चला फोटो काढूया : कोणता कॅमेरा वापरू ?
नमस्कार,
नुकतीच एका प्रचि धाग्यामध्ये फोटो काढण्याबद्दल एक स्वतंत्र धागा असावा अशी चर्चा झाली त्यामुळे हा धागा काढत आहे. आधीपासून असा स्वतंत्र धागा असल्यास मला त्याची कल्पना नाही.
मी एक हौशी फोटोग्राफर असून गेली काही वर्षे निरनिराळी उपकरणे वापरून फोटो काढत आहे. यात कॉम्पॅक्ट डिजिटल कॅमेरा, DSLR आणि सध्या मोबाईल फोन हि उपकरणे येतात.
मला नवीन मोबाईल घ्यायचा आहे. मुख्य उद्देश प्रवासादरम्यान किंवा फिरायला गेल्यावर सहज आणि सुलभ व चांगल्या दर्जाची फोटोग्राफी करता येणे हा आहे. दर वेळेस कॅमेरा सोबत नेणे शक्य नसते. अशा वेळेस एखादे सुंदर दृश्य टिपता येत नाही.
कृपया 30 हजार पर्यंत बजेट असणारा फोटोग्राफी साठी उपयुक्त असा मोबाईल सुचवा.
Thanks in Advance !
माबोकरांचे प्रचि दालन..
अर्थात सबकुछ फोटोग्राफी..
प्रकाश-चित्रे : मायबोली आर्ट गॅलरी..
मायबोलीच्या गणेशोत्सव स्पर्धेत रंगाची जोडी या प्रकाशचित्रण उपक्रमाला छानंच प्रतिसाद मिळाला..
रोज वेगळ्या रंगाची जोडी असल्यामुळे रोज नवीन धागा असायचा.
अनेक मायबोलीकर छान फोटोग्राफर आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
या आधी फोटो न टाकणाऱ्या अनेक सभासदांनीही नवीन आहोत म्हणत छान फोटो टाकले आणि सगळ्यांनीच त्यांच कौतुक केलं, प्रतिसाद देऊन हुरुप वाढवला.
नमस्कार,
फोटो सर्कल सोसायटी, ठाणे गेले दोन वर्ष फोटोग्राफीला वाहीलेला मराठी दिवाळी अंक 'फ फोटोचा' प्रकाशित करत आहे. २०१४ हे या दिवाळी अंकाचे तिसरे वर्ष. दरवर्षी या अंकाचे प्रकाशन ठाणे महापौर चषक स्पर्धेच्या बक्षिस समारंभाच्या दिवशी ठाणे महापौरांच्या हस्ते होते. ( यावर्षी निवडणुकांच्या कारणास्तव बक्षिस समारंभ उशिरा झाला आणि त्यामुळे या अंकाचे प्रकाशनही आम्ही दिवाळीत करु शकलो नाही, त्याबद्दल दिलगीर आहोत)
दर आठवड्याला एक वेगळा विषय देऊन त्यावर फोटोग्राफी स्पर्धा घेता येईल का इथे ?
त्यामुळे फोटोग्राफर्सना प्रोत्साहनही मिळेल आणि आपल्यालाही वेगवेगळ्या फोटो पाहता येतील.
ज्येष्ठ सभासदांनी कृपया यावर विचार करावा.