सूर्यास्त
सुवर्णदुर्ग, हर्णे येथे काढलेले सूर्यास्ताचे छायाचित्र.
.
१)
.
2)
.
3)
.
4)
.
५)
.
6)
.
7)
.
8)
सुवर्णदुर्ग, हर्णे येथे काढलेले सूर्यास्ताचे छायाचित्र.
.
१)
.
2)
.
3)
.
4)
.
५)
.
6)
.
7)
.
8)
क्रूझवर आल्यापासून सूर्यास्त बघायचं व्यसनच लागलय! काय मजा मजा असते, रोजचा सूर्यास्त म्हणजे रोजची नवीन नवीन मेजवानी मनाला! समोर डोळ्यांना सूर्यास्त दिसतो तो वेगळा, शिवाय मन:चक्षूंना दिसतो तो आणि वेगळाच! डोळ्यांना फक्त दिसतो, पण रोजच्या आयुष्यातला सुखद गारवा, त्यातच बसलेला एखादा चटका, त्याची जाणवणारी हुळहुळ, कुणीतरी त्यावर घातलेली फुंकर किंवा कुणीतरी त्यावर अजून जोरात घातलेला घाव या सगळ्यांची त्या चक्षूंना बाधा होते आणि त्या सगळ्याला डोळे वाट मोकळी करून देतात!
संध्याकाळ झाली का गच्चीत जाऊन सूर्यास्त पहायचा त्याने पायंडाच घातला होता. एकदा त्याला मित्राने विचारल काय करतोस रे तो सूर्यास्त पाहून?
तो म्हणाला, “ कोडं सोडवत असतो मी एक”
मित्र : “कसलं कोडं ?”
तो, “ तू कधी निरखून पाहिल आहेस सुर्यास्ताला? जाता जाता का होईना किती रंगांची उधळण करून जातो तो, मी जेंव्हा तो सूर्यास्त बघत असतो ना, तेंव्हा तो सूर्य क्लाउडे मोनेट बनतो आणि त्या क्षितिजावरच्या मोकळ्या कॅनव्हास वर किरणांच्या कुंचल्यातून रंग सांडून स्वतःच एक मस्त सूर्यास्ताचा लँडस्केप चित्तारतो.
मस्कत येथील सूर्यास्त...कुरुम बीच
समुद्राचे सन्थ पाणी आणि सूर्यास्त...रन्गान्ची निसर्गाने केलेली मनसोक्त उधळण..
कडक उन्हामधे तेव्ह्ढाच काय तो विरन्गुळा ....
आकाशगंगा
पाहीली मी एकदाची फिरुनी ती आकाशगंगा
मंद्रशीतल नादलहरी खुलवून जाती अंतरंगा
पाहता पाहिला तो सूर्य जाता मावळूनी
पक्षी गेले निजघराला ऊन त्याचे अावरूनी
श्यामवर्णी नभाची नीलकांती पारदर्शी
एक झाला गौरप्रभु ज्या सर्वगामी सागराशी
दिव्य व्योमाची निळाई ओसरूनी गेली जशी
गाव अाला तारकांचा पाहण्या पृथ्वी अशी
कृष्णवदनी गगन होता हर्षवेगे सज्ज झालो
दूरदर्षी जोडून नेत्रा अमृताचे पूर प्यालो
दर्षिला तेजस्वी गुरुराज सोबत सौंगडी
पृथ्वी नाही विश्वकेंद्री सांगते जी चौकडी
वेध घेऊनी मृगाचा गर्भोदरी अवलोकीले
तरल धूसर मेघजाली चार हीरक जन्मले
मोडवेना निजसमाधी अनिवार तरी होतेच जाणे
वाळवंटातील संध्यारंग