नाकासमोर पाहून मी आपल्या सरळ वाटेनं जात होतो. जाता जाता एका कोरड्या ठक्क नाल्यातून पाखरं उडाली. अरेच्या, इथं पाणी आहे? मी थांबून नाल्यात उतरलो. रस्त्यावरून दिसणार्या पहिल्या वळणाशी आलो. पुढं नाला वळून डावीकडं गेला होता. इथं वीसेक फूट अंतरावर पाणी पाझरून पात्रात छोटं डबकं झालं होतं. वर मोवईनं सावली धरली होती. हिवाळा सरत आला की मोवई फुलावर येते. चैत्राच्या आजू-बाजूला तिची फळं पिकू लागतात. पानझडीमुळं द्राक्षांचे घोस लोंबावेत असे लिंबोळीसारख्या फळांचे फांदी-फांदीला घोस लगडलेले दिसतात. मग बहू पाखरांची इथं चंगळ होते.
- फुलपाखरू
![IMG_6557 - Copy.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u29285/IMG_6557%20-%20Copy.JPG)
- फुलपाखरू
![IMG_6560 - Copy - Copy (2).JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u29285/IMG_6560%20-%20Copy%20-%20Copy%20%282%29.JPG)
- फुलपाखरू
![IMG_6559 - Copy.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u29285/IMG_6559%20-%20Copy.JPG)
- फुलपाखरू
![IMG_6561.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u29285/IMG_6561.JPG)
- फुलपाखरू
कॅनडामधली व्हँकुव्हर ही माझी आवडती जागा. शांतता हवी असेल भटकायला तर मस्त निसर्ग. गर्दी, दुकानं, गजबज आणि मुख्य म्हणजे विविध वंशाची, विविध भाषा बोलणारी लोकं, खाद्यप्रकार एकूणच एथनिक डायव्हरसीटी अनुभवायची असेल तर मस्त व्हायब्रन्सी असलेली सीटी. व्हँकुव्हर पासून साधारण दीडतासाचा बोटीचा किंवा इथल्या भाषेत फेरीचा प्रवास करून गेलं की येतं व्हँकुव्हर आयलंड. हा प्रवास देखील एकदम भारी. आपल्या गाड्या ड्राईव्ह करत फेरीमधे चढवून पार्क करायच्या आणि मग फेरीच्या वरच्या मजल्यांवर किंवा बाहेर डेकवर बसून प्रवास. ह्या व्हॅकुव्हर आयलंड वरच्या व्हीक्टोरीया शहराजवळचं 'बुचार्ट गार्डन' ही अशीच एक भन्नाट जगा.
तुम्हाला कोणाला सावंतवाडीला मिळणारी लाकडाची खेळणी आठवतात का? त्या खेळण्यात एक बदक असायचं, विविध रंगांचं. स्प्रींगमुळे त्याची मान हलायची.... ते बदक म्हणजे 'वुड डक' !
उत्तर अमेरिकेतल्या अनेक पानथळीच्या जागी हे वुड डक्स आपला संसार थाटतात. त्यातले काही स्थलांतरही करतात.
वुड डक हा एक अतिशय देखणा, रंगांची मुक्त उधळण असलेला पक्षी. थोडासे लाजाळू, स्वतःला सांभाळून असणारे हे वुडडक्स म्हणजे फोटोग्राफीसाठी पर्वणीच !
या घरात रहायला आल्यापासून सकाळी उठून लिविंग रुममध्ये आलं की समोरच सुर्योदय दिसतो मला. रोजचे नवे विभ्रम! कधी कधी खूप मनोरम देखावा असेल तर फोटोही काढले जातात. आताशा म्हणजे गेल्या वर्षीपासून व्हॉट्सअॅम्प ग्रुपवर 'गुड मॉर्निंग'च्या मेसेज बरोबर रोज सुर्याचाही फोटो टाकण्याची सवयच झाली आहे. ग्रुपवरची मंडळीही वाट बघत असतातच.
माझ्या या घरात हिवाळ्यात सूर्य नेमका समोरच उगवतो. अर्थात मुंबईचा हिवाळा तो! उन्हं चांगलीच तापतात कधी कधी. उन्हाळ्यात मात्र सूर्य एक वळण घेतो आणि उन्हाळ्याची सकाळ बर्यापैकी सुसह्य करतो.
'चांदोबा' मासिकातील चित्रे फारच भन्नाट असायची. एक अदभूत जग होतं ते. वेगळ्याच प्रकारचे पेहराव, दागिने, चेहर्याची ठेवण असलेली पात्रं त्या चित्रांतून दिसत. त्याचबरोबर देवादिकांनी घातलेले मोठ्ठे आणि विविध प्रकारचे फुलांचे हार असत. चित्रातल्या बायका भरपूर गजरे माळलेल्या दिसत. चांदोबातील या चित्रांवर दाक्षिणात्य ठसा होता.
तेच ते 'चांदोबा'तले हार माटुंग्याच्या बाजारात बघायला मिळतात. अतिशय आकर्षक आणि नक्षीदार रचना केलेले हे हार बघून त्या कलाकारांचं कौतुकच वाटतं. काही हार तर खास दाक्षिणात्य स्टाईलचे - हे भलेमोठ्ठे. माणसापेक्षाही जास्त उंचीचे.
फोटोसर्कल सोसायटीच्या 'आविष्कार' महापौर छायाचित्र स्पर्धेतल्या प्रकाशचित्रांचे प्रदर्शन कलाभवन, ठाणे येथे आहे.
शक्य असेल त्या सगळ्यांनी नक्की तिथे जाऊन या. अॅक्शन, हिस्टोरिकल प्लेसेस, शाळा या सगळ्याचे फोटो बघण्यासारखे आहेतच पण विषेशकरुन 'टेबलटॉप' या विषयात मधे खुप छान प्रकाशचित्रे आहेत.
जागा - कलाभवन, बिगबझार जवळ, कापुरबावडी, ठाणे
वेळ - २२ऑक्टो ते २७ ऑक्टो. सकाळी १०:०० ते संध्याकाळी ७:००
माझा 'उत्तेजनार्थ' पारितोषिक विजेता फोटो.
बाप्पा मोरया!! ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्व मायबोलीकरांना सप्रेम नमस्कार!
घरी बाप्पाची प्रतिष्ठापना केलीत ना? त्याच्यासाठी सुंदर सजावट, आरास हे ही केले असेलच.. घरुन तोंडभरुन कौतुकही अनुभवले असेल, हो ना? मग आपल्या मायबोलीच्या परिवारालाही ह्या आनंदात सामील करुन घ्या.. मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनाही तुमचं कौतुक करण्याची संधी द्या. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मग, बाप्पाच्या कल्पक मूर्तींसोबतच त्याची आरास आणि सजावट यांचे फोटो आणि यासोबतच सजावट करतांना काय नवीन विचार केलात? पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी, संवर्धनासाठी काही नवीन कल्पना आणि त्यांची अंमलबजावणी केलीत का? हे ही कळवा. कळवाल ना? तुमच्या प्रतिसादांची आतुरतेने वाट पहात आहोत.