संदेहकथा

वेडा

Submitted by ऑर्फियस on 12 November, 2017 - 01:10

शहराच्या कडेचा भाग, अगदी गर्दीचा नाही पण सुनसानही नाही. रात्रीची मात्र जास्त वर्दळ असायची. सर्व गर्दी ट्रक ड्रायव्हर्सची. लांबच्या पल्ल्याच्या गाड्या जाणारा मुख्य रस्ता जवळच होता. फेटे घातलेली, दाढी राखलेली, रगेल पण कळकट माणसे तेथे येत. बाजुलाच जुनाट वस्ती होती. अगदी झोपड्या म्हणता येणार नाही पण पत्र्याची बर्‍यापैकी बांधलेली घरे होती. बहुतेक जण गोदामात काम करणारे कामगार. समोरच्या रेल्वे यार्डात मालगाड्या येत. तेथे हमालकाम करणारे. खाक्या चड्ड्या आणि बनियन घालून दिवसभर राबल्यावर शिणवटा घालवण्यासाठी रस्त्याच्या उजव्या बाजूला काहीसे आत असलेले रंगरावचे हॉटेल. ऐसपैस. आत बाहेर भरपूर जागा.

Subscribe to RSS - संदेहकथा