वाळवंट
Submitted by मून on 12 March, 2013 - 22:41
वाळवंटातुन चालत आहे कधिचा
पार करायचा मनसुबा आहे.
चालुन चालुन थकलो आहे,
कुणीतरी पाणी द्या.
जीर्ण काया, राकट त्वचा बघुन
घाबरु नका, मी निरुपद्रवी आहे.
खुणावत आहे चांदणी मजला
म्ह्णुनच चालत आहे सरळसोट
डावीकडे पाणी दिसले होते
वळलो नाही पण, मॄगजळच असेल.
तहान, भू़क यांनि साथ सोडली नाहि कधिहि,
भेटुन कुणीतरी अलिंगन द्या.
मेलोच कधि चालता चालता येथे,
लिहुन ठेवा "याने प्रयत्न केला होता".
विषय:
शब्दखुणा: