भोसरी' मध्ये घरपोच डबा पोहोचवणाऱ्या लोकांची माहिती हवी आहे.
Submitted by रीया on 1 April, 2021 - 23:17
सध्या कोरोना च्या काळात अनेक जण घरी विलागीकरणात आहेत त्यांच्यासाठी आणि इतर ही पेशंट साठी घरपोच डब्बे पोहोचवणा ऱ्यांची माहिती एकत्र संकलित व्हावी म्हणून हा धागा.
माझे आई , बाबा आणि बहीण कोविड पोजिटीव्ह असून दवाखान्यात ऍडमिट होते. त्यांना 2 दिवसात डिस्चार्ज मिळेल. अशक्तपणा खूप असल्यामुळे घरी स्वयंपाक करण्याची ताकद त्यांच्यामध्ये नसणार तेंव्हा मला 'भोसरी' मध्ये घरपोच डबा पोहोचवणाऱ्या लोकांची माहिती हवी आहे.
मला स्पेशली नाश्ता पोहचवणारे लोकं हवे आहेत खरं तर कारण दुपारचे आणि रात्रीचे जेवण बहिणीच्या मित्र मैत्रिणी अरेंज करतील पण नाश्ता कुठून अरेंज होत नाहीये.
विषय:
शब्दखुणा: