माबोकरांचे प्रचि दालन..
अर्थात सबकुछ फोटोग्राफी..
प्रकाश-चित्रे : मायबोली आर्ट गॅलरी..
मायबोलीच्या गणेशोत्सव स्पर्धेत रंगाची जोडी या प्रकाशचित्रण उपक्रमाला छानंच प्रतिसाद मिळाला..
रोज वेगळ्या रंगाची जोडी असल्यामुळे रोज नवीन धागा असायचा.
अनेक मायबोलीकर छान फोटोग्राफर आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
या आधी फोटो न टाकणाऱ्या अनेक सभासदांनीही नवीन आहोत म्हणत छान फोटो टाकले आणि सगळ्यांनीच त्यांच कौतुक केलं, प्रतिसाद देऊन हुरुप वाढवला.
आपल्यापैकी अनेक जण उत्तम फोटो काढतात, त्या फोटोंचे विषयही खूप निरनिराळे असतात.
इतरांचे चांगले फोटो पाहून डोळ्यांना, मनाला बरं तर वाटतंच पण काही शिकायलाही मिळतं, नवीन संकल्पना कळतात.
त्याच ठिकाणचा किंवा त्याच विषयावर आपण काढलेलाही एखादा छान फोटो असतो.
तर असे सर्व फोटो एका जागी, एका ठिकाणी बघायला मिळावेत यासाठी हा धागा..
जे प्रकाशचित्र आपण देऊ त्या प्रत्येकाबद्दल एखादी आठवण म्हणा, ठिकाणाबद्दल म्हणा, कशा प्रकारे फोटो काढला यावर चार अथवा जास्त ओळीत माहिती दिली तर अति उत्तम.
चांगल्या चांगल्या फोटोग्राफर्सनी काही टीप्स दिल्या, कॅमेराबद्दल, सेटिंग्ज बद्दल माहिती दिली तर सोन्याहून पिवळं..
फोटोग्राफीच्या काही टिप्स देणारी, मायबोलीकर अवल यांच्या Simple Photography ह्या ब्लॉगची लिंक : https://photographyforcommonpeople.blogspot.com/?m=1
तेव्हा चला मायबोलीकरांनो.. आपापली प्रकाशचित्रं इथे द्यायला सुरुवात करा..
नवोदितांच्या चांगल्या फोटोंचं, आठवणींचंही स्वागतच आहे..
मसाई मारा- केनया : निळी जांभळी सायंकाळ..
जंगलातल्या पार्क राऊंडनंतर जंगललॉजवर परतताना संध्याकाळ गडद होत गेली. आणि एक अविस्मरणीय दृश्य डोळ्यासमोर उभं राहिलं;
मसाईमारातला सूर्यास्त.
सर्व साधारणत: आपल्याकडे सूर्योदय आणि सूर्यास्त हे दोन्ही केशरी रंग छटांत होतात पण मसाईमाराच्या स्थानानुसार किंवा काय माहित नाही पण सूर्यास्तावेळी निळ्या रंगाच्या छटा दिसतात.
विस्तीर्ण गवताळ कुरण, घननिळी संध्याकाळ आणि मसाईमारातील Typical अकॅशियाच्या विशिष्ट छत्रीसारख्या (Topiary) आकारामागे मावळणारा सूर्य.
टीप : प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे.
सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
सर्व प्रकाशचित्रे स्वतःची असावीत. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा- https://www.maayboli.com/node/47635?page=4
या धोरणाचे कृपया पालन करावे..
तसेच "ज्यांना मायबोली.सीसी या किंवा अशा उपक्रमात भाग घ्यायचा असेल त्यानी कृपया हा फोटो मी प्रताधिकार मुक्त करत आहे असे फोटोखाली लिहा." अशी वेमांची सूचना आहे..
त्याचा विचार व्हावा..
(मी या धाग्यावरचे माझे प्रचि प्रताधिकार मुक्त करित आहे..)
(No subject)
सर्वच आहाहा एकदम.
सर्वच आहाहा एकदम.
सुर्यास्त बघून मला मावळत्या दिनकरा हे गाणे तोंडात यायचं . आता कुसुंबी, सावळे, निळे, उदे अनंत जांभळे हे येतं तोंडात.
https://www.youtube.com/watch?v=2ozSVM83zY8
ग्रेस ह्यांचे गीत आहे.
सुर्योदयासाठी अजूनही, पुर्वेच्या देवा तुझे सुर्यदेव नाव हे आठवतं.
सर्वांचे सुर्य तेजस्वी
सर्वांचे सुर्य तेजस्वी दिसताहेत पण वावेला तो जरा जास्तच प्रसन्न झालाय असं वाटतं. बंगळूर चं सूर्यबिंब एवढं मोठं कसं आलं? वावे तुझा कॅमेरा काही खास आहे का?
(No subject)
वाह मस्त आहे शेत... मागे
वाह मस्त आहे शेत... मागे सुर्य.. अगदी निसर्गचित्रच जणू
धनुडी झूम भरपूर आहे माझ्या
धनुडी झूम भरपूर आहे माझ्या कॅमेऱ्याला .. त्यामुळे मोठा दिसतोय सूर्य!
सुरेख फोटो मंजूताई!
वाह मंजूताई. क्या बात! सांज
वाह मंजूताई. क्या बात! सांज ये गोकुळी सावळी सावळी..
योगायोग.. फेसबूक मेमरीत एक
योगायोग.. फेसबूक मेमरीत एक वर्षापूर्वीचा सुर्यास्त आला
जपानमधल्या एका बागेत टिपलेला
जपानमधल्या एका बागेत टिपलेला सूर्यास्त...
वा, अप्रतिम
वा, अप्रतिम
आहा..काय सुंदर फोटो आहे!
आहा..काय सुंदर फोटो आहे! बागही फार सुरेख आहे असंं दिसतंय!
धन्यवाद... काईराकुएन
धन्यवाद... काईराकुएन (kairakuen) नावाच्या ठिकाणी काढला आहे... इथला प्लमच्या फुलांचा उत्सव बघायला दरवर्षी गर्दी होते... फोटोतली गुलाबी छटेतली फुलं असलेली झाडं (बहुधा) प्लम (नाही तर चेरी, म्हणजे चेरी ब्लॉसम वाली) आहेत...
त्या पायर्या पण काय मस्त
त्या पायर्या पण काय मस्त आहेत..
गुजरातेत, द्वारका दर्शन
गुजरातेत, द्वारका दर्शन आटोपून कोस्टल रोडने सोमनाथला जाताना, पाय मोकळे करायला एका ठिकाणी थांबलो होतो, अक्षरशः निर्मनुष्य बीच, वाळूवर एक मानवी/ प्राणिज पाऊल उमटलेले नाही, मस्त गार वारे अश्या सगळ्या सेटप मध्ये मस्त कॅमेरा उलट करून वगैरे काढला होता हा फोटो.
सुंदर (जपानी) सूर्यास्त..
सुंदर (जपानी) सूर्यास्त..
गुजराती सूर्यास्त पण खूप छान टिपला आहे.
हो ना.. एकदम 'कहीं दूर जब दिन
हो ना.. एकदम 'कहीं दूर जब दिन ढल जाए' वातावरण आहे!
काईराकुएन (kairakuen) नावाच्या ठिकाणी काढला आहे...
अच्छा! मस्तच.
जेम्स वांड, छान फोटो.
हा परवाचा. गच्चीतून दिसलेला
हा परवाचा. गच्चीतून दिसलेला
मुळशी रोड
मुळशी रोड
नागपूर - अमरावती महामार्ग
जपानी सूर्यास्त फार सुंदर ..
जपानी सूर्यास्त फार सुंदर ..
त्या पायर्या पण काय मस्त आहेत.. >> निरु +111
सर्वांचे अनेक आभार...
सर्वांचे अनेक आभार... मायबोलीवर रजिस्टर होऊन बरेच दिवस झाले असले तरी फार कमी वेळा ऍक्टिव्ह राहायची संधी मिळाली. काल खूप दिवसांनी पुन्हा लॉगिन केल्यावर हा धागा सापडला. प्रचि हा एक जिव्हाळ्याचा आणि हौसेचा विषय असल्याने पोस्ट करायची इच्छा झाली. फोनमध्ये शोधल्यावर जपानमधले आणखी काही सूर्योदय/सूर्यास्त सापडले आहेत, एकेक पोस्ट करत राहेन.
हा आणखी एक सूर्यास्त. या वेळी छोट्याश्या नदीलगत असलेल्या वनराईजवळून...
वा वा, सगळ्या नवीन एंट्रीज
वा वा, सगळ्या नवीन एंट्रीज सुंदरच
मला मोबाईल वरून फोटो अपलोड
मला मोबाईल वरून फोटो अपलोड कसे करायचे ते सांगाल का कुणी? मी या बॉक्सच्या image वर क्लिक केलं की माझ्या खाजगी जागेत जाते, तिथे इमेज सिलेक्ट केल्यावर पुढे इथे कशी अपलोड करायची ते जमत नाहीये
भारी याकीसोबा.. दोन्ही फोटो
भारी याकीसोबा.. दोन्ही फोटो फुल्ल वीएफएक्स ईफेक्ट वॉलपेपर आहेत..
काय कुठला कॅमेरा, सेटींग, कसे टिपावेत फोटो वगैरे एक नवा धागा काढून मार्गदर्शन करा लोकांना
मुग्धटली
मुग्धटली
>>>
जर ॲप वापरत असाल तर फोटो अपलोडला ब्राऊसर वापरून बघा.
एकापेक्षा एक सरस आहेत फोटो..
एकापेक्षा एक सरस आहेत फोटो.. जबरदस्तच एकदम..
एक से एक फोटो ,जपान मधला
एक से एक फोटो ,जपान मधला सुर्यास्त, गुजरातेतील सुर्यास्त भारीच आहेत. मनिम्याउचे फोटो ही छान.
@ऋन्मेऽऽष
प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे आभार...
@ऋन्मेऽऽष
वीएफएक्स ईफेक्ट... हाहा
पूर्वी डिजिटल कॅमेरा, मग DSLR असे प्रयोग करून सध्या सर्व फोटो मोबाईलवर (आयफोन ११) वर काढतो. ३ वर्षांपूर्वी कॅमेरा रिप्लेसमेंट साठी हा फोन घेतला होता आणि अजूनही कॅमेरा ठेवलेल्या बॉक्सला हात लावावासा वाटत नाही.
मी एक हौशी असल्यामुळे मला प्रो लेव्हलचे अनुभव/सल्ले यापैकी काही देता येईलसं वाटत नाही पण आपण सुचवल्याप्रमाणे एखादा धागा काढून पाहतो.
खाली दिलेला फोटो मागच्या महिन्यात पाऊस पडून गेल्यानंतर एकदम वेगळाच संधिप्रकाश पडला असताना घेतला आहे.
याकीसोबा, सुंदर फोटोज्..
याकीसोबा,
सुंदर फोटोज्..
<<काय कुठला कॅमेरा, सेटींग,
<<काय कुठला कॅमेरा, सेटींग, कसे टिपावेत फोटो वगैरे एक नवा धागा काढून मार्गदर्शन करा लोकांना Happy>>
फोटोग्राफीच्या काही टिप्स देणारी, मायबोलीकर अवल यांच्या Simple Photography ह्या ब्लॉगची लिंक : https://photographyforcommonpeople.blogspot.com/?m=1
सर्वच फोटो छान आहेत.
सर्वच फोटो छान आहेत.
याकीसोबा,
जपानचा नवीन धागा काढून,थोडी माहिती देऊन फोटो देता येतील का? फार आवडलेत. बाग आणि नदी अप्रतिम आहेत.
Pages