“नमन नटवरा ” - नाट्यसंगीताची एक सुरेल संध्याकाळ
नमस्कार मंडळी,
बृहन महाराष्ट्र मंडळ २०१७ च्या अधिवेशनानिमित्त जमणाऱ्या असंख्य कला आणि संगीत प्रेमी रसिकांसाठी IPAP Seattle घेऊन येत आहे मर्मबंधातली एक ठेव अर्थात ,
“नमन नटवरा ”
नाट्यसंगीताची एक सुरेल संध्याकाळ.
ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही उजाळा देणार आहोत, संगीत नाट्य परंपरेच्या दैदिप्यमान कारकिर्दीतील काही अविस्मरणीय क्षणांना व काही हृदयंगम नाट्यपदांना. आपल्या साक्षीने संगीत रंगभूमीची काही सुवर्णपाने उलघडण्याचा प्रयत्न करणार आहोत.