शहर

शहरात या

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 18 August, 2019 - 06:28

शहरात या
***********
कधीचा मी
शहरात या
तरीही
शहर हे
माझे नाही
जरी हे चेहरे
ओळखीचे सारे
तरी का इथे
डोळ्यात पहारे
माहित खड्डे
तोंडपाठ वळणे
ठरवून घडेना
परि ते थांबणे
देती कुणी त्या
तीरी इशारे
ओलांडण्या
पथ परी
येती शहारे
तू आहेस तिथे
मजला
हे ठाव जरी
बुडतोच दिन
रोजच्या अंधारी

डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
००

शब्दखुणा: 

या शहरात

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 13 July, 2019 - 13:30

या शहरात
********

येताच या शहरात
जळतात श्वास आत
मरणगंध घेवूनी
रोज जागते पहाट

वाहतात प्रेत सारी
संवेदना बोथटली
जीवनाच्या लत्करांनी
इंच इंच व्यापलेली

एक फक्त पोट इथे
जीवनाचा सूत्रधार
अस्तित्वाच्या संगरात
कत्तलींचा रोज वार

रोज थवे जल्लादांचे
फिरती बेभान इथे
पापण्या कापून निजे
रोज रोज स्वप्न इथे

राहतो इथे कशाला
विक्रांता का लाज नाही
हरवले काय तू ते
तुला तो अंदाज नाही

शब्दखुणा: 

शहर को नज़र का टीका (ग्रीस ९)

Submitted by Arnika on 17 November, 2018 - 17:01

चॉकलेट केकच्या धांदरटपणे कापलेल्या तुकड्यासारखं दिसतं हे शहर. वेगवेगळ्या शतकांचे एकावर एक चढवलेले नीटस, पण आता एकमेकात मिसळलेले थर. रेल्वे रुळांच्या आजुबाजूने मधेच भग्न बाजारपेठ दिसते. उंच सोसायट्यांच्या रानातून मान वर काढून बघणारं पार्थेनोनचं देऊळ दिसतं. कचकड्याच्या दागिन्यांची हातगाडी आद्रियानोस राजाने बांधलेल्या लायब्ररीसमोर दिसते. ओस पडलेल्या भिंतींवरच्या ग्रफ़ीटीपलीकडेच एखादं जुनं, कष्टाने जपलेलं चर्च दिसतं. एक पुरातन पेठ, तिच्यामागे रोमन पेठ, दोघींच्या मधे आजची पेठ आणि त्या वाटेत जिथे जिथे कोपरा मिळेल तिथे उपाहारगृह.

शहर...

Submitted by मी मुक्ता.. on 16 May, 2015 - 08:56

किती भरभर बदलत जातात शहरं..
अनोळखी होत जातात ..
झपाट्याने बदलण्याचा काळच असतो एकेक..
आणि मग नाहीच थोपवता येत आपल्याला काही..
हरवून जातात जुनी आपुलकीची ठिकाणं..
उन्मळून पडतात मुळापासून रुजलेल्या आठवणींचे वृक्ष..
नव्या गर्दीत नाहीसे होतात आपले सरावाचे रस्ते..
आणि जपून ठेवलेल्या खाणाखुणा कधी पडल्या हे तर कळतही नाही..
.
.
बघता बघता बदललं शहर..
अनोळखी झालं..
जिथं कधी काळी माझं अवघं विश्व नांदायचं..
हरवलं..
तुझ्या नजरेतलं माझं शहर..

शब्दखुणा: 

शहरातली ’समोवार’ जेव्हा बंद होत जातात..

Submitted by शर्मिला फडके on 6 April, 2015 - 00:26

’समोवार’ हे शहरातल्या एका रेस्टॉरन्टचं नाव असतं पण अनेकांकरता ते केवळ खाण्या-पिण्याचं ठिकाण नसतं. त्यांच्याकरता ते वैयक्तिक भावना गुंतलेलं एक ठिकाण असतं ज्यात आनंदाचे, दु:खाचे, जिव्हाळ्याचे, नैराश्याचे, उमेदीचे, यशाचे, अपयशांचेही असंख्य क्षण भरुन असतात. मुंबईसारख्या गजबजाटी, कोलाहल भरुन राहिलेल्या शहरांमधे अशीही काही निवांत बेटं असतात ज्यांचं नाव ’समोवार’ असतं.
--

शहर - ३ (स्फुट)

Submitted by उद्दाम हसेन on 3 September, 2013 - 15:03

तुझा विचार मनात येतो.
तो कधी गेलेला असतो ?

सवय. हं !!
पृष्ठभाग आलबेल असेल कि त्याखाली काय खदखदतंय तिकडे डोळेझाक करणं जमतं सवयीने.
पण खदखद राहतेच ना..

बाहेर बरं वाटतं.
दिवसा चकाचक सगळं आणि रात्री नेत्रदीपक रोषणाई.

पण या शहराच्या खाली एक शहर आहे.
या शहराची घाण वाहणारं.

आताशा ऐकवणार नाहीत वर्णनं.
पावसाळ्यात मेनहोल मध्ये तुंबून वाहू लागलं कि अस्तित्व दाखवतं.
तट्ट फुगून आलेल्या घुशी, कीडे, रोगजंतू
भटकी जनावरं...
बस्स !

मग पिवळ्या रेनसूट मधली पथकं आली कि हायसं वाटतं.

शब्दखुणा: 

कालाय तस्मै नम: !

Submitted by ratnakari on 1 April, 2013 - 03:08

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आटपाट नगरी जवळच एक आयटीपार्क नावाचं शहर होतं . शहर मोठ टूमदार . मोठ्या मोठ्या इमारती, सुंदर चौपदरी रस्ते. देशाच्या राजानेही या नगरीसाठी बरयाच सोयी-सुविधा मोफत दिल्या होते. करआकारणी सवलतीच्या दारात केली होती. कामगार कायदे पुरातन असल्याने या नगरीला त्यातून सुट देण्यात आली . ह्या नगरीचा विकास होण्यात एकंदर राजाही प्रयत्नशील होता. एकूणच सगळं ऐटीत चालल होतं . शहरातले लोक सुजाण , सुशिक्षित आणि कामसू होते. त्यांच कामही बौद्धिक आणि आवडीचे असे होते. रोज सकाळी शहरातली लोक आपल्या आपल्या संस्थेत जात. प्रत्येक संस्थेत त्यांना चांगली वागणूक मिळत असे.

आपलं शहर

Submitted by Vini on 18 October, 2012 - 10:42

मायबोलीवर लेखनाचा पहिलाच प्रयत्न

खरंतर हे आपलंच शहर असतं,इथले ट्राफिक जॅम,खड्डे ,गर्दी ,छोटे रस्ते,असंख्य वन वे अशा सगळ्या गोष्टीं सहीत! पण या गोष्टी कधीच प्रकर्षाने जाणवल्या नसतात. एकेकाळी अनोळखी असलेल्या या शहरात एन्ट्री केल्यावर पाहता पाहता कधी हे शहर आपलंच होऊन गेलं हे कळलं देखील नसत. इथला पाऊस,इथला हिवाळा ,शॉपिंग करता प्रसिद्ध असलेल्या गल्ल्या ,ऐतिहासिक वाडे ,स्वतःची ओळख जपलेली भाषा , पाट्या ,शहराच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत विखुरलेली संकेतस्थळ,कॉफी पिण्यापासून ते ऑफिस ची पार्टी अरेंज करण्यासाठी भटकलेली हॉटेल्स हे सगळ आपलंच ..

शब्दखुणा: 

तुझी खबर (तरही)

Submitted by आनंदयात्री on 12 July, 2011 - 00:31

"खोल खोल आतवर तुझी नजर" या तरहीसाठी माझा सहभाग -

खोल खोल आतवर तुझी नजर
पोचते तिथे जिथे तुझेच घर

आसवांत वाहिल्या तुझ्या खुणा
साचले रूमालभर तुझे शहर!

विरह वाढता रडायचीस तू
(मी असायचो उगाच थेंबभर)

आठवांत राहती जुन्या व्यथा
सांग मग पडेल का तुझा विसर?

चालतो तसेच पाय ओढुनी
वाट हरवली कधीच दूरवर

जीवना तुझा लळाच लागला
मरणही तुझीच वाटते कुसर

तू निवांत वाच एकदा कधी
मी तुझेच पत्र अन् तुझी खबर

- नचिकेत जोशी

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - शहर