहे. तिथे मतिमंद मुली राहतात पण स्वयंसेवक व मार्ग दर्शक ताई नेहमी लागतात तिथे चौकशी करा
सुलेखा तळवलकर चे चॅनेल आहे तुनळीवर दिल के करीब तिथे ह्या संस्थेच्या चालिका बाईंची मुलाखत आहे. तिथे सर्व डिटेल्स मिळतील.

९) काकुंकडे काही स्त्रीधन असल्यास ते लोन ठेवुन पैसे उभे करता येतील. घर / खोली स्वतःची घ्यायची असल्यास.

इट कँन बी डन बट यु हॅव टु एज स्मार्टली.

ज्यांना पुढील येणाऱ्या स्थिती शी स्वतः प्रतिकार करायचा आहे.
जसे ठरवू तसे होईल च ह्याची शाश्वती नसते.
येणाऱ्या कोणत्या ही अडचणी वर स्वतः मात करायची तयारी असावी लागते.
लांबून सल्ला देणारे हे कोणत्याच येणाऱ्या संकटात भागीदार बनत नाहीत.
सर्वात सोप.
तुम्ही आर्थिक मदत देवू शकता पण किती दिवस.
पूर्ण लाईफ?
तशी तयारी असेल तर त्या एकटे पण शरीर चालेल तो पर्यंत राहतील त्या नंतर वृद्धांचा सांभाळ करणाऱ्या संस्था.
हा मार्ग सर्वात उत्तम.
लाँग टर्म आर्थिक मदत करण्याची तयारी असणारे तुम्ही.
आणि येणाऱ्या अडचणी वर मात करण्याचा विश्वास असणारी तुमची नातेवाईक .
फक्त तुमच्या दोघींचा हा प्रश्न आहे.
सल्ले काय काही ही देता येतात..जबाबदारी थोडीच घ्यायची आहे

एका लांबच्या नात्यात असे उदाहरण पाहिले आहे. त्या बाई अशिक्षित परत तब्यतीने नाजूक. नवरा प्रचंड अब्युसिव्ह. मारहाण करायचा. नवऱ्याच्या स्वभावामुळे सासरचे कोणी मध्ये पडत नसे, लांब असत.
मुलीच शिक्षण व लग्न तसेच मुलाचं शिक्षण बाईंच्या भावाने करून दिले. भाऊ पाठीशी होता, आर्थिक बाजू त्याने सांभाळली पण त्या नरकातून बाहेर काढू शकला नाही तिला. . एखाद्या आश्रमात शिफ्ट करता येईल का असे मी आमच्या घरात सुचवून पाहिले पण मग तिच्या मुलांची लग्न कशी होतील म्हणून कोणी मान्य केले नाही.
मग आला कोरोना. आधी शिक्षणासाठी व मग नोकरीसाठी घराबाहेर पडलेला मुलगा घरून काम करू लागला. त्याच्या धाकाने मारहाण थाम्बली. नंतर नवरा आजारी पडला, सर्जरी झाली, शरीरात शक्ती उरली नाही. सेवा करायला बायको आहेच पण आता कुठे तिचे आयुष्य शांतमय झाले आहे

>>> अमा खूप छान सल्ले दिले आहेत तुम्ही सगळ्या बाजूने विचार करून
अगदी!! टोटल रिस्पेक्ट, अमा! Happy

अमांचा मुद्दा (१) हा सल्ला खूप आवडला. फक्त जितकी डोकी तितकी मते व सूचना. तेव्हा काका-काकूंच्या भल्या बुर्‍याने ज्यांना तोषिस पडते, फक्त त्यांना सामिल करा. बाकीचे बघे दूर ठेवा.
अमांचा मुद्दा (२) जर काकांना मानसिक व्याधी असेल तर त्यांना बरे करणे हे महा-चिकाटीचे काम असेल ते असे चटकन होणार नाही. काकूंनाच पदर खोचून सिद्ध व्हावे लागेल आणि खूप धीर (पेशन्स) ठेवावा लागणारे.
अमांचा मुद्दा (४) अति महत्वाचा मुद्दा आहे हा. काकूंचा इयरली चेक अप करुन घ्याच.
बाकी सर्वच मुद्दे व्यावहारीक आहेत.

अमांनी फार मोलाचे मार्गदर्शन केले आहे. कौतुकास्पद आहे.

आधी तर तुमचं कौतुक करते. आजच्या काळात सख्खा नाहीतर चुलत भाऊ बहिणीच्या विचार करतोय. माझ्या ओळखीच्या अशा साठीच्या जवळपासच्या बायका आहेत ज्या compromise करत आयुष्य काढताहेत मुलं (मुलगा/मुलगी)आपल्या आयुष्यात बिझी आहेत. तुमच्या दोघांच्या हा प्रॉब्लेम आहे तुम्ही सोडवा. काहीवेळा पालकही मुलांना सांगत नाहीत... ढकलत आहेत आयुष्य दोघंही..
माझ्या एका ७५ वर्षाच्या मावशीला दोन मुली. काका विक्षिप्त, कमी ऐकायला येतं. मावशीचंही वय झालंय तिची सहनशक्ती कमी झालीय. तिच्या दोन्ही मुली आलटून पालटून एकेकाला आपल्या घरी बोलावतात जेणेकरून दोघांनाही स्पेस मिळावी. तसं काही करता येईल तर बघा थोडे दिवस.
> अमा खूप छान सल्ले दिले आहेत तुम्ही सगळ्या बाजूने विचार करून
अगदी!! टोटल रिस्पेक्ट, अमा! Happy

अवांतर
कुटुंब व्यवस्था नष्ट होण्याचे आणि ग्रामीण अर्थ व्यवस्था नष्ट होण्याचे किती गंभीर परिणाम होवू शकतात त्याचे हे उदाहरण आहे.

हे फक्त एक उदाहरण आहे काहीच वर्षात घरोघरी असेच प्रॉब्लेम लोकांना येतील.
आजचे जात्यात उद्याचे सुपात आहेत.
पैसा सर्व काही देवू शकत नाही.
पैसा खूप असला की म्हातारपण नीट जाईल हे एक दिव्य स्वप्न आहे.
घरकाम करणारे प्रामाणिक भेटत नाहीत.
तुमची मालमत्ता हडपण्या साठी प्रतेक जन टपून असतो.
तुम्ही कमजोर झाला की आरामात ती हडप करता येते.
Complaint करायला पण कुठे जाण्या चे त्रान नसते.

Pages