त्या अलिशान बंगल्यात ती एकटीच होती. संपूर्ण घरावर सुतकी वातावरण पसरले होते. ती पायऱ्या उतरून खाली आली. तिने एकदा भिंतीवरील नवऱ्याच्या फोटोकडे पाहिले. गतकाळातील त्या भयाण आठवणीने तिचं अंग शहारल. पण क्षणात तिने स्वत:ला सावरलं. तिथल्या एका पलंगावर बसली, आणि भूतकाळात हरवली.
शहराच्या कडेचा भाग, अगदी गर्दीचा नाही पण सुनसानही नाही. रात्रीची मात्र जास्त वर्दळ असायची. सर्व गर्दी ट्रक ड्रायव्हर्सची. लांबच्या पल्ल्याच्या गाड्या जाणारा मुख्य रस्ता जवळच होता. फेटे घातलेली, दाढी राखलेली, रगेल पण कळकट माणसे तेथे येत. बाजुलाच जुनाट वस्ती होती. अगदी झोपड्या म्हणता येणार नाही पण पत्र्याची बर्यापैकी बांधलेली घरे होती. बहुतेक जण गोदामात काम करणारे कामगार. समोरच्या रेल्वे यार्डात मालगाड्या येत. तेथे हमालकाम करणारे. खाक्या चड्ड्या आणि बनियन घालून दिवसभर राबल्यावर शिणवटा घालवण्यासाठी रस्त्याच्या उजव्या बाजूला काहीसे आत असलेले रंगरावचे हॉटेल. ऐसपैस. आत बाहेर भरपूर जागा.
गुढ
इयत्ता सातवीचा निकाल लागला होता. अजिंक्य वर्गाबाहेर थांबलेल्या मुलींच्या घोळक्याकडे पाहात उभा होता. तेवढ्यात त्याच्या कानावर काहीतरी ऐकु आले आणि तो थेट पळाला ते शिवमच्या घरी.....
"शिवम....ए शिवम...लवकर बाहेर ये..." तो ओरडला.
" व्वा,मित्रा आलास तु!! आणला का माझा निकाल?लवकर दे.आई यायच्या आत,लपवुन ठेवतो."
" शुभम,तु फक्त माझ्यासोबत चल." अजिंक्य अजुनही धापा टाकत होता.
"अरे पण कुठे ते तरी सांगशील?आणि निकाल कुठे आहे माझा?" शिवम.