माबोकरांचे प्रचि दालन..
अर्थात सबकुछ फोटोग्राफी..
प्रकाश-चित्रे : मायबोली आर्ट गॅलरी..
मायबोलीच्या गणेशोत्सव स्पर्धेत रंगाची जोडी या प्रकाशचित्रण उपक्रमाला छानंच प्रतिसाद मिळाला..
रोज वेगळ्या रंगाची जोडी असल्यामुळे रोज नवीन धागा असायचा.
अनेक मायबोलीकर छान फोटोग्राफर आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
या आधी फोटो न टाकणाऱ्या अनेक सभासदांनीही नवीन आहोत म्हणत छान फोटो टाकले आणि सगळ्यांनीच त्यांच कौतुक केलं, प्रतिसाद देऊन हुरुप वाढवला.
आपल्यापैकी अनेक जण उत्तम फोटो काढतात, त्या फोटोंचे विषयही खूप निरनिराळे असतात.
इतरांचे चांगले फोटो पाहून डोळ्यांना, मनाला बरं तर वाटतंच पण काही शिकायलाही मिळतं, नवीन संकल्पना कळतात.
त्याच ठिकाणचा किंवा त्याच विषयावर आपण काढलेलाही एखादा छान फोटो असतो.
तर असे सर्व फोटो एका जागी, एका ठिकाणी बघायला मिळावेत यासाठी हा धागा..
जे प्रकाशचित्र आपण देऊ त्या प्रत्येकाबद्दल एखादी आठवण म्हणा, ठिकाणाबद्दल म्हणा, कशा प्रकारे फोटो काढला यावर चार अथवा जास्त ओळीत माहिती दिली तर अति उत्तम.
चांगल्या चांगल्या फोटोग्राफर्सनी काही टीप्स दिल्या, कॅमेराबद्दल, सेटिंग्ज बद्दल माहिती दिली तर सोन्याहून पिवळं..
फोटोग्राफीच्या काही टिप्स देणारी, मायबोलीकर अवल यांच्या Simple Photography ह्या ब्लॉगची लिंक : https://photographyforcommonpeople.blogspot.com/?m=1
तेव्हा चला मायबोलीकरांनो.. आपापली प्रकाशचित्रं इथे द्यायला सुरुवात करा..
नवोदितांच्या चांगल्या फोटोंचं, आठवणींचंही स्वागतच आहे..
मसाई मारा- केनया : निळी जांभळी सायंकाळ..
जंगलातल्या पार्क राऊंडनंतर जंगललॉजवर परतताना संध्याकाळ गडद होत गेली. आणि एक अविस्मरणीय दृश्य डोळ्यासमोर उभं राहिलं;
मसाईमारातला सूर्यास्त.
सर्व साधारणत: आपल्याकडे सूर्योदय आणि सूर्यास्त हे दोन्ही केशरी रंग छटांत होतात पण मसाईमाराच्या स्थानानुसार किंवा काय माहित नाही पण सूर्यास्तावेळी निळ्या रंगाच्या छटा दिसतात.
विस्तीर्ण गवताळ कुरण, घननिळी संध्याकाळ आणि मसाईमारातील Typical अकॅशियाच्या विशिष्ट छत्रीसारख्या (Topiary) आकारामागे मावळणारा सूर्य.
टीप : प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे.
सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
सर्व प्रकाशचित्रे स्वतःची असावीत. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा- https://www.maayboli.com/node/47635?page=4
या धोरणाचे कृपया पालन करावे..
तसेच "ज्यांना मायबोली.सीसी या किंवा अशा उपक्रमात भाग घ्यायचा असेल त्यानी कृपया हा फोटो मी प्रताधिकार मुक्त करत आहे असे फोटोखाली लिहा." अशी वेमांची सूचना आहे..
त्याचा विचार व्हावा..
(मी या धाग्यावरचे माझे प्रचि प्रताधिकार मुक्त करित आहे..)
आहाहा काय सुंदर
आहाहा काय सुंदर फोटो निरु
वा मस्त धागा। छान छान फोटो बघता येतील आता इथे। थँक्यु निरु
मस्त धागा. डोळ्यांचे पारणे
मस्त धागा. डोळ्यांचे पारणे फिटणार . वरचा फोटो सुरेSSख !
निरु, तुमचे सगळेच फोटो लाजवाब असतात.
अहाहा निरु. तुमच्या फोटोंमुळे
अहाहा निरु. तुम्ही काढलेल्या फोटोंमुळे मन अगदी तृप्त होतं. छान धागा.
मी अधून मधून प्रचि देईनच..
मी अधून मधून प्रचि देईनच..
पण आपण सर्वांनीही आपापले प्रचि द्यावेत हे धाग्याचे मुख्य प्रयोजन..
सर्वांच्या सहकार्याने, कधी कंटाळा आला तर हा विरंगुळा म्हणून किंवा स्ट्रेस बस्टर धागा झाला तर मजा येईल..
कल्पना खरंच खूप छान आहे. मस्त
कल्पना खरंच खूप छान आहे. मस्त मस्त फोटो पहायला मिळतील.
एक सुचवू का? एकेका विषयावर एकेक धागा काढाल का? म्हणजे पक्षी, झाडं, उत्सव, आकाश वगैरे. झब्बू असतो तसंच. म्हणजे नीट वर्गीकरण होईल. नंतर शोधायलाही बरं पडेल. फोटो टाकायलाही सुचेल.
सुंदर फोटो निरु!
सुंदर फोटो निरु!
फोटो टाकताना फोटोची साईझ आणि
फोटो टाकताना फोटोची साईझ आणि रिझोल्युशन किती असावे लागते.
<<फोटो टाकताना फोटोची साईझ
<<फोटो टाकताना फोटोची साईझ आणि रिझोल्युशन किती असावे लागते.>>
@ बोकलत, गुगल फोटोवरुन Embeded Link देणार असाल तर फोटो फाईल साईझ आणि रेझोल्युशनचे बंधन नाही.
फक्त Width 650 किंवा 700 ठेवली (आणि Aspect Ratio As It Is) तर मायबोलीच्या पानाच्या रुंदीत फोटो छान बसतो.
मायबोलीवरच्या खाजगी जागेत साठवून (सध्या ७० MB Storage Limit) अपलोड करणार असाल तर फाईल साईझ मर्यादा मला वाटतं १५० KB ची असावी.
<<<एक सुचवू का? एकेका विषयावर
<<<एक सुचवू का? एकेका विषयावर एकेक धागा काढाल का? म्हणजे पक्षी, झाडं, उत्सव, आकाश वगैरे. झब्बू असतो तसंच. म्हणजे नीट वर्गीकरण होईल. नंतर शोधायलाही बरं पडेल. फोटो टाकायलाही सुचेल.>>>
@ वावे,
खरं तर मला सुरुवातीला विषयवारच धागे काढायचे होते.
पण प्रत्येक विषयाला तेवढा प्रतिसाद मिळेल का..? या विचाराने सुरुवात म्हणून हा धागा काढलाय.
आणि इथे थोडी विषयांची सरमिसळ झाली तर ती वेगवेगळ्या विषयांवरच्या प्रचिंची भेळ कदाचित जास्त चटकदार बनेल.
त्यात वैविध्य आल्याने एकसुरीपणा येणार नाही. बघणाऱ्यांनाही कदाचित आवडेल..
(No subject)
पुण्यातला एक सुर्यास्त. सुर्यास्त नेहमीच छान दिसतो पण पावसाळ्यात, थोडे ढग आकाशात असले की काही औरच मजा असते.
खरं तर प्रत्येकाने आपापल्या
खरं तर प्रत्येकाने आपापल्या फोटोची पार्श्वभूमी, खासियत, आठवण सांगितली तर नुसत्या फोटोंच्या संमेलनाऐवजी आठवणींचंही संमेलन भरेल.. आणि ती आठवण दुसऱ्या एखाद्याला त्याची आठवण इथे टाकायला प्रवृत्त करेल.. बघू काय होतंय..
ओके धन्यवाद.
ओके धन्यवाद.
अवल, तुमचा या धाग्यावरचा
अवल, तुमचा या धाग्यावरचा पहिलाच फोटो सुंदर होता.
पण आता दिसत नाहीये. कृपया पुन्हा अपलोड करा ना.
चार ओळी नसल्या तरी चालतील. असल्या तर घी मे शक्कर..
>>एक सुचवू का? एकेका विषयावर
>>एक सुचवू का? एकेका विषयावर एकेक धागा काढाल का? म्हणजे पक्षी, झाडं, उत्सव, आकाश वगैरे. झब्बू असतो तसंच. म्हणजे नीट वर्गीकरण होईल. नंतर शोधायलाही बरं पडेल. फोटो टाकायलाही सुचेल.
मला आवडलीय ही सूचना..... आमच्या ऑफिसच्या फोटोग्राफी क्लबमध्ये आम्ही असेच करायचो..... दर महीन्याला एक नवीन थीम आणि महीन्याच्या शेवटच्या फ्रायडेला त्या थीमनुसार काढलेल्या फोटोंचे कॅफेटेरिया मध्ये प्रदर्शन!
<<<आमच्या ऑफिसच्या फोटोग्राफी
<<<आमच्या ऑफिसच्या फोटोग्राफी क्लबमध्ये आम्ही असेच करायचो..... दर महीन्याला एक नवीन थीम आणि महीन्याच्या शेवटच्या फ्रायडेला त्या थीमनुसार काढलेल्या फोटोंचे कॅफेटेरिया मध्ये प्रदर्शन!>>>
मलाही थीमनुसार फोटोग्राफी आवडेल. पण सुरुवातीला थोडा रिस्पॉन्स पाहू या असं वाटतं. गणेशोत्सवात जो माहोल असतो तो कायम न टिकावा..
आणि मायबोली हे Online संस्थळ असल्याकारणाने तुमच्या ऑफिस सारखं फोटोंचे प्रत्यक्ष प्रदर्शनही शक्य नाहीये..
हवं तर धागा एकच ठेवून सध्या
हवं तर धागा एकच ठेवून सध्या सूर्योदय आणि सूर्यास्त ही थीम ठेवू या..
पुण्यापासून जवळच कवडीपाट
पुण्यापासून जवळच कवडीपाट म्हणून एक ठिकाण आहे. तिथे मित्रांबरोबर बर्डवॉचिंगला गेलो असतानाचे काही फोटो!
एक सोनेरी संध्याकाळ
एक सोनेरी संध्याकाळ
कोचीन, केरळ
आहाहा सुंदर!! सूर्यास्त अफाट
आहाहा सुंदर!! सूर्यास्त अफाट आहेत.
भांडुप खाडीतले पक्षी
भांडुप खाडीतले पक्षी बघण्यासाठी, खरं तर टिपण्यासाठी लवकर उठून प्रस्थान केलं होतं..
कारणं दोन..
१.. खादाड पक्षी जागे झाल्यावर जरा वेळातच खायला सुरुवात करणार आणि त्यासाठी मॅन्ग्रोव्हज् मधून बाहेर येणार. आणि
२.. ओहोटीच्या वेळीच त्यांना खाद्य टिपणं सोपं पडतं ती ओहोटी त्या रविवारी पहाटे होती..
आम्हीही सुदैवाने सूर्य उगवता उगवता पोहोचलो आणि मग वाढलेल्या गवतामधून हा सूर्योदय टिपता आला..
स्वरुप, मनिम्याऊ... सुंदर
स्वरुप, मनिम्याऊ... सुंदर प्रचि...
स्वरुप,मनिम्याऊ, निरु मस्त
स्वरुप,मनिम्याऊ, निरु मस्त फोटो
वा, सगळे फोटो सुंदर आहेत एकदम
वा, सगळे फोटो सुंदर आहेत एकदम
ढगांतून सूर्यकिरण खाली येतात
ढगांतून सूर्यकिरण खाली येतात हे दृष्य मोबाइल क्याम्राने कुणाला मिळाले आहे का? आता चांगले क्याम्रावाले मोबाईल आलेले आहेत. पूर्वी फक्त डिएसएलारनेच शक्य होतं.
लेखाचा उद्देश आवडला. आणि विषयाची वर्गवारी हवीच.
मायबोली डॉट सीसी उपक्रम चालू केला होता तो फक्त प्रताधिकारमुक्त चित्रं देण्यासाठी होता. तो आता बंद आहे.
बंगळूरचा सूर्योदय
बंगळूरचा सूर्योदय
जगातल्या विविध देशांमधले सूर्योदय-सूर्यास्त एकापाठोपाठ एक दाखवण्याच्या एका उपक्रमात मी भाग घेतला होता. तेव्हा खूप सुंदर सूर्योदय आणि सूर्यास्त पाहिले. त्यातलाच हा एक
खरं तर प्रत्येकाने आपापल्या
खरं तर प्रत्येकाने आपापल्या फोटोची पार्श्वभूमी, खासियत, आठवण सांगितली तर नुसत्या फोटोंच्या संमेलनाऐवजी आठवणींचंही संमेलन भरेल.. आणि ती आठवण दुसऱ्या एखाद्याला त्याची आठवण इथे टाकायला प्रवृत्त करेल..>> +१२३४५
माझ्या आठवणीतला आर्चेस नॅशनल पार्क मधला सुर्योदय..
सगळे फोटो सुंदर आहेत एकदम....
सगळे फोटो सुंदर आहेत एकदम....
होसुरचा सूर्यास्त.
रोज संध्याकाळी बाल्कनीत बसून सूर्यास्त बघणे माझे आवडीचे काम...वेगवेगळ्या रंगाची उधळण होत असते रोजच खास करून पावसाळ्यात.
कधी विसरले तर मुले आठवण करतात 'मा, लवकर बघ आकाशात किती छान रंग आहेत.'मग आम्ही पटकन बाल्कनीत जाऊन बसतो.
कृपया सगळ्यासाठी एकच धागा नको
कृपया सगळ्यासाठी एकच धागा नको. ही सूचना मी फक्त याच धाग्यावर नाही तर वेळोवेळी इतरही धाग्यांवर केली आहे.
थीमप्रमाणे वेगवेगळे धागे सुरु करा. ज्यामुळे नंतर पाहणार्याला सोपे होईल.
>खरं तर मला सुरुवातीला विषयवारच धागे काढायचे होते.
>पण प्रत्येक विषयाला तेवढा प्रतिसाद मिळेल का..? या विचाराने सुरुवात म्हणून हा धागा काढलाय.
एकदम सगळे विषय सुरु करूच नका. हवे तर दर महिन्यात एक नवीन थीम घ्या आणि नवीन धागा सुरू करा.
प्रतिसाद न मिळणे हा ही खरतर एक प्रतिसाद असतो. तुमच्यातला कलाकाराला काही विषय / काही फोटो कितिही आवडत असतील तरी सगळेच विषय मायबोलीवरच्या वाचकांना आवडतीलच असे नाही. त्यामुळे तुम्हाला कुठल्या विषयावरचे फोटो लोकप्रिय होतात याचाही अंदाज येतो.
तुमची आताची थीम ठरली असेल तर वर शीर्षकात तसा बदल करा.
ज्यांना मायबोली.सीसी या किंवा
ज्यांना मायबोली.सीसी या किंवा अशा उपक्रमात भाग घ्यायचा असेल त्यानी कृपया हा फोटो मी प्रताधिकार मुक्त करत आहे असे फोटोखाली लिहा.
<<एकदम सगळे विषय सुरु करूच
<<एकदम सगळे विषय सुरु करूच नका. हवे तर दर महिन्यात एक नवीन थीम घ्या आणि नवीन धागा सुरू करा.
प्रतिसाद न मिळणे हा ही खरतर एक प्रतिसाद असतो. तुमच्यातला कलाकाराला काही विषय / काही फोटो कितिही आवडत असतील तरी सगळेच विषय मायबोलीवरच्या वाचकांना आवडतीलच असे नाही. त्यामुळे तुम्हाला कुठल्या विषयावरचे फोटो लोकप्रिय होतात याचाही अंदाज येतो.
तुमची आताची थीम ठरली असेल तर वर शीर्षकात तसा बदल करा.>>>
वेबमास्टर, सूचनेबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल मनापासून धन्यवाद..
आपल्या सूचनेनुसार शिर्षकात बदल करतोय..
_/\_ _/\_
Pages