कधी ,कधी सरतील ह्या भयानक विषाणूचे दिवस चार?
कधी ,कधी सरतील ह्या भयानक विषाणूचे दिवस चार?
भगवंता तुझ्या ह्या लेकरांना शक्तीची गरज आहे फार
आता या आभासी(virtual) दुनियेचा आला आहे कंटाळा
पोरंही विचारू लागली आहेत कोणती असती ती शाळा?
हा विषाणू जणू कली आहे या विचारात वेळ चाललाय व्यर्थ
भगवंता तुझ्या कल्की अवताराचे चे दाखव बरं सामर्थ्य
इतके तर कळाले धन,दौलत ,पद, पैसा निष्फळ आहे सर्व
त्यामुळेच तर उमगले माणसातला,धवल, खाकीतला देव
हे भगवंता,कित्येकांनी श्वास सोडला, कित्येकांचा घास पळाला
त्यामुळेच त्यांच्या जीवलगांचा रडून रडून डोळ्यांचा ही बांध फुटला